तो निघाला आणि 'ती' वेडीपीशी झाली. तिने आतुर नजरेने त्याच्या नेत्रात स्वतःला गुंतवले. पण तो बधला नाही; तेव्हा मात्र ती शांतपणे म्हणाली,"जातोस? जा! तुला अडवणार नाही. हे अर्थहीन... प्राणहीन....जीवन तुझ्या आठवणींवर कंठेन आणि तुझ्यातच विलीन होईन. मात्र तुला मी आठवेन..मग मात्र......" तिने त्याच्याकडे पाठ केली. यमुनेच्या काळ्या मऊशार वाळूतून तिची सुकुमार पावलं आपली ओळख उमटवत राहिली......
द्वारका वसली आणि तो विसावला. आता समुद्र किनाऱ्यावर उतरत्या सूर्य किरणांमध्ये त्याला ती हवी होती...त्याची दमदार पावलं शुभ्र मऊशार वाळूतून अस्तित्व उमटवत तिला शोधत होती. वाऱ्यावर उठणारे पाव्याचे मंद...मधुर स्वर आणि उडणारे उत्तनिय तिची आठवण जागवत होते......आज द्वारकाधिशाला 'ति'च्या अर्ध्या वाक्याचा अर्थ लागत होता....
प्रतिक्रिया
30 Jan 2017 - 10:32 pm | पिलीयन रायडर
मतदान कसं करायचंय नक्की? म्हणजे इथे दिलेले +१ मोजणार आहात का? की त्यासाठी वेगळी पद्धत आहे यंदा?
30 Jan 2017 - 10:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
वेगळा धागा येईल. प्रशांत काहीतरी व्यवस्था करतोय :)!
30 Jan 2017 - 10:43 pm | आनंदयात्री
कॅप्टन, दर धाग्यात ती ती इमेज जोडली तर वाचकांना शतशब्दकथा नेमकी कोणत्या छायाचित्रासाठी लिहली आहे ते कळणे सोपे होईल आणि मतदान करणे सोयीचे होईल.
30 Jan 2017 - 10:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रत्येक धाग्यामधे इमेज देणं म्हणजे मोबाईल डेटा वाल्यांच्या शिव्या खाणं :). मी लिंक आणि फोटोचं नावं उद्या धाग्यामधे अपडेटवतो. म्हणजे तो गोंधळ उडणार नाही.
30 Jan 2017 - 10:54 pm | ज्योति अळवणी
ज्यांनी सगळी चित्र बघितली आहेत त्यांना कथा लक्षात येईल.पण सर्व वाचकांसाठी चित्र असावं असं वाटत
31 Jan 2017 - 3:01 am | रुपी
सहमत.. अगदी थंबनेलच्या आकारात असलं तरी चालेल.
कथा आवडली!
31 Jan 2017 - 12:05 am | रातराणी
मस्त! आवडली कथा!
31 Jan 2017 - 3:58 am | लोथार मथायस
कथा आवडली
31 Jan 2017 - 10:04 am | अॅस्ट्रोनाट विनय
कथा चांगलीये फक्त उत्तनिय च्या ऐवजी उत्तरीय हवे
31 Jan 2017 - 7:30 pm | यशोधरा
कथा आवडली.
2 Feb 2017 - 1:16 pm | निओ
आवडली