भारतीय इमोश्नल ब्लॅकमेलिंग व चुकीचे आदर्श

त्रास's picture
त्रास in जनातलं, मनातलं
19 Feb 2009 - 5:17 pm

एक बातमी- अमके तमके श्री. प्रसिद्ध व्यक्तिमत्व ह्यांना तमक्या वकिलातीने व्हीसा नाकारला.

[बातमीत हे देत नाही की त्यांनी कागदपत्रांची पुर्तता केली होती की नाही. पण आमच्या लाडक्या दैवताला तुम्ही व्हिसा देत नाही हा "इमोशनल" मुद्दा लावून धरला जातो व लोकांच्या समोर चुकीचा आदर्श उभा राहतो. व्यक्तिमत्व लाडके असले म्हणजे काय झाले त्यांना कायद्याच्या सवलती नसाव्यात हा मुद्दा त्यात येत नाही.]

दुसरी बातमी- श्री. अमुक तमुक ह्यांनी १००० नाटकाचे प्रयोग केल्यानिमित्ताने सत्कार

[त्यांचा नाटक हा व्यवसाय आहे. मग त्यात काय विषेश- सत्कार कशाबद्दल? त्यांनी अभिनय हा व्यवसाय पोटापाण्यासाठी निवडला आहे.
एखाद्या काम्गाराला १००० दिवस रोज कामावर गेल्याबद्दल, देशाच्या उत्पादनात भर घातल्याबद्दल काय बक्षीस मिळते?
एखाद्या डेव्हलपर्ला १००००० लाईन्स कोड लिहिल्या बद्दल काय बक्षीस मिळते?
एखाद्या सफाई कामगाराला शहरातील गटारं ५ वर्षे रोज साफ़ केल्याबद्द्ल काय मान मिळतो?
एखाद्या पि एम टी ड्रायव्हरला अपघात न करता बस चालवल्याबद्दल काय शाबासकी मिळते?
एखाद्या रिक्षावाल्याला रोज दिवसभर रिक्षा चालवून, सन्मानाने पैसे मिळवून, कुटूंब चालवायचे असते म्हणुन प्रदुषणात स्वतःची फुफूसे जाळून घ्यावी लागतात. त्याच्या अथक प्रयत्नांसाठी त्याच्या पाठीवरुन कोण हात फिरवते?
एखाद्या वैमानिकाला ५००० तास विमान उडवल्याबद्द्ल काय मिळते?
इस्रो मधिल संशोधक तुम्हाला माहित आहेत?

समाजापुढे कोण येते- गायक, वादक, अभिनेते, लेखक, म्हणजे सगळे कला वाले. इतरांना ह्या समाजात जगण्याची लायकी नाही आहे का? आपल्या आजुबाजूला असे अनेक आहेत की ज्यांच्या शिवाय आपले काहिच चालू शकणार नाही. त्याच्या पाठीवर पण मायेचा हात फिरला पाहिजे तरच भारतात श्रम प्रतिष्ठेला महत्व मिळेल.

तुम्ही भारतातील घाणीला, वगैरे जे दोष देता त्याचे उत्तर इथे लपले आहे का?
भारतीय ज्यापद्धतीने बेशिस्तेने वागतात त्याचे उत्तर इथे लपले आहे का?

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

19 Feb 2009 - 5:22 pm | ब्रिटिश टिंग्या

तुम्ही जे कोणी आहात्....धन्य आहात!

आज तुमच्या या लेखरुपी अंजनाने माझे चुकीच्या आदर्शांची पट्टी बांधलेले डोळे खाडकन उघडले गेले.....
त्याबद्दल जन्मभर मी आपला शतश: ऋणी राहीन!

- टिंग्या

आनंदयात्री's picture

19 Feb 2009 - 5:24 pm | आनंदयात्री

सहमत आहे.
डु यु थिंक आउट ऑफ द बॉक्स ? येह इ विल फॉलो यु :)

दशानन's picture

19 Feb 2009 - 5:26 pm | दशानन

वाटते बदडावे ईतके की..... कंटाळा तुला यावा ...
भांड्ता भांड्ता तुझ्या तोंडाला फेस यावा

मृगनयनी's picture

19 Feb 2009 - 5:32 pm | मृगनयनी

वाटते बदडावे ईतके की..... कंटाळा तुला यावा ...
भांड्ता भांड्ता तुझ्या तोंडाला फेस यावा


राजे!!! =)) =)) =))
=)) =))
=))
=))

फारच मनाला लावून घेतलय, कि ओ "त्यांचे ते वाक्य"!!!!!
___________________________

पण प्रस्तुत लेखकाने मान्डलेला शब्द न शब्द खरा आहे.
या समाजात कुणीतरी आहे, जो एका वेगळ्या ऍन्गल्ने समाजाकडे, सामान्यांकडे पाहतोय.

मी .......प्रचंड प्रभावित!!!!!!!!

प्रस्तुत लेखकाने आपले नाव असे "त्रासिक " का ठेवले, या बद्दल पण प्रचंड कुतुहल असणारी.......................
मृगनयनी.
:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

त्रास's picture

20 Feb 2009 - 6:41 am | त्रास

ज्यांचे बौद्धिक सामर्थ्य खुंटते ते असेच हमरीतुमरी वर येतात.

दशानन's picture

20 Feb 2009 - 6:57 am | दशानन

वाटते बदडावे ईतके की..... कंटाळा तुला यावा ...
भांड्ता भांड्ता तुझ्या तोंडाला फेस यावा

ह्या ओळी तुला उद्देशून नाही आहेत हे मी खालीच स्पष्ट केले आहे हे माझे हस्ताक्षर आहे ;)
काही मिपाकर.. म्हणजेच माझ्या कंपुतले मित्र माझी खास हस्ताक्षरे वाचण्यासाठीच माझा प्रतिसाद पाहतात कारण मी प्रतिसाद लिहीत नाही हे त्यांना ही माहीत आहे =))

+१वीर
राजे

सहज's picture

19 Feb 2009 - 5:26 pm | सहज

सहमत आहे

श्री's picture

19 Feb 2009 - 5:28 pm | श्री

+४
सहमत आहे
तमसो मा ज्योर्तिगमय

इनोबा म्हणे's picture

19 Feb 2009 - 5:33 pm | इनोबा म्हणे
दशानन's picture

19 Feb 2009 - 5:33 pm | दशानन

तुम्ही प्लस वन हा वरील प्रतिसादा साठिच दिला आहे ना :?


वाटते बदडावे ईतके की..... कंटाळा तुला यावा ...
भांड्ता भांड्ता तुझ्या तोंडाला फेस यावा

हे वरील माझं हस्ताक्षर आहे.... त्रास ह्यांना दिलेली धमकी नव्हे =))

भडकमकर मास्तर's picture

19 Feb 2009 - 5:31 pm | भडकमकर मास्तर

पहिला मुद्दा पटला...
पण एक शंका...
( कागदपत्रांची पूर्तता असतानासुद्धा काही वकिलातीमध्ये त्या त्या वेळच्या अधिकार्‍याच्या "मनात आले म्हणून" वगैरे कारणासाठी व्हिसा नाकारू शकतात असे ऐकले... ठाणेदारांच्या पुस्तकात असा काही संदर्भ होता असे वाचले होते)..खरी खोटी माहिती इथल्या अनुभवी लोकांनी द्यावी..

नुकताच कबड्डी कबड्डी या नाटकासाठी विनय आपटे यांना व्हिसा नाकारला होता... त्यामुळे तिकडल्या मंडळींना मंगेश कदमचा अभिनय सहन करावा लागला / पहायची संधी मिळाली असे ऐकले... इथेही जाणकारांनी माहिती द्यावी...

दुसरा मुद्दा तितका नाही पटला...
... हजार प्रयोग तितके जास्त होत नाहीत म्हणून एवढे कौतुक...
आणि ड्रायव्हरचे कौतुक होतेच की...
आणि हजार प्रयोगाचे कौतुक जनरली ती संस्थाच करते.. ( स्वतःच्या खर्चाने)... :) ....
एखाद्या प्रोग्रॅमरने स्वतःच एक कार्यक्रम करावा , छान कोड लिहिला म्हणून ...
किंवा इस्त्रोतल्या संशोधकाने स्वतःच एक पार्टी द्यावी स्वा:च्या खर्चाने...झाले तर मग...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

त्रास's picture

19 Feb 2009 - 5:44 pm | त्रास

दिलेली उदाहरणे प्रातिनिधिक आहेत.
मी सरकारी सत्काराबद्दल लिहिले आहे.

भडकमकर मास्तर's picture

19 Feb 2009 - 10:43 pm | भडकमकर मास्तर

मी सरकारी सत्काराबद्दल लिहिले आहे.

एक तर तुम्ही सरकारी सत्कार असे कुठे लिहिलेले दिसले नाही...
आणि हजार नाटकाचे ( की नाटकाचे हजार ) प्रयोग केले म्हणून कोणत्या नटाचा सरकारने सत्कार केला तेही बरोबर लिहिले असतेत तर बरे झाले असते...

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Feb 2009 - 9:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

किंवा इस्त्रोतल्या संशोधकाने स्वतःच एक पार्टी द्यावी स्वा:च्या खर्चाने...झाले तर मग...
जी.एम.आर.टी.चे जनक डॉ.गोविंदस्वरूप यांना पंतप्रधानांच्या हस्ते गोल्ड मेडल मिळालं, अर्थातच त्यांनी एक अतिप्रचंड दुर्बिण उभारून जगभरात भारताचं नाव आणखी एका चांगल्या कारणासाठी पोहोचवलं म्हणून! गोविंदस्वरुपांनी एक छोटेखानी पार्टी दिली, ऑफिसातल्या सगळ्या सहकार्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी.
आणि काही दिवसांनी पेप्रात छापून आलं, 'आयुका'ने जी.एम.आर.टी. बनवली म्हणून!

अदिती

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Feb 2009 - 5:47 pm | बिपिन कार्यकर्ते

कौतुक

समाजात सगळ्याच प्रकारच्या लोकांचे कौतुक होते. पण प्रत्येक क्षेत्रामधे कौतुकाचे निकष वेगळे असतात. १००० प्रयोग केल्याने कलाकाराचा सत्कार होतो म्हणून १००० किंवा १०००० किंवा १००००० किंवा कितीही ओळींचा प्रोग्रॅम लिहिणार्‍या प्रोग्रॅमरचं कौतुक नाही होऊ शकत.

मुळात समाजात कौतुक होतं कारण एखादी व्यक्ति पूर्ण समजासमोर, समजासाठी काहीतरी करते. कलाकार हा समाजापुढेच असतो सतत, त्याच्या सगळ्या कलाकृती समाजासाठीच असतात. जर का एखाद्या प्रोग्रॅमरने असं एखादं सॉफ्टवेअर बनवलं किंवा एखादी सॉफ्टवेअर कंपनी उत्तुंग यशाला नेली तर होतंच की त्यांचं कौतुक. नारायणमूर्ति, प्रेमजी वगैरे आहेतच की. किंवा असेही असतील ज्यांनी काही लोकोपयोगी तंत्रज्ञान विकसित केलं आहे जेणेकरून त्यांच्या परिघापुरत्या समाजात त्याम्चं कौतुक झालंच असेल.

कितीतरी सार्वजनिक बसचालकांचे जाहिर कौतुक झाल्याच्या बातम्या आपण वाचतोच. गुणी शिक्षकांचे कौतुक होते. एखाद्या अशिक्षित मेक्यानिकने काही तरी नविन उपकरण तयार केले वगैरे बातम्या आपण वाचतोच.

बिपिन कार्यकर्ते

त्रास's picture

19 Feb 2009 - 5:54 pm | त्रास

इथे आशय आहे कौशल्याच्या कौतुकाचा. मी दिलेली प्रतिनिधिक समजावित.

कौशल्याच्या सत्कारामुळे त्यात वर्धन होणे अपेक्षित असते. जशा कलाकाराच्या कलाकृती समाजासाठी असतात तशाच इतरांच्याही सेवा समाजासाठीच असतात.

त्रास's picture

19 Feb 2009 - 6:31 pm | त्रास

जेवढे गायन, वादन, अभिनय अशा कलाबद्दल रोज छापुन (प्रमोशनल) येत असते त्याच्या किती प्रमाणात इतर कौशल्यांच्या बाबतीत छापुन येते?
कित्येक व्यवसायांना ज्योक्मधून वगैरे हिणवले जाते. उदा. कारकुनी. त्यात हिणवण्यासारखे काय असते? ती ही माणसंच आणि ते ही समाजाची सेवा म्हणूनच ते काम करत असतात.
मराठी तरुण घरी बसुन राहणे पसंत करतो पण हिणवल्या गेलेल्या व्यवसायाची निवड केली की लोक हसतील, कायमचा "शिक्का" मरतील ही भीती बाळगतो.

सूहास's picture

19 Feb 2009 - 5:50 pm | सूहास (not verified)

सुहास..

बाप्पा's picture

19 Feb 2009 - 6:19 pm | बाप्पा

अगदि सहमत. आजकाल तर कलाकर मोठा झाला कि तो प्रसीध्दी च्या जोरावर निवडुन येतो आणि ५ वर्ष फुकटचे सरकारी मानधन खाउन ढेकर पन नाय देत. किति उदाहरणे देउ? उदाहरणे देत नाही कारण फुकट लोकांच्या भावना दुखावतील.

लिखाळ's picture

19 Feb 2009 - 6:38 pm | लिखाळ

काही मुद्दे पटले. कारकून आणि सिनेस्टार या दोन पेशांमध्ये जी प्रसिद्धीची तफावत आहे ती भारतच नाही तर जगभर आहे.

समाजातल्या काही लोकांनी सर्वच गुणवंतांचे कौतूक करावे हा मुद्दा योग्यच आहे. आणि समाजाने अश्या गुणवंतांप्रति आदर बाळगावा हे खरेच.

पण गुणवत्ता (कष्ट इद्यादी) आणि प्रसिद्धी नेहमीच हातात हात घालुन जात नाहीत. उदा. मध्यम दर्जाच्या क्रिकेटपटूचे नावच काय त्याच्या खाद्याआवडी सुद्धा लक्षांत राहतील पण एवरेस्टवीर सुरेंद्र चव्हाणचे नाव लक्षांत राहिले तरी मिळवली अशी स्थिती आहे. ती डाचते.
-- लिखाळ.

त्रास's picture

19 Feb 2009 - 6:43 pm | त्रास

"मध्यम दर्जाच्या क्रिकेटपटूचे नावच काय त्याच्या खाद्याआवडी सुद्धा लक्षांत राहतील पण एवरेस्टवीर सुरेंद्र चव्हाणचे नाव लक्षांत राहिले तरी मिळवली अशी स्थिती आहे. ती डाचते."

अगदी हाच मुद्दा मला मांडायचा होता. धन्यवाद कंपॅशनबद्दल.

ऍडीजोशी's picture

19 Feb 2009 - 7:07 pm | ऍडीजोशी (not verified)

मध्यम दर्जाच्या क्रिकेटपटूचे नावच काय त्याच्या खाद्याआवडी सुद्धा लक्षांत राहतील पण एवरेस्टवीर सुरेंद्र चव्हाणचे नाव लक्षांत राहिले तरी मिळवली अशी स्थिती आहे.

ह्यात आमची काय चूक? क्रिकेट पटूंच्या माहितीचा सतत आमच्यावर सगळीकडून मारा होत असतो. तेंव्हा जबरदस्तीने लक्षात रहातेच. स्वत: हून त्याचा पाठलाग करून तो कुठल्या हॉटेल मधे खातो, कुठल्या ब्रँड चे कपडे वापरतो हे आम्ही शोधत नाही.

अवांतर: एकूण ९ वेळा भारत-श्री (शरीर-सौष्ठव स्पर्धेत) मिळवणार्‍या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे नाव काय? सद्ध्याचा महाराष्ट्र-श्री कोण आहे? भारताने कबड्डीत किती पदकं मिळवली आहेत?

ऍडीजोशी's picture

19 Feb 2009 - 7:00 pm | ऍडीजोशी (not verified)

कारकून हजारो असतात, सफाई कामगार हजारो असतात, कोडींग करणारेही हजारो असतात.

पण मराठी नाट्यभूमी मॄतप्राय अवस्थेत असताना एखाद्या नाटकाचे १००० प्रयोग एकट्याच्या जीवावर करून दाखवणारा आणि नाटकाचे खेळ पुन्हा महिनेच्या महिने हाऊसफुल्ल मधे चालवणारा तसा सन्माननीय, लाडका कलाकार एखादाच असतो. (आता फुकट नाटकामधे बॅकस्टेज वाले पण अविभाज्य घटक आहेत असं समाजवादी वाद घालू नये. लोकं पडदे खिडक्या नाही तर त्या लाडक्या कलाकाराला बघायला जातात)

वर्तमानपत्रात वाचकांचा पत्रव्यवहार सदरात लिहीणारे लोक आणि पु. ल. ह्यांच्यातला फरक कळत नसेल तर देव पण भलं करणार नाही.

१००० कारकून नसते तरी आपल्याला काही फरक पडला नसता. पण एक लता, एक पु.ल., एक वसंतराव, एक सचीन हे नसते तर... कल्पनाही करवत नाही.

तुमच्या तोकड्या बुद्धीला सलाम.

(ह. घ्या. किंवा नका घेऊ)

त्रास's picture

19 Feb 2009 - 7:05 pm | त्रास

आणि १००० डेव्हल्पर नसते तर? ड्रूपल झाले असते का जिवंत?

त्रास's picture

19 Feb 2009 - 7:05 pm | त्रास

"तुमच्या तोकड्या बुद्धीला सलाम."
धन्यवाद.

त्रास's picture

19 Feb 2009 - 7:07 pm | त्रास

"पण मराठी नाट्यभूमी मॄतप्राय अवस्थेत असताना एखाद्या नाटकाचे १००० प्रयोग एकट्याच्या जीवावर करून दाखवणारा आणि नाटकाचे खेळ पुन्हा महिनेच्या महिने हाऊसफुल्ल मधे चालवणारा तसा सन्माननीय, लाडका कलाकार एखादाच असतो. (आता फुकट नाटकामधे बॅकस्टेज वाले पण अविभाज्य घटक आहेत असं समाजवादी वाद घालू नये. लोकं पडदे खिडक्या नाही तर त्या लाडक्या कलाकाराला बघायला जातात)"

हे तुमच्या त्या लाडक्या कलाकाराला वाचयला द्या तोच त्याचे स्प्ष्टीकरण देईल.

आनंद's picture

19 Feb 2009 - 7:29 pm | आनंद

मुद्दा एकदम पटला त्रासभाउ.(अगदी मनातलाच)
गायक, वादक आणि कलावंत मंडळी, तू मला भारी म्हण मी तुला लॅए भारी म्हणतो.हेच सुत्र पाळत असतात्.खाजगीत एकमे़कां विषयी काय बोलतात हे बाहेर आल तर सगळ्या श्रद्धास्थानां विषयी चा आदर झट्क्यात गळुन पडेल.
आपल्या कडे पंतप्रधानांच्या कवितानां चाली लावल्या म्हणुन पद्मश्री पण मिळु शकते.

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Feb 2009 - 9:15 pm | llपुण्याचे पेशवेll

अगदी खरे.
http://www.esnips.com/doc/8eb029df-4ced-451a-969b-42fbe06f67fb/11.with-P...
http://www.esnips.com/doc/7c96093a-2a53-4174-9a4a-04e4152400cf/12.with-P...
इथे ऐका. कलाकार कलाकारांबद्द्ल काय म्हणतात ते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

त्रास's picture

20 Feb 2009 - 1:50 am | त्रास

असं झालंय बहुतेक, त्यामुळे ज्या गोष्टींचे काहीच महत्व नाहीये, ते महत्वाचे वाटू लागलेय. बहूतेकांना माहित असेल ही गोष्ट:-

monkey story (company policy, organizational development, group behaviour, group beliefs, inertia and assumptions)

Start with a cage containing five monkeys.

Inside the cage, hang a banana on a string and place a set of stairs under it.

Before long, a monkey will go to the stairs and start to climb towards the banana.

As soon as he touches the stairs, spray all of the monkeys with cold water.

After a while, another monkey makes an attempt with the same result - all the monkeys are sprayed with cold water.

Pretty soon, when another monkey tries to climb the stairs, the other monkeys will try to prevent it.

Now, turn off the cold water.

Remove one monkey from the cage and replace it with a new one.

The new monkey sees the banana and wants to climb the stairs.

To his surprise and horror, all of the other monkeys attack him.

After another attempt and attack, he knows that if he tries to climb the stairs, he will be assaulted.

Next, remove another of the original five monkeys and replace it with a new one.

The newcomer goes to the stairs and is attacked.

The previous newcomer takes part in the punishment with enthusiasm.

Again, replace a third original monkey with a new one.

The new one makes it to the stairs and is attacked as well.

Two of the four monkeys that beat him have no idea why they were not permitted to climb the stairs, or why they are participating in the beating of the newest monkey.

After replacing the fourth and fifth original monkeys, all the monkeys that have been sprayed with cold water have been replaced.

Nevertheless, no monkey ever again approaches the stairs.

Why not?

Because as far as they know that's the way it's always been around here.

And that's how company policy begins ...

मराठी_माणूस's picture

20 Feb 2009 - 6:54 am | मराठी_माणूस

म्हणुनच सरकार अजुन ही अँबॅसॅडर गाड्या वापरते

विसोबा खेचर's picture

20 Feb 2009 - 6:55 am | विसोबा खेचर

वा! छानच मुद्दे मांडले आहेत..!

नाटककार, गायक, अभिनेते, बस ड्रायव्हर, भंगी, रिक्षावाले, अमके, ढमके, तमके.....वगैरे वगैरे सगळ्यांचा सत्कार झालाच पाहिजे..!

मराठी आंतरजालावर लिहिणार्‍या तात्या अभ्यंकरांचा, त्रासबुवांचाही सत्कार झालाच पाहिजे! नाही झाला तर आम्हीच तिच्यायला शंभर रुपायांचा एक हार आणून स्वत:च्या गळ्यात घालून घेऊ. त्रासबुवा, आपलं म्हणणं खरं आहे. सगळ्यांचाच सत्कार झाला पाहिजे..

समाजाची वासना शमन करणार्‍या, शैय्यासोबत करून एका रात्री पाच पाच पुरुषांची वासना मिटवणार्‍या आमच्या फॉकलंड रोडवरील रांडांचाही सत्कार झाला पाहिजे!

सगळ्यांचाच सत्कार झाला पाहिजे...!

त्रासबुवा, आम्ही आपल्याशी सहमत आहोत! :)

आपला,
(सत्कारेच्छुक) तात्या.

स्वगत : छ्या! काय साली वेडझवी लोकं असतात! :)

विंजिनेर's picture

20 Feb 2009 - 6:55 am | विंजिनेर

मला वाटते हा फार संकुचित विचार आहे.
आपल्या वाचनात जेव्हढे येते त्यात कलाकार, क्रिकेटपटु आणि लेखक-कवी मंडळीचा आदर सत्कार वारंवार लिहून येतो. याचा अर्थ इतर कोणत्या क्षेत्रातील व्यक्तिची दखल घेतलीच जात नाही हे चूक आहे.
केवळ सकाळ/लोकसत्ता/टाईमस ऑफ इंडिया/व्हॅनिटी फेअर म्हणजे सारे विश्व नव्हे.

आजकाल माहितीचा महापूर आला आहे. त्यात प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींची बारकाईने दखल घेणारी वार्तापत्रे असतातच की(उदा "नेचर" सारख्या अति शास्त्रीय आणि प्रचंड प्रतिष्ठेच्या पाक्षिका पासून नॅशनल जिओग्रॅफिक सारख्या सर्वसामान्य माणसाला आवडेल अशा भाषेत माहिती देणार्‍या मासिकापर्यंत, ईकॉनॉमिस्ट सारख्या "अभ्यासु" वृत्तपत्रापर्यंत ). आता तुम्ही ती वार्तापत्रे वाचत नाही आणि मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रे तुम्हाला हव्या असणार्‍या लोकांच्या बातम्या छापत नाही असे म्हणणे म्हणजे हास्यास्पद आहे.
मुख्य प्रवाहातील वर्तमान पत्रे/दूरदर्शन वाहिन्या इ. चा बातम्या देण्याचा उद्देश हा व्यावसायिक असतो. त्यात कमी जास्त झाले तर निराशेच्या भरात एव्हढा कांगावा करण्यात अर्थ नाही.

या शिवाय महाजालावर तर अक्षरशः लाखोंच्या संख्येने स्वतंत्र/अव्यावसायिक दृष्टिकोण ठेवून आपली मतं मांडणार्‍या अनुदिनी/संकेतस्थळे सापडतील. तुम्ही-आम्ही सुद्धा वर्षाला दोनचार हजार रूपयांमधे एखादे संस्थळ चालवू शकतो. तिथे मग करा की हव्या त्या व्यक्तिचे कौतुक. नाहीतर मनमुराद शिव्या सुद्धा घाला. लिहिलेत चांगले तर लोक वाचतील!!

एकलव्य's picture

20 Feb 2009 - 8:08 am | एकलव्य

लष्करातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने काही दिवसांपूर्वी विरोपातून पाठविलेला लेख सदर धाग्याशी संलग्न वाटल्याने येथे चिकटवितो आहे -

DEATH IS HUMBLING BUT NOT SYNONYMOUS WITH BRAVERY By Lt Gen Vijay Oberoi

An unprecedented eleven Ashoka Chakras were presented by the Rashtrapati onthe 60th anniversary of the Republic. That the numbers are exceptionallyhigh may not be an issue, as bravery of the most exceptional order cannotand must not be constrained by numbers. However, the highest peace-timeaward must only be bestowed for exceptional bravery and for no other reason.There is a question mark on whether the awards this year were given only tothe exceptionally brave.

In writing this piece I am aware that I am touching a sensitive issue,especially as it is about the death of four highly regarded police officers.To that extent, I am guilty of being politically incorrect, but there aretimes when one has to speak one's mind, however unpalatable it may be. Thisis one of those exceptional occasions. My aim in doing so is not todenigrate the sacrifices made by these officers but to caution the nationalleadership not to succumb to political expediency when considering suchweighty issues as conferring of the highest bravery awards.

We Indians are highly emotional when it comes to death, but emotions have noplace when it is a question of recognising valour. The highest recognitionfor exceptional bravery is the award of Ashoka Chakra in peace time and thatof the Param Vir Chakra in the face of the enemy during war. These are theonly two awards that are bestowed publicly at the Republic Day Parade andfor good reason, so that the bravery of the awardees is fully appreciated bythe entire nation. All other awards, for bravery as well as fordistinguished service, are presented by the Rashtrapati on investitureparades held at Rashtrapati Bhavan.

In accordance with the official website, Ashoka Chakra is awarded for mostconspicuous bravery, or some act of daring or pre-eminent act of valour orself-sacrifice otherwise than in the face of the enemy. All ranks of thearmy, the navy and the air force, members of the nursing services of thearmed forces or of any of the reserve forces, the territorial army, militiaand of any other lawfully constituted forces are eligible to receive thismedal. Civilian citizens of either sex in all walks of life, other thanmembers of police forces and of recognised fire services are also eligible.

Soon after the terrorist attack in Mumbai, where a number of senior policeofficers had lost their lives within a few hours of the terrorist strike, ananalyst had termed them "Innocent Casualties". In amplification he hadstated that these three officers, along with a few policemen had beensurprised, waylaid and butchered without getting a chance to use theirweapons. Perhaps their lack of training did not permit them to anticipateand react with operational swiftness. Their dear ones do deserve our deepsympathy and heartfelt condolences, as well as care and compassion, but dothey meet the criteria of "the most conspicuous bravery"? The same appliesto another police officer who was unfortunately killed in an earlierincident in Delhi.

By all accounts, all four police officers were highly efficient, dedicatedand exemplary officers. Their devotion to duty needs to be recognised andhonoured, but this is not the way of doing so. There is a vast differencebetween gallantry awards and awards for distinguished service. A largenumber of military personnel, especially from the army, lay down their livesor lose limbs fighting terrorists in various parts of the country, nearly ona daily basis. Their sacrifices are for the country. Yet most of them do notqualify for earning gallantry awards, even of a lesser category. Let me citemy own example. I lost my leg during the 1965 Indo-Pak War and becamepermanently disabled, but I did not get any award. Neither did I ever thinkthat I should have been given one. The same is the case with the largenumber of soldiers and officers who are killed or disabled in wars orwarlike situations. That is how it should be.

In the army, grant of gallantry awards is an elaborate process, wherecommanders at successive levels give their recommendations after evaluatingall facts. Eventually, a committee presided over by the Vice Chief takes thefinal decision. During this process, the operational staff briefs thecommittee about all facets of the relevant operations. It is only when allmembers of the committee are fully satisfied that the award is approved. Inthe case of higher level of awards, the cases also need the Chief's approvaland later that of the Minister of Defence.

The trend of bestowing gallantry awards merely because officers had losttheir lives in terror-related incidents goes back to the death of two seniorofficers in Afghanistan in a terrorist incident, who were awarded KirtiChakras, the second highest gallantry award not in the face of the enemy.The two, one a brigadier from the army and the other an officer of theforeign service, lost their lives as they were driving in when an explosivedevice was exploded by terrorists at the embassy gate. Surely there was nobravery there. The government must take all actions to help the next of kinmonetarily and for subsequent rehabilitation, but it must not be done bybestowing high level gallantry awards. Such hasty and irrational decisionstaken by the Government devalue the awards, besides creating embarrassment.

My concern in this piece is that if we persist in this type of populouslargesse, the sanctity and aura attached to these highest level gallantryawards that the nation bestows on the bravest of the brave would disappear.Surely, the nation does not want this, even if some political leaders desireit for extraneous reasons.

जयहिंद!

दशानन's picture

20 Feb 2009 - 8:12 am | दशानन

इंग्रजी मध्ये का प्रतिसाद ?

मी वर जी सत्यकथा लिहली आहे ती हरयाणवी मध्ये आहे त्याच भाषेत देऊ का :?

च्यामायला ज्या कोणी ही इग्रजी भाषा काढली आहे त्याला फासावर चढवा रे कोणी तरी ;)

वैताग आला आहे !

एकलव्य साहेब तुमच्या कडून देखील ही अपेक्षा नव्हतीच... त्याच्या नावामध्येच त्रास आहे त्यामुळे त्याला काहीच बोललो नाही पण तुम्ही पण :''(

इंग्रजी मध्ये का प्रतिसाद ?
>> प्रतिसाद मराठीत आहे. जोडलेला लेख इंग्रजीत आहे. मुद्दाम इंग्रजी लिहिणे मराठी संस्थळावर टाळले पाहिजे हा आग्रह मान्य आहे पण निव्वळ मराठीत भाषांतर करायला जमले नाही म्हणून अधिकारी माणसाचे विचार येथे मांडण्यास हरकत नाही अशी माझी समजूत आहे.

च्यामायला ज्या कोणी ही इग्रजी भाषा काढली आहे त्याला फासावर चढवा रे कोणी तरी
=))

एकलव्य साहेब तुमच्या कडून देखील ही अपेक्षा नव्हतीच... त्याच्या नावामध्येच त्रास आहे त्यामुळे त्याला काहीच बोललो नाही पण तुम्ही पण

>> जाऊ द्या... सवड मिळेल तसे भाषांतर करेन. पण उगाच कोणाची जात आणि नाव काढू नये हे बरे!

मर्‍हाटी चीअर्स - एकलव्य

अभिष्टा's picture

20 Feb 2009 - 1:11 pm | अभिष्टा

आम्ही मित्र मैत्रिणींनी २६ नोव्हेंबर नंतर आपली आर्मि, एन्.एस्.जी, पोलिस, अग्निशमन दल यांना पत्रं लिहून आभार मानले होते व अभिनंदन केले होते. काही सख्या स्वतः पोलिस स्टेशन्स, अग्निशमन दलाच्या ऑफिस मधे जावून फूल व पत्र देवून आल्या. काहीजणी कै. तुकाराम ओंबळे यांच्या घरीही जावून आल्या. काही जण अग्निशमन दलाच्या ऑफिस मधे चिफ फायर ऑफिसरना पत्र द्यायला गेले असताना काही जवान भेटले. सामान्य माणसांपैकी कुणी असं प्रत्यक्ष येवून कृतज्ञता व्यक्त करतंय हे पाहून त्यांना भरुन आलं होतं. त्यातला काहींनी सांगितलं की ताज मधे मे. उन्नीकृष्णन शहिद व्हायच्या आधी ५ मिनिटे, त्यांना जिन्यातच थांबवून पुढचा मार्ग क्लिअर करायला पुढे गेले होते.
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

शिवापा's picture

20 Feb 2009 - 4:13 pm | शिवापा

लहान असतांना आजोबानी एक गोष्ट सांगितली होती.

पावसाळ्यात रस्त्यांत पाणि साठते. चालताना पाण्यातुन जाता यावे म्हणुन दगड वैगेरे ठेवलेले असतात. आपण सहज पाय ठेउन पलिकडे जातो. हा दगड कुणी ठेवला असेल असे साधे मनात सुद्धा येत नाहि.

पाउलवाटा बणन्याआगोदर कुणितरी काटे तुड्वत तुड्वतच गेलेला असतो

तिमा's picture

20 Feb 2009 - 7:23 pm | तिमा

आहो, नेते लोकांच्या भाषेत सत्काराचा अर्थ वेगळा आहे बरं का! सत्कार म्हणजे मुडदा पाडून गुपचुप मातीत गाडणे. आठवा तो पोलिटिकल पिक्चर, ज्यात जो मुख्यमंत्र्याच्या पोरीला वाचवतो त्याचाच "सत्कार" होतो.

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Feb 2009 - 7:40 pm | ब्रिटिश टिंग्या

असा चित्रपट होता!