"आम्हाला ईश्वराचं सत्यस्वरूप शोधायचेय" एका शिष्याने नम्रतेने प्रस्तावना केली.
"ह्म्म्म."- घोसातले एक द्राक्ष गुरूदेवमुखी विलीन झाले.
"आपले मार्गदर्शन-"
काही क्षण विमर्शात लोप पावले.
"हे काय आहे?", एका ललनेचे अनावृतावस्थेतले उन्मादक चित्र पुढे ठेवून गुरूदेवांनी विचारणा केली.
"काम", पट्टशिष्याचा उत्स्फूर्त सूर आला.
"पाप", दुसर्या शिष्याने डोळे मिटले.
"मोह", तिसर्याने नेत्र विस्फारले.
"ज्ञान", पुटपुटत चौथ्याने काही मापे टिपून घेतली.
"सौंदर्य" पाचवा चित्राकडे सरकला.
"पत्ता?" म्हणून सहाव्याने वहीपेन्सिल पुढे ओढली.
"स्त्रीचा अपमान!" सातवा खवळून ओरडला.
"मोक्षsss" आठव्याची 'हस्तसाधना' भंग पावली.
"एका चित्रातले सत्य तुम्हाला उमगेना, आणि ईश्वराचे सत्यस्वरूप शोधताय भोसडीच्यांनो?"
म्हणत गुरूदेवांनी पुढले द्राक्ष तोंडात टाकले आणि ते चित्राकडे टक लावून पहात राहिले!
प्रतिक्रिया
31 Jan 2017 - 12:35 am | गामा पैलवान
एको सत् विप्रा: बहुधा वदन्ति. हेही त्या गुरूमहाराजांस विदित नाही! :-(
-गा.पै.
31 Jan 2017 - 10:07 am | अॅस्ट्रोनाट विनय
ही जुन्या काळातली कथा असल्यास वही आणि पेंसिल कुठून आले?
गुरुजींच्या तोंडी शिव्या शोभत नाहीत
31 Jan 2017 - 11:11 am | जव्हेरगंज
__/\__
येक नंबर!!
मजा आ गया!!!!
31 Jan 2017 - 12:55 pm | बापू नारू
त्यावेळी पण असली चित्र मिळायची काय?
31 Jan 2017 - 2:23 pm | तिमा
गुरुजींच्या शेवटच्या वाक्याने , कथा एका उंचीवरुन खाली आपटली.
31 Jan 2017 - 2:46 pm | पुंबा
हाहाहा.. मला आवडली..
1 Feb 2017 - 7:32 am | अनिरुद्ध.वैद्य
पण शेवटलं वाक्य एडिट केलं ते लैच मस्त!!
1 Feb 2017 - 11:34 am | पियुशा
आवड्ली, थोड्क्यात गम्मत :)
2 Feb 2017 - 11:37 am | अनुप ढेरे
मस्तं!
2 Feb 2017 - 1:14 pm | निओ
आवडली
8 Feb 2017 - 1:19 am | विअर्ड विक्स
कथा आवडली