"चल ना वं बिगी बिगी..उशीर होऊ राह्यला शाळेले"
"मले त याचंच नव्हतं..भेव लागते मले..दोन-चार त पोट्ट्या असतेत तिथं.."
"येतीन अजून पाय तू"
"कोन म्हन्ते?"
"माय सांगे..लय इनंत्या केल्यावर हे जागा देल्ली सरपंचानं..देत नौता सरपंच..पोरीले कायले शाळा पाहिजे म्हने?"
"मंग?"
मास्तरीन बायनी पिछा नाय सोडला..मंग द्याच लागली त्याले... पयली शाळा व्हय नं हे आपल्यासाठी..येतीन पोट्ट्या हळूहळू..."
"कोन नाय येनार..पायजो"
"बरं चाल तू"
"हप्ताभर वाट पायते..मंग मी बी नाय येनार"
"बरं"
"ओ बाय...शाळा कुठं गेली?"
"आत्ता माय.. इमारत कस्काय पडली? "
.
.
.
.
.
.
.
सरपंच फोनवर...
"आमदार सायब..इमारत पडली..बांधा आता फार्महाउस.."
"हे जमलं...अन बाई ?"
"तिले गाडलं इमारतींतच"
प्रतिक्रिया
10 Feb 2017 - 7:37 am | यशोधरा
आवडली.
10 Feb 2017 - 8:54 am | जव्हेरगंज
:)
10 Feb 2017 - 11:12 am | मराठी कथालेखक
छान...
10 Feb 2017 - 11:15 am | अॅस्ट्रोनाट विनय
बिचारी बाई
10 Feb 2017 - 11:22 am | शब्दबम्बाळ
चांगलीये! :)
10 Feb 2017 - 1:58 pm | रातराणी
भन्नाट, कथा आवडली!
12 Feb 2017 - 4:57 am | लोथार मथायस
खुप छान
Different perspective
18 Feb 2017 - 4:24 pm | चिगो
मस्त.. +१..
21 Mar 2017 - 9:41 am | कहर
छान +१
21 Mar 2017 - 2:53 pm | प्रीत-मोहर
आवडली ही कथा