मनातल्या मनात !!

अर्धवटराव's picture
अर्धवटराव in जनातलं, मनातलं
2 Apr 2017 - 3:17 pm

बरेच दिवस मनाविषयी चार ओळी टंकायची इच्छा होती. पण मन मानत नव्हतं :) आता थोडं मनावर घेतोय.

आजवर मनावर जितका विचार झालाय तेव्हढा कदाचीत कुठल्याच विषयावर झाला नसावा. तत्वज्ञ, कवि, साहित्यीक, वैज्ञानीक, दार्शनीक... किंबहुना अवघी मानवजात या एका विषयाचं गेली कित्येक शतकं चिंतन करतेय. पण मन बालकृष्णासारखं समस्त वैचारीक ब्रह्मांड व्यापुन दशांगुळे उरतच. मनच ते.

साधारणपणे 'भावना' या विषयाला धरुन मनाचा अभ्यास सुरु होतो. 'विचार' आणि/किंवा भावना या दोन घटकांची संगती लावणं हा फार मजेदार विषय आहे. प्रचंड मोठं शास्त्र उभं आहे याचा अभ्यास करायला. अलीबाबाची गुहाच ति. यच्चयावर मानवी व्यवहारांचे धागेदोरे अत्यंत क्लीष्ट, पण तेव्हढेच नेमकेपणाने गुंफलेले आढळतात मनाच्या महावस्त्रात.

आता प्रश्न येतो कि हि भावना म्हणजे नेमकं काय. सोप्या शब्दात सांगायचं तर एक विशिष्ट क्रिया करायला शरीराला सज्ज करण्याची यंत्रणा म्हणजे भावना. जीवशास्त्रं म्हणतं कि प्रेरणेला प्रतिसाद देणं हे सजीवाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. शुद्ध मराठीत आपण त्याला रिस्पॉन्स टु स्टिम्युलस म्हणतो. आहार-निद्रा-भय-मैथुन या प्रेरणा प्रकारांबरहुकूम शरीराने प्रतिक्रीया द्यावी म्हणुन शरीराला एका विशिष्ट अवस्थेत घेऊन जाण्यासाठी जे काहि रासायनीक उपद्व्याव शरीरात होतात त्याला आपण भावना म्हणतो. साधारणपणे हि क्रिया क्षणार्धात होते. संकटाची चाहुल लागली कि हरीण कान टवकारतो, नाग फणा काढतो, सरडा रंग बदलतो, भीमाचे स्नायु फुरफुरतात, धर्मेंद्रच्या जिभेवर कमिने-कुत्ते वगैरे शब्द आपापली पोझीशन घेतात. प्रेरणेची दाहकता, शरीराची घडण व इतर परिस्थितीनुसार या क्रियेची लांबि-रुंदी बदलते. उद्देश मात्रं एकच. रिस्पॉन्स टु स्टिम्युलस.

मनाचा दुसरा घटक म्हणजे विचार. इतर प्राण्यांच्या मानाने मानवाला हे वैचारीक दान अगदी भरभरून देण्यामागे निसर्गाची काय इच्छा असेल कोण जाणे. पण माकडसदृश एका प्राण्याचा मेंदु एका विशिष्ट प्रकारे डेव्हलप झाला. त्या प्राण्याला आपण मानव असं नाव दिलं. शरीराचे इतर उपद्व्याप सांभाळण्यापलिकडे या मानवी मेंदुचं काम तसं बघितलं तर इतर प्राण्यांसारखच आहे. ते काम म्हणजे गणितीय समिकरणं. चित्त्याचा मेंदु भक्षावर फायनल झेप कधि घ्यायची याचं समीकरण मांडतो. एकदा झेप झाली कि भक्ष्य मिळो अथवा न मिळो त्याचे सरकारी बाबुसारखे संध्याकाळचे पाच वाजतात. धृवीय प्राणी याच न्यायाने पोटाचे पेटारे भरुन आपल्या शीतकालीन निद्रेची सोय करते. मोराचे नृत्य असो वा गोगलगाईचा विजेच्या चपळाईने केलेला प्रवास, सर्वांची समीकरणं काहि ठरावीक उद्दीष्टाच्या भोवती अगदी गच्च आवळलेले असतात. मानवाच्या बाबतीत मात्र या समीकरणांच्या जंत्रीचा परिघ फार म्हणजे फारच मोठा असतो. इतका मोठा, कि नेमका कुठल्या उद्दीष्टासाठी हि समीकरणं चालली आहेत हे कळेनासं व्हावं. हा परिघ इतका मोठा व्हायचं कारण म्हणजे मानवी मेंदुला इतर प्राण्यांच्या मानाने काळाचं अफाट भान असणे होय. चित्ता मागच्या-पुढच्या काहि क्षणांचा विचार करुन स्वस्थ बसतो. मानवी मेंदुसाठी अशा मागच्या-पुढच्या संदर्भाला काहिच मर्यादा नाहि. या परिघीय संदर्भांनाच आपण म्हणतो "विचार". या विचारांचं जंजाळ किती खोल असावं याचा काहि थांगपत्ता नाहि.

हा डोलारा सांभाळायला स्मृतीची सोबत असतेच. असं हे भावना आणि विचारांचं कॉकटेल घेऊन मानवी मेंदु आपली करामात दाखवत असतं. त्याची अनेक प्रतलं असतात. कुठली भावना विचारांच्या आश्रयाने समुद्रात बुडालेल्या एखाद्या जहाजाप्रमाणे मेंदुत कुठेतरी पडुन असेल व कधि उफाळुन वर येईल याचा नेम नाहि. विचारांच्या पृष्ठभागावर मेंदु एखादं समीकरण मांडत असेल. ते तसच खालच्या प्रतलांमधे गडप होऊन आपलं उत्तर शोधत बसेल. उत्तर सापडलं कि सरसरुन परत पृष्ठभागावर येऊन "सरप्राइझ" म्हणुन कधि बोंब ठोकेल सांगता येत नाहि. ब्रेनवेव्ह वगैरे प्रकरणं याच सदरात मोडतात.

हे सगळं मनुष्यप्राणी जंगलात रहायचा तोपर्यंत ठीक होतं. निसर्गाने मानवाला पक्षांप्रमाणे पंख दिले नाहि. हत्तीची शक्ती दिली नाहि. सापाचं विष दिलं नाहि. मासोळीची पोहोण्याची क्षमता दिली नाहि. हे सर्व कंपन्सेट करायला म्हणुन कि काय, एक प्रगत मेंदु देऊन टाकला... आणि लोचा झाला ना राव. माणुस झाडामाडांच्या जंगलातुन बाहेर पडला व त्याच्या मेंदुने आपलं स्वतःचं जंगल निर्माण केलं. आता शरीर टिकवायला भावना नामक सिस्टीम जुनीच, पण प्रेरणा निर्माण करणारे घटक मात्रं वैचारीक असं नवीन नाटक सुरु झालं. जंगलात असताना वाघाची डरकाळी ऐकुन भिती नामक भावना धावायची प्रेरणा उत्पन्न करायची. आता ऑफीसात बॉस ओरडला कि हिच भिती धावायला सांगते, पण प्रॉब्लेम असा कि त्याची गरजच नसते. मग आणखी नाटकं सुरु होतात. भावनांचा कंट्रोल काय, विचारांना आवरणं काय, सुख-दु:खांवर रामबाण उपाय काय, मनाला शटडाऊन करणं काय... बरच काय काय.

आपलं जगणं हि अशी मनाशी केलेल्या व्यवहारांची गाथा असते. खरं तर "मनाशी व्यवहार" वगैरे काहि भानगड नसते. कारण आपण आणि मन अशी काहि विभागणीच नसते. मनाची कवाडं आपापसात कुजबुजतात फक्त. पण मनाचा व्यवहार वगैरे म्हटलं कि कसं एकदम फिलॉसॉफीकल वाटतं :)
कोळ्याने स्वतःच जाळं विणाव व आपणच त्रयस्थासारखं त्यात भटकत राहावं असं काहिसं मनाचं होतं. कल्पकता, बुद्धी, भावनांचा कल्लोळ, समीकरणं सोडवताना सतत बदलणार्‍या भुमीका, त्यातनं निर्माण होणार्‍या स्व-आयडेण्टिटी, सुख-दु:खांचे प्रसंग. मग त्यावर उपाय शोधताना इतर प्रश्न निर्माण होणं. असं सगळं मस्तपैकी चाललं असतं. त्यावर खात्रीशीर उपाय काहि सांगता येत नाहि. एक मात्रं नक्की. मनाशी व्यवहार करताना त्याला उगाच चिडवु नये. उदा. प्रसंग जर दु:खाचा असेल तर उगाच मुद्दाम त्याला कुठल्या अवडंबराखाली दाबु नये, कि नकारु नये, किंवा त्याला खोटा ठरवु नये. मनाला त्याचा स्वतःचा मार्ग काढण्याची मोकळीक दिली कि ते बरोबर आपलं आनंदनिदान शोधतच. आळस, अहंकार, भिती, नैराश्य... समस्या काहिही असली तरी शेवटी आहे तो मनाचा स्वतःचा केमीकल लोचा असतो.. त्याचा त्याला निस्तरु द्यावा.
तर सांगायचा मुद्दा असा... मुद्दा वगैरे काहि नाहि. झोप येत नव्हती म्हणुन कळफलक बडवायला घेतला :) . झोपतो आता.

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 Apr 2017 - 3:31 pm | कंजूस

माया राहिली.

यशोधरा's picture

2 Apr 2017 - 3:37 pm | यशोधरा

हं.

पैसा's picture

2 Apr 2017 - 4:40 pm | पैसा

आवडलं

कवितानागेश's picture

2 Apr 2017 - 11:43 pm | कवितानागेश

इज धिस वैचारिक गोंधळ?! ;)

संजय क्षीरसागर's picture

3 Apr 2017 - 7:58 am | संजय क्षीरसागर

इज धिस वैचारिक गोंधळ?! ;)

एका वाक्यात सगळं पकडलंय ! सगळाच गोंधळ आहे.

आणि तो नेमका इथे आहे :

कारण आपण आणि मन अशी काहि विभागणीच नसते. मनाची कवाडं आपापसात कुजबुजतात फक्त. पण मनाचा व्यवहार वगैरे म्हटलं कि कसं एकदम फिलॉसॉफीकल वाटतं :)

याला मनाशी तादात्म्य होणं म्हणतात. म्हणजे घोड्यावर स्वार असलेल्या मालकाचं, घोड्याच्या वेगामुळे त्याच्यावरचं नियंत्रण पूर्णपणे सुटतं. त्याला वाटतं आपण आणि घोडा एकच आहोत. खरं तर मालक आणि घोडा असा फरकच राहात नाही. फक्त चौखुर उधळणारा, बेलगाम, (मनरुपी) घोडाच उरतो !

लेखातलं हे वाक्य फार बोलकं आहे :

भावनांचा कंट्रोल काय, विचारांना आवरणं काय, सुख-दु:खांवर रामबाण उपाय काय, मनाला शटडाऊन करणं काय... बरच काय काय.

घोड्याचा लगाम पूर्णपणे हातातून सुटला की असं होतं. मग घोडा नेईल तिकडं भरकटत फिरण्याशिवाय काही उपाय उरत नाही. याला सायकॉलॉजीत केमिकल लोच्या म्हणतात.

अर्धवटराव's picture

3 Apr 2017 - 11:32 am | अर्धवटराव

गोंधळालेले घोडेस्वार किती आवर्जुन आपला गोंधळ जाहीर करताहेत ;)

संजय क्षीरसागर's picture

3 Apr 2017 - 11:38 am | संजय क्षीरसागर

कारण आपण आणि मन अशी काहि विभागणीच नसते

म्हणजे घोडा आणि मालक एकच झालेत. आता मालकाला घोडा जुमानतच नाही हा गोंधळ लेखातून स्पष्ट होतोयं

अर्धवटराव's picture

3 Apr 2017 - 11:45 am | अर्धवटराव

घोड्याला वाटतय कि कोणितरी स्वार आपल्याला हाकतोय. पण अ‍ॅक्चुली त्याचं धावण त्याच्या स्वतःच्या हातात (नेमकं म्हणायचं तर पायात) आहे. तो धावला काय, थांबला काय, घोडा तो घोडा राहिल.

त्यामुळे लेखात हे वाक्य आलंय :

मनाला त्याचा स्वतःचा मार्ग काढण्याची मोकळीक दिली कि ते बरोबर आपलं आनंदनिदान शोधतच. आळस, अहंकार, भिती, नैराश्य... समस्या काहिही असली तरी शेवटी आहे तो मनाचा स्वतःचा केमीकल लोचा असतो.. त्याचा त्याला निस्तरु द्यावा.

घोडा आणि मालक एकच झाल्यानं, घोड्याचा गोंधळ आपोआप शांत होईल या हताश परिस्थितीत मालक सापडला आहे.

आणि त्या त्रयस्थाकडे आपला कंट्रोल असल्याची गुलामगिरी त्याने स्विकारली आहे. वास्तवीक 'तुझे आहे तुज पाशी' हे घोड्याला कळायला हवं.

१) आपल्याला कुणीतरी त्रयस्थ मालक आहे हा घोड्याचा भास आहे

ज्याचं मनाशी तादात्म्य झालं त्याला स्वतःचा विसर पडतो. थोडक्यात मालकाला स्वतःचा विसर पडतो आणि घोडा हेच सत्य वाटायला लागतं. हा प्रथम चरणातला घोळ.

२) आणि त्या त्रयस्थाकडे आपला कंट्रोल असल्याची गुलामगिरी त्याने स्विकारली आहे.

हा नंबर दोनवर होणारा घोळ. मालक घोड्याचा गुलाम झाल्यानं त्याला आपण गुलामगिरी स्वीकारल्याचा भास होतो . मालकाकडे ताबा असला तर घोड्याला गुलामी वाटणार नाही कारण मालक आहे म्हणून घोडा आहे. घोड्याप्रमाणे मन ही युटिलीटी आहे.

३) वास्तवीक 'तुझे आहे तुज पाशी' हे घोड्याला कळायला हवं.

हा फायनल घोळ ! कळणारे आपण आहोत आणि ज्या बद्दल कळतंय (विचार, भावना, मूडस) ते मन आहे. पण मालक इतका मनशरण आहे की त्याला, मनालाच स्वतःच्या स्वातंत्र्याचा उलगडा होईल असं वाटतंय.

अर्धवटराव's picture

3 Apr 2017 - 3:37 pm | अर्धवटराव

ज्याचं मनाशी तादात्म्य झालं त्याला स्वतःचा विसर पडतो.

एखादी गोष्टीची आठवण असणं, विसरणं, एखादी गोष्ट समजणं, न समजणं हे सर्व जैवशास्त्रीयदृष्ट्या मेंदुचे, मानसशास्त्रीयदृष्ट्या मनाचे खेळ आहेत. मनाव्यतिरीक्त (किंवा मेंदु व्यतिरीक्त) अशी दुसरी कुठली यंत्रणा नाहि जिला या सगळ्या भानगडीत पडायची गरज असते. मनाचं तादात्म्य त्याच्या भावनांशी, विचारांशी असतं/नसतं. सगळा मनाचाच व्यापार आहे.

मालकाकडे ताबा असला तर घोड्याला गुलामी वाटणार नाही कारण मालक आहे म्हणून घोडा आहे. घोड्याप्रमाणे मन ही युटिलीटी आहे.

मालकपण आणि गुलामगिरी या दोन्ही मनाच्याच प्रॉपर्टी आहेत. स्वतः मनच या दोन्हि भुमीका वठवतो. या दुहेरी भुमीकेचा त्रास सहन करणारं मनच असतं. या दोन्हि आपल्याच भुमीका आहेत हे शहाणपणदेखील मनालाच येऊ शकतं. हे शहाणपण आल्यानंतरची शांती अनुभवणारंसुद्धा मनच असतं. मन हि फक्त युटीलिटी वाटणं हा मनाचा स्कोप न कळल्याचा परिणाम आहे. मन स्वत:च युटीलिटी आणि युटीलायझर दोन्हि आहे. हे दोन्हि मनाचेच कंपार्टमेण्ट्स आहेत.

कळणारे आपण आहोत आणि ज्या बद्दल कळतंय (विचार, भावना, मूडस) ते मन आहे.

एखादी गोष्ट कळण्याची गरज आणि शक्यता फक्त मनाच्या बाबतीत संभवते. कळणारे ते आपण आणि ज्याबद्दल कळतय ते मन हि मनाची विभागणी मनच करतं. "केवळ विचार, भावना, मूड्स एव्हढं म्हणजेच मन" असं वाटणं हा मनाचा परिघ न कळल्याचा परिणाम आहे. विचार, भावना, मूड्स या सर्वांचं सृजन मनातच होतं. त्यांचा अनुभव देखील मनालाच येतो. त्यांचं विसर्जन देखील मनातच होतं.

पण मालक इतका मनशरण आहे की त्याला, मनालाच स्वतःच्या स्वातंत्र्याचा उलगडा होईल असं वाटतंय.

स्वातंत्र्य-पारतंत्र्य, शरण-अशरण हे सर्व मनाचेच भाव आहेत. त्यांचा अनुभव, उलगडा मनालाच होतो.

संजय क्षीरसागर's picture

3 Apr 2017 - 3:57 pm | संजय क्षीरसागर

१) एखादी गोष्टीची आठवण असणं, विसरणं, एखादी गोष्ट समजणं, न समजणं हे सर्व जैवशास्त्रीयदृष्ट्या मेंदुचे, मानसशास्त्रीयदृष्ट्या मनाचे खेळ आहेत.

एखादी गोष्ट आठवत नाही हे ज्याला कळतं ते आपण आहोत आणि ज्या यंत्रणेला ती आठवत नाही ते मन आहे.

२) मालकपण आणि गुलामगिरी या दोन्ही मनाच्याच प्रॉपर्टी आहेत.

गुलामगिरी ही मानवी कल्पना आहे ती मनात निर्माण होते. आणि ज्याचं स्वातंत्र्य हरवतं त्याला आपण गुलाम वाटू लागतो. मनाचा उपयोग करणारा कायम स्वतंत्र असतो पण सगळा कारभार मनाच्या हातात गेल्यामुळे स्वातंत्र्य आणि गुलामी या मनाच्याच अवस्था वाटतात.

३) एखादी गोष्ट कळण्याची गरज आणि शक्यता फक्त मनाच्या बाबतीत संभवते.

हे म्हणजे आयटी क्षेत्रातल्या व्यक्तीनं `कंप्युटरलाच सगळं कळतं' असा विनोद करणं आहे !

४) स्वातंत्र्य-पारतंत्र्य, शरण-अशरण हे सर्व मनाचेच भाव आहेत. त्यांचा अनुभव, उलगडा मनालाच होतो.

मनाशी संपूर्ण तादात्म्यामुळे, गोंधळाचा परीघ व्यापक झाल्याचं लक्षण !

एखादी गोष्ट आठवत नाही हे ज्याला कळतं ते आपण आहोत आणि ज्या यंत्रणेला ती आठवत नाही ते मन आहे.

परत तिच चूक. मनाने स्वतःची केलेली "आपण" आणि "मन" अशी विभागणी. वस्तुतः हे विसरणं, आठवणं, कळणं, न-कळणं, सर्व काहि एकाच मनाच्या (किंवा मेंदुच्या) परिघात होत असतं.

गुलामगिरी ही मानवी कल्पना आहे ती मनात निर्माण होते. आणि ज्याचं स्वातंत्र्य हरवतं त्याला आपण गुलाम वाटू लागतो. मनाचा उपयोग करणारा कायम स्वतंत्र असतो पण सगळा कारभार मनाच्या हातात गेल्यामुळे स्वातंत्र्य आणि गुलामी या मनाच्याच अवस्था वाटतात.

ज्याला ऊन जाणवतं त्यालाच सावली जाणवते. ज्याला भूक जाणवते त्यालाच तृप्ती जाणवते. ज्याला गुलामगिरी जाणवते त्यालाच स्वातंत्र्याची जाणिव होऊ शकते. "मनाचा उपयोग" हि भ्रामक कल्पना मनानेच निर्माण केलेली असते. वास्तवीक मनाची एक फॅकल्टी मनाच्या दुसर्‍या फॅकल्टीचा उपयोग करत असते, इंटरॅक्ट करत असते. हे सर्व काहि एकाच मनाच्या परिघात होत असतं.

हे म्हणजे आयटी क्षेत्रातल्या व्यक्तीनं `कंप्युटरलाच सगळं कळतं' असा विनोद करणं आहे !

डोळे बघतात, पाय चालतात, कान ऐकतात. पण हे सर्व एकाच शरीराचे अवयव आहेत. त्यांना भिन्न व्यक्ती मानणं हा महाविनोद आहे.

मनाशी संपूर्ण तादात्म्यामुळे, गोंधळाचा परीघ व्यापक झाल्याचं लक्षण !

मनाच्या स्कोपचं अत्यंत संकुचीत आकलन झाल्यावर आणखी काय होणार.

संजय क्षीरसागर's picture

4 Apr 2017 - 10:42 am | संजय क्षीरसागर

१) डोळे बघतात, पाय चालतात, कान ऐकतात. पण हे सर्व एकाच शरीराचे अवयव आहेत. त्यांना भिन्न व्यक्ती मानणं हा महाविनोद आहे.

पाय हालतायंत हे पायांना कसं कळणार ? गेलेल्या व्यक्तीचे डोळे उघडे असतील तर त्याला दिसेल काय ? कान हे एकण्याचं माध्यम आहे. कानांना ऐकू येत नाही. व्यक्ती कानांनी ऐकते.

कान, डोळे, पाय, मन या भिन्न व्यक्ती आहेत असा माझ्या प्रतिसादातून अर्थ काढणं ही कन्फ्युजनची परमसीमा आहे. एकाच व्यक्तीला लाभलेल्या त्या भिन्न फॅकल्टीज आहेत. आणि फॅकल्टीजपेक्षा व्यक्ती कायम वेगळी आहे.

अर्थात, थोडा जरी विचार केला तरी प्रकाश पडायची शक्यता आहे. उदा. कान असूनही बहिरा आपल्याला ऐकू येत नाही हे जाणतो. `कानांनी ऐकू येत नाही हे कानांना समजेल' ही वस्तुस्थिती नसून भ्रामक कल्पना आहे.

२) वास्तवीक मनाची एक फॅकल्टी मनाच्या दुसर्‍या फॅकल्टीचा उपयोग करत असते, इंटरॅक्ट करत असते. हे सर्व काहि एकाच मनाच्या परिघात होत असतं. वस्तुतः हे विसरणं, आठवणं, कळणं, न-कळणं, सर्व काहि एकाच मनाच्या (किंवा मेंदुच्या) परिघात होत असतं.

तोच गोंधळ कायम आहे. ज्याप्रमाणे पायांना आपण चालतोयं हे कळू शकत नाही त्याचप्रमाणे मनातल्या क्रिया मनाला समजणं असंभव आहे.

मनाच्या स्कोपचं अत्यंत संकुचीत आकलन झाल्यावर आणखी काय होणार.

जो `पाय चालतायंत हे पायांना समजतं' अशा भ्रामक कल्पनेत असेल, तो `स्वतःलाच मन समजतो'. तस्मात, ही सर्व पोस्ट मानसिक गोंधळाची झलक आहे. अर्थात हे सार्वत्रिक आहे त्यामुळे मनाशी तादात्म्य पावलेल्यांना ते योग्य वाटणार !

अर्धवटराव's picture

4 Apr 2017 - 11:58 am | अर्धवटराव

पाय हालतायंत हे पायांना कसं कळणार ... आपण चालतोयं हे कळू शकत नाही त्याचप्रमाणे मनातल्या क्रिया मनाला समजणं असंभव आहे.

परत तेच. क्रिया घडणारं मन आणि त्या समजणारे दुसरच कोणितरी हे मनाचं पार्टीशन अगदी पक्कं झालय. म्हणजे कसं, कि क्रिया घडायला एक मन (किंवा मेंदु) नामक यंत्रणा आणि ते कळायला दुसरीच यंत्रणा. या दुसर्‍या यंत्रणेला सगळं "आपोआप" कळतं. असंही म्हणावं कि "आपल्याला" घडणार्‍या क्रिया समजायला कुठल्या यंत्रणेची आवष्यकता नाहि वगैरे... कवि कल्पना म्हणुन ते ठीक आहे. वास्तवाशी त्याचा संबंध नाहि. सर्वकाहि एकाच मनाच्या परिघात घडतय.

जो `पाय चालतायंत हे पायांना समजतं' अशा भ्रामक कल्पनेत असेल, तो `स्वतःलाच मन समजतो'!

अर्थाचा अनर्थ कसा करायचा याचं उत्तम उदाहरण. पायांचं चालणं, कानांचं ऐकणं वगैरे सर्व एकाच मन नामक यंत्रणेचं काम आहे हा मूळ मुद्दा दिला सोडुन. असो.

अर्थात हे सार्वत्रिक आहे त्यामुळे मनाशी तादात्म्य पावलेल्यांना ते योग्य वाटणार !

जे मन स्वतःलाच नाकारतय त्याच्याकडुन अजुन काय अपेक्षा करणार.

पहिल्यांदा हा लफडा सोडवा मग बाकीचा गोंधळ आपोआप दुरुस्त होईल :

क्रिया घडायला एक मन (किंवा मेंदु) नामक यंत्रणा आणि ते कळायला दुसरीच यंत्रणा. या दुसर्‍या यंत्रणेला सगळं "आपोआप" कळतं.

ज्याला कळतंय तो एकच आहे.

नीट समजून घ्या :

चालणं ही क्रिया पायांनी घडते, ती मेंदूपर्यंत पोहोचते आणि देह चालतोयं हे आपल्याला कळतं .

आतापर्यंत तुमचा गोंधळ `पाय चालतायंत हे पायांना समजतं' असा होता. आता (माझे प्रतिसाद वाचून) तो थोडा दुरुस्त झाला आणि आता तुम्ही `मेंदूला कळतं' इथपर्यंत पोहोचलात.

"आपल्याला" घडणार्‍या क्रिया समजायला कुठल्या यंत्रणेची आवष्यकता नाहि वगैरे... कवि कल्पना म्हणुन ते ठीक आहे. वास्तवाशी त्याचा संबंध नाहि. सर्वकाहि एकाच मनाच्या परिघात घडतय.

पायांचं चालणं, कानांचं ऐकणं वगैरे सर्व एकाच मन नामक यंत्रणेचं काम आहे हा मूळ मुद्दा दिला सोडुन

तुम्ही काय लिहीतायं हे आता बहुदा तुम्हालाही समजेनासं झालंय.

पुन्हा नीट वाचा :

क्रिया आपल्याला घडत नाही. उदा. आपण चालण्याची इच्छा करतो :

(१) ही इच्छा मेंदूमार्फत पायांप्रत पोहोचते (२) पाय चालतात आणि मेंदू ती प्रक्रिया नियंत्रित करतो (३) मग देह चालतो आणि (४) देह चालला आहे हे आपल्याला समजतं !

तुमच्या आकलनात सगळं `एकाच मनाच्या परिघात' घडतंय. म्हणजे इतका गोंधळ आहे की पाय, मेंदू, ज्याला तुम्ही मन समजतायं ते गौडबंगाल, सगळं एकच आहे आणि .... जाणणारा (म्हणजे खुद्द आपण) बेपत्ता आहे !

जे मन स्वतःलाच नाकारतय त्याच्याकडुन अजुन काय अपेक्षा करणार.

मन हेच सर्वस्व आणि मनाशी फुल्ल तादात्म्य झाल्याचं हे लक्षण आहे. मला यापुढे प्रतिसाद देऊन वेळ घालवता येणार नाही. त्यामुळे प्रतिसादावरच्या तुमच्या उपप्रतिसादाला उत्तर मिळण्याची शक्यता कमी. तरीही या पोस्टवर इतरत्र कुठे गोंधळ दिसला (जो ठायीयीयी दिसेलच) की प्रकट होईन.

अर्धवटराव's picture

5 Apr 2017 - 12:21 am | अर्धवटराव

मनाचं पार्टीशन ? हे आता नवीन कुठून काढलं !

नवीन ? तुम्ही मनाचं "आपण" आणि "मन" अशी विभागणी करता हा तुमचा प्रॉब्लेम अगदी सुरुवातीपासुन डिस्कस होतोय ना? विसरलात कि काय ?

आतापर्यंत तुमचा गोंधळ `पाय चालतायंत हे पायांना समजतं' असा होता. आता (माझे प्रतिसाद वाचून) तो थोडा दुरुस्त झाला आणि आता तुम्ही `मेंदूला कळतं' इथपर्यंत पोहोचलात.

सर्व अवयवांच्या क्रिया ज्याप्रमाणे एकाच यंत्रणेच्या परिघात होतात तसाच मनाचा स्कोप सर्वसमावेषक आहे याचं उदाहरण म्हणुन दिलं होतं. अर्थात, तुम्ही तुमच्या बुद्धीने काय काढायचे ते निश्कर्ष काढालाच. "माझे प्रतिसाद वाचुन" हि कमेण्ट विशेष आवडली. तरि मी विचार करतच होतो अजुनपर्यंत स्व-आरतीचं ताट कसं अवतरलं नाहि ते.

तुम्ही काय लिहीतायं हे आता बहुदा तुम्हालाही समजेनासं झालंय.

स्वारी येतेय मूळ स्वभावावर...

(४) देह चालला आहे हे आपल्याला समजतं !

देह चालवला पाहिजे हि गरज ओळखणं, देह चालवायला एक्च्युअल फिजीकल कंट्रोल्स ट्रिगर करणं, देह चालला आहे याचं रिडींग घेणं, गरज पडल्यास त्यात करेक्शन्स करणं... हे सर्व एकाच यंत्रणेअंतर्गत होत असतं (जीवशास्त्र दृष्ट्या नर्व्हस सिस्टीम, मानसशास्त्र दृष्ट्या मन). होप यु अंडरस्टॅण्ड धिस टाईम.

तुमच्या आकलनात सगळं `एकाच मनाच्या परिघात' घडतंय. म्हणजे इतका गोंधळ आहे की पाय, मेंदू, ज्याला तुम्ही मन समजतायं ते गौडबंगाल, सगळं एकच आहे आणि .... जाणणारा (म्हणजे खुद्द आपण) बेपत्ता आहे !

हाच तुमचा गोंधळ आहे. चालण्याची प्रेरणा उत्पन्न होण्यापासुन ते क्रिया पूर्ण होतपर्यंत सर्व काहि एकाच यंत्रणेअंतर्गत होत आहे, इथे कुणीच बेपत्ता वगैरे नाहि. मूळ लेखातला 'रिस्पोन्स टु स्टिम्युलस' पुन्हा एकदा वाचा असं सुचवलं असतं. ते तुम्ही करणार नाहि हे ठाऊक आहे.

मन हेच सर्वस्व आणि मनाशी फुल्ल तादात्म्य झाल्याचं हे लक्षण आहे.

मन म्हणजे नेमकं काय हे अजीबात न कळल्याची निशाणी ठाई ठाई दिसतेय. असो.

मला यापुढे प्रतिसाद देऊन वेळ घालवता येणार नाही. त्यामुळे प्रतिसादावरच्या तुमच्या उपप्रतिसादाला उत्तर मिळण्याची शक्यता कमी. तरीही या पोस्टवर इतरत्र कुठे गोंधळ दिसला (जो ठायीयीयी दिसेलच) की प्रकट होईन.

आप अपने मन हे हाथो मजबूर हो साहिब. मनाने म्हटलं प्रतिसा द्या, तुम्ही दिला. डाळ शिजत नाहि असं दिसल्यामुळे मनाने म्हटलं प्रतिसाद देणं थांबवावे, तुम्ही ते थांबवाल. परत तुमचं मन कुठल्याश्या कारणाने उचकेल आणि तुम्ही कळफलक हाती घ्याल. अहो, समस्त मानवजात मनाच्या तालावर नाचते. तुमचा तरी कसा अपवाद असेल.

कवितानागेश's picture

4 Apr 2017 - 1:10 am | कवितानागेश

घोडा बाहेर काढला काय लपवला काय?! :)

अर्धवटराव's picture

4 Apr 2017 - 2:04 am | अर्धवटराव

असो. त्यालाही आपले भ्रम जपायचा अधिकार असतोच ना :ड

संजय क्षीरसागर's picture

4 Apr 2017 - 10:53 am | संजय क्षीरसागर

घोडा बाहेर काढला काय लपवला काय?! :)

घोडा हे मनाचं रुपक आहे. पण घोडा बाहेर आलेला नाही, मानसिक गोंधळ पोस्टमधून बाहेर आला आहे. थोडक्यात, नॉट द हॉर्स, बट द कॅट इज आऊट ऑफ द बॅग !

अशा परिस्थितीत लेखक अंतःप्रेरणेवर लेखन करणार होते ! ते तर कॉस्मिक इंटेलिजन्सशी अनुसंधान आहे. इथेच इतका गोंधळ तर त्या विषयाचं काय होईल याची कल्पना करा.

ज्योति अळवणी's picture

3 Apr 2017 - 7:19 am | ज्योति अळवणी

छान आहे

शिवोऽहम्'s picture

5 Apr 2017 - 4:33 am | शिवोऽहम्

च‌तुर‌ घोडा

संजय क्षीरसागर's picture

5 Apr 2017 - 11:07 am | संजय क्षीरसागर

१) देह चालवला पाहिजे हि गरज ओळखणं, देह चालवायला एक्च्युअल फिजीकल कंट्रोल्स ट्रिगर करणं, देह चालला आहे याचं रिडींग घेणं, गरज पडल्यास त्यात करेक्शन्स करणं... हे सर्व एकाच यंत्रणेअंतर्गत होत असतं (जीवशास्त्र दृष्ट्या नर्व्हस सिस्टीम, मानसशास्त्र दृष्ट्या मन). होप यु अंडरस्टॅण्ड धिस टाईम.

२) शुद्ध मराठीत आपण त्याला रिस्पॉन्स टु स्टिम्युलस म्हणतो. आहार-निद्रा-भय-मैथुन या प्रेरणा प्रकारांबरहुकूम शरीराने प्रतिक्रीया द्यावी म्हणुन शरीराला एका विशिष्ट अवस्थेत घेऊन जाण्यासाठी जे काहि रासायनीक उपद्व्याव शरीरात होतात त्याला आपण भावना म्हणतो.

३) कारण आपण आणि मन अशी काहि विभागणीच नसते.

आता या तुमच्या फंड्यावरुन मागे सरकू नका !

या तीन्हींचा एकत्रित अर्थ एवढाच की व्यक्तीला स्वेच्छाच नाही ! व्यक्ती ही प्रेरणेच्या हातातलं बाहुलं आहे. क्रिया सुरु होणं, घडणं आणि थांबणं मनाच्याच स्वाधिन आहे !

यालाच तर मनाशी तादात्म्य म्हणतात ! किंवा सायकॉलॉजीत संपूर्ण केमिकल लोच्या. नो सेल्फ विल. एवरी थींग इज जस्ट अ स्टिम्युलस अ‍ॅक्टीवेशन. मानवेतर सर्व सजीव एक्झॅक्टली असेच जगतात. फरक इतकाच त्यांच्याकडे स्वेच्छेची कल्पनाच नसते आणि मानवाचा गौरव हा की त्याला स्वेच्छा असते आणि तो स्टिम्युलसला स्वेच्छेनं रिस्पाँंड करतो. भोजनाच्या प्रेरणेवर उपवासानं, व्यसनाच्या इच्छेवर निग्रहानं, प्रणयाच्या प्रेरणेवर संयामानं.... तुम्हाला याची कल्पनाच दिसत नाही.

आता केमिकल लोच्या काय झालायं ते लक्षात येणं अवघड नाही.

अर्धवटराव's picture

5 Apr 2017 - 1:12 pm | अर्धवटराव

पहिले ३ मुद्दे आत्ता वाचलेत तुम्ही ? म्हणजे आतापर्यंतचा सगळा प्रतिसाद उपद्व्याप लेख न वाचताच केलात कि काय ?

या तीन्हींचा एकत्रित अर्थ एवढाच की व्यक्तीला स्वेच्छाच नाही ! व्यक्ती ही प्रेरणेच्या हातातलं बाहुलं आहे. क्रिया सुरु होणं, घडणं आणि थांबणं मनाच्याच स्वाधिन आहे !

अगदी बरोबर. मनाच्या परिघाबाहेरची एक तरी 'स्वेच्छा' दाखवुन द्या.

मानवेतर सर्व सजीव एक्झॅक्टली असेच जगतात. फरक इतकाच त्यांच्याकडे स्वेच्छेची कल्पनाच नसते आणि मानवाचा गौरव हा की त्याला स्वेच्छा असते आणि तो स्टिम्युलसला स्वेच्छेनं रिस्पाँंड करतो. भोजनाच्या प्रेरणेवर उपवासानं, व्यसनाच्या इच्छेवर निग्रहानं, प्रणयाच्या प्रेरणेवर संयामानं.... तुम्हाला याची कल्पनाच दिसत नाही.

ओह्ह... तुमचं बेसीक कन्फ्युजन हे आहे तर. भोजनाची इच्छा हि शरीराची आणि उपवास करणं हि "आपली" असा भेद करताय का तुम्ही ? व्यसनाची इच्छा मनाची आणि त्याचा निग्रह कराणारे "आपण" असं वाटतय का तुम्हाला ? या फार सिंपल सायकोलॉजील केस स्टडी आहेत. मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे मानवी मनाचे रिस्पॉन्स टु स्टिम्युलस आधारीत समीकरणांचा परिघ फार अफाट आहे. एकाच वेळी अनेक प्रेरणांना रिस्पॉन्स देण्याचे, त्यांचे रूळ बदलण्याचे कॅल्क्युलेशन मानवी मन अगदी सहज करु शकतं. भूक लागली, मी हॉटेलात गेलोय. तिथे एखादी आयटम दिसली, मी जेवणाचा ऑर्डर द्यायचे सोडुन तिला पटवायचे प्लॅन बनवायला लागलो. आता तिच्या घराबाहेर गाडी पार्क करुन तिची आतुरतेने वाट बघतोय, आणि सोबतच धूम्रकांडीचे वलय काढतोय. ति बाहेर आल्याबरोबर धूम्रकांडी फेकुन देतो आणि गाडीच्या आरशात बघुन परत आपले केस सावरतो... किती सहज तत्कालीन प्रेरणांविरुद्ध क्रिया करायचे निर्णाय घेतले मनाने. खरं तर याला लिटरली "प्रेरणांविरुद्ध" असं नाहि म्हणता येत. काय करावे आणि काय करु नये याचे अनेक थ्रेड्स मनात चालले असतात. त्याचं एक कलेक्टीव्ह रिजल्टण्ट डिसिजन म्हणजे आपली तत्कालीन क्रिया होय. मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे हे जे अनेक थ्रेड्स मनात चालले असतात त्यातल्या प्रत्येकावर अ‍ॅक्शन घेतली जात नाहि. त्यातले काहि थ्रेड्स मनाच्या तळाशी जाऊन बसतात (दे आर नॉट किल्ड, ते फक्त डॉर्मण्ट होतात) आणि ते परत उफाळुन वर येऊ शकतात. माणसाचं मन असं प्रेरणांविरुद्ध कसं वागु शकतं, किंवा ऑबव्हिस वाटणार्‍या प्रेरणांविपरीत वागण्याच्या प्रेरणा मनात कशा तयार होतात याचा फार सखोल विचार मानसशास्त्रात होतो. त्यात भूक लागलेली असताना मुद्दाम उपवास करुन भूक कंट्रोल करणं, व्यसनाला निग्रहाने ( अ‍ॅक्चुली तो देखील 'मनोनिग्रह' असतो... मनाचा निग्रह) जिंकणं वगैरे सकारात्म बाबी असतात तसच सॅडीझम, आईने तान्ह्या मुलाला दूध न पाजणं वगैरे नकारात्मक बाबींचा अभ्यास देखील होतो. उपवास, निग्रह, संयम... हे सर्व मनाचेच खेळ आहेत.

थोडक्यात काय, तर तत्कालीन प्रेरणांविरुद्ध वागण्याची मनाची किमया म्हणजे मनाला कंट्रोल करणारं किंवा मनाचा युटिलिटी म्हणुन वापर करणारं कुणीतरी "आपण" असा काहिसा तुमचा गैरसमज झालेला आहे. तुम्ही मनाचा फार संकुचीत अर्थ घेता. तुम्हाला वाटतं त्यापेक्षा मनाचा परिघ फार विषाल आहे... त्यात "आपण" आणि "मन" अशा भिंती पाडण्यात काहि अर्थ नाहि.

१) आळस, अहंकार, भिती, नैराश्य... समस्या काहिही असली तरी शेवटी आहे तो मनाचा स्वतःचा केमीकल लोचा असतो.. त्याचा त्याला निस्तरु द्यावा.

याचा अर्थ व्यसनाधिन व्यक्तीचं मनंच व्यसन सोडवेल अशी वाट बघायची ! नैराश्यातून मनंच मार्ग काढेल अशी खुळी कल्पना करायची, आळसावर मन मात करेल अश्या भ्रमात राहायचं..... कारण तुमच्या धारणेत मनावेगळं या जगात काहीही नाही.

२) मनाच्या परिघाबाहेरची एक तरी 'स्वेच्छा' दाखवुन द्या.

मनाच्या पलिकडे जी आहे तिलाच स्वेच्छा म्हणतात. आणि स्वेच्छा मनापेक्षा वेगळी आणि बलवत्तर हवी. ती स्वेच्छा करु शकणारे आपण आहोत. अर्थात, तुम्हाला स्वतःचा पत्ताच नाही कारण तुमच्या लेखी सर्व ऑटोमॅटिक आहे !

३) उपवास, निग्रह, संयम... हे सर्व मनाचेच खेळ आहेत.

इतका भारी ज्योक मनात पुरता फसलेलाच करु जाणे. जो स्वेच्छेनं जगतो तोच उपवास, निग्रह, संयम करु शकतो. स्वेच्छा मनात प्रकट होते पण ती मनाची गुलाम नसते, ती मनाच्या माध्यमातून ऑटोमेटेड रिसपाँस बदलू शकते.

तुम्हाला स्वेच्छेचा पत्ताच नाही ! स्वेच्छा म्हणजे आपली इच्छा, तो मनात प्रकट होणारा स्टिम्युलस नाही, तर त्या स्टिम्युलसला नक्की काय रिस्पाँन्स द्यावा हे ठरवणारी आपली इच्छा !

मनाशी तादात्म्य झालेल्याला स्वेच्छा नसते. तो फक्त मनाच्या व्यावहारांचा गुलाम असतो आणि लेखात म्हटल्याप्रमाणे मनच सर्वातून वाट काढेल या भ्रमात कायम राहातो. कारण त्याला मनावेगळ्या स्वतःचा परिचयच नसतो.

अर्धवटराव's picture

5 Apr 2017 - 9:31 pm | अर्धवटराव

याचा अर्थ व्यसनाधिन व्यक्तीचं मनंच व्यसन सोडवेल अशी वाट बघायची ! नैराश्यातून मनंच मार्ग काढेल अशी खुळी कल्पना करायची, आळसावर मन मात करेल अश्या भ्रमात राहायचं..... कारण तुमच्या धारणेत मनावेगळं या जगात काहीही नाही.

हो तर. मनावरचं मळभ दूर व्हायला मनालाच प्रयत्न करायला लागतात. ति जबाबदारी दुसर्‍या कुणाची आहे या भ्रमात जगणं म्हणजे आणखी सत्यानाश करणं आहे.

मनाच्या पलिकडे जी आहे तिलाच स्वेच्छा म्हणतात. आणि स्वेच्छा मनापेक्षा वेगळी आणि बलवत्तर हवी. ती स्वेच्छा करु शकणारे आपण आहोत. अर्थात, तुम्हाला स्वतःचा पत्ताच नाही कारण तुमच्या लेखी सर्व ऑटोमॅटिक आहे !

कुठल्याही इच्छेचं उगम, कार्य, विसर्जन, सगळं काहि मनात होतं.. तिला स्वेच्छा, कच्छा, पिच्छा असं काहिही म्हणा. मनाच्या पलिकडे म्हणुन कुठलीच इच्छा वावरु शकत नाहि.

इतका भारी ज्योक मनात पुरता फसलेलाच करु जाणे. जो स्वेच्छेनं जगतो तोच उपवास, निग्रह, संयम करु शकतो. स्वेच्छा मनात प्रकट होते पण ती मनाची गुलाम नसते, ती मनाच्या माध्यमातून ऑटोमेटेड रिसपाँस बदलू शकते.

हा तुमचा लोचा अगोदर प्रकट झालेला आहे. परस्पर भिन्न वाटणार्‍या प्रेरणा मनात कशा वावरतात हे न कळल्यामुळे तुमची "मनाला कंट्रोल करणारा कुणीतरी" अशी धारणा फार घट्ट झाली आहे. शास्त्रीय भाषेत कॉन्शन, सबकॉन्शस वगैरे मनाच्या अवस्थांचा अभ्यास उपलब्ध आहे. ओटोमेटॅड रिस्पॉन्स, कॉन्शस रिस्पॉन्स, रिफ्लेक्स अ‍ॅक्शन वगैरे सर्व घडामोडींचं सखोल वर्णन त्यात मिळेल. परस्पर भिन्न प्रेरणांवर काम करणारं मनच असतं. ते त्याचच कार्यक्षेत्रं आहे.

तुम्हाला स्वेच्छेचा पत्ताच नाही ! स्वेच्छा म्हणजे आपली इच्छा, तो मनात प्रकट होणारा स्टिम्युलस नाही, तर त्या स्टिम्युलसला नक्की काय रिस्पाँन्स द्यावा हे ठरवणारी आपली इच्छा !

स्टिम्युलसला रिस्पॉन्स काय द्यावा, देऊ कि नये, कसा द्यावा, हे ठरवणारं इंजीन मनातच एक्झीक्युट होत असतं. एकाच अजस्त्र यंत्रणेचे वेगवेगळे विभाग आहेत ते. तिथे मन वेगळं आणि "आपण" वेगळं अशी काहि भानगड नसते.

मनाशी तादात्म्य झालेल्याला स्वेच्छा नसते. तो फक्त मनाच्या व्यावहारांचा गुलाम असतो आणि लेखात म्हटल्याप्रमाणे मनच सर्वातून वाट काढेल या भ्रमात कायम राहातो. कारण त्याला मनावेगळ्या स्वतःचा परिचयच नसतो.

स्वतःच्या अनेक आयडेण्टिटी बनवणं, त्यात कन्फ्युज होणं, प्रसंगी स्प्लीट पर्स्नॅलिटी सारखे आजार होणं हे सर्व मनाच्या बाबतीत घडु शकतं. "मनावेगळे आपण" असा भास मनच तयार करतं. मानसोपचारतज्ञांकडे अशा केसेस येणं फार कॉमन आहे. "मनावेगळे आपण" अशी कल्पना करुन त्यात सुख शोधणं हि मनाचीच किमया आहे. त्यातनं बाहेर पडायचं अथवा नाहि हे देखील मनच ठरवेल.

१) मनावरचं मळभ दूर व्हायला मनालाच प्रयत्न करायला लागतात. ति जबाबदारी दुसर्‍या कुणाची आहे या भ्रमात जगणं म्हणजे आणखी सत्यानाश करणं आहे.

मनाला डिप्रेशनमधून बाहेर काढायला व्यक्ती सक्षम व्हावी लागते. तुमच्या लेखी ती मनाचीच जवाबदारी आहे ! कारण मनापेक्षा दुसरा तुम्हाला कुणी मंजूरच नाही. हे सत्यानाशाचं खरं कारण आहे !

२) मनाच्या पलिकडे म्हणुन कुठलीच इच्छा वावरु शकत नाहि.

व्यक्तीनं इच्छा करणं आणि ती मनात प्रकट होणं या एकामागोमाग होणार्‍या घटना आहेत. पण तुम्हाला व्यक्ती आणि मन एकच वाटतंय हा खरा लोच्या आहे.

३) परस्पर भिन्न वाटणार्‍या प्रेरणा मनात कशा वावरतात हे न कळल्यामुळे तुमची "मनाला कंट्रोल करणारा कुणीतरी" अशी धारणा फार घट्ट झाली आहे.

उलट आहे ! परस्परविरोधी विचार अनियंत्रितपणे मनात वावरत असल्यानं, मनावरचा ताबा गेलेल्या व्यक्तीला असं वाटू शकतं.

४) स्टिम्युलसला रिस्पॉन्स काय द्यावा, देऊ कि नये, कसा द्यावा, हे ठरवणारं इंजीन मनातच एक्झीक्युट होत असतं. एकाच अजस्त्र यंत्रणेचे वेगवेगळे विभाग आहेत ते. तिथे मन वेगळं आणि "आपण" वेगळं अशी काहि भानगड नसते.

हे पुन्हा मनाशी तादात्म्य पावल्याचं आणखी एक उदाहरण !

५) स्वतःच्या अनेक आयडेण्टिटी बनवणं, त्यात कन्फ्युज होणं, प्रसंगी स्प्लीट पर्स्नॅलिटी सारखे आजार होणं हे सर्व मनाच्या बाबतीत घडु शकतं. "मनावेगळे आपण" असा भास मनच तयार करतं. मानसोपचारतज्ञांकडे अशा केसेस येणं फार कॉमन आहे.

सायकॉलॉजीचा शून्य अभ्यास वरील विधानातून स्पष्ट दिसतो. व्यक्तीमत्त्वाचा दुभंग मन सैरभैर झाल्यामुळे होतो. मनावर नियंत्रण करु शकणारी व्यक्ती मनाच्या काह्यात गेल्यामुळे दुभंग होतो. वेडा माणूस आपोआप शहाणा होईल इतकी व्यर्थ अपेक्षा तुमच्या सारखी व्यक्तीच करु जाणे !

६) "मनावेगळे आपण" अशी कल्पना करुन त्यात सुख शोधणं हि मनाचीच किमया आहे. त्यातनं बाहेर पडायचं अथवा नाहि हे देखील मनच ठरवेल.

खालच्या प्रतिसादात तुम्ही जो रिमार्क मारला आहे तो तुमच्या वरील विधानाला लागू होतो. मनात अडकलेली व्यक्ती स्प्लीट पर्सनॅलिटीची शिकार होते. तिला मनाबाहेर आपलं अस्तित्वच नाही असा भ्रम होतो. अशी मनाच्या महालात हरवलेली व्यक्ती मनालाच सर्वस्व समजू लागते आणि मनाबरहुकूम वागू लागते. अशा व्यक्तीला एकसंध व्यक्तीमत्त्व नसतं. अश्या व्यक्तीला स्वतःशीच धड डिल करता येत नाही, दुसर्‍यांची तर बातच सोडा !

अर्धवटराव's picture

5 Apr 2017 - 11:55 pm | अर्धवटराव

मनाला डिप्रेशनमधून बाहेर काढायला व्यक्ती सक्षम व्हावी लागते. तुमच्या लेखी ती मनाचीच जवाबदारी आहे ! कारण मनापेक्षा दुसरा तुम्हाला कुणी मंजूरच नाही. हे सत्यानाशाचं खरं कारण आहे !

व्यक्ती सक्षम व्हावी लागते हे फार सुपरफिशियल वाक्य आहे. डिप्रेशनवर मात करणारी सकारात्मक प्रेरणा तीव्र करणे हि अ‍ॅक्चुअल थेरपी आहे. कुठलाही मानसोपचारतज्ञ हेच करतो. सकारात्मक प्रेरणा तीव्र करायला जर मन तयार नसेल तर नो बडी कॅन हेल्प इट. मनाच्याच खोल प्रतलांमधे दडलेल्या सकारात्मक प्रेरणा प्रज्वलीत होऊन वर आल्या कि डिप्रेशन समाप्त होतं. मन कितीही डिप्रेस असलं तरी या डिप्रेशनमधुन बाहेर पडण्याची त्याची ऊर्मी, कितीही क्षीण का असेना, जोपर्यंत जागृत असते तोपर्यंत बिमारी ठीक होनेकी संभावना बनी रेहेती है. हि ऊर्मी तीव्र करायच्या पद्धती अनेक असु शकतात. पण त्यावर अल्टीमेट अ‍ॅक्शन मनालाच घ्यायला लागते.

व्यक्तीनं इच्छा करणं आणि ती मनात प्रकट होणं या एकामागोमाग होणार्‍या घटना आहेत. पण तुम्हाला व्यक्ती आणि मन एकच वाटतंय हा खरा लोच्या आहे.

इच्छा उत्पना होणार्‍या युनीटला कुणीतरी भिन्न व्यक्ती समजणं हा तुमच्या मनाचा प्रॉब्लेम आहे. इच्छा उत्पन्न होणं, त्या नोटीस करणं/ न करणं , त्यावर अ‍ॅक्शन घेणं/न घेणं... सर्व काहि एकाच यंत्रणेच्या परिघात चालतं.

उलट आहे ! परस्परविरोधी विचार अनियंत्रितपणे मनात वावरत असल्यानं, मनावरचा ताबा गेलेल्या व्यक्तीला असं वाटू शकतं.

मन म्हणजे केवळ विचार, भावना, एव्हढच समजणार्‍याला असं वाटणं सहाजीक आहे. मनाचा थांग लागणं तसंही कठीण आहे. इथे तर पक्क्या भिंती उभारल्या आहेत मनात.

हे पुन्हा मनाशी तादात्म्य पावल्याचं आणखी एक उदाहरण !

मनाचा स्कोप संकुचीत केल्याचं लक्षण. प्रॉब्लेम कंटिन्यु होतोय.

सायकॉलॉजीचा शून्य अभ्यास वरील विधानातून स्पष्ट दिसतो. व्यक्तीमत्त्वाचा दुभंग मन सैरभैर झाल्यामुळे होतो. मनावर नियंत्रण करु शकणारी व्यक्ती मनाच्या काह्यात गेल्यामुळे दुभंग होतो. वेडा माणूस आपोआप शहाणा होईल इतकी व्यर्थ अपेक्षा तुमच्या सारखी व्यक्तीच करु जाणे !

जिथे मनालाच नकारल्या जातय तिथे काय डोंबलाची सायकोलॉजी डिस्कस करणार. वेड्या माणासाला कुणीतरी "आपण" प्रकट होऊन शहाणा करेल हि थेरपी किती हुच्च म्हणायची... मनाचं पार्टीशन केल्यामुळे असं वाटणं स्वाभावीक आहे म्हणा.

खालच्या प्रतिसादात तुम्ही जो रिमार्क...अश्या व्यक्तीला स्वतःशीच धड डिल करता येत नाही, दुसर्‍यांची तर बातच सोडा !

ज्याने आपलच मन आरपार स्प्लीट केलय त्याला अशी चीड येणं सहाजीक आहे.

संजय क्षीरसागर's picture

6 Apr 2017 - 11:47 am | संजय क्षीरसागर

१) व्यक्ती सक्षम व्हावी लागते हे फार सुपरफिशियल वाक्य आहे. डिप्रेशनवर मात करणारी सकारात्मक प्रेरणा तीव्र करणे हि अ‍ॅक्चुअल थेरपी आहे.

सगळ्या चर्चेत तुम्ही स्वतःलाच नाकारतायं ! आणि स्व-विस्मरण हाच सगळ्या मनोरुग्णतेचा उगम आहे. जगात फक्त एकच गोष्ट नाकारता येत नाही आणि ती म्हणजे `मी आहे' ! कारण मी नाही म्हणायला सुद्धा मी हवाच !

२) जिथे मनालाच नकारल्या जातय तिथे काय डोंबलाची सायकोलॉजी डिस्कस करणार. वेड्या माणासाला कुणीतरी "आपण" प्रकट होऊन शहाणा करेल हि थेरपी किती हुच्च म्हणायची... मनाचं पार्टीशन केल्यामुळे असं वाटणं स्वाभावीक आहे म्हणा.

तुमच्या तर्काचा पुरता बाजा वाजलायं, मन कुणी नाकारलंय ? मी मन नाकारत नाहीये, तुम्ही स्वतःला नाकारतांय आणि हीच गंभीर चूक मनोरुग्ण अवस्थेला कारणीभूत होते.

आता हे नीट वाचा :

वेड लागण्याचं कारणंच स्व-विस्मरण आहे आणि स्व-विस्मरणाचं कारण कमालीचा मानसिक गोंधळ आहे.

थोडक्यात, वेड्याला जोपर्यंत स्वतःची जाणीव होत नाही तोपर्यंत तो मनाच्या काह्यातच राहाणार. दुसरा कुणी प्रकट होण्याचा प्रश्नच नाही. वेड्याला स्वतःचं भान येण्याचा प्रश्न आहे .

३) ज्याने आपलच मन आरपार स्प्लीट केलय त्याला अशी चीड येणं सहाजीक आहे.

मला रागवायचं काहीच कारण नाही. मी स्वतःप्रत येऊन जमाना झालायं. मन माझं घंटा काही करु शकत नाही. इट इज माय युटिलीटी पण मन म्हणजे तुमचं सर्वस्व !

आता शांतपणे वाचा म्हणजे उलगडा होईल :

एखाद्या व्यक्तीचा (किंवा समूहाचा) पुरता बाजा वाजवायचा असेल तर त्या व्यक्तीचं ब्रेन वॉशिंग केलं जातं. उदाहरणार्थ अतीरेकी तयार करतांना `धर्मासाठी कुर्बान व्हा' (किंवा ज्यूंनमुळे तुमचा सत्यानाश झाला) असा भंपक विचार मनात खोलवर रुजवला जातो. ती प्रक्रिया इतकी नेटानं आणि अहोरात्र केली जाते की अतीरेक्याला धर्मापुढे आपली जिंदगी तुच्छ वाटायला लागते (किंवा समूह बलिदानाला तत्पर होतो).

या सगळ्या प्रक्रियेची फक्त एकच किमया आहे : व्यक्ती किंवा समूहाला स्व-विस्मरण घडवणं ! एकदा स्व-विस्मरण झालं की अतीरेकी कोणताही सारासार विचार न करता, फुल पेट्रोल भरलेलं विमान, स्वतःसकट वर्ल्ड ट्रेड सेंटरवर धडकवतो.... आणि हिटलर स्वतःच्या सत्तालालसेपोटी आख्ख्या जगाला वेठीला धरुन अभूतपूर्व संहार घडवू शकतो.

तुमची परिस्थिती अजून तरी ठीक दिसते. पण चुकीच्या धारणा आणि डोकं भंजाळवणारं काहीबाही सायकॉलॉजीचं वाचन थांबवलं नाही तर मनाचा गुंता न सुटण्यासारखा होऊन बसेल.

स्व-च्या दिपकाशिवाय मनाच्या गूढ महालात प्रवेश करणं धोक्याचं आहे. तुम्ही तर हातातला दिवा विझवून प्रवासाला निघालात !

अर्धवटराव's picture

7 Apr 2017 - 12:01 am | अर्धवटराव

सगळ्या चर्चेत तुम्ही स्वतःलाच नाकारतायं ! आणि स्व-विस्मरण हाच सगळ्या मनोरुग्णतेचा उगम आहे. जगात फक्त एकच गोष्ट नाकारता येत नाही आणि ती म्हणजे `मी आहे' ! कारण मी नाही म्हणायला सुद्धा मी हवाच !

स्वतः नकारणं, स्व-विस्मरण वगैरे काहि नाहि. "मी-पणा" हा मनाचा अहंभाव आहे. तो मनापासुन भिन्न नाहि. अहंभाव मनाच्या इतर भाव-भावनांपासुन भिन्न असणं वेगळं आणि आपण मनापेक्षा भिन्न. मनाला कंट्रोल वगैरे करायचं म्हटलं तरी देखील इच्छा लागते व इच्छेचं उगमस्थानच मुळी मन आहे. मनाला स्प्लीट करणं हे मनोरुग्णतेचं कारण असु शकतं. इतरही कारणं असतील... कल्पना नाहि.

मला रागवायचं काहीच कारण नाही. मी स्वतःप्रत येऊन जमाना झालायं. मन माझं घंटा काही करु शकत नाही. इट इज माय युटिलीटी पण मन म्हणजे तुमचं सर्वस्व !

तुमच्या प्रतिसादावरुन वाटलं तुम्ही चिडलाय म्हणुन तसं टंकलं. प्रत्यक्ष काय सिच्युएशन आहे कल्पना नाहि. तुमच्या मनाचा अहंभाव फार सघन झालाय व तो इतर भाव-भावनांना हावी होतोय.. हे डेफिनेटली शक्य आहे. पण हा अहंभाव मनाचीच प्रॉपर्टी आहे. अहंभाव प्राथमीक व इतर भावभावना दुय्यम असं कहिसं झाल्यामुळे तुम्हाला वाटतय कि तुम्ही मनाला कंट्रोल करताय... पण हे सर्व एकाच मनाच्या परिघात चाललय हे लक्षात घ्या. कुठल्याही इच्छेचं प्रोसेसींग मनातच होतं. मनाला कंट्रोल करायची इच्छा देखील मनातच एक्झीक्युट होते. तिथे मनाबाहेरचं अ‍ॅस सच काहि नाहि.

एखाद्या व्यक्तीचा (किंवा समूहाचा) ...अभूतपूर्व संहार घडवू शकतो.

अगदी नेमका प्रॉब्लेम पकडला आहे. आपण म्हणजे कुणीतरी मनाला (किंवा मेंदुला) कंट्रोल करणारे कुणीतरी सुप्रीम आहोत अशी हिटलरी धारणा विनाश घडवु शकते, मनातल्या सुख-दु:खांना सामोरे जाण्याऐवजी त्याला कंट्रोल करुन, मारुन-मुरकुटुन स्वर्गप्राप्ती करायची इच्छा घातक ठरु शकते.

तुमची परिस्थिती अजून तरी ठीक दिसते. पण चुकीच्या धारणा आणि डोकं भंजाळवणारं काहीबाही सायकॉलॉजीचं वाचन थांबवलं नाही तर मनाचा गुंता न सुटण्यासारखा होऊन बसेल.!

काऴजी दाखवल्याबद्दल धन्यवाद. माझे टंकनश्रम काहिबाही वाचन वगैरे करुन घडलेले नाहित... विवेकबुद्धीला जे दिसतय, समजतय ते टंकतो तुमच्याबाबतीत काय होईल मला माहित नाहि.

स्व-च्या दिपकाशिवाय मनाच्या गूढ महालात प्रवेश करणं धोक्याचं आहे. तुम्ही तर हातातला दिवा विझवून प्रवासाला निघालात !

स्व-चा दिपक कधि विझु शकत नाहि. ति मनाचीच एक प्रॉपर्टी आहे.

संजय क्षीरसागर's picture

7 Apr 2017 - 11:12 am | संजय क्षीरसागर

त्यामुळे सॉल्लीड गोंधळ होतोयं, बघा :

१) आपण म्हणजे कुणीतरी मनाला (किंवा मेंदुला) कंट्रोल करणारे कुणीतरी सुप्रीम आहोत अशी हिटलरी धारणा विनाश घडवु शकते, मनातल्या सुख-दु:खांना सामोरे जाण्याऐवजी त्याला कंट्रोल करुन, मारुन-मुरकुटुन स्वर्गप्राप्ती करायची इच्छा घातक ठरु शकते.

आपण कचरा आहोत, आपण म्हणजे कुणीच नाही हा न्यूनगंड हिटलरला , आपण जगातली सर्वोच्च व्यक्ती आहोत हे सिद्ध करायला प्रवृत्त करतो. ही स्व-विस्मरणाची परिसीमा आहे. तीच मनाच्या काह्यात नेते. तुमच्या धारणेतला मनालाच सर्वस्व मानणारा अशा गुंत्यात सापडतो कारण त्याला सोडवणारा मनाबाहेरचा कुणी उरतच नाही.

स्व-गवससेला कायम आनंदी असतो. तो बुद्धासारखा शांत असतो. त्याला झेनमधे `नो माइंड' म्हणतात. नो माइंड याचा अर्थ नो मेंटल अ‍ॅक्टिवीटी. संपूर्ण शांतता !

मनालाच सर्वस्व मानणारा जन्मोजन्म घालवून सुद्धा त्या अवस्थेला येऊ शकणार नाही कारण मनाच्या कोलाहालाच त्यानं सर्वस्व मानलंय !

मनाला मारुन-मुटकून स्वर्गप्राप्ती वगैरे कल्पना केवळ बालीश आहेत. त्या दोनच गोष्टी दर्शवतात : सायकॉलॉजीचं अज्ञान आणि अध्यात्मिक अंधार !

२) अहंभाव मनाचीच प्रॉपर्टी आहे. अहंभाव प्राथमीक व इतर भावभावना दुय्यम असं कहिसं झाल्यामुळे तुम्हाला वाटतय कि तुम्ही मनाला कंट्रोल करताय...

अहंकार हा न्यूनगंडाचाच सुधारीत प्रकार आहे पण निदान त्याला सपोर्ट करायला मागे काही तरी कर्तृत्व असावं लागतं. त्यामुळे तो परवडला. चुकीचं अध्यात्मिक आकलन फक्त एकच शिकवतं, दुसरा आपल्यापेक्षा बरा दिसला की त्याला अहंकारी म्हणायचं ! वास्तविकात स्वतःला मन आणि मनालाच सर्वस्व मानणं हाच अहंकार (अहं - आकार) आहे. पण सगळीकडेच गोंधळ म्हटल्यावर इथे वेगळी अपेक्षा नाही.

३) स्व-चा दिपक कधि विझु शकत नाहि. ति मनाचीच एक प्रॉपर्टी आहे.

स्वला `मनाची प्रॉपर्टी' मानणारा स्वचा काय उजेड पाडणार ? त्याचा स्व केव्हाच विझलायं ! मन ही स्वची प्रॉपर्टी आहे आणि स्व सार्वभौम आहे त्याच्या पलिकडे काही नाही.

आपण कचरा आहोत,...तुमच्या धारणेतला मनालाच सर्वस्व मानणारा अशा गुंत्यात सापडतो कारण त्याला सोडवणारा मनाबाहेरचा कुणी उरतच नाही.

हिटलरला स्व-विस्मरणाची परिसीमा नव्हे तर केवळ स्व-स्मरणाची बाधा झाली होती. त्याच्यातला 'मी' अत्यंत घातक अवस्थेप्रत तीव्र झाला होता. मनाची सर्व कोमलता, विवेक, सारासार विचार, जळुन राख केली त्याच्या 'स्व' ने. मनापासुन तोडणारी अशी स्व-आयडेंटीटी हिटलरचा आणि जगाचा घात करुन गेली. तसं हिटलरच्या आयुष्यावर, एकुण 'कर्तुत्वावर' लोक पीएचडी करतात. तो असा चार ओळीत मांडायचा विषय नाहि.
तुमचा देखील तोच प्रॉब्लेम आहे. (मी तुम्हाला हिटलर वगैरे म्हणत नाहिए... फक्त एक साम्यता दाखवतोय). तुम्ही स्वतःला मनापासुन तोडताय. हे विभाजन व्हर्चुअल आहे, सत्य नाहि. तुम्ही म्हणताय तसा मनापासुन तुटलेला 'मी' मानवी जीवनाला अर्थ प्राप्त करुन देणार्‍या मनापासुन विभक्त होऊन (इन वर्स्ट कंडीशन) केवळ आत्मघात करु शकतो.

अहंकार हा न्यूनगंडाचाच सुधारीत प्रकार आहे पण निदान त्याला सपोर्ट करायला मागे काही तरी कर्तृत्व असावं लागतं. त्यामुळे तो परवडला. चुकीचं अध्यात्मिक आकलन फक्त एकच शिकवतं, दुसरा आपल्यापेक्षा बरा दिसला की त्याला अहंकारी म्हणायचं !

अहंभाव आणि अहंकार यात मूलभूत फरक आहे. दुसर्‍याला चुक ठरवायची आत्यंतीक घाई मुद्द्याचं नीट आकलनच होऊ देत नाहि.

स्वला `मनाची प्रॉपर्टी' मानणारा स्वचा काय उजेड पाडणार ? त्याचा स्व केव्हाच विझलायं !

स्वतःला सतत जजमेण्टल पोझीशनमधे ठेवणं हा देखील स्व ला मनापासुन तोडल्याचा परिणाम आहे. जिथे विनाकारण मनालाच जज केल्या जातय तिथे इतरांची काय कथा.

मन ही स्वची प्रॉपर्टी आहे आणि स्व सार्वभौम आहे त्याच्या पलिकडे काही नाही.

स्व पलिकडे काहि नाहि हि घसरगुंडीची सुरुवात आहे. मनाच्या सर्व मंगल्याचं, सौंदर्याचं अधिष्ठान तोडुन पुढे निघालेला कोरडा स्व केवळ किव करण्याच्या लायकीचा उरतो. असो.

संजय क्षीरसागर's picture

7 Apr 2017 - 6:56 pm | संजय क्षीरसागर

बुटांच्या लेसनं स्वतःला उचलायचा प्रयत्न करतोयं !

एखाद्या गोष्टीचं अवलोकन करण्यासाठी ते करणारा विषयवस्तूपेक्षा वेगळा हवा इतपत बेसिक माहिती तरी असायला हवी. तुमचं सायकॉलॉजिचं एकूण ज्ञान वरील प्रतिसादातून उघड होतं.

१) मनापासुन तोडणारी अशी स्व-आयडेंटीटी हिटलरचा आणि जगाचा घात करुन गेली.

खरा, मनावेगळा स्व न गवसलेल्याला, मन सांगेल तसा खोटा स्व एस्टॅब्लिश करावा लागतो ! ही हिटलरची शोकांतिका आहे. पण तुम्हाला ती कळण्याची सुतराम शक्यता नाही कारण मनावेगळा स्व तुम्हाला माहितीच नाही.

अहंभाव आणि अहंकार यात मूलभूत फरक आहे.

तुम्हाला शब्दांचे अर्थही नीट माहिती नाहीत ! दोन्ही शब्दांचा एकच अर्थ : मनाशी तादात्म्य !

जिथे विनाकारण मनालाच जज केल्या जातय तिथे इतरांची काय कथा.

हे नेहेमीचं रडगाणं बदला ! मनाला `जज' करणं कुठून काढलं ? मनाच्या सीमांविषयी चर्चा चालू आहे. तुमचं मनापलिकडे अस्तित्वच नाही त्यामुळे तसं वाटतंय.

स्व पलिकडे काहि नाहि हि घसरगुंडीची सुरुवात आहे.

स्व हाच सर्व विश्वाचा आधार आहे. तो सर्वव्यापी आणि कायम आहे. तो कृष्णाचा, माझा, तुम्हाला (पत्ता नसला तरी) तुमचा आणि सर्वांचा एकच आहे ! याला अद्वैत म्हणतात पण तुम्हाला ते समजण्याची शक्यता शून्य आहे.

अर्धवटराव's picture

7 Apr 2017 - 9:07 pm | अर्धवटराव

एखाद्या गोष्टीचं अवलोकन करण्यासाठी ते करणारा विषयवस्तूपेक्षा वेगळा हवा इतपत बेसिक माहिती तरी असायला हवी. तुमचं सायकॉलॉजिचं एकूण ज्ञान वरील प्रतिसादातून उघड होतं.

अवलोकन करणारे आणि अवलोकनाचा विषय मांडणारे, असे दोन्ही थ्रेड्स मनातच वावरत असतात. तुम्ही चुकीच्या अध्यात्मीक कल्पनेने भारावुन जाऊन त्यांना वेगवेगळ्या डबड्यात बसवलं आहे.

खरा, मनावेगळा स्व न गवसलेल्याला, मन सांगेल तसा खोटा स्व एस्टॅब्लिश करावा लागतो ! ही हिटलरची शोकांतिका आहे. पण तुम्हाला ती कळण्याची सुतराम शक्यता नाही कारण मनावेगळा स्व तुम्हाला माहितीच नाही.

मनाला अत्यंत संकुचीत केल्याचा परिणाम परत उफाळुन आला आहे.

तुम्हाला शब्दांचे अर्थही नीट माहिती नाहीत ! दोन्ही शब्दांचा एकच अर्थ : मनाशी तादात्म्य !

आता मराठीच्या बाबतीत जजमेण्टल भुमीका घेणं सुरु केलय. मुद्द्यांचं आकलन करायच नाहि असं ठरवल्यावर इतर करण्यासारखं काहि उरतच नाहि.

हे नेहेमीचं रडगाणं बदला ! मनाला `जज' करणं कुठून काढलं ? मनाच्या सीमांविषयी चर्चा चालू आहे. तुमचं मनापलिकडे अस्तित्वच नाही त्यामुळे तसं वाटतंय.

आपल्या मनाच्या भिंतींना सघन केल्यामुळे आपण मन त्याच्याबाहेर अशी काहितरी धारणा केलेली आहे. त्याचं वारंवार प्रत्यंतर येतय.

स्व हाच सर्व विश्वाचा आधार आहे. तो सर्वव्यापी आणि कायम आहे. तो कृष्णाचा, माझा, तुम्हाला (पत्ता नसला तरी) तुमचा आणि सर्वांचा एकच आहे ! याला अद्वैत म्हणतात पण तुम्हाला ते समजण्याची शक्यता शून्य आहे.

अद्वैतावर आपल्याशी चर्चा करण्याची आमची हिम्मत नाहि. माणसाला जाणवणारं, न जाणावणारं हे संपूर्ण विश्वच एक सिंगल युनीट आहे. थोडा कॉमनसेन्स असणार्‍या कुणालाहि हे कळेल. पण ज्याची मन आणि आपण इथपासुन द्वैताची सुरुवात होते त्याच्याशी अद्वैत विषयावर चर्चा करण्यात काहि पॉईण्ट नाहि.

संजय क्षीरसागर's picture

8 Apr 2017 - 1:14 pm | संजय क्षीरसागर

`मी आहे' हे जगातलं एकमेव नाकारता न येणारं वाक्य आहे. कारण मी नाही म्हणायला सुद्धा मी हवाच !

तुम्ही `मी नाही' म्हणून दाखवा. म्हणजे इथे तर तोंडघशीच पडाल. पण जिथे आहात तिथे, मनातल्या मनात सुद्धा तुम्ही तसं म्हणू शकत नाही.

आता प्रामाणिकपणे काय झालं याचं उत्तर द्या !

तुमच्यापुढे दोन पर्याय आहेत :

१) उत्तर न देणं : पण याचा अर्थ मनावेगळा `मी' आहे. तुम्ही अप्रामाणिकपणे ते मान्य करत नाही इतकंच.

२) `मी आहे' हे मनंच म्हणतंय ! असा स्टँड घेणं .

पण त्याचा अर्थ मी सुरुवातीला म्हणालो तोच होईल : तुम्ही स्वतः मनाशी तदृप झालेले आहात ! जसं लोक शरीरालाच स्वतः समजातात तसं तुम्ही मन म्हणजेच मी समजतायं. तुम्हाला स्वतःचाच विसर पडलेला आहे.

`मी आहे' हे जगातलं एकमेव नाकारता न येणारं वाक्य आहे. कारण मी नाही म्हणायला सुद्धा मी हवाच !

तुम्ही `मी नाही' म्हणून दाखवा. म्हणजे इथे तर तोंडघशीच पडाल. पण जिथे आहात तिथे, मनातल्या मनात सुद्धा तुम्ही तसं म्हणू शकत नाही.

मूळ समस्या मी-आहे किंवा मी-नाहि अशी नसुन "मी मनाला कंट्रोल करणारा कुणीतरी" अशी मनाची दुभंग अवस्था आहे. मन आत्मभावाला नाकारत नसुन आत्मभाव मनाला नाकारतोय. बाकी ते तोंडघाशी पडाल वगैरे... जाऊ देत.

आता प्रामाणिकपणे काय झालं याचं उत्तर द्या !

समोरचा व्यक्ती आपल्याशी अप्रामाणीकपणे वागेल अशी सतत शंका का येत असते तुमच्या मनात ?

१) उत्तर न देणं : पण याचा अर्थ मनावेगळा `मी' आहे. तुम्ही अप्रामाणिकपणे ते मान्य करत नाही इतकंच.

अप्रामाणीकपणा... असो.

२) `मी आहे' हे मनंच म्हणतंय ! असा स्टँड घेणं .

पण त्याचा अर्थ मी सुरुवातीला म्हणालो तोच होईल : तुम्ही स्वतः मनाशी तदृप झालेले आहात ! जसं लोक शरीरालाच स्वतः समजातात तसं तुम्ही मन म्हणजेच मी समजतायं. तुम्हाला स्वतःचाच विसर पडलेला आहे.

काय गंमत आहे बघा. मी मनाबाहेरचा कुणीतरी आहे हे एकमेव सत्य असेल तर स्वःचा विसर पडणं अशक्य आहे. एखाद्या गोष्टीचं स्मरण असणं, विस्मरण होण, समजणं, न समजणं हे मनाच्या बाबतीत होऊ शकतं. मी मनाबाहेरचा कुणीतरी कंट्रोलर असेल तर मनाचं कुठलंही स्मरण-विस्मरण मला माझं विस्मरण करुन शकत नाहि. "तुम्हाला स्वतःचाच विसर पडलेला आहे." असं जेंव्हा तुम्ही म्हणता तेंव्हा हा स्वतः जो आहे तो मनातच असायला लागेल, अन्यथा त्याची विस्मरणाची शक्यताच उरत नाहि...कुठल्याच परिस्थीतीत. हा मनाबाहेरचा 'मी' मनात उतरल्यामुळे स्वतःला विसरतो वगैरे सुद्धा चुकीचं आहे. जी गोष्ट मनाबाहेरची आहे त्यावर मन प्रभाव टाकु शकत नाहि. आणि जर मन त्यावर प्रभाव टाकु शकत असेल तर ति गोष्ट मनाच्याच इको-सिस्टीमचा भाग आहे, मनाच्याच परिघातली आहे.

नदी पात्रातलं एखादं बेट नदीचं पाणि उतरलं कि कोरडं होतं. पाणि चढलं कि ते परत ओलं होतं. नदीबाहेरच्या जमीनीला ओलं-कोरडं व्हायची शक्यताच नसते. नदी दुथडी भरुन वाहात असली काय, कोरडी ठण्ठणीत पडली काय, नदीबाहेरची जमीन त्यापासुन अलिप्त आहे, ति नदीच्या कह्यात जाऊ शकत नाहि. स्वतःला मनाबाहेरचा स्वच्छंद म्हणायचं आणि छंद हि मनाचीच प्रॉपर्टी आहे हे विसरण्यात काहि पॉइण्ट नाहि. उदा. संगीतात रस आहे, राजकारणात नाहि हे छंद लक्षण 'स्व'च्या नव्हे तर मनाच्या कक्षेत येतं. त्याला उगाच मनाबाहेर काढण्यात काहि अर्थ नाहि. असो.

बाकी या चर्चेची अशी शोकांतीका होईल असं वाटलं नव्हतं. सगळं मुसळ केरात गेलं. मी एक मनोगत म्हणुन हि चर्चा करतोय आणि तुमच्यासाठी ति एक नॉक आऊट स्पर्धा आहे. असो. सतत मनाला कंट्रोल करायच्या वृत्तीमुळे मनोगत वगैरे तसंही शक्य नाहि.

संजय क्षीरसागर's picture

8 Apr 2017 - 5:38 pm | संजय क्षीरसागर

सविस्तर प्रतिसाद खाली दिला आहे !

गणामास्तर's picture

5 Apr 2017 - 2:36 pm | गणामास्तर

बाझवला इथं तर बीमरचा पाऊस पडलाय. .स्टिम्युलस काय, अनुसंधान काय आणि काय काय. .
चर्चा संपन्न झाली कि कुणी तरी या सगळ्याचे सुलभ मराठी भाषांतर करेल काय गरीबासाठी ?

संजय क्षीरसागर's picture

5 Apr 2017 - 2:46 pm | संजय क्षीरसागर

स्टिम्युलस = जाणीव
अनुसंधान = सध्या ऑप्शनला टाका.... (नोईंग द कॉस्मिक विल !)

उदाहरणादाखल दिलेल्या शब्दांचे सुलभ भाषांतर आले. चर्चेच्या भाषांतराची वाट पाहतो :)
बाकी, चर्चा संपन्न झालेली आहे हे बघून बरे वाटले.

कारण लेखकाचा गोंधळ सहजी निस्तरणारा नाही.

१) काय करावे आणि काय करु नये याचे अनेक थ्रेड्स मनात चालले असतात. त्याचं एक कलेक्टीव्ह रिजल्टण्ट डिसिजन म्हणजे आपली तत्कालीन क्रिया होय.

म्हणजे मनंच काय करावं आणि करु नये ते ठरवतं असा त्यांचा फंडा आहे. आपण मनानं दिलेल्या ऑप्शन्सपैकी एक निवडायचा. मनावेगळं या जगात काही नाहीच ! खरं तर आपण नाहीच म्हटल्यावर मनंच पर्याय देणार आणि मनंच निवडणार. याला सोप्या भाषेत केमिकल लोच्या म्हणतात.

अर्धवटराव's picture

5 Apr 2017 - 9:36 pm | अर्धवटराव

स्प्लीट पर्स्नॅलिटीची एक मजेदार केस उलगडतेय इथे. एंजॉय. :)

संजय क्षीरसागर's picture

5 Apr 2017 - 2:49 pm | संजय क्षीरसागर

स्टिम्युलस = जाणीव
स्वेच्छा = मनावर हुकूमत असणारा करु शकतो अशी इच्छा. पण लेखकाला असा कुणी असतो याचा पत्ताच नाही आणि त्यावर सद्य चर्चा चालू आहे.
अनुसंधान = सध्या ऑप्शनला टाका.... (नोईंग द कॉस्मिक विल !)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Apr 2017 - 6:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

stimulus = प्रेरणा
Feeling = जाणीव, भावना

बाकीच्या चर्चेबद्दल काही मत दिलेले नाही, ती चालूद्या. :)

अर्धवटराव's picture

5 Apr 2017 - 9:34 pm | अर्धवटराव

.

संदीप डांगे's picture

5 Apr 2017 - 3:48 pm | संदीप डांगे

मारीच! सुवर्णचर्म! सीताहट्ट! रामकर्तव्य! लक्ष्मणरेषा! रावणागमन! सीताहरण!
कुणाला समजलं तर मला सांगा...

संजय क्षीरसागर's picture

5 Apr 2017 - 5:31 pm | संजय क्षीरसागर

सीताहरण! > सीतापुनर्प्राप्ती > अपत्यजन्म > सीताडिवोर्सम > इती संपूर्णं

वरुण मोहिते's picture

5 Apr 2017 - 5:52 pm | वरुण मोहिते

हे म्हटल्यावर आम्हाला एकतर मनी आठवतो किंवा आजूबाजूला राहणाऱ्या मनी .

संजय क्षीरसागर's picture

5 Apr 2017 - 6:29 pm | संजय क्षीरसागर

.
`झेन नो माइंड' दिसतं !

संदीप डांगे's picture

6 Apr 2017 - 12:46 am | संदीप डांगे

वर चाललेल्या डिप्रेशन च्या चर्चेबद्दल.
डिप्रेशन मधून बाहेर पडायला अध्यात्म किंवा मेडिटेशन उपयोगाचे नाही. डिप्रेशन साठी उपाय म्हणून अरा म्हटले तसे सकारात्मक प्रेरणेला प्रोत्साहन द्यावे लागते. डिप्रेशन हा आजार आहे, स्वयंनिंर्णय नाही, स्वेच्छा नाही हे लक्षात असू द्यावे.

वर चाललेली दिग्गजांची चर्चा मानसशास्त्र व अध्यात्म अशा परस्परविरोधी मान्यतांचे एकमेकांशी भिडणे आहे. आउटपुट झिरो.

अर्धवटराव's picture

6 Apr 2017 - 12:52 am | अर्धवटराव

आउटपुट झिरो हे ठाऊक आहे :)
सदर चर्चेत अध्यात्माबद्दल चर्चा करण्याचा अजिबात हेतु नाहि. तसंही "हे संस्थळ अध्यात्मीक चर्चा करायला अजीबात लायक नाहि" हे माहित आहे ना ;)

संजय क्षीरसागर's picture

6 Apr 2017 - 12:39 pm | संजय क्षीरसागर

१) डिप्रेशन हा आजार आहे, स्वयंनिंर्णय नाही, स्वेच्छा नाही हे लक्षात असू द्यावे.

डिप्रेशन हा मनाच्या नेगटिवीटीचा परिणाम आहे. स्वेच्छेचा अर्थ व्यक्तीची इच्छा असा होतो. जोपर्यंत व्यक्ती स्वतः डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत ते कायम राहील. व्यसनमुक्तीतही स्वेच्छाच काम करते. डिप्रेशनमधे जाण्याची कारणं असंख्य असू शकतील पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग व्यक्तीनं स्वतःला सावरणं हाच आहे. जेव्हा व्यक्ती स्वतःला सावरते तेव्हा मनाची नेगटिवीटी दूर होण्याचा मार्ग सापडतो, अन्यथा नाही.

२) वर चाललेली दिग्गजांची चर्चा मानसशास्त्र व अध्यात्म अशा परस्परविरोधी मान्यतांचे एकमेकांशी भिडणे आहे.

अध्यात्म हा स्व-जागरणाचा विषय आहे आणि मानसशास्त्र मनाचा आभ्यास आहे. स्व-जागृतीविना मनाचा आभ्यास धोक्याचा आहे कारण सैरभैर झालेलं मन केव्हाही स्व-विस्मरण घडवून व्यक्तीला स्वतःच्या काह्यात घेऊ शकतं.

३) आउटपुट झिरो

तसं वाटत असेल तर या चर्चेत भाग न घेतलेला बरा.

संदीप डांगे's picture

6 Apr 2017 - 1:00 pm | संदीप डांगे

संक्षि, तीन स्पष्ट प्रश्न.
१. डिप्रेशन हा आजार आहे की राग-लोभ-मोह-मत्सर ह्यासारखी भावना?
२. डिप्रेशनच्या आजारात (आणि बहुतेक नशामुक्तीमध्येही) जी मेंदूत रासायनिक परिणाम घडवून आणणारी औषधे दिली जातात, त्याबद्दल काय मत आहे?
३. एखादी नशा 'चढल्यावर' व्यक्तिचं आपल्या कृती-विचारांवर पूर्ण नियंत्रण असते की नसते? (नशा चढणे म्हणजेच नियंत्रण गमावणे म्हटले जाते.)

उत्तरे आल्यावर चर्चा करायची की नाही ते पुढे ठरवू.

संजय क्षीरसागर's picture

6 Apr 2017 - 1:24 pm | संजय क्षीरसागर

पहिल्यांदा ` आऊटपुट झिरो' हा शेरा मागे घ्या तरच चर्चा होईल. कारण अश्या पूर्वग्रहातून प्रतिसाद वाचले तर तुमच्यासाठी आऊटपुट कायम झिरो राहील. आणि मग प्रतिसाद देऊन वेळ घालवण्यात अर्थ नाही.

संदीप डांगे's picture

6 Apr 2017 - 1:39 pm | संदीप डांगे

मानसशास्त्र व अध्यात्म अशा परस्परविरोधी मान्यतांचे एकमेकांशी भिडणे

>> ह्यातून आऊटपूट झिरो असतो हा आतापर्यंतचा माझे वैयक्तिक अनुभव व निरिक्षणावर आधारलेला निष्कर्ष आहे. त्याच्याशी इथल्या चालू चर्चेचा संबंध नाही. दोन वेगळ्या मान्यतांचे एकमेकांशी एकाच पटलावर येणे अशक्य आहे. सो आउटपूट झिरो असेल.

तेवढं सोडून द्या.

मला फक्त 'रसायनांचे मेंदूवर होणारे परिणाम व त्यानुसार बदलणारी व्यक्तीची निर्णयक्षमता' या लिमिटेड मुद्द्यावर चर्चा अपेक्षित आहे. (खरेतर बाह्य घटकांमुळे घडणारा, घडवून आणला जाणारा मनोव्यापार हा लिमिटेड नव्हे तर वास्ट असा मुद्दा आहे. मार्केटींग व अ‍ॅडवर्टायझिंग हे क्षेत्र ह्याच मुद्द्यावर टिकून आहे.)

संजय क्षीरसागर's picture

6 Apr 2017 - 1:55 pm | संजय क्षीरसागर

मानसशास्त्र व अध्यात्म अशा परस्परविरोधी मान्यतांचे एकमेकांशी भिडणे ह्यातून आऊटपूट झिरो असतो हा आतापर्यंतचा माझे वैयक्तिक अनुभव व निरिक्षणावर आधारलेला निष्कर्ष आहे.

मानशास्त्र किंवा मनोव्यापार समजल्याखेरीज अध्यात्म व्यर्थ आहे. त्यामुळे अध्यात्म हा प्रथम चरणात मनाचा उलगडा आहे. थोडक्यात, स्वतःप्रत येण्याचा मार्ग मनाचा महाल पार करुनच जातो.

तुम्ही म्हणतायं तशी `रसायनांचे मेंदूवर होणारे परिणाम व त्यानुसार बदलणारी व्यक्तीची निर्णयक्षमता' यावर इथे डेटा ओतला जाईल. मग मतभेदांमुळे वाद होईल आणि निष्पन्न काहीएक होणार नाही.

संदीप डांगे's picture

6 Apr 2017 - 2:05 pm | संदीप डांगे

मानसशास्त्र, सायकॅट्री, सायकॉलॉजी वगैरेंमध्ये केला जाणारा मनोव्यापाराचा अभ्यास आणि अध्यात्मात केला जाणारा मनोव्यापाराचा अभ्यास ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अभ्यासाची विषयवस्तू एक असली तरी गृहितके, प्रयोग, निष्कर्ष, परिणाम वेगवेगळे आहेत.

शास्त्रज्ञ मनोचिकित्सा करतांना वेगवेगळ्या रसायनांच्या, कार्यकारणभावाच्या अनुषंगाने मनाचा (प्रत्यक्षात मेंदूचा) अभ्यास करतात. अध्यात्मात असं अजिबात होत नाही. (अध्यात्मात कसं होतं ते इथे उलगडत बसत नाही, ती शब्दांची नव्हे तर अनुभवाची गोष्ट आहे) तस्मात चर्चा निष्फळ होते कारण दोन ग्रहावर दोघे आपण अशी स्थिती आहे.

संजय क्षीरसागर's picture

6 Apr 2017 - 3:01 pm | संजय क्षीरसागर

अभ्यासाची विषयवस्तू एक असली तरी गृहितके, प्रयोग, निष्कर्ष, परिणाम वेगवेगळे आहेत.

सहमत आहे.

शास्त्रज्ञ मनोचिकित्सा करतांना वेगवेगळ्या रसायनांच्या, कार्यकारणभावाच्या अनुषंगाने मनाचा (प्रत्यक्षात मेंदूचा) अभ्यास करतात. अध्यात्मात असं अजिबात होत नाही.

मानसशास्त्र व्यक्तीला, `सोशली नॉर्मल' (समाजशील व्यक्ती) बनवण्याचा प्रयत्न आहे आणि अध्यात्म व्यक्तीला `व्यक्तीमत्त्वातून मुक्तता' देण्याचा प्रयत्न आहे.

पण इथे चर्चा फार वेगळ्या विषयावर चालली आहे.

लेखकाच्या मते मनंच सर्वसत्ताक आहे आणि `आपण' अशी काही मनावेगळी चिजच या दुनियेत नाही ! त्यांनी तर अशी हद्द केलीये की `मनावेगळे आपण ही मनानीच स्वतःच्या सुखासाठी केलेली कल्पना आहे !' आणि त्याहून ग्रेट म्हणजे त्यांना वाटतंय की मनावेगळे आपण ही स्प्लीट पर्सनॅलिटी आहे.

आणि माझं म्हणणंय :

आपण सर्वसत्ताक आहोत आणि मन हा शरीरस्थित बायोकंप्युटर आहे. आपण तो वापरु शकतो पण मन म्हणजे सर्वस्व नाही. आणि याही पुढे जाऊन माझं असं म्हणणं आहे की स्व-विस्मरण हाच मनोरुग्ण होण्याचा प्रथम चरण आहे.

त्यामुळे ही चर्चा योग्य मार्गानं गेली तर सदस्यांना उपयोगी होईल.

संजय क्षीरसागर's picture

6 Apr 2017 - 3:47 pm | संजय क्षीरसागर

१) १. डिप्रेशन हा आजार आहे की राग-लोभ-मोह-मत्सर ह्यासारखी भावना?

डिप्रेशन हा मूड आहे. तो विचार आणि भावनांपेक्षा गहीरा आहे आणि त्यामुळे दीर्घकाळ टिकू शकतो. पण कोणताही मनोविकार उद्भवण्याचं मूळ कारण स्व-विस्मरण हेच आहे.

२) २. डिप्रेशनच्या आजारात (आणि बहुतेक नशामुक्तीमध्येही) जी मेंदूत रासायनिक परिणाम घडवून आणणारी औषधे दिली जातात, त्याबद्दल काय मत आहे?

अनुभव नाही. ध्यानप्रणालींचा आभ्यास केल्यामु़ळे तशी आवश्यकताही वाटली नाही.

३) ३. एखादी नशा 'चढल्यावर' व्यक्तिचं आपल्या कृती-विचारांवर पूर्ण नियंत्रण असते की नसते? (नशा चढणे म्हणजेच नियंत्रण गमावणे म्हटले जाते.)

अर्थात ! पण यात एक मेख आहे. निद्रा हे पूर्ण आत्मविस्मरण आहे आणि त्यामुळे देह पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जातो. काही प्रमाणात चढलेली नशा ही निद्रा पण सतत चालू असलेले विचार यांच्या मधली स्थिती आहे. म्हणजे जागृत आणि विचारांची रहदारी कमी झालेली. अशा वेळी नव्या कल्पना सुचणं, इतर वेळी न होऊ शकणारं साहस करता येणं, वैचारिक उहापोह कमी झाल्यामुळे मूड लाइट होणं अशा गोष्टी घडतात.

संजय क्षीरसागर's picture

6 Apr 2017 - 4:09 pm | संजय क्षीरसागर

काही प्रमाणात चढलेली नशा ही निद्रा आणि सतत चालू असलेले विचार यांच्या मधली स्थिती आहे. म्हणजे जागृत पण विचारांची रहदारी कमी झालेली.

सुबोध खरे's picture

7 Apr 2017 - 8:39 pm | सुबोध खरे

डिप्रेशन हा मूड आहे. तो विचार आणि भावनांपेक्षा गहीरा आहे आणि त्यामुळे दीर्घकाळ टिकू शकतो. पण कोणताही मनोविकार उद्भवण्याचं मूळ कारण स्व-विस्मरण हेच आहे.
मनोविकार हा इतका साधा सोपा विषय नाही. स्व विस्मरण न होता ही मनोविकार होतात.
http://apps.who.int/iris/bitstream/10665/37958/8/9241544228_eng.pdf
येथे पण ४१ वर पहा डिप्रेशन चे किती अगणित प्रकार आहेत ते.
बाकी -- आपण अध्यात्मावर लिहा. आम्ही सवडीने वाचतो.

अनुप ढेरे's picture

7 Apr 2017 - 11:54 am | अनुप ढेरे

मेडिटेशन उपयोगाचे नाही.

अनलेस तुम्ही मानसशास्त्रज्ञ नाही तोपर्यंत कोणत्याही बाजूची ठाम विधानं नका करू डांगे अण्णा.

पैसा's picture

7 Apr 2017 - 5:22 pm | पैसा

मी एका सायकिअ‍ॅट्रिस्टकडून ऐकलं आहे. क्रॉनिक किंवा सिव्हियर डिप्रेस्ड असलेली व्यक्ती मेडिटेशनचा अनुभव घेऊ शकत नाही.

संदीप डांगे's picture

7 Apr 2017 - 6:28 pm | संदीप डांगे

ढेरेसाहेब, शास्त्रज्ञ असल्याशिवाय ठाम विधाने करु नये हे जरा विचित्र आहे,

किंवा एकूणच ठाम विधाने करण्याचा अधिकार कोणाला असावा हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे.

वरचे विधान ठामच आहे, भले मी मानस शास्त्रज्ञ नसलो किंवा असलो तरी त्याने फरक पडत नाही,

दुसरे असे की सेवियर, किंवा इंटर्मिजीएट लेव्हल च्या डिप्रेस्ड लोकांनी मेडिटेशन करणे अधिक नुकसानकारक आहे असे मानले जाते. त्यामागे रीतसर कारणे आहेत.

अनुप ढेरे's picture

7 Apr 2017 - 6:40 pm | अनुप ढेरे

मुद्दा हा की हा लय नाजूक आणि महत्वाचा विषय आहे. जालावर नॉन एक्सपर्ट्सकडून आलेली असली ठाम विधानं डिप्रेस्ड लोकांची विधानं दिशाभूल करू शकतात. या केसमध्ये तुम्ही बरोबर आहात का चूक हा मुद्दाच नाही.

लोकांनी डाक्टराचा सल्ला घेतलेला उत्तम.

संदीप डांगे's picture

7 Apr 2017 - 7:58 pm | संदीप डांगे

नाजूक आणि महत्त्वाचा विषय आहे म्हणूनच विधानाच्या अर्थाकडे बघा अशी विनंती करतो. "डिप्रेशनमध्ये मेडिटेशन उपयोगाचे नाही" ह्या विधानाला एखाद्या आजारी व्यक्तीने तज्ञाकडे न जाता ब्लाइण्डली फॉलो केल्यास काय धोका उद्भवू शकतो ते मला तरी दिसत नाही.

'मेडिटेशनमुळे डिप्रेशन बरे होण्यास मदत होते' असा कोणा आजारी माणसाला नॉन-एक्सपर्टकडून सल्ला मिळाला असल्यास तर तो मात्र प्रत्यक्षात धोकादायक आहे. माझे उपरोल्लिखित विधान ह्याच्या अगदी विरोधी आहे. मी इथे कोणालाही हे करुन बघा, ह्याचा अमुक आजारात फायदा होतो असा सल्ला वा सुचना दिलेली नाही.

सगळ्यात महत्त्वाचे पारंपरिक ध्यान ज्याला मेडिटेशन, एकाग्र होऊन मन स्थिर करण्याचा प्रयत्न करणे, ह्यापासून पुढच्या सगळ्या स्टेप्स ह्या मानसिकरित्या निरोगी व्यक्तीने करायच्या असतात. कोणी डिप्रेशनवर उपाय वा मदत म्हणून ह्याकडे मेडिटेशनकडे पाहत असेल तर दूरच राहावे असे म्हणेन. हे दूर राहा म्हणणे संबंधित व्यक्तीच्या फायद्याचे आहे, त्यासाठी रितसर तज्ञांकडून सल्ला घेऊन उपचार करणे हा मार्ग दिसू शकतो. त्यात जर का त्या तज्ञानेच मेडिटेशन करायचा सल्ला दिल्यास तो त्याच्या डायग्नोसिसचा विषय आहे.

मी इथे कोणत्याही चुकीच्या गोष्टीची (क्वॅक थेरपीज) भलामण किंवा पाठराखण केलेली नाही हे आवर्जून नमूद करतो.

तरीही आक्षेप असल्यास या क्षेत्रातले मिपावर तज्ञ असतील तर त्यांच्याकडून खुलासा होइल अशी अपेक्षा करतो.

------------------------

साधारणपणे कोणत्याही प्रकारच्या आजारावर जाल-ज्ञान वापरुन उपाय करु नये असा दंडक असावाच. जालावर मेडिटेशन हा डिप्रेशनवर उपाय म्हणून सांगणारे व त्या विरुद्ध बोलणारे अनेक आर्टिकल्स मिळतील. इथे थोडं मेडिटेशन काय याबद्दल बोलतो. आणि ते कुठे उपयोगाचे त्यावरही बोलतो.

ध्यान ही एक साधना पद्धत आहे. उपचार पद्धत नाही. काही आजारांत, स्थितींमध्ये याचे सकारात्मक साइडइफेक्ट्स दिसून येतात. पण त्यासाठी ध्यान करावे असे नसते. हा पहिला दंडक. एका मानसिक निरोगी व्यक्तीला रोजच्या जीवनातल्या कटकटी, स्ट्रेस, इ. चा मनावर ताण येतो, त्यामुळे मन अस्वस्थ राहतं, निर्णयक्षमता प्रभावित होऊ शकते. अनेक प्रसंगात ओवररिअ‍ॅक्ट केल्या जाऊ शकते. तर रोजच्या जीवनात असे प्रसंग हाताळण्यासाठी मन स्थिर, चित्तदशा समतल असणे आवश्यक असते. नुकसान-फायदा-अपमान-स्तुती इत्यादी गोष्टींकडे तटस्थ भावाने बघून निर्णय घेता येणे शक्य होते. म्हणजे भावनेच्या भरावर नियंत्रण येते. हे थोडेफार वरवरचे सर्वसाधारण फायदे आहेत. जसे जसे ध्यान अधिक उत्तम होत जाते त्याचे तसतसे फायदे मिळत जातात. हे निरोगी व्यक्तीने मजबूत व्यायाम व दणदणीत खुराक खाण्यासारखे असते.

असाच दणदणीत व्यायाम व मजबूत खुराक आजारी व्यक्तीला सुचवला जात नाही. त्यास हलकं-फुलकं आरोग्यास पूर्वपदाला आणण्यास मदत करेल असे प्रकार सुचवले जातात.

दुसरे महत्त्वाचे की ध्यान हे गुरुंकडून शिकावे लागते. ध्यान म्हणजे डोळे मिटून बसणे, अजिबात न हलणे हे वरवर दिसणारे बाह्य रुप नव्हे. त्याशिवाय बरंच काही घडत असतं, त्या घडण्याला सहाय्यक म्हणून डोळे-मिटणे, शांत-बसणे असतं. नुसतं असे असे बसतात मग आपण पण बसुया म्हटल्याने ध्यान होत नसते. तसेच ध्यान म्हणजे एकाग्रतेचा, मनोनिग्रहाचा व्यायाम नाही. तसे समजणेही चूक आहे. ध्यानाच्या अनेक पद्धती आहेत, पण त्या शास्त्रशुद्ध शिकल्या तरच उपयोगाच्या, (शास्त्रशुद्ध म्हणजे सायंटिफिक वाले शास्त्र नव्हे, तत्सम नियमांत राहून केलेलं, उगा वाद नको) म्हणजे ध्यानाचा योग्य पद्धतीने फायदा घ्यायचा असल्यास ते शास्त्रशुद्ध पद्धतीने गुरुंकडून शिकून घेणे व तसेच करणे आवश्यक असते. त्यात आपल्या मनचे जोडून, किंवा काढून करणे चुकीचे होते.

वरील दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेता, ध्यान हे निरोगी व्यक्तीने शास्त्रशुद्ध मार्गदर्शनात करायची गोष्ट आहे असे समजेल.

आता तिसरी. समजा इण्टरमिजिएट किंवा क्रॉनिक लेवलच्या व्यक्तीने ध्यान करायचा प्रयत्न केला उदा: अ) स्वतःच्या मनाने डोळे मिटून बसून राहिले, फायदा शून्य. ब) शास्त्रशुद्ध शिकून ध्यानाचा प्रयत्न केला तर काही पातळ्या असतात जिथे व्यक्तीच्या मनातल्या खोल दडलेल्या, दडवलेल्या भावना ज्वालामुखीसारख्या उचंबळून बाहेर येतात, तेव्हा त्यांचे नियंत्रण करणे किंवा पू-अशुद्ध रक्त जसा वाहून जाऊ देते तसे त्याकडे बघत वाहून जाऊ देणे मानसिक आजारी व्यक्तीला शक्य होईल असे नसते. त्यातून समस्या गंभीर होऊ शकतात.

शास्त्रशुद्ध ध्यान हे पूर्ण निरोगी ते सर्दी-पडसा झालेली व्यक्ती ह्या रेंजमधल्या लोकांसाठी उपयोगाचे आहे. म्हणजे स्ट्रेस, दडपण, भिती, असुरक्षितपणा, चिंता, चिडचिड, वगैरे सर्वसाधारण परिस्थितीत ध्यान केल्यास चांगलीच मदत होते. पण काही लोक हेच ताणून थेट मानसिक आजारात ध्यान उपयोगाचे असे विधान करत असतात, त्याबद्दल सावध असावे. वर उल्लेखलेल्या स्थिती ह्या निरोगी माणसांना जाणवतच असतात, त्या क्रॉनिकमध्ये डेवलप होऊ नये म्हणून ध्यान मदत करते. पण ते आजारावरचा उपाय म्हणून बिन्धास्त वापरणे हे तितकेच धोकादायक आहे जितके प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणत्याही नॉन-ओटीसी गोळ्या घेणे.

माझ्या विधानातून कोणतेही आर्थिक, शारिरीक, मानसिक नुकसान होत नसल्याचे दिसल्याने माझ्या विधानाच्या ठामपणाबद्दल शंका नाही. तरीही त्यात काही चुकीचे किंवा शंकास्पद आहे असे सिद्ध झाल्यास विधान नक्कीच मागे घेईन, व संपादकांना संपादित करायची विनंती करेन.

संजय क्षीरसागर's picture

7 Apr 2017 - 8:11 pm | संजय क्षीरसागर

`मेडिटेशन' म्हणजे नक्की काय याची प्रतिसाददात्यांपैकी कुणाला कल्पना आहे का ?

सुबोध खरे's picture

7 Apr 2017 - 8:14 pm | सुबोध खरे

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4109098/
Neural mechanisms of mindfulness and meditation: Evidence from neuroimaging studies

सुबोध खरे's picture

7 Apr 2017 - 8:16 pm | सुबोध खरे

The word “meditation” stems from the Latin meditari, which means to participate in contemplation or deliberation. Meditation includes a variety of practices aimed at focusing attention and awareness. Two general forms of meditation exist. These are focused attention and open monitoring[3]. Initially a practitioner will often utilize focused attention practice to enhance attentional skills[4]. Then, it will be possible to engage in open monitoring, which involves moment-by-moment awareness of whatever occurs in one’s awareness[4].

संदीप डांगे's picture

7 Apr 2017 - 8:15 pm | संदीप डांगे

मला विचारताय काय सर? मला विचारत असाल तर अजिबात नाही, शून्य कल्पना आहे मला. आय अ‍ॅम जस्ट अ स्टुडंट.

मारवा's picture

7 Apr 2017 - 10:05 pm | मारवा

सुंदर वैविधय्पुर्ण आहेत.
काही वर्षांपुर्वी जपान मध्ये वास्तव्याला असतांना एका झेन ग्रुप च्या संपर्कात आलेलो होतो.
ते रजनीश चे ही फॅन होते. त्यांचे रीच्युअल्स विचीत्र होते. मात्र मेडीटेशन्स टेक्नीक्स भन्नाट होत्या.
काही अती प्रतिभाशाली पण तितक्याच विक्शीप्त लोकांचा भरणा त्यात होता.
तेव्हाच मी तिथे पहील्यांदाच. सुंदर फुलाकडे एकटक पाहत राहणे नंतर काही काळानंतर ते फुल जणु माझ्याकडे पाहत आहे हा भाव मनात कल्पून बघणे. त्या फुलाकडुन. रीव्हर्सली ब्युटीफुली एनरजाइज होणे इ. संवेदनशील विधी तिथे प्रयोगात घेत. त्यानंतर मी रजनीश मेडीटेशन्सची पुस्तके वाचलेली. पण मुळ प्रक्रुती वेगळी असल्याने त्यांचा अंतरगत सदस्य काही होण्याचा प्रश्न नव्हता. जपान सोडल्यावर तो ग्रुप ही सोडला.

डिटेल प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

मी इथे कोणत्याही चुकीच्या गोष्टीची (क्वॅक थेरपीज) भलामण किंवा पाठराखण केलेली नाही हे आवर्जून नमूद करतो.

याच्याशी सहमत आहे. पण वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही इथे बरोबर्/चूक यावर आक्षेप नाहीच.

मला खरच नाही वाटलं की नक्की हो/नक्की नाही ही विधानं नॉन एक्सपर्ट्सकडून येऊ नयेत असं वाटलं. मेबी माझं मत चूक असेल.

संदीप डांगे's picture

7 Apr 2017 - 8:20 pm | संदीप डांगे

तुमचे म्हणणे शंभर टक्के मान्य आहे, तुम्ही आक्षेप घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद, त्यामुळे मला माझी (नॉन-एक्स्पर्ट) बाजू मांडता आली. त्यावर एक्सपर्ट बाजू पडताळून गरजू व्यक्ती निर्णय घेतील अशी अपेक्षाही निर्माण झाली.

गामा पैलवान's picture

6 Apr 2017 - 1:13 am | गामा पैलवान

अर्धवटराव,

मला तुमच्या आणि संक्षींच्या वादांत पडायचं नाहीये. फक्त तुमचं एक विधान दुरुस्त करावंसं वाटलं. हे ते विधान :

.... मनाचा परिघ फार विषाल आहे... त्यात "आपण" आणि "मन" अशा भिंती पाडण्यात काहि अर्थ नाहि.

गंमत अशीये की मनाचा परीघ फार विशाल असल्यानेच त्यात 'आपण' आणि 'मन' अशा भिंती पाडाव्या लागतात. आपण स्वप्नामध्ये असतांना मनसुद्धा असतंच. पण ते जागृतावस्थेपेक्षा वेगळं काहीतरी असतं. शिवाय देह कुठे असतो हाही प्रश्न आहेच. त्यामुळे 'आपण' आणि 'मन' वेगळे मानावेत अशा मताचा मी आहे.

आ.न.,
-गा.पै.

अर्धवटराव's picture

6 Apr 2017 - 4:40 am | अर्धवटराव

विचारांच्या, अभ्यासाच्या सोयीकरता म्हणुन मन आणि आपण हे वेगळे मानावेच लागतात. 'मेरे दिल मे आज क्या है' वगैरे भाव त्याशिवाय प्रकट होऊ शकत नाहि. एखादा मानसोपचारतज्ञदेखील 'तुमच्या मनात काय चाललय ते सांगा' अशीच संवादाची सुरुवात करतो. पण हि विभागणी केवळ एक सोय आहे, हे सत्य नाकरुन कसं चालेल ?

गामा पैलवान's picture

6 Apr 2017 - 11:45 am | गामा पैलवान

अर्धवटराव,

स्वप्नात देह जागृत नसतांना देहाची अनुभूती देण्याइतपत मन शक्तिशाली असतं. मग स्वप्नातलं मन खरं की खोटं मानावं? देहाप्रमाणे मनाचाही कशावरून भासच होत नसेल स्वप्नात?

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

6 Apr 2017 - 12:49 pm | संजय क्षीरसागर

१) स्वप्नात देह जागृत नसतांना देहाची अनुभूती देण्याइतपत मन शक्तिशाली असतं.

स्वप्नातून बाहेर पडणं म्हणजे मनाच्या चित्रपटातून बाहेर पडणं आहे. मन देहाची अनुभूती देत नाही तर आपण मनाच्या कब्जातून बाहेर येतो.

२) मग स्वप्नातलं मन खरं की खोटं मानावं? देहाप्रमाणे मनाचाही कशावरून भासच होत नसेल स्वप्नात?

मन एकच आहे आणि त्याचा चलतपट आहोरात्र चालूच असतो. दिवसाच्या उजेडामुळे तो दिसत नाही पण रात्रीच्या अंधारात, डोळे मिटल्यामुळे तो स्पष्ट होतो इतकंच. थोडक्यात, ज्याप्रमाणे चित्रपटगृहात पडदे आणि दरवाजे उघडले की स्क्रीन धूसर होऊन चित्र अस्पष्ट होतं आणि पुन्हा अंधार केल्यावर ते स्पष्ट होऊन वास्तविक वाटायला लागतं तसा प्रकार आहे.

अर्धवटराव's picture

7 Apr 2017 - 12:43 am | अर्धवटराव

जागृत अवस्थेत मन शारीरीक स्टिम्युलसला रिस्पोन्स देत असतं असते तर निद्रीत अवस्थेत वैचारीक स्टिम्युलसला. तसं बघितलं तर जागृती, निद्रा, बेशुद्धी.. अवस्था कुठलिही असेना, मन आपलं काम करतच असतं. शरिराचे स्टिम्युलस विचारांत परिवर्तीत होणं, किंवा त्या उलट, हे ही मनात होत असतं. त्यापैकी एका विशिष्ट क्षणी कुठला स्टिम्युलस एक्झिक्युट होतोय याचं निदान करणं कठिण आहे. मनाची प्रतलं इतकी खोल असतात कि त्यांचा पूर्ण ट्रेस काढता येत नाहि.
अर्थात, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यात नविन ते काय :)

भास म्हणजे "जे उपलब्ध नाहि नाहि त्याचि जणिव" या अर्थाने म्हणत असाल, तर भासमान वस्तुचं का होईना, प्रोसेसींग होतच आहे कि.

सगळ्या सव्यापसव्यातून शेवटी काही ठरले का?

संजय क्षीरसागर's picture

6 Apr 2017 - 1:29 pm | संजय क्षीरसागर

चर्चा जर योग्य मार्गानं गेली तर हा `मन आणि आपण' या महत्त्वाच्या विषयावर चाललेला उहापोह आहे. इट इज अपटू द मेंबर्स अँड ऑफकोर्स दि ऑथर !

यशोधरा's picture

6 Apr 2017 - 3:56 pm | यशोधरा

संक्षी, चर्चा आहे कुठे? नुसतेच आरोप - प्रत्यारोप आणि मी म्हणेन तेच सत्य हेच दिसते आहे धागाभर.

संजय क्षीरसागर's picture

6 Apr 2017 - 4:14 pm | संजय क्षीरसागर

संदीपला वर दिलेला प्रतिसाद पाहिलात तर माझा स्टँड कळेल :

लेखकाच्या मते मनंच सर्वसत्ताक आहे आणि `आपण' अशी काही मनावेगळी चिजच या दुनियेत नाही ! त्यांनी तर अशी हद्द केलीये की `मनावेगळे आपण ही मनानीच स्वतःच्या सुखासाठी केलेली कल्पना आहे !' आणि त्याहून ग्रेट म्हणजे त्यांना वाटतंय की मनावेगळे आपण ही स्प्लीट पर्सनॅलिटी आहे.

आणि माझं म्हणणंय :

आपण सर्वसत्ताक आहोत आणि मन हा शरीरस्थित बायोकंप्युटर आहे. आपण तो वापरु शकतो पण मन म्हणजे सर्वस्व नाही. आणि याही पुढे जाऊन माझं असं म्हणणं आहे की स्व-विस्मरण हाच मनोरुग्ण होण्याचा प्रथम चरण आहे.

त्यामुळे ही चर्चा योग्य मार्गानं गेली तर सदस्यांना उपयोगी होईल.

चर्चा पुढे नेणं म्हणजे फक्त तुमची मतं ग्राह्य असणं आणि इतरांची मतं धुडकारुन लावणं, असं तर होत नाही ना? :)

संजय क्षीरसागर's picture

6 Apr 2017 - 6:54 pm | संजय क्षीरसागर

प्रत्येकाकडे स्वतःचा किबोर्ड आहे ! आणि जो तो स्वतःची मतं व्यक्त करतोयंच की.

मला तर जास्त करुन एकमेकांना खोडून काढायची स्पर्धा चालल्याचं वाटतंय.

आणि लेखक तीच नाकारतायंत. आता मी तरी काय करणार ?

बघा, "चर्चा पुढे नेणं म्हणजे फक्त तुमची मतं ग्राह्य असणं आणि इतरांची मतं धुडकारुन लावणं, असं तर होत नाही ना? :) " हा मुद्दा सिद्ध होतो आहे. थोडक्यात काय, इनिमिनीमायनीमो.

मुद्दे किस खेत कि मुली है :)

यशोधरा's picture

8 Apr 2017 - 9:43 am | यशोधरा

खेत की मूली आवडत नसेल. :)