ती आमच्यातली नव्हती पण अल्पावधीतच मी तिचा झालो होतो.आमच्यातील नाते तिच्या पोटी नवा आकार घेत होते.
मायभूमीहून तीला निरोप आला कि तिची माय आजारी आहे. माईला नि मायभूमीतील अनेक सैनिकांना तिच्या कुशल हातांची गरज होती.
३० जानेवारी - विमानतळावर भरलेल्या मनाने सोडलेला हात;काहीतरी चुकतंय असे सतत सांगत होता.
ती नि मी हेच माझे विश्व होते, पण जग बदलत होते ! एका अध्यादेशाने तिचे परतीचे दोर कापले गेले होते. साथ सुटली होती. नि मायदेशी तिथल्या क्रूर कायद्याने तिचे हात तोडले होते.
तुटलेले हात जोडता येतात पण सुटलेली साथ परत मिळत नाही , हे जाणून त्याने टाइम मशीनची सुई ३० जानेवारीवर फिरवली.
प्रतिक्रिया
10 Feb 2017 - 1:12 pm | विनिता००२
आवडली :)