||कोहम्|| भाग 6

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जनातलं, मनातलं
31 Mar 2017 - 8:38 pm

||कोहम्||
भाग 6

मागच्या भागात आपण विविध प्राणी आणि त्यांचे वेगवेगळे समुदाय यांच्या विषयी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, उत्क्रांतीत नेहमी तेच प्राणी यशस्वी ठरलेत जे सामुदायिक आयुष्य जगू शकले. एकेकटे जगणारे प्राणी हे शक्यतो फारसे न बदलता जसे होते तसेच राहिले.

आता आपण परत मागच्या भागात जे उदाहरण घेतले होते ते बघू, समजा लांडग्यांची एक टोळी हरणांच्या शिकारीला आलाय, त्यांनी हरणांच्या कळपाला घेरलंय आणि सगळ्यात हळू धावणार हरीण त्यांच्यातल्या एका लांडग्यांच्या तावडीत सापडलं, ज्या क्षणी तो लांडगा त्या हरणाला खाली पाडतोय, अगदी त्याच वेळी इतर दोन लांडगे अजून एका हरणाच्या अत्यंत जवळ आहेत, काही सेकंदाची मेहनत आणि हेही हरीण त्यांना मिळू शकत, पण ज्या क्षणी पहिला लांडगा हरणाला खाली पाडेल त्याक्षणी ते दोन लांडगे त्या हरिणाचा पाठलाग सोडून देतील आणि पडलेल्या हरणाच्या मांसातील आपला वाटा घेण्यासाठी धावतील. लांडग्यांमधील अल्फा मेल आपला वाटा आधी उचलेल आणि मग इतर लांडगे उरलेल्या भागावर तुटून पडतील, असं का? कारण शिकार पूर्ण झाल्यावर, घरी नेवून तिचे समान वाटे करावे आणि मग ती खावी असं लांडग्यांमध्ये ठरलेलं नसतं, का ठरलेलं नसतं? कारण ते तसं ठरवावं हे एकमेकांत ठरवण्याइतकी त्यांची भाषा सक्षम नसते.

अगदी 4-5 लक्ष वर्षांपूर्वी असलेल्या असलेल्या मानवाची भाषाही या लांडग्यांपेक्षा अत्यंत प्रगत होती. इथे भाषा म्हणजे आपण फक्त माहितीची देवाणघेवाण या अर्थाने घेतोय, कशी असेल त्या मानवी समूहांची भाषा? त्यांचे सामूहिक जीवन कसे असेल? आज आपण या गोष्टीचा फक्त अंदाज करू शकतो पण तरी या संदर्भात आपण मानवाचा निकटचा शेजारी, चिम्पाजी, त्याच्या भाषेचा आणि समुदायाच उदाहरण समजून घेणे उपयुक्त ठरेल.

चिंपाजी साधारण 50 ते 100 च्या गटांमध्ये राहतात, फार कमी वेळा त्यांचे 100 पेक्षा मोठे कळप दिसतात. या कळपात अर्थातच एक अल्फा मेल असतो, हा या कळपाचा एका अर्थी राजा असतो. इतर सगळे चिंपाजी त्याला लवून आणि घशातून विशिष्ट आवाज काढत मानवंदना देतात, अगदी आपले पूर्वज राजाला मुजरा करायचे किंवा आपण बॉसला गुड मॉर्निंग करतो तसंच. हा अल्फा मेल गटातील इतरांची भांडण सोडवतो, कळपातील हिंसा रोखतो, कळपावर हल्ला झाल्यास स्वतः पुढे राहून नैतृत्व करतो. त्या बदल्यात त्याला कळपाने कमावलेल्या अन्नातील सर्वोत्कृष्ट अन्न खायला मिळतं आणि त्याच्या पसंतीच्या माद्यांशी मिलनाची आणि प्रजोत्पादनाची संधी मिळते. आता तुम्ही म्हणाल कि यात वेगळं काय आहे, कारण हेच आणि असंच लांडग्यांच्या, रानकुत्र्यांची आणि हरणांच्या कळपातही असतं, हि सामाजिक उतरंड बऱ्याच प्राण्यांमध्ये असते.
वेगळेपण आहे तो अल्फा मेल निवडण्याचा चिंपांजींच्या पद्धतीत..

लांडग्यांमध्ये, कुत्र्यांमध्ये, हरणांमध्ये सगळ्यात ताकदवान नर हा अल्फा मेल असतो मात्र चिंपांजिंमध्ये सगळ्यात ताकदवान चिंपांजी अल्फा मेल नसतो. अल्फा मेल हा एक प्रकारे निवडणुकीने ठरवला जातो, अगदी आपल्या सारखा..
जर समजा दोन किंवा तीन तगडे नर अल्फा मेल होण्याच्या शर्यतीत असतील तर ते आपल्या मागे टोळीतूनच आपला एक वेगळा गट उभा करतात, आपल्या टोळीतीलच काही नर आणि माद्यांना ते स्वतःला नेता म्हणून अनुमोदन देण्यास उद्युक्त करतात, यासाठी ते त्या नरांची गळाभेट घेतात, त्यांच्या पाठीवर थोपटतात, कधी लहानग्या पिल्लांचे पापे घेतात, त्यांच्याशी खेळतात, एकमेकांना आवडेल असे स्पर्श करतात. कधीकधी तर खायची वस्तूही शेयर करतात, थोडक्यात आपल्याकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जे काही आणि जितकं काही केलं जाऊ शकत ते सगळं हे चिंपाजी उमेदवार करतात. अशा सगळ्या पद्धतीने जो चिम्पाजी उमेदवार स्वतःबद्दल जास्त विश्वास तयार करून, स्वतः मागे जास्तीत जास्त मोठा गट उभा करेल तो त्या कळपाचा अल्फा मेल बनतो. लक्षात घ्या, या प्रक्रियेत त्या नराची शारीरिक ताकद महत्वाची नसून त्याची त्या कळपातील प्रतिमा, त्याच्यावर श्रद्धा असलेल्या गटाची गणसंख्या आणि त्या गटाची शारीरिक ताकद हि महत्वाची आहे. थोडक्यात स्वतःबद्दल विश्वास निर्माण करून हा चिंपाजी स्वतःची शारीरिक ताकद काही पटींनी वाढवण्यात यशस्वी ठरला..
इतिहासजमा झालेले सगळे मानव वंश जवळ जवळ अशाच पद्धतीने स्वतःचा नेता निवडत असावे.
मग होमो सेपियनचे वेगळेपण काय? ज्याला 70 हजार वर्षापूर्वी झालेली बौद्धिक क्रांती म्हणतात, ती नेमकी कोणती? तिचा भाषेशी काय संबंध? एक एक करून या प्रश्नांची उत्तरं शोधुया..

सगळ्यात आधी आपण भाषेकडे वळूया, भाषा म्हणजे माहितीच्या देवाण घेवाणीचे साधन, पण मानवी भाषा म्हणजे फक्त तितकेच नव्हे, कस ते बघूया..

प्रत्येक सजीव कुठल्या न कुठल्या प्रकारे संवाद साधत असतो, मानवी भाषा ही ध्वनी केंद्रित भाषा आहे, पण भाषा फक्त आवाजाचीच नसते. कित्येक कीटक रासायनिक भाषेत संवाद साधतात, अगदी आपल्या स्वतःच्या शरीरातील पेशीही एकमेकींशी रासायनिक भाषेत संवाद साधतात. अगदी ध्वनी आधारित भाषा जरी घेतली तरी मानवाच्या कंठाची ध्वनी निर्माण करण्याची क्षमता हि काही अनन्यसाधारण नव्हे. एखादा पोपट मानवाला येणारे सगळे शब्द तर बोलूच शकतो पण पोपटाला, घोड्याला आणि कोकिळेला येणारे आवाजही काढू शकतो, पण तरी पोपटाची भाषा हि मानवाच्या भाषिक कौशल्याच्या आसपासही पोहचू शकत नाही, हि गोष्ट अजून समजून घेण्यासाठी आपण पुन्हा चिंपाजीचे उदाहरण घेऊ.
इतर अनेक प्राण्यांसारखा चिंपाजीही स्वतःच्या कळापाचे रक्षण करण्यासाठी धोक्याच्या सूचना देतो, चिंपाजीचे दोन मुख्य शत्रू म्हणजे जमिनीवर फिरणारे सिंहासारखे हिंस्त्र प्राणी आणि आकाशात फिरणारे गरुडासारखे पक्षी. चिंपांजींच्या भाषेत या दोन शत्रूंसाठी वेगवेगळे संदेश आहेत. जेंव्हा शास्त्रज्ञांनी हे संदेश रेकॉर्ड करून वाजवले तेंव्हा त्या संदेशाला मिळालेला प्रतिसाद भिन्न होता. पहिला संदेश वाजवताच सगळे चिंपाजी सिंह जवळ आलाय असं समजून पटकन झाडावर पळाले, तर दुसरा संदेह वाजवताच सगळ्यांनी आकाशाकडे पाहिलं.
समजा, या ठिकाणी चिंपाजीऐवजी मानवाचा 5-6 लाख वर्षांपूर्वीचा पूर्वज असता तर त्याने काय केलं असतं? नक्की माहीत नाही पण बहुदा एखाद्याने सिंह पाहिला असता तर त्याने लगेच सिंह कुठे आहे, किती मोठा आहे, काय करतो आहे, तो असलेल्या ठिकाणाकडे जाण्याचे रस्ते कोणते, त्यातला कोणता सुरक्षित हि सगळी माहिती आपल्या टोळीला दिली असती मग सगळ्या टोळीने मिळून त्या सिंहाला कसे हाकलायचे, किंवा त्यानी नुकतीच केलेली शिकार कशी लांबवयाची याचा प्लॅन केला असता.
मानव वंशातील सगळ्या प्राण्यांची भाषा इतकी विकसित नक्की होती. त्यांचे एकमेकांशी असलेले घट्ट संबंध, अग्नीचा हत्यारांचा वापर, भित्तिचित्रे इत्यादिवरून आपण हे अनुमान नक्की काढू शकतो.

पण तरी हे सगळे कळप जास्त मोठे होऊ शकत नव्हते, जसा चिंपाजीचा कळप 100 पेक्षा मोठा झाला की फुटतो तसंच याही मानवांचे कळप एका मर्यादेपर्यंत वाढून फुटायचे आणि मग हे कळप एकमेकांचे हाडवैरी व्हायचे, का?

कारण बहुदा त्यांच्या भाषेत गॉसिप करण्याची सोय नव्हती.. होय बरोबर, गॉसिप किंवा गप्पा, कुटाळक्या, चहाड्या करण्याची सोय नसल्याने त्या आदिम मानवांची भाषा मागे पडली आणि ते होमो सेपियन बरोबरच्या संघर्षात हारले..

कसे ते बघू पुढच्या भागात..

विज्ञानलेख

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

31 Mar 2017 - 8:57 pm | उगा काहितरीच

आवडला हा पण भाग ! मस्त उत्कंठावर्धक चालू आहे . रच्याकने अजून किती भाग असतील साधारणपणे ?

उगा काहितरीच's picture

31 Mar 2017 - 8:57 pm | उगा काहितरीच

आवडला हा पण भाग ! मस्त उत्कंठावर्धक चालू आहे . रच्याकने अजून किती भाग असतील साधारणपणे ?

शैलेन्द्र's picture

1 Apr 2017 - 1:19 pm | शैलेन्द्र

मलाच माहीत नाही

भीमराव's picture

31 Mar 2017 - 9:52 pm | भीमराव

छान,
१ प्रश्न आहे. टोळी किंग पद्धतीमधे किंग सोडुन ईतर नरांना प्रजननाची संधी मिळते का ते तसेच राहतात व एकटा प्रमुख नर सौख्य ऊपभोगतो?

वाचतोय. छान सुरू आहे. पुभाप्र.

nanaba's picture

1 Apr 2017 - 8:33 am | nanaba

Many to many relations asatat chimpanzees madhe. So everyone gets chance.

वरुण मोहिते's picture

1 Apr 2017 - 10:41 am | वरुण मोहिते

छान चालू आहेत ..वाचतोय

अमोल काम्बले's picture

1 Apr 2017 - 12:22 pm | अमोल काम्बले

छान चालू आहेत. पु.भा.ल.टा.

पद्मावति's picture

2 Apr 2017 - 11:56 am | पद्मावति

जबरदस्त लेखमाला. आवडतेय.

पैसा's picture

2 Apr 2017 - 5:13 pm | पैसा

छान लिहितो आहेस.

अप्पा जोगळेकर's picture

3 Apr 2017 - 11:32 am | अप्पा जोगळेकर

छानच. शक्यतो एकही भाग चुकवायचा नाही असे ठरवले आहे.

मराठी_माणूस's picture

3 Apr 2017 - 12:16 pm | मराठी_माणूस

ज्याला 70 हजार वर्षापूर्वी झालेली बौद्धिक क्रांती म्हणतात,

70 हजार वर्षे हा काळ कसा ठरवला ?

संचित's picture

3 Apr 2017 - 1:56 pm | संचित

पु भा प

मंजूताई's picture

3 Apr 2017 - 3:19 pm | मंजूताई

वाचतेय ...

चौकटराजा's picture

3 Apr 2017 - 3:41 pm | चौकटराजा

मस्त माहिती आहे. हा तर ईश्वराचा शोध घ्यायचाच प्रयत्न. निसर्गाशिवाय वेगळा देव आहेच कुठे ?

पुंबा's picture

6 Apr 2017 - 11:57 am | पुंबा

पुढचा भाग येऊ द्या..

आजचा मानव म्हणजे होमो सेपियन की होमो सेपियन सेपियन?
विज्ञानाच्या पुस्तकात होमो सेपियन सेपियन असे वाचलेले आठवते आहे.

आनंदयात्री's picture

6 Apr 2017 - 10:54 pm | आनंदयात्री

छान. हा भागही आवडला. पुभाप्र.

संचित's picture

9 Apr 2017 - 6:26 pm | संचित

हा भागही आवड्ला

संचित's picture

11 Apr 2017 - 8:35 am | संचित

पुढचा भाग कधी येणार?

प्रकाश घाटपांडे's picture

13 Apr 2017 - 8:52 pm | प्रकाश घाटपांडे

असे विज्ञान सांगितले तर का नाही लोकप्रिय होणार?

प्रमोद देर्देकर's picture

16 Apr 2017 - 7:21 pm | प्रमोद देर्देकर

छान येऊ दे अजुन

इरसाल कार्टं's picture

25 Apr 2017 - 4:23 pm | इरसाल कार्टं

छान चालू आहेत. पुभालटा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Apr 2017 - 8:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान चालली आहे मालिका. पुभाप्र.

कोहमच्या पुढच्या भागासाठी रोज मिपावर सकाळ संध्याकाळ चक्कर मारत आहे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

शाम भागवत's picture

3 May 2017 - 2:04 pm | शाम भागवत

मी पण

पुंबा's picture

4 May 2017 - 12:34 pm | पुंबा

+११
हाऊ ना..
येऊ द्या हो पूढचा भाग..

पुंबा's picture

4 May 2017 - 12:35 pm | पुंबा

+११
हाऊ ना..
येऊ द्या हो पूढचा भाग..