बाबाची चप्पल

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
15 Apr 2017 - 11:26 am

बाबाची चप्पल

फार तर पन्धरा सोळा वर्षान्चा असेन नसेन. बाबाची चप्पल माझ्या पायाला यायला लागली. मग कधी तरी बाबा घरी असताना बाबाची नजर चुकवून त्यान्ची चप्पल मुद्दाम घालून जाण हा स्वभाव बनला. बाबा चिडायचा म्हणायचे तुझी चप्पल घालून जा म्हणून. पण त्या चिडण्यात ही गम्मत वाटायची. का कोण जाणे पण त्या चपलेच्या स्पर्शात खुप खुप आपले पणा वाटायचा. बाबा सदोदित बरोबर असल्याचा भास व्ह्यायचा. बाबाने रागावून मग स्वताच्या चपले सारखी चप्पल आणून दिली. पण तरीही बाबान्ची चप्पल घालून घेण्यात जी गम्मत होती ती ह्या नव्या चपलेत नव्हती. बाबाला आवडायचे नाही आणि तेच मला आवडायच. परीक्षेला जाताना त्याची चप्पल घालून गेलो की खुप छान वाटायच. अगदी पेपर सोप्पा जायचा.

पाय मोठा झाल्यावर मग ती चप्पल पायाला येइनाशी झाली. तरीही कोम्बून पाय त्यात भरायचो. मग पुढे शिक्षण झाल्यावर नोकरी निमीत्त बाहेर गावी गेल्यावर चपलेचा सन्बध तुटला. अगदीच तुटल्या तुटल्या सारख झाल. बाबा आजारी पडल्यावर मग घरी बाबाच्या चपले जवळ आलो पण मात्र पुन्हा चपलेच्या खेळाची गम्मत येइनाशी झाली. ईस्पीतळाच्या वार्‍या सुरू झाल्या. अनेकदा अतिदक्षता कक्षाच्या बाहेर बाबाची चप्पल असायची. ती परत बाबाच्या पायात यावी म्हणून देवा जवळ प्रार्थना करायचा. काही वेळा देवाने माझी प्रार्थना ऐकलीही. पण पुढे कदाचित देवाला हा चपलेचा खेळ पुढे चालवायचा नसावा. तो पटकन बाबाला घेऊन गेला. खल्लस. पटदिशी खेळ सम्पला. बाबाच्या अन्त्यविधीला देवाला चिडवायला मुद्दाम बाबाची चप्पल घालून गेलो. कदाचित मुद्दाम कदाचित चुकून असेल. बाबा जळताना चप्पल माझ्या पायाशी होती. ती हृदया जवळ यावी म्हणून कवटाळून छातीशी घेतली. तीही लगेच मला बिलगली माझे स्वान्त्वन करायला. काही अश्रु चपलेवर ओघळले काही मनातच राहीले. ते असे कधी कधी बाहेर पडतात. आत्ता सारखे. बाबा गेला पण जाताना आपली चप्पल देउन गेला. वारसा हक्काने ती माझ्या कडे आली.

पुढे चपलेने मला धीर दिला. बाबाची वाचनाची आवड मी लिखाणातून भागवली. चालण्याची आवड मैलोनमैल प्रवास करून भागवली. बडबडण्याची आवड बडबडून भागवली. खाण्याची आवड खाद्य पदार्थान्चे दुकान सुरू करून भागवली. परोपकाराची आवड अनेकाना मदत करून भागवली. आता खर्‍या अर्थाने चप्पल माझ्या पायाला यायला लागली होती.

अनेकदा मी बाबाची चप्पल पायात घालून बाहेर जातो. घरचे ओरडतात पण मी ऐकत नाही. त्याना माझे आणि चपलेचे नाते त्याना माहीत नाही त्याला ते तरी काय करणार? कधी कधी मी कुण्या स्नेह्याकडे जातो. चप्पल त्याच्या घराबाहेर काढतो. स्नेही मग विनोद करतात. म्हणतात. तुझ काय बर आहे. तुझी चप्पल कधीच चोरीली जाणार नाही (मनात: इतकी जुनी पुराणी चप्पल कोण नेणार?) सर्व जण हसतात मी सर्वात मोठ्याने हसतो आणि हळुच म्हणतो ही चप्पल माझ्या बाबाची आहे आणि " In real sense, I stepped into my father's shoes"

केदार साखरदान्डे

व्यक्तिचित्रप्रकटन

प्रतिक्रिया

पैसा's picture

15 Apr 2017 - 12:02 pm | पैसा

......

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Apr 2017 - 12:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

हृद्य मनोगत !

आनन्दा's picture

15 Apr 2017 - 1:38 pm | आनन्दा

.......

फारच हृद्य लिहिले आहे!

संजय पाटिल's picture

16 Apr 2017 - 3:47 pm | संजय पाटिल

फारच हृद्य लिहिले आहे!...

होय...

जव्हेरगंज's picture

16 Apr 2017 - 4:06 pm | जव्हेरगंज

फारच हृद्य लिहिले आहे!

+1

संजय क्षीरसागर's picture

16 Apr 2017 - 6:31 pm | संजय क्षीरसागर

मस्त लिहीलंय .

उपेक्षित's picture

16 Apr 2017 - 8:20 pm | उपेक्षित

वाचताना नकळत डोळे ओलसर झाले... बाकी काय बोलू ?

अनुप ढेरे's picture

20 Apr 2017 - 11:01 am | अनुप ढेरे

हेच बोलतो. खूप हृद्य लिहिलय.

ट्रेड मार्क's picture

20 Apr 2017 - 7:08 pm | ट्रेड मार्क

.......

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2017 - 9:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

.................. सुन्नं........................

किसन शिंदे's picture

16 Apr 2017 - 10:53 pm | किसन शिंदे

फार सुरेख लिहीलंय.

रेवती's picture

17 Apr 2017 - 4:08 am | रेवती

सुरेख लिहिलय.

प्रमोद देर्देकर's picture

17 Apr 2017 - 6:11 am | प्रमोद देर्देकर

मनस्पर्शी लिखाण.

योगी९००'s picture

17 Apr 2017 - 9:57 am | योगी९००

फार छान प्रकारे लिहीलेयं...वाचताना मला माझ्या वडीलांची आठवण झाली.

रायबा तानाजी मालुसरे's picture

20 Apr 2017 - 2:58 pm | रायबा तानाजी मालुसरे

+१

प्रसन्न३००१'s picture

17 Apr 2017 - 11:06 am | प्रसन्न३००१

स्पीचलेस

मूखदूर्बळ's picture

18 Apr 2017 - 10:45 am | मूखदूर्बळ

धन्यवाद :)

मनातले अश्रु शब्दावाटे उमटले इतकेच :(

खटपट्या's picture

18 Apr 2017 - 11:36 am | खटपट्या

मनातील बोललात

अनय सोलापूरकर's picture

26 Apr 2017 - 4:17 pm | अनय सोलापूरकर

बाबा आजारी पडल्यावर मग घरी बाबाच्या चपले जवळ आलो पण मात्र पुन्हा चपलेच्या खेळाची गम्मत येइनाशी झाली. ईस्पीतळाच्या वार्‍या सुरू झाल्या. अनेकदा अतिदक्षता कक्षाच्या बाहेर बाबाची चप्पल असायची. ती परत बाबाच्या पायात यावी म्हणून देवा जवळ प्रार्थना करायचा. काही वेळा देवाने माझी प्रार्थना ऐकलीही. पण पुढे कदाचित देवाला हा चपलेचा खेळ पुढे चालवायचा नसावा. तो पटकन बाबाला घेऊन गेला. खल्लस. पटदिशी खेळ सम्पला. बाबाच्या अन्त्यविधीला देवाला चिडवायला मुद्दाम बाबाची चप्पल घालून गेलो. कदाचित मुद्दाम कदाचित चुकून असेल. बाबा जळताना चप्पल माझ्या पायाशी होती. ती हृदया जवळ यावी म्हणून कवटाळून छातीशी घेतली. तीही लगेच मला बिलगली माझे स्वान्त्वन करायला. काही अश्रु चपलेवर ओघळले काही मनातच राहीले. ते असे कधी कधी बाहेर पडतात. आत्ता सारखे. बाबा गेला पण जाताना आपली चप्पल देउन गेला. वारसा हक्काने ती माझ्या कडे आली.

>> माझा स्वानुभव . :(

अजया's picture

26 Apr 2017 - 6:13 pm | अजया

ह्रदयस्पर्शी लिखाण.

मूखदूर्बळ's picture

1 May 2017 - 9:10 am | मूखदूर्बळ

धन्यवाद _/\_

लेख लिहीताना डोळ्या समोर माझे बाबा येत होते :(

जीते पणी मी त्यान्चे व्यवस्थीत करू शकलो नाही ही सल मनाला कायम टोचत राहील :(

रातराणी's picture

1 May 2017 - 10:05 am | रातराणी

जाम टोचलं :(

बांवरे's picture

2 May 2017 - 6:45 am | बांवरे

हृद्गत पोचले.

झाडांशी निजलो आपण ...

मी-सौरभ's picture

4 May 2017 - 6:39 pm | मी-सौरभ

हृदयस्पर्शी ....

अभ्या..'s picture

4 May 2017 - 6:53 pm | अभ्या..

बापाबद्दल बाप लेखन.
बाबांची चप्पल हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय.
फूटवेअर भारीतले ब्रँडेड पाहिजेत ही सवय मला वडीलांनी लावली पण स्वतः त्यांचा चॉइस एकच. बाटाची ज्युबिली टी पट्टा.
पण ते स्वतःसाठी नवीन चप्पल लवकर विकत घेत नाहीत. ती सवय मला लवकर लागो हीच प्रार्थना.

पाटीलभाऊ's picture

5 May 2017 - 6:01 pm | पाटीलभाऊ

मस्त लिहिलंय

जयंत कुलकर्णी's picture

6 May 2017 - 3:10 am | जयंत कुलकर्णी

छान लिहिले आहे.
माझीही एक आठवण...

इयत्ता तिसरी. किंवा चौथी.

पाचवी निश्चित नाही कारण मी पाचवीत शाळा बदलली होती.

शाळा सरस्वती मंदीर.
मधली सुट्टी झाली आणि मी शाळेच्या पटांगणात आलो. धक्काबुक्कीतून मी दरवाजाकडे चाललो होतो. दरवाजात पांढऱ्या शुभ्र कपड्यात, शर्टाच्या बाह्या कोपऱ्यापर्यंत दुमडलेल्या, चकचकीत बुट घातलेला एक स्मार्ट माणूस पटांगणातील एका मुलाच्या पायातील बुटाची सुटलेली नाडी बांधत होता. उभट चेहरा, थोडे कुरळे केस व टिपिकल फौजी हेअरकट. त्याचा मातीत टेकलेला एक गुडघा त्याची पँट मळवत होता......

माझ्या वडिलांचे मला आठवणारे हे पहिले अंधुकसे रुप......

फादर्स डेच्या निमित्त एक आलेली आठवण.. सगळ्यात जुनी आठवण कुठली असेल म्हणून आठविण्याचा प्रयत्न केला असता ही आठवण पुसटशी आठवली..

जेनी...'s picture

1 Jul 2017 - 4:18 pm | जेनी...

नि:शब्द !