"खा खा पैसे ... लुबाडा आम्हाला", बाई भलतीच तोंडाला आली होती.
मंत्रीमहोदय मात्र चैनीत बसले होते. कातडीचं लेदर झालं होतं. हिनं लाख दिले. दुसऱ्या बिल्डरने त्यादिवशीच आणखीन कोट्यानकोटी चारले.
हुश्शार बाईने सुद्धा माणसं पेरली होती. मंत्री निघाले त्यांच्या गाडीतून पण तिच्या गाडीवानाने गाडी नेली थेट कबरस्तानात.
मंत्रीसाहेबांनी पैसे देऊन पाहिलं, रडून पडून पाहिलं, राजीनामा देण्यास राजी झाले पण पठ्ठा बाईशी प्रामाणिक होता. त्यानं मंत्रीसाहेबांना जिवंत कबरीत गाडलं. पांढऱ्या पोत्यातला पैका पैकीच्यापैकी पुरला.
दहा दिवसात मंत्री सापडले.
कबरीत भूक लागली असावी. तोंडात नोटा अर्ध्या खाल्लेल्या सापडल्या. सगळ्या पाचशेच्याच होत्या. दोनहजारच्या ढुंकून पण चाटल्या नसाव्यात!
तिथे प्रधानांचे पंत दिल्लीत उर्जितावस्थेत वावरत होते.
प्रतिक्रिया
1 Feb 2017 - 8:38 pm | जव्हेरगंज
आयडीया मस्त होती की हो!!
मांडणी गडबड..
पण आवडली!
1 Feb 2017 - 8:57 pm | पिलीयन रायडर
कळली नाही नीटशी..
1 Feb 2017 - 9:53 pm | अत्रुप्त आत्मा
+१
2 Feb 2017 - 4:40 am | लोथार मथायस
शेवटची ओळ पार डोक्यावरून गेली
2 Feb 2017 - 8:47 am | नूतन सावंत
फुकट गेली चांगली कल्पना.
2 Feb 2017 - 3:43 pm | बापू नारू
नाही समजलं नीटस