मी या आधीच माझं वय व माझी पार्श्वभुमी आंतरजालावर सांगुन झालेली आहे.मी अविवाहीत आहे.सध्या एका to be or not to be प्रकरणात अडकलो आहे.
जास्त फाटे न फोडता विषयाला हात घालतो.माझ्या घराजवळ एक विवाहीत तरुणी राहते.तिचे व माझे कुटुंब एकमेकांना ओळखते.ति साधारणतः माझ्या पुढे तीन चार वर्ष मोठी असेल .आधी कधी तिने माझ्याशी संपर्क ठेवला न्हवता.माझ्याकडे बघतही नसायची.पण अचानक गेल्या काही महीण्यात तिचा नूर बदलला व ति माझ्याकडे हेतुतः बघायला लागली.तशी ती दिसायला खूप सुंदर आहे. सुरवातीला मी ओळखीत कशाला झकमारी करायची म्हणून गप्प बसलो.पण येता जाता तिची स्निग्ध नजर मला न्याहाळत असायची.मग मी ही तिच्याकडे पाहू लागलो.मधे आधे दोघेही एकमेकांना स्माईल देऊ लागलो.एक दोनदा बोललीही.तीन चार दिवसापुर्वी मला ति फिरायला येताना भेटली.मी ठरवले हीला आज विचारायचेच.मी तिला थांबवले ,इकडतिकडच्या गप्पा झाल्या,अंधारुन यायला लागल्याने व वर्दळ कमी झाल्याने तिची भीड चेपल्यावर मी सरळ तिला विचारले ,तू माझ्यात इंटरेस्टेड आहेस का? ति फक्त हसली व शून्यात बघत राहीली.मी तिचा हात हातात घेऊन जे मनात आहे ते सांगुन मोकळा झालो.जाताना तिला परत विचारले are you interested in me?.यावर तिथोड्या दिवसांनी सांगते म्हणाली.
तिच्या एकंदर बिहेविअरवरुन ती मला हो म्हणेल असे वाटत आहे.पण माझेच तळ्यातमळ्यात चालू आहे.एकतर लग्न झालेल्या बाईशी अफेअर करुन त्याचा लॉजिकल एंड काय होईल हे मला सांगता येत नाही आहे.दुसरीकडे तिच्याविषयीचे आकर्षण गप्प बसु देत नाही आहे.
तिचा नवरा मला फारसा ओळखत नाही पण एकंदर तो स्वभावाने चांगला असावा.त्याला फसवने गैर् आहे असेही वाटते व तो त्याच्या बायकोला पसंत नसेल तर आपण का संधी सोडावी असेही वाटते.काय करावे कळत नाही ,मार्गदर्शन करावे.
१.विवाहीत स्त्रीशी प्रेमसंबंध ठेवने योग्य आहे काय?
२.तिच्या देखनेपणात मि गुंतलो आहे ,पुढे जावे असे वाटत आहे,काय करावे?
३. विवाहबाह्य संबंध adultery मध्ये येतात का? यातून पुढे काही कायदेशीर अडचण येईल काय?
४.तिच्याशी मला लग्न करायचे नाही आहे ,फक्त casual relationship ठेवायची आहे,हे तिला मान्य होईल काअसे थेट विचारावे का तिला?
प्रतिक्रिया
5 Feb 2017 - 10:23 pm | गॅरी ट्रुमन
वेगवेगळ्या मासिकांमध्ये 'ताईचा सल्ला' असे काहीसे सदर असते. त्या ताईला विचारा :)
5 Feb 2017 - 10:56 pm | जयंत कुलकर्णी
Contd....
रात्री तिचा नवरा तिला जवळ घेत म्हणाला, " जमतय की तुला. पुढच्या आठवड्यात प्रकरण अजून थोडे पुढे ने''
यावर ती फक्त मंद हसली...................................................................................................
5 Feb 2017 - 11:14 pm | संजय क्षीरसागर
एक त्रिपक्षीय मिटींग घ्या, ती तुम्ही आणि तिचे पतिदेव . भारतात द्वीभार्या प्रतिबंधक कायदा असला तरी द्वीपतीला प्रॉब्लम नाही . तुमचं प्रकरण एकदम वॅलीड होईल . तिलाही काही चोरी राहणार नाही आणि डबल मजा येईल . पती सूज्ञ असेल तर विभागलेली जवाबदारी प्लस तिच्या प्रेमाखातर केलेला अभूतपूर्व त्याग यामुळे त्याचं ही नांव प्रेमिकांच्या इतिहासात अजरामर होईल . तुमची अधूनमधून येणाऱ्या नैराश्याच्या झटक्यातून कायमची मोकळीक होईल प्लस संजय भंसाळीला पिक्चरची नवी स्टोरी मिळेल . तुम्ही सेन्सेशनल रायटर आहातच त्यात तुमचा फर्स्ट हँड अनुभव असल्यानं स्टोरीला ज्याम वजन येईल . दरम्यानच्या काळात मिपावर तुम्हाला एक उत्कंठावर्धक लेखमाला सुरू करता येईल . कल्पनेतच इतका बारुद आहे तर प्रत्यक्षात काय कहर होईल , जस्ट इमॅजीन !
6 Feb 2017 - 8:34 am | श्रीगुरुजी
जबरदस्त प्रतिसाद!
टफि सर्वांना गंडवत आहेत. ते प्रत्यक्षात विवाहीत आहेत.
6 Feb 2017 - 9:59 am | चिनार
संजय लीला भन्साळी ऐवजी करण जोहर अशी दुरुस्ती सुचवतो. एकट्या भन्सालीनेच का मार खावा म्हणतो मी...
बाकी प्रतिसाद जबरदस्त!
6 Feb 2017 - 10:42 am | आनन्दा
संक्षी तुसी ग्रेट हो.. तोह्फा कबूल करो.
अवांतर.. संक्षींच्या मिपावरील पुनरागमनाने आता मिपावर आणखीन मजा यायला लागलेय.
6 Feb 2017 - 4:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
टफि, असा प्रतिसाद (पक्षी : टोला) मिळेल असे स्वप्नातही वाटले नसेल तुम्हाला, नाही का ? =)) =)) =))
ब्राव्हो, संक्षी... आतापर्यंत हा धागा उघडण्यात अर्थ नाही असे वाटत होते, पण आता तो उघडल्याचे सार्थक झाले असे वाटत आहे ;) :)
6 Feb 2017 - 6:16 pm | संदीप डांगे
+१, =))
5 Feb 2017 - 11:46 pm | बाजीप्रभू
उगाचच नसलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यात वेळ घालवू नका. दाणे टाकून कोंबडी झुंझवायची आवड असलेला हा आयडी इकडे "टर्बोचार्जड फिलॉसॉफर" नावाने आणि माबोवर "सिंथेटिक जिनियस" नावाने पिंका मारतात.
इकडच्या प्रतिक्रिया तिकडे स्वतःच्या म्हणून लिहितात आणि तिकडच्या इकडे.
आपल्या वाचनातला क्वालीटी टाइम यांच्यामागे घालवू नका. __/\__
5 Feb 2017 - 11:57 pm | संजय क्षीरसागर
सिच्युएशन नामी आहे !
6 Feb 2017 - 12:13 am | बॅटमॅन
संक्षी, तुम्ही किनै मचाक जॉईन करा. असल्या एकापेक्षा एक नामी सिच्वेशन वाचायला मिळतील. =))
6 Feb 2017 - 6:31 am | रेवती
आलात का? या या या. नै, म्हंजे काये, बरेच दिवसात भेंड्या खेळायचा योग आला नव्हता. तुम्ही हंटरररर नावाचा शिनेमा पाह्यलाय का?
6 Feb 2017 - 10:59 am | सतिश गावडे
क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्कील हाय
कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाय
के एक तरफ तो उससे प्यार करे हम
और उसको ये केहनेसे भी डरे हम
6 Feb 2017 - 1:29 pm | गॅरी ट्रुमन
मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने
सपने सुरीले सपने
कुछ हसते कुछ गम के
तेरी आंखो के साये चुराए रसीली यादों ने
6 Feb 2017 - 2:04 pm | नावातकायआहे
नकळत सारे घडले
मी वळता पाउल अडले
ती पहिली क्षण ओझरती
परिचयात ओळख नुसती
संभाषण ओठांवरती, लाजण्यात राहुन गेले
6 Feb 2017 - 2:13 pm | अत्रुप्त आत्मा
लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे
6 Feb 2017 - 2:15 pm | परिधी
नको मारुस हाक मला घरच्यांचा धाक
भर बाजारी करशी खुणा, करू नको गुन्हा हा पुन्हा!
6 Feb 2017 - 2:34 pm | श्रीगुरुजी
हिर्व्या हिर्व्या रंगाची झाडी घनदाट,
सांगो चेडवा, दिसतो कसो, खंडाळ्याचो घाट
हिल्लोरी SSSSSSS
6 Feb 2017 - 2:52 pm | सूड
रिमझिम पाऊस पडे सारखा
एमुनेलाही पूर चढे
पानीच पानी चऊकडे
गेला मोहण कुनीकडे..
6 Feb 2017 - 3:16 pm | श्रीगुरुजी
डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे
सादाविना कळावे संगीत लोचनांचे
7 Feb 2017 - 1:11 am | रेवती
च आलय ना,
चांदण्यात फिरताना, माझा धरलास हाऽऽऽत,
सखया रे आवर ही सावर ही चांदराऽऽऽत..........चांदराऽऽत.
त आलय.
हे गाणं टफिंसाठी त्या बाईनं म्हटलय.
7 Feb 2017 - 1:58 am | आदूबाळ
टफि कॉलिंग बाई (अल्फा कॉलिंग चार्लीच्या चालीवर)
तुझे G1 की डोर से बांध लिया है
बांध लिया है
तेरे जुल्मोसितम .... सरआँखोंपर
(अप्सरा कोई आए तो देखू नहीं हे कडवं गैरलागू आहे)
7 Feb 2017 - 2:23 am | संदीप डांगे
तेरे जुल्मोसितम .... सरआँखोंपर
>> जुल्मोसितम हे नवर्याकडून होण्याची शक्यता जास्त असल्याने टफिंच्या 'सर'पर टेंगूळ आणि 'आंखो'पर ते म्होट्टं हिरवं-नीळं सर्कल इमॅजिन केलं....
7 Feb 2017 - 2:24 am | संदीप डांगे
त्यामुळे अप्सरा कोई आये तो देखूं नही हे कडवं गैरलागू नाही... पुरेपूर लागू पडतंय... एकदा फटके खाल्ल्यावर कोण कशाला तडमडतंय...
7 Feb 2017 - 2:38 am | रेवती
र आलय ना, मग बाई सिंगिंग फॉर टफीG
रजनीगंधा Gवनी या, बहरुनी आली.
मनmeet आला तिच्या पाऊlee.
ल आलय.
7 Feb 2017 - 4:47 am | नावातकायआहे
रेवती अक्का...
लाजून हासणे अन् हासून हे पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा ?
मिटताच पापण्या अन् का चंद्रही दिसावा ?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे
ण आला
7 Feb 2017 - 6:27 am | रेवती
ण म्हणजे न समजायचे.
आता ट्फींना कळून चुकलेय की असे विवाहित महिलेशी वागणे बरे नव्हे. ते तिला ताई म्हणायला लागलेत. अर्थातच बाईंना ते आवडलेले नाही. त्या सिचुएशनला साजेसे गाणे.
नको ताई रुसू, कोपर्यात बसू,
येऊ दे गालात खुदकन हसू.
स आलय.
7 Feb 2017 - 7:00 am | नावातकायआहे
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
हृदयी अमृत नयनीं पाणी
तुझिया पोटी अवतरती नर
अन्यायच ते करिती तुझ्यावर
दासी म्हणुनि नमविति चरणी !
परत "ण"आला रेवाक्का....
8 Feb 2017 - 10:00 am | सूड
णिलाजरेपण कटीस णेसले, णिसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल काणी गर्व जडविला भाळा
उपभोगाच्या शतकमलांची कंठी घातिली माला
थकले रे णंदलाला...
8 Feb 2017 - 12:14 pm | गॅरी ट्रुमन
लिखे जो खत तुझे, वो तेरी याद मे
हजारो रंग के नजारे बन गये
सवेरा जब हुआ तो फूल बन गये
जो रात आयी तो सितारे बन गये
8 Feb 2017 - 6:22 pm | श्रीगुरुजी
या डोळ्यांची दोन पाखरे
फिरतील तुमच्याभवती,
पाठलाग ही सदैव करतील
असा कुठेही जगती
8 Feb 2017 - 10:43 pm | संजय पाटिल
ती ती ती ती ...... . . . . .
ती ती
9 Feb 2017 - 4:14 am | रेवती
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला,
माझ्या मनी प्रीत तुझी घेऊ हिंदोळा.
ळ आलय......म्हंजे ल.
9 Feb 2017 - 4:54 am | नावातकायआहे
लग्नविधींतील खरें मर्म काय ठाऊक तें मुळिंहि तुज नसे ॥
वैवाहिक होममंत्र अंतःपट अक्षतादि ।
पोषक हे विधि, मिळणी जीव जीवा सार हें असे ॥
ताई "स" आला
6 Feb 2017 - 8:01 am | सूड
मचाक वर कथा लिहायचात का हो तुम्ही?
6 Feb 2017 - 10:24 am | संजय क्षीरसागर
१.विवाहीत स्त्रीशी प्रेमसंबंध ठेवने योग्य आहे काय?
तिच्या पतीनं तक्रार केली तर पोलीस तुम्हाला असा काही इंगा दाखवतील की नंतर प्रत्येक स्त्री मातेसमान वाटायला लागेल.
२.तिच्या देखनेपणात मि गुंतलो आहे ,पुढे जावे असे वाटत आहे,काय करावे?
पहिल्या पहिल्यादानुसार फुल स्पीडनं पुढे जा.
३. विवाहबाह्य संबंध adultery मध्ये येतात का? यातून पुढे काही कायदेशीर अडचण येईल काय?
नं. १ चं उत्तर वाचा.
४.तिच्याशी मला लग्न करायचे नाही आहे ,फक्त casual relationship ठेवायची आहे,हे तिला मान्य होईल काअसे थेट विचारावे का तिला?
`घडीभरचा खेळ अन तडीपारीची वेळ' ही म्हण कायम लक्षात ठेवा. `माल किसका और कमाल किसका' असे प्रत्येकाचे सितारे बुलंद असत नाहीत आणि एखादे वेळी असले तरी ग्रहदशा केंव्हा बदलेल आणि प्रकरण अंगलट येईल नेम नाही. रितसर लग्न करा.
फ्लशच्या खेळात तिघांना एकावेळी ट्रायो लागल्याची अभूतपूर्व किमया होईल.
6 Feb 2017 - 3:15 pm | हतोळकरांचा प्रसाद
हहपुवा!! :):)
6 Feb 2017 - 1:25 pm | धर्मराजमुटके
नक्की नाते जोडा. जमल्यास नाते जुळल्यानंतरचे अनुभव देखील इथे लिहा. काही प्रश्न असल्यास मिपा तुमच्यासाठी तत्पर आहेच ! प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला कोणाच्या निमंत्रणाची गरज नाहीये हे आत्तापर्यंतच्या तुम्ही काढलेल्या धाग्यांवरुन सिद्ध झालेच असेल.
आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे :
१.विवाहीत स्त्रीशी प्रेमसंबंध ठेवने योग्य आहे काय?
होय. आता तुम्ही असा धागा काढलाय म्हणजे नक्कीच योग्य असणार. अपने दिलकी सुनो ! संक्षींचा सल्ला मनावर घेऊ नका ! त्यांच्या क्रेडीट कार्ड विषयावरचे प्रतिसाद बघीतले ना सगळ्यांनी कसे इग्नोर केलेत ते !
२.तिच्या देखनेपणात मि गुंतलो आहे ,पुढे जावे असे वाटत आहे,काय करावे?
पुढे जा. मराठी माणसाने किती दिवस मागे रहायचे ? मात्र पुढे जाताना कोणी पाठीत खंजीर खुपसणार नाही याची काळजी घ्या. मी निवडणूकीनंतर या शस्त्रावर बंदी घालण्यासाठी निवेदन देणारच आहे. तोपर्यंत सावधगिरी बाळगा.
३. विवाहबाह्य संबंध adultery मध्ये येतात का? यातून पुढे काही कायदेशीर अडचण येईल काय?
काही कल्पना नाही ब्वॉ ! पुढील अडचणींचा विचार करु नका. आजच्या, आत्ताच्या क्षणाचा उत्सव साजरा करा. भविष्याचा विचार करुन वर्तमानकाळातील आनंदाकडे दुर्लक्ष केले तर तुमच्यात आणि २५ वर्षे ईएमाआय बोडक्यावर घेऊन जगणार्यामधे काय फरक राहिला ? कायद्याचेच म्हणाल तर कायदा माणसासाठी आहे. माणूस कायद्यासाठी नाही. तिच्या नवर्याचा फारसा विचार करु नका. तो तिचा नवरा आहे की तुमचा आहे ? त्याचा स्वभाव चांगला असो की वाईट त्याच्याशी तुम्हाला काय देणेघेणे आहे ?
४.तिच्याशी मला लग्न करायचे नाही आहे ,फक्त casual relationship ठेवायची आहे,हे तिला मान्य होईल काअसे थेट विचारावे का तिला?
नक्कीच मान्य होईल. अधिक मार्गदर्शनासाठी हंटर हा चित्रपट पाहा. तुमच्यासारख्या स्पेशल लोकांसाठीच बनवला आहे. हा घ्या दुवा. उगाच शोधाशोध नको.
अवांतर : ते केसांचे काय झाले ?
जमल्यास पुढचा धागा टर्बोचार्जड वासु या नावाने काढाल काय ?
अतिअवांतर : ( संक्षी सर कृपया टेक इट लाईटली !)
7 Feb 2017 - 12:54 am | ट्रेड मार्क
मस्त प्रतिसाद. ३रा प्यारा तर एकदम भारी.
6 Feb 2017 - 1:36 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
मुटके साहेब धन्यवाद. केस अजून सहा इंचच आहेत.न कापण्याचे मनावर घेतले आहे.
6 Feb 2017 - 1:53 pm | संजय क्षीरसागर
मी निवडणूकीनंतर या शस्त्रावर बंदी घालण्यासाठी निवेदन देणारच आहे. तोपर्यंत सावधगिरी बाळगा.
वाक्याचा अर्थ विपरित होतो आहे.
तिच्या नवर्याचा फारसा विचार करु नका. तो तिचा नवरा आहे की तुमचा आहे ?
शस्त्र शास्त्रानुसारच वापरायला हवे.
अधिक मार्गदर्शनासाठी हंटर हा चित्रपट पाहा.
काय बोलता ? हंटरमुळेच तर हा प्रसंग ओढवला आहे .
संक्षी सर कृपया टेक इट लाईटली !
येस ! लाईटली घेण्याचा विषय आहे कारण द सबजेक्ट इज सो लाईट दॅट इव्हन अ थॉट कॅन लिफ्ट इट.
6 Feb 2017 - 2:00 pm | धर्मराजमुटके
टफींचे बहुधा जगन्मान्य विचारधारेनुसार दिलेल्या सल्ल्यानुसार समाधान होत नाही हे त्यांच्या अगोदरच्या सगळ्या धाग्यांवरुन सिद्ध होते म्हणून त्यांना अपेक्षीत प्रतिसाद दिला इतकेच. थोडी गंमत करायची होती पण तुम्ही लगेच प्रतिसाद देऊन माझ्या प्रतिसादातील गंमत काढून टाकली . बरे लगेच स्पष्टीकरण न द्यावे तरीही माझीच अडचण होणार कारण माझा हा प्रतिसाद माझ्या जालावरील आतापर्यंतच्या इमेजच्या एकदम विरुद्ध ! असो.
लोभ असावा !
6 Feb 2017 - 2:17 pm | संजय क्षीरसागर
पण तुम्ही लगेच प्रतिसाद देऊन माझ्या प्रतिसादातील गंमत काढून टाकली
सगळं लाईटलीच चाललंय .
6 Feb 2017 - 2:30 pm | श्रीगुरुजी
टफि,
माझ्या जवळच्या माहितीतल्या एकाचा खराखुरा अनुभव सांगतो. ते प्रकरण बरेचसे तुमच्यासारखेच आहे, पण थोडेसे वेगळे आहे.
पुण्याच्या एका २६ वर्षीय अविवाहीत तरूणाला मुंबईत चाकरी मिळाली. तो तसा लहानपणापासून थोडा वाह्यात प्रकारातलाच होता. काही कारणाने कोणाच्या तरी ओळखीने एका ३७ वर्षीय घटस्फोटित सापत्य महिलेची ओळख झाली. तिला एक मुलगी होती. जोपर्यंत आपण अविवाहीत आहोत तोपर्यंत थोडी गंमत करावी या उद्देशाने त्याचे तिच्याशी ओळख वाढविली. काही महिन्यांतच त्यांचे संबंध सुरू झाले. तिला घेऊन तो वेगवेगळ्या लॉजवर जायचा. त्याच्या घरच्यांना अर्थातच त्याच्या वाह्यातपणाची अजिबात माहिती नव्हती. १-२ वर्षांनी घरच्यांनी त्याचे लग्न जमवायला सुरूवात केली. आता आपण लग्न करून संसार थाटावा व अधूनमधून या बाईबरोबरही गंमत सुरू ठेवावी असे त्याने ठरविले. हा लग्नासाठी मुली बघतोय हे समजताच ती बाई बिथरली. तिने प्राणपणाने विरोध केला. आपण पुण्यात तुझ्या घरी येऊन तमाशा करू, तुझ्या लग्नात येऊन तमाशा करू, आपण ज्या ज्या लॉजवर गेलो होतो त्याचे पुरावे मी लिहून ठेवले आहेत असे सांगून तिने त्याला घाबरवले. तू तिच्या ऐवजी माझ्याशीच लग्न कर असा तिने धोशा लावला. माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी जीव देऊन व जाताना चिठ्ठीत तुझे नाव लिहून सर्व पुरावे देईन असे सांगितल्यावर तो घाबरला. त्याच्या घरच्यांनाही त्या दोघांचा अत्यंत संताप आला होता, त्यामुळे त्यांनी या प्रकरणात लक्ष न घालण्याचे ठरविले.
कालांतराने त्याने तिच्याशीच लग्न केले. ती त्याच्यापेआ ११ वर्षांनी मोठी होती व आपल्या पहिल्या अपत्यानंतर तिने नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्यामुळे त्याला नाईलाजाने पडाव्या लागलेल्या या विजोड संसारात स्वत:चे अपत्य नाही, आयुष्यात काहीही ध्येय/उमेद राहिलेली नाही. त्याच्या संसारात काहीही चार्म राहिलेला नाही. आला दिवस ढकलणे एवढेच तो करतो. त्यांची आर्थिक परिस्थिती यथातथाच आहे. त्याच्या आईवडीलांनी संतापून मृत्युपत्रात त्याचे नाव न घालता त्यांची सर्व इस्टेट त्यांनी त्याच्या भावाच्या नावावर केली. स्वतःच्या वाह्यातपणाची मोठी किंमत तो मोजत आहे.
तुमची केस थोडीशी वेगळी असली तरी क्षणिक सुखाकरता भविष्यात मोठी किंमत द्यावी लागू शकेल. तेव्हा वेळीच सावध व्हा. एखादी सुयोग्य वधू बघून दोनाचे चार पाय करून मोकळे व्हा. वाटल्यास माईसाहेबचा सल्ला घ्या.
(बादवे, लग्नाला बोलवायला विसरू नका).
6 Feb 2017 - 3:20 pm | हतोळकरांचा प्रसाद
माईसाहेब काय सल्ले देणार, सगळं तर त्यांचे "हे"च सांगत असतात! :):)
6 Feb 2017 - 2:56 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
धन्यवाद गुरुजी.तुमचा सल्लाही योग्य आहे.
पण माझे प्रकरण वेगळे आहे.ति घरंदाज श्रीमंत आहे व मी मध्यमवर्गीय.तिच्या दारात स्कोडा वगैरे गाड्या उभ्या असतात.तिचा पति श्रीमंत आहे त्यामुळे ति त्याला सोडून माझ्या गळ्यात माळ घालेल याची सुतराम शक्यता नाही.तिलाही माझ्याशी नावापुरते नाते जोडाय्चे आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतरच मी पुढे गेलो.पण एक आहे ,जर सापडलो तर निदान माझा सैराटमधला परश्या व्हायला वेळ लागणार नाही हे खरेच.
6 Feb 2017 - 3:00 pm | चिनार
थांबा नागराज मंजुळेला नाव सांगतो तुमचं..तो नवीन कथेच्या शोधात आहे म्हणे..
6 Feb 2017 - 3:18 pm | श्रीगुरुजी
तसं असेल तर मग तिच्या गाडीवर सारथ्याची चाकरी स्वीकारा किंवा तिचा बॉडीगार्ड व्हा. म्हणजे कोणालाच संशय येणार नाही.
6 Feb 2017 - 3:26 pm | विशुमित
टफी आणि बॉडीगार्ड...!!
6 Feb 2017 - 3:21 pm | विशुमित
असल्या गोष्टीचा कुठे एवढा गाजावाजा करतात होय टफी साहेब. आमच्याकडे एक म्हण आहे "आलं झोकात तर घातलं **कात आणि बसलं परत चार चौघात".
त्यापेक्षा गुरुजींचा सल्ला ऐका, आपलं लग्न करा. अशा लग्न झालेल्या बायांच्या भानगडीत पडू नका त्या तुम्हाला कधी विकून येतील हे समजणार पण नाही.
6 Feb 2017 - 3:48 pm | संजय क्षीरसागर
त्यामुळे ति त्याला सोडून माझ्या गळ्यात माळ घालेल याची सुतराम शक्यता नाही.
प्रेमात काहीही शक्य आहे. पण तुमचं प्रेम हवं. नुसता चान्सपे डान्स नाही. जेव्हा ती तुमच्याशी लग्नाला तयार होईल तेव्हा तुम्हीही उदारपणे तिच्या पतीला, मी सांगितलेली ट्रायो ऑफर द्या म्हणजे तुमच्या जीवाला धोका राहाणार नाही.
तिलाही माझ्याशी नावापुरते नाते जोडाय्चे आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतरच मी पुढे गेलो.
क्षणिक सुखासाठी लफडं करण्यापेक्षा राजमान्य पद्धतीनं आपण ट्रायो-विवाह करुन आजन्म सुख उपभोगू ही आयडीया तिला द्या.
जर सापडलो तर निदान माझा सैराटमधला परश्या व्हायला वेळ लागणार नाही हे खरेच.
कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास ठेवा. जोपर्यंत तुम्ही कायदा पाळतायं तोपर्यंत काय बिशादे कुणाची तुम्हाला बेकायदा उडवायची ?
6 Feb 2017 - 4:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
जर सापडलो तर निदान माझा सैराटमधला परश्या व्हायला वेळ लागणार नाही हे खरेच.
बघा बुवा, तसं झालं तर, खर्या जीवनात मिपासारखे, डझनांनी ड्यु-आयड्या काढून, परत परत येता येणार नाही. ;) ;)
तुमचा पुनर्जन्मावर विश्वास असला तरी पुढचा जन्म (ड्यु-आयडीप्रमाणे) कोणता मागावा ते आपल्या हातात नसतं असं म्हणतात... किंबहुना परस्त्रीगमनाचे पाप केल्याने कोण्या नको असलेल्या प्राण्याचा जन्म मिळाला तर अजूनच पंचायत व्हायची. =)) =)) =))
6 Feb 2017 - 4:41 pm | बॅटमॅन
डोक्टरसाहेब पण ते पंचाईत झाली तरी टफिंना कसं कळणार की गतजन्मीच्या पापामुळे असं झालं ते?
6 Feb 2017 - 6:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
"प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर" या तत्वावर दिलेला सल्ला होता तो ;) :)
7 Feb 2017 - 11:47 am | मराठी कथालेखक
आणि डुआयडी घेवून , चित्रविचित्र धागे काढत राहण्याच्या पापामुळे ट्फी पुढील जन्म निरक्षर राहणार आहेत
6 Feb 2017 - 3:02 pm | इरसाल कार्टं
बऱ्यापैकी असाच अनुभव माझ्या मित्राचा आहे, फरक इतकाच कि ती बाई घटस्फोटित नसून अजून विवाहित आहे, याचे लग्न ठरायला आल्यापासून तीही प्रचंड बिथरली. त्याच्या घरी जाऊन सगळं सांगायची धमकी द्यायला लागली. तिला विवाह नाव पण कायमचे अनैतिक संबंध हवे होते. त्यात तिने याला अत्यंत शिताफीने आर्थिक व्यवहारात गुंतवले. आता १.५ लाख मागतेय ती कर्ज दिलेत म्हणून. प्रत्यक्षात पैसे त्याने लगेच परत केले होते.
कोर्टात फेरी चालू आहेत त्याच्या.
6 Feb 2017 - 3:30 pm | श्रीगुरुजी
एकंदरीत टफि म्हणजे एकदम हॉट रोमिओ दिसतात. ते महाविद्यालयात शिकत असताना २-३ मुलींचा त्यांच्यावर कट होता. ते एकदा मॉलमध्ये गेले असताना तिथल्या दोन सेल्सगर्ल्स त्यांच्यावर फिदा झाल्या होत्या. आणि आता ती विवाहीत बाई त्यांच्यावर लट्टू झालीये. मजा आहे टफिंची!
6 Feb 2017 - 3:36 pm | बॅटमॅन
तसे आहे की फँटस्या सत्य म्हणून खपवताहेत ते एक टफिच जाणोत.
6 Feb 2017 - 3:56 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ब्याटोबा ,मी दिसायला कुणी मदनाचा पुतळा वगैरे नाही.नाकी डोळी नीटस आहे इतकेच.आणि असे संबंध केवळ फॅण्टसीज असतात असा तुमचा समज असेल तर या बाबतीत तुम्ही खूप मागास आहात हे नमुद करु इच्छितो.
6 Feb 2017 - 4:02 pm | बॅटमॅन
बरं बरं, मग काय पांचो उंगलियां घी में आहेत म्हणा की.
त्यामुळे असं करा, जे कै अनुभव येतील त्यांना तडका देऊन मचाकमध्ये खपवा. तिकडे अशा कथांचा तगडा वाचकवर्ग आहे. इथे तशा लिखाणाचे तेवढे मोठे मार्केट नाही. हे जनरल स्टोर्स आहे, कंडोमची पाकिटे मिळतात पण फक्त तेवढेच नाही.
6 Feb 2017 - 4:08 pm | बबन ताम्बे
ते मिपा वरचे "ब्रम्हे" आहेत म्हणून !!
6 Feb 2017 - 6:19 pm | अॅस्ट्रोनाट विनय
तुमच्या प्रेयसीशी माझी भेट घालून द्या :-))
6 Feb 2017 - 6:20 pm | संदीप डांगे
एक्स्ट्रीमली सॉरी टफि, या बाबतीत आपल्याला काय पण 'फर्स्ट हॅन्ड' अनुभव नाही. गुडलक!
6 Feb 2017 - 6:39 pm | बॅटमॅन
फर्स्ट हँड>>>>>>> अरारारारा =)) =)) =)) =))
6 Feb 2017 - 6:35 pm | Ranapratap
तुमच्या 6 इंच केसांची वेणी घालायला लावा तिला. हे जमले तर पुढे चालू ठेवा.
6 Feb 2017 - 9:35 pm | वरुण मोहिते
मागेच तुम्हाला सांगितलेलं टफी, (बाई बाटली आणि मटणाची ताटली ...............)
त्यावेळी माणसाने चारित्र्यशील असावे असे आपण म्हणालेलात . आता काय हे हो.
6 Feb 2017 - 10:17 pm | संदीप डांगे
तुमचं बरं लक्षात राहतं बॉ इतकं बारीक सगळं... तेही टफिंचं.. तेही इतकं जुनंपुराणं....
आम्हाला तर टफिंचा धागा वाचायला सुरुवात केल्यावर पंधराव्या प्रतिसादाला धागाविषय विसरायला होतं....
6 Feb 2017 - 11:04 pm | संजय क्षीरसागर
आपत्यप्राप्तीनंतर ते नक्की कुणाचं हे न कळल्यानं वडीलांचं नांव आणि आडनांव लावायचा प्रश्न सुटला ! नांवानंतर फक्त जन्मदात्रीचं नांव लावलं की झालं . हे जगाच्या इतिहासात प्रथमच घडेल.
मुलगा झाला तर ट्रायो नांव ठेवा, एकदम भारी वाटेल. फॉर एक्झांपल : ट्रायो गुलबदन ! आणि मुलगी असेल तर : त्रिवेणी गुलबदन .
केवळ आईचं नांव लावायची नवी प्रथा इतिहास घडवेल. स्वतः कर्वे , फुले इत्यादी मंडळी परलोकी आनंदून जातील.
`ती सध्या काय करते?' असे पिक्चर निघण्याऐवजी `ती सगळ्यांना सुखात ठेवते' असे अभूतपूर्व पिक्चर येतील.
आरक्षण, जातीवाद वगैरे प्रश्न एका झटक्यात निकालात निघतील.
6 Feb 2017 - 11:14 pm | कुंदन
गिरणी अन दळण इत्यादी
8 Feb 2017 - 10:29 pm | संजय क्षीरसागर
काय निर्णय झाला शेवटी ?
9 Feb 2017 - 1:42 am | खटपट्या
चांगलंय.
9 Feb 2017 - 9:06 am | लीना कनाटा
आंजी हा टफि धाग्यांचा पसारा माजला सारा
गमे या भ्रांत आंतर्जाली ध्रुवाचा ट्यार्पी हा तारा
कधी डोकेच चालेना, कधी तांबूल विळखा जाचे
भ्रमाने शेजारणीच्या विभ्रमाने टफिचे चित्त ते नाचे
कधी वयाचा गिल्ट, कधी सायकोपाथ चळ लावी
तर कधी नजर मांसाहाराच्या निशेने धुंदली भारी
कधी सिंजि तर कधी ग्रेथिं, नानाविध अवतारी
एकाच जिलेबी सवे आंतरजाली लीलया संचारी
जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा
मिपा ब्रम्हेच्या जिल्बी-भेंडीचा स्वाद हा न्यारा
9 Feb 2017 - 10:41 am | संजय पाटिल
वाहवा... वाहवा...