शतशब्दकथा स्पर्धा २०१७: लाटा

निओ's picture
निओ in जनातलं, मनातलं
3 Feb 2017 - 10:54 pm

aa

एका तपानंतर आज ती भेटली.
त्याच्याविषयीच्या प्रेमाबद्दल, जगाबद्दल भरभरून बोलली. रडली. तिच्या प्रेमसागराला पौर्णिमेचं भरतं आलं होतं. सर्व सीमा ओलांडणारं.
तो सुन्न होऊन ऐकत राहिला.
तिच्याविषयी आकर्षण असणाऱ्या भूतकाळात शिरला.
तारुण्याच्या नकळत्या वळणावर त्यांची चूकामूक झाली होती.

आज ती प्रेमाचा सागर असूनही त्याची तहान भागवू शकत नव्हती.
सागर जवळ असूनही तो किनाऱ्यावरच्या वाळूसारखा कोरडा राहिला.
तिने प्रयत्न सोडले नाहीत. तिच्या प्रेमाच्या लाटा किनाऱ्यावर आदळतच राहिल्या. पुन्हा पुन्हा त्याला भिजवतच राहिल्या.
तो हि भिजल्यासारखे दाखवत आतून कोरडाच राहिला.

वेळ संपली तेव्हा तो निघाला. तिच्या प्रेमभावनांचं ओझं घेऊन. त्याची पावलं वाळूत खोल रुतत होती.
लाटा अजून किनाऱ्यावर आदळतच होत्या, आदळतच राहणार होत्या.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

4 Feb 2017 - 7:09 am | अत्रुप्त आत्मा

नै जमलं! शेवटात लाट फिरावी लागते शशक मधे. ते कैच नैय्ये झालेलं यात!

जव्हेरगंज's picture

4 Feb 2017 - 10:15 am | जव्हेरगंज

+१

अॅस्ट्रोनाट विनय's picture

4 Feb 2017 - 11:06 am | अॅस्ट्रोनाट विनय

सॉरी पण थोडंसं हुकलंय

मराठी कथालेखक's picture

4 Feb 2017 - 12:40 pm | मराठी कथालेखक

चांगली वाटली.. तारुण्यात दूरावा निर्माण झाला पण काही वर्षांनी ती पुन्हा त्याच्याकडे आली. तिच्या मनात प्रेमाच भरतं आलंय पण तो मात्र कोरडा असं काहीसं..छान