गजावरील राणी

हृषिकेश पांडकर's picture
हृषिकेश पांडकर in जनातलं, मनातलं
11 Apr 2017 - 1:35 pm

परवाच्या दुपारी टळटळीत उन्हात 'पित्तशामक नीरा' घशाखाली सारत असताना किलकिल्या डोळ्यांनी या वाड्याला न्याहळत असताना हे दृश्य दिसले.एप्रिल महिन्याचा दिवस असूनही टांगलेला आकाशकंदील येथे साजऱ्या होणाऱ्या वार्षिक दीपावलीच्या साक्ष देत होता.त्या खाली नजर टाकली आणि आश्चर्य वाटले.
पुण्यातील सगळ्यात जुनी पेठ म्हणून आपण जिचे वर्णन वाचतो ती हि कसबा पेठ.पुणेरी खोचकपणा,टोपी,कोट धोतर आणि अनुनासिक आवाज,तिरकसपणा,ओतप्रोत भरलेला उपहास,पुणेरी पगडी आणि टांगा या गोष्टींचे उगम स्थान आणि पर्यायाने केंद्रबिंदू.छत्रपती वास्तव्यास येऊन गेले,पेशवे सरले,टिळक,गोखले,आगरकर वावरले,त्याबरोबर गोरा साहेबाची इथून परतला आता फक्त जुन्या आठवणी अंगाखांद्यावर मिरवत री-डेव्हलोपमेंटची' वाट बघत असलेले काही जुने वाडे राहिलेले दिवस ढकलत आहेत.
वाड्याच्या माडीला लावलेल्या लोखंडी गजांवर असलेली इंग्लंडच्या राणीची कोरीव प्रतिमा साहेबांच्या पुण्याची आठवण करून देत होती.एकसंध आणि मजबूत कठड्यावर असलेली राणीची प्रतिमा पाहून १५० वर्ष गोऱ्यांनी हुकूमत राखली आणि जाता जाता अनंत ठिकाणी आपली छाप सोडून गेले त्यातीलच हा एक भाग.
गोरे परतून आता ७० वर्ष होतील पण त्यांनी सोडलेल्या या पाऊलखुणा पाहताना वेगळीच मजा येते.असा कधी रिकामा वेळ मिळाला तर एकदा या पुणे ११ किव्वा पुणे ३० च्या जुन्या पुण्यातून पायी फिरा, IT हब किव्वा विद्येचे माहेरघर असणारे हे आताचे पुणे पूर्वीपासूनच गडगंज श्रीमंत होते याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही :)

1

हृषिकेश पांडकर
११-०४-२०१७

रेखाटनअनुभवमत

प्रतिक्रिया

अरे वा, हे डायकास्टचे पॅटर्न वापरायची फॅशन परत आलीय बरंका. फॅब्रिकेशन करणारे लोक आता हे जुन्या टाईपचे डेकोरेटिव्ह्, फ्लोरल आणि व्हिक्टोरिअन स्टाईलचे डायकास्ट पॅटर्न वापरुन गेट, कंपाउंड साठी डिझाइन्स बनवत आहेत.
बाकी हे राणीचे पॅटर्न सोलापुरात लै ठिकाणी पाहिलेले आहे. काही नवलाई नाही त्यात.

मला वाटलं राणी मुखर्जी-चोप्रा हत्तीवरुन साखर वाटत होती का काय

हृषिकेश पांडकर's picture

11 Apr 2017 - 4:21 pm | हृषिकेश पांडकर

आता 'ज' चा उच्चार कसा करायचा हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे ;)

अभ्या..'s picture

11 Apr 2017 - 4:00 pm | अभ्या..

पुणेरी पगडी आणि टांगा या गोष्टींचे उगम स्थान

टांगा पुण्याचे इनोव्हेशन हाय काय?
तरीच. पुणेरी घोडा कुणाच्या बरोबरीने पाय कसा उचलणार म्हणा. ;)

हृषिकेश पांडकर's picture

11 Apr 2017 - 4:12 pm | हृषिकेश पांडकर

एल ओ एल ...
काय कमाल टिपलंय हो ..

अत्रुप्त आत्मा's picture

11 Apr 2017 - 4:48 pm | अत्रुप्त आत्मा

असल्या वाड्यांमधल्या (तसल्याच ) लोकांकडे कामाला जायचा योग नै आलेला दिसत तुमच्या आयुष्यात!
आला,तर परत हा असला लेख नै लिहिणार टुम्ही! ;)

मितान's picture

13 Apr 2017 - 11:36 am | मितान

=)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

11 Apr 2017 - 4:49 pm | अत्रुप्त आत्मा

असल्या वाड्यांमधल्या (तसल्याच ) लोकांकडे कामाला जायचा योग नै आलेला दिसत तुमच्या आयुष्यात!
आला,तर परत हा असला लेख नै लिहिणार टुम्ही! ;)

आषाढ_दर्द_गाणे's picture

11 Apr 2017 - 8:14 pm | आषाढ_दर्द_गाणे

मस्त टिपलंय!

मितान's picture

13 Apr 2017 - 11:37 am | मितान

+११

पैसा's picture

13 Apr 2017 - 11:44 am | पैसा

मस्त!

सिरुसेरि's picture

13 Apr 2017 - 1:20 pm | सिरुसेरि

छान फोटो. वाडा बघुन "कल्हईवाले पेंडसे येथेच राहतात का ?" असा प्रश्न पडला .

नेमकं टिपलंय. अशीही एक 'गजगामिनी'!

वेल्लाभट's picture

13 Apr 2017 - 3:35 pm | वेल्लाभट

सुरेख. जुन्या इमारती बघताना मजाच येते ब्वा.