शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ दिवसाची लाईट

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
23 Feb 2017 - 6:42 am

a

"तू लाईट चालू करतो का नाय?", लेबर कॉलनीतला सदाशिव सकाळी सकाळी सोसायटी गेटवरच्या वॉचमनवर भडकलेला.
"वरनंच आडर हाय, दिवसा ९ ते ६ बंद ठ्वा सांगील्ती, बाकी काय म्हायीत नाय" इति वॉचमन. हतबल होऊन सदाशिव आला तसा तणतणत गेला.
बिल्डीन्गमध्ये कुणाचे पडदे किलकिलले तर कुणाच्या गॅलरीतल्या चहाचे झुरके मंदावले. मग दुपारी एकेकजण खाली गेटवर वॉचमनकडे विचारपूस करून सकाळच्या चर्चेचा आढावा घेऊ लागले.
पहिला मजला: अरे, एवढी मस्ती आहे तर हेड ऑफिसला बोल की म्हणावं! आमच्या झोपेच खोबरं कशाला?
तिसरा : वाईट ओ! इथ गरीबाचं पडलयं कुणाला?
आठवा : पण ह्या लोकांना कशाला पाहिजे दिवसा लाईट?
बारावा : ह्या...ह्या...ह्या...असं झालं तर... बरं!

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

23 Feb 2017 - 4:12 pm | विनिता००२

चहाचे झुरके>>> झुरके सिगारेटचे असतात ना???