काही खास असं नाही या कवितांबद्दल. प्रवासात येता जाता लिहून ठेवल्या होत्या. कधीतरी शंभरेक झाल्यावर प्रसिध्द करू म्हणून.विचार रोज बदलतात.आजच बोर्डावर टाकल्या.
१
टाळून
कधी वे़ळ
कधी नुस्तंच .
आयुष्यानी सोडवून घेतलं स्वत:ला.
आईनी अंगावरून सोडवावं बाळाला
तसंच.
आता
वेळी अवेळी
अनावर हुक्की आली तर ..
कविता लिहीतो.
* * * *
२
दूरच्या दुखणाईत नातेवाईकाला
भेटावं औपचारीक .
तसा मी भेटतो स्वतःला .
आजकाल.
भेटीची वेळ संपता संपता.
* * * * *
३
दहा वेळा कापूनही
परत परत उगवणार्या
लोचट चामखीळीसारखं .
नविन वर्षं परत दारात.
* * * *
प्रतिक्रिया
17 Feb 2009 - 7:17 pm | यशोधरा
>>आयुष्यानी सोडवून घेतलं स्वत:ला.
आईनी अंगावरून सोडवावं बाळाला
तसंच.
सही!
17 Feb 2009 - 7:18 pm | प्राजु
दहा वेळा कापूनही
परत परत उगवणार्या
लोचट चामखीळीसारखं .
नविन वर्षं परत दारात.
जबरदस्त.... कल्पना!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Feb 2009 - 7:21 pm | अवलिया
मस्त रामदास शेट
--अवलिया
भेटण्यासाठी तुला तैयार होतो
पण तुझे फर्मान आले, साद नाही
17 Feb 2009 - 7:21 pm | शंकरराव
मस्त...
17 Feb 2009 - 7:21 pm | स्मिता श्रीपाद
दूरच्या दुखणाईत नातेवाईकाला
भेटावं औपचारीक .
तसा मी भेटतो स्वतःला .
आजकाल.
भेटीची वेळ संपता संपता.
हे छानच...पटलं...अगदी माझ्या मनातलीच गोष्ट तुम्हाला कशी कळली ? :-(
-स्मिता
17 Feb 2009 - 7:24 pm | लिखाळ
जोरदार..
तीनही कविता छान. १ आणि ३ विशेष !
-- लिखाळ.
17 Feb 2009 - 7:25 pm | सहज
लवकर बाकीच्या ९७ येउ दे!
पाणी प्यायला देता व भांड्यात एकच घोट? :-)
17 Feb 2009 - 10:39 pm | विसोबा खेचर
दूरच्या दुखणाईत नातेवाईकाला
भेटावं औपचारीक .
तसा मी भेटतो स्वतःला .
आजकाल.
भेटीची वेळ संपता संपता.
क्लासिक..!
तात्या.
17 Feb 2009 - 10:56 pm | बेसनलाडू
सगळ्याच आवडल्या.
(आस्वादक)बेसनलाडू
17 Feb 2009 - 10:58 pm | चतुरंग
खास रामदास टच!!
चतुरंग
17 Feb 2009 - 11:16 pm | पिवळा डांबिस
तसा मी भेटतो स्वतःला .
आजकाल.
भेटीची वेळ संपता संपता.
आवडलं...
18 Feb 2009 - 5:18 am | धनंजय
जबरदस्त कविता.
18 Feb 2009 - 5:48 am | मुक्तसुनीत
आणि श्वास अडकवणार्याही. साहिरच्या तल्खियाँची आठवण करून देणार्या ..". ...गुजर रही है कुछ इस तरहा से जिंदगी जैसे , इसे किसी सहारेकी आरझू भी नही .."च्या जातीच्या. कसलेही संदर्भ नसूनही - कदाचित नसल्यामुळेच - प्रत्येकाला आपापल्या आयुष्यातल्या कोड्यांबद्दल विचार करायला लावणार्या.
18 Feb 2009 - 7:12 pm | सुवर्णमयी
कविता आवडल्या,
सोनाली
19 Feb 2009 - 11:09 am | दत्ता काळे
छान आहेत कविता.
19 Feb 2009 - 7:26 pm | नंदन
कविता. अधिक काय लिहावे? रग्गेल दोडका ते आजकाल स्वतःलाच दूरच्या दुखणाईत नातेवाईकासारखे औपचारिक भेटणार्या तुमच्या अनुभवांची, लेख-कवितांची रेंज विलक्षण आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 Aug 2014 - 2:59 pm | उत्खनक
कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त व्यक्तता!
__/\__