शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ एकजीव

नीलमोहर's picture
नीलमोहर in जनातलं, मनातलं
23 Feb 2017 - 6:52 am

aa

मावळतीची किरणे चहूकडे सोनं उधळीत होती,
ते सोनेरी लेणं लेऊन लाटाही चमचमत होत्या,
फेसाळत्या लाटांच्या गाजेने आसमंतास एक गूढगंभीर साज चढवला होता.

तिला समुद्र आवडतो, मनापासून..
त्याला माहित होतं, म्हणून तो तिला इथे घेऊन आला होता,
जिथे होते फक्त ते दोघे, समुद्र, आणि साक्षीला सांजवेळ..

तिच्याकडे बघून मंद स्मित करत त्याने तिचा हात हाती घेतला," खुश ना?"

तिचा चेहरा उतरला," किती कमनशिबी आहे मी,
समोर अथांग समुद्र.. त्याला भेटू शकत नाही,
लाटांच्या या पायघड्या त्याने अंथरल्यात, त्यांवर चालू शकत नाही."

"बस, इतकंच.."
त्याने हलकेच तिला व्हीलचेअरवरून उचलून घेतलं,

मग वाळूत खुणा उमटवीत दोघे चालू लागले,
तो त्याच्या पावलांनी, तीही त्याच्याच.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

स्रुजा's picture

23 Feb 2017 - 8:48 am | स्रुजा

छान !

कथा आवडली. हळुवार एकदम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2017 - 11:33 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

पद्मावति's picture

23 Feb 2017 - 12:20 pm | पद्मावति

तो त्याच्या पावलांनी, तीही त्याच्याच. क्या बात है. सुरेख.

समाधान राऊत's picture

23 Feb 2017 - 4:09 pm | समाधान राऊत

आवडल्या गेली आहे

शब्दानुज's picture

19 Mar 2017 - 1:14 pm | शब्दानुज

पण त्या वाळूपर्यत व्हीलचेअर येईल का ?

मराठी कथालेखक's picture

26 Mar 2017 - 10:54 pm | मराठी कथालेखक

आता सर्व लेखकांनी आपापली ओळख उघड करायला हरकत नसावी.
मला ही कथा विशेष आवडली म्हणून या कथेच्या लेखकास ओळख जाहीर करण्याची विनंती करतो आहे..
धन्यवाद

मग वाळूत खुणा उमटवीत दोघे चालू लागले,
तो त्याच्या पावलांनी, तीही त्याच्याच.

क्लास!

मराठी कथालेखक's picture

30 Mar 2017 - 11:05 am | मराठी कथालेखक

या कथेचं Role reversal होवू शकेल काय ? म्हणजे तो अपंग -व्हीलचेअरवर असेल तर ती त्याला उचलून घेईल का ? :)