तो मी नव्हेच

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
21 Mar 2017 - 3:02 pm

गज़लेत सूर्य होतो, तो पिऊन अंध:कार
मी कुडकुडून जातो, डेंजर किती हे वारं

ब्रह्मांड भेदुनिया, गर्जेल काव्य त्याचे
टपरीकडे विडीच्या, वळतात पाय माझे

मृत्यूस डिवचणारे, तो अमरगीत रचतो
लाईफ इन्शुरन्सचा, मी पूर्ण हप्ता भरतो

तारे, फुले नि शब्द, वश त्यास जन्मसिद्ध
मी सापळ्यात - माझे, पाठीस पोट बद्ध

हास्यकविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

21 Mar 2017 - 11:36 pm | चांदणे संदीप

.

Sandy

शार्दुल_हातोळकर's picture

22 Mar 2017 - 12:34 am | शार्दुल_हातोळकर

कल्पनाविलास आणि वास्तव याची मस्त सांगड !

सत्यजित...'s picture

22 Mar 2017 - 5:39 am | सत्यजित...

'मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो...
तो कट्ट्यावर बसतो,घुमतो,शिळ वाजवतो...'

हे गीत आठवुन गेले!

अनन्त्_यात्री's picture

22 Mar 2017 - 10:19 am | अनन्त्_यात्री

स॑दीप, शार्दूल, सत्यजित ..धन्यवाद!