नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने
नोकरीशी जुंपणेही फिरुनी ते, नव्या दमाने ।
राहीले मनात गाणे, वर बॉसचे जोडे नव्याने,
काय पडलो मी भरीला, बिल्डरांच्या सुक्या दमाने ।
कोणत्या शैय्येवरी असते मजा सांगा गड्यांनो,
छळे इएमाय वेळी-अवेळी, रोजचा नव्या बळाने ।
भूक तगडी पण रोमान्सही, का जमेना रोज आता ?
रेंटातूनी हप्ता वळविणे माथी का, पुन्हा नव्याने ।
तू मला कुरवाळणेही सोडले आहे अताशा,
टेक-होम झाला कमी का? व्हिलनी नव्या लोनाने ।
भाडेकरी मी शोधतो पण, रेंट पाडूनी मागती,
मुजोर कामवालीचाही रेट, वाढतो नव्या दराने ।
मोल उसंतीला ना उरले, बिल्डराने पुन्हा काढली ,
नदीकाठची स्कीम देखणी, नव्या मुहूर्ती, नव्या दराने ।
प्रतिक्रिया
4 Feb 2017 - 7:14 pm | अभ्या..
जब्बरदस्त हो संजयजी.
आवडले एकदम.
4 Feb 2017 - 8:19 pm | विशाल कुलकर्णी
लै भारी देवा...
जबराटच !
4 Feb 2017 - 10:27 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ही ही ही ही! =))
4 Feb 2017 - 10:50 pm | संदीप डांगे
अर्र..... आवरा संक्षिना या, छळती नव्या दमाने! =))
मस्त हो राजे! बढिया...
4 Feb 2017 - 11:22 pm | जव्हेरगंज
कं लिवलंय! कं लिवलंय!!
6 Feb 2017 - 9:07 am | लीना कनाटा
इएमायमुळे सुबत्ता गेली | सुबत्तेविना स्वास्थ गेले |
स्वास्थविना प्रगती गेली | प्रगतीविना वित्त गेले |
वित्ताविना इएमाय ग्रस्त खचले | इतके अनर्थ इएमायने केले!
इति इएमाय पुराणाम संक्षीप्त
6 Feb 2017 - 10:08 am | शब्दबम्बाळ
राबतो दिन रात्र तरीही भार हा कमी होईना
शोधतो कमवायला जोड-धंदे मी, पुन्हा नव्याने!
घर छोटे कर्ज मोठे, संपेल का विवंचना,
बांधले आयुष्य माझे दावणीला, भरल्या मनाने...
6 Feb 2017 - 10:54 am | संजय क्षीरसागर
मीटरमधे बहुदा असं बसेल
राबतो रात्रंदिनी तरी भार कमी काय होईना,
शोधितो मी जोड-धंदा फावल्यावेळी, नव्या दमाने!
सुपरबिल्टप एरिया अन अप्पर लिमीटच्या लोनने,
बांधले मी दावणीला मालाच की, पुन्हा नव्याने |
6 Feb 2017 - 12:31 pm | रातराणी
हा हा भारी! पण विडंबनाच्या नावात कंस नाहीत, कंसाच काय झालं? ;)
6 Feb 2017 - 12:42 pm | संजय क्षीरसागर
आणि विषय अमर्याद आहे म्हणून....
6 Feb 2017 - 12:46 pm | रातराणी
तो लॉलीपॉपचं काय झालं याचा बदला होता.. :) जमला नई बहुतेक. नेक्स्ट टाइम :)
6 Feb 2017 - 2:11 pm | संजय क्षीरसागर
आज लॉलीपॉपही वाटे मला, च्युईंगम कशाने ?
फिरुनी येई इएमाय बघ बुलेटवाणी, पुन्हा नेमाने |
6 Feb 2017 - 1:41 pm | पाटीलभाऊ
मस्त लिहिलंय... _/\_