माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian?

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
11 Dec 2016 - 10:49 am

शाकाहार मांसाहार असे म्हटले कि लगेच माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian? हा प्रश्न लोक विचारू लागतात. आणि त्यावर आपापली मतही अभिनिवेशाने मांडू लागतात. आता Non Vegetarian चं भाषांतर अ-शाकाहारी असे काहीतरी होईल, मांसाहारी नाही म्हणून मुद्दाम वरच्या प्रश्नात तसे लिहिलेले आहे.आम्ही पूर्ण पणे Vegetarian आहोत असे म्हटले तर मग दुध, तूप, लोणी, मध असे प्राणीजन्य पदार्थ खाण टाळावे लागेल. आश्चर्य म्हणजे आपल्या धर्मात ह्या गोष्टी उपासाला देखील चालतात. (मला कधी कधी कळतच नाही आपल्या धर्माचं, म्हणजे एकादशी,चतुर्थीला भाज्या पण चालत नाहीत पण हे उपरोल्लेखित प्राणीजन्य पदार्थ चालतात. गणेश चतुर्थीला कांदा लसूण पण चालत नाही असे म्हणताना कोकणात अनेकांच्याकडे गणेशोत्सवात जेव्हा गौरी बसतात तेव्हा त्यांना मांसाहाराचा / मत्स्याहाराचा नैवेद्य असतो. इतर धर्मांच तसं नसावं. म्हणजे मुसलमानांना डुकराच मांस चालत नाही, तर कधीच चालत नाही काही विशिष्ट वेळी चालते आणि काही विशिष्ट वेळी चालत नाही असं त्यांच्यात नसतं.)बर प्युअर मांसाहारी म्हणावं तर तसे कोणीच नसते म्हणजे मांस शिजवायला लागणारे मसाले, तेल इ. पदार्थ काही मांसाहारामध्ये येत नाहीत. हिंसा, अहिंसा तत्व पाहायचे म्हणावे तर आपण काहीच खाऊ शकणार नाही. कारण वनस्पतींना जीव असतोच.धान्य, बिया फळ फळावळ हि त्यांची पिल्लं/गर्भं असतात कि नाही.आणि झाडांना फळ, फुलं, बिया तुमच्या पोटभरीसाठी येत नाहीत. आपल्या खाण्याचे प्रयोजन म्हणून तयार होणारे अन्न खायचे म्हणवे तर मग आपण फक्त काही फळच खाऊ शकतो उदा. आंबा चिकू फणस वगैरे(पवित्र नारळ नाही). यांचा स्वादिष्ट गर इतर प्राण्यांनी ती फळ खावीत आणि बिया कुठेतरी नेऊन टाकाव्यात ज्यामुळे त्या झाडांची प्रजा वाढेल असा हेतू त्यामागे असतो. पण आपण किती जण खाल्लेल्या फळांच्या १ टक्का तरी बिया कुठे तरी पेरतो. आणि खाणच का? ह्य न्यायाने मग रेशीम, चामडे, सौंदर्य प्रसाधने, औषधे, काही काही वापरता येणार नाही. मग काय करणार?
मुळात माणूस शेती करू लागला तेव्हाच माणसाला संस्कृती उभी करता आली म्हणून पुढे हे हिंसा-अहिंसा, शाकाहारी-मांसाहारी वगैरे चोचले पुरवायची सोय झाली. शेतीचा गंधही नसलेल्या आदिवासींना हि असली थेरं परवडत नाहीत. तसल्या कल्पनाही त्यांच्यात नसतात. जेव्हा शेतीचा शोध लागलेला नव्हतं तेव्हा आदिमानव जो अन्न जंगलात शोधून गोळा करून उपजीविका चालवायचा ( hunter- gatherer)त्याला मोठी लोकसंख्या पोसणे सभ्यता, संस्कृती विकसित करणे जमलेच नव्हते. तेव्हा शेतीचा शोध लागला म्हणून एवढी मोठी लोकसंख्या पोसणे आणि अन्न शोधण्यापेक्षा इतर उद्योग करणे आपल्याला शक्य झाले आहे. एवढी प्रगती होणे शक्य झाले आहे. आणि शेती म्हणजे फक्त पिकं किंवा फळ फळावळच नसते तर गायी म्हशी कोंबड्या शेळ्या हे पण त्यात येतात. नव्हे पशुपालन हा तर माणसाचा शेती पेक्षाही पुरातन उद्योग आहे. तोच शेतीचा Precursor आहे. ह्यामागची मूळ कल्पना/ गरज अशी कि अन्न आपल्याला सदा-सर्वकाळ आणि विनासायास उपलब्ध व्हावे. शिवाय त्याबरोबर आपल्याला चामडे, साल वस्त्र अशा इतर वस्तू सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात.हे सर्व प्राणी आणि पिकं आपण आपल्या सोई प्रमाणे संकरीत, विकसित केली आहेत.(जंगलात हि पिकं, ह्या कोंबड्या २ महिनेही टिकू शकणार नाहीत.) ती आपल्या विविधतेने नटलेल्या समृद्ध संस्कृतीचा भाग आहेत.खाद्यसंस्कृती म्हटल्यावर त्यातफक्त उदरभरण हा भाग न येता इतर अनेक गोष्टी येतात. अन्न हे फक्त पोषक द्रव्याची सरमिसळ न राहता ते माणसाच्या जीभ, नाक, डोळे, त्वचा अशा सर्व संवेदनांना उद्दीपित करणारा उच्च प्रतीचा शृंगार बनून जातो.इतर कोणत्या प्राणीमात्रात हे आढळते. संस्कृती हि गोष्ट आपल्या जगण्याला इतर प्राणी मात्राच्या जगण्यापेक्षा भिन्न करते. ‘जीवो जीवस्य जीवनम’ वगैरे सुभाषितं खरी पण खाद्य संस्कृती त्याहून भिन्न, उच्च अभिरुचीपूर्ण अशी आहे.मानवी इतिहासात अनेक मोठ मोठ्या संस्कृत्या आल्या भरभराट पावल्या आणि काळाच्या उदरात गडप ही झाल्या. त्यांच्यात आपसात रक्तरंजित संघर्षही झाले पण खाद्य संस्कृती अजूनही टिकून आहे आणि ती उत्तरोत्तर अधिक समृद्ध होते आहे.मानवी जीवन समृद्ध, संपन्न आणि अभिरुची पूर्ण बनवण्याचे अत्यंत महत्वाचे काम तिने केले आहे.कुठल्याही संस्कृतीचे तेच मूळ उद्दिष्ट असते नाहीका? मानवी संस्कृतीमध्ये खाद्य-संस्कृती हि म्हणूनच महत्वाची आणि मोठी विलोभनीय गोष्ट आहे तिचं संगोपन, संवर्धन आपण आपल्या मगदुराप्रमाणे करत राहणं हे आपलं सांस्कृतिक कर्तव्य आहे.
वस्त्र संस्कृती हि अशीच पशुपालन(लोकर) आणि कापसाच्या शेतीमुळे शक्य झालेली गोष्ट आहे. माणूस कापसाची शेती काय अन्न मिळवण्यासाठी करतो कि काय? सगळ्या देवांना चालणारे रेशीम कोणत्या वनस्पतींपासून बनते? त्या करता कोशात गेलेल्या आळीला उकळत्या पाण्यात घालून क्रूर पणे मारले जाते.ते बरे चालते आपल्याला. व्याघ्राजीनावर किंवा मृगाजिनावर बसणारे बाबा, स्वामी लोक ती कातडी कोणत्या अहिंसक मार्गाने गोळा करतात? आणि चामडी कशाला हवी बसायला? बुडाला कापूस लागला तर मुळव्याध होते काय त्यांना? मधासाठी मधमाशाना मारून किंवा हाकलून देऊन किंवा त्यांना फसवून मध काढून घेतला जातो.आतातर त्या बिचाऱ्या कीटकांना शेळ्या मेंढ्यासारखे सारखे पाळून, त्यांनी कष्ट करून मिळवलेला मध आपण हिसकावून घेतो. जंगलात त्या बिचाऱ्या उंच झाडावर, लपवून पोळी बांधायच्या, ते शोधून वणवण करून आपण मध गोळा करायचो. आता तेवढाही त्रास नाही.
तेव्हा अन्न ग्रहण करताना हिंसा-अहिंसा, धर्म-अधर्म, पाप-पुण्य, भक्ष्य-अभक्ष्य, पेय-अपेय काय असेल? असले फालतू विचार सोडा आणि आणि आपल्या शरीराला काय झेपतंय, आणि जिभेला काय रुचतय, आपल्याला कशाची अलर्जी आहे असल्या निव्वळ भौतिक गोष्टी पाहून त्याप्रमाणे वागा. उगाच उपास मोडला तर पाप लागेल अन श्रावण नाही पाळला तर नरकात जावे लागेल. अमका प्राणी मारून खाल्ला तर धर्म नियमाचे उल्लंघन होईल अशा तद्दन भिकार गोष्टी बोलून स्वतःच्या आणि समोरच्याच्या डोक्याची मंडई करू नका.
‘जगा आणि जगू द्या’ नाही तर मनसोक्त खा आणि खाऊ द्या .
---आदित्य

मांडणीविचार

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

11 Dec 2016 - 10:53 am | पगला गजोधर

दोन्हीही नाही...

माणूस हा "मौकाटेरियन"

पगला गजोधर's picture

11 Dec 2016 - 10:57 am | पगला गजोधर

टीप: "मौकाटेरियन" = देखं के मौका, जो मारे चौका...

पैसा's picture

11 Dec 2016 - 1:17 pm | पैसा

बरचंसं पटण्यासारखं आहे.

संदीप डांगे's picture

11 Dec 2016 - 3:32 pm | संदीप डांगे

काय पण खा पण एकमेकांवर खार खाऊ नका,
दोघंही बेणे दुसरा काय खातो त्यावर फार कमेंट करतात.

माणूस मुलतःहा कसाही असूदेत.पण किडनी फेल झाली किंवा एक दोन अॅटॅक येऊन गेले की मग जिवंत रहाण्यासाठी त्याला मांसाहारी पासून शाकाहारी बनावेच लागते. मरता क्या नही करता?

अत्रुप्त आत्मा's picture

11 Dec 2016 - 3:56 pm | अत्रुप्त आत्मा

@माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian? ››› अता कळ्ळ मला, पांडु मिपा सोडून का गेला. ;)

अफगाण जलेबी's picture

11 Dec 2016 - 4:04 pm | अफगाण जलेबी

आदिमानव पहिल्या दिवसापासून शेती तर नक्कीच करत नसणार. दुसरी गोष्ट म्हणजे शाकाहार हाही एक प्रकारचा मांसाहारच आहे. वनस्पतींनाही जीव असतो. त्या खाण्यासाठी कापल्या जातात. म्हणजे त्यांचीही हत्या होतेच की. मग शाकाहार अाणि मांसाहार असा फरक का करायचा? उलट शाकाहार पचायला कठीण असतो. सर्व शाकाहारी प्राण्यांची पचनसंस्था ही त्या प्रकारचं सेल्युलोज असलेलं अन्न पचवता यावं अशी आहे. माणसाची पचनसंस्था तशी (गाय वगैरे प्राण्यांसारखी) आहे का? याचं उत्तर नक्कीच नाही असं आहे. त्यामुळे माणूस हा मुळात मांसाहारीच असणार. नंतर तो शाकाहारी झाला असणार.

चित्रगुप्त's picture

12 Dec 2016 - 1:27 am | चित्रगुप्त

आताचा माणूस आहे GMOहारी. यापासून कसे वाचायचे हा खरा प्रश्न आहे.

साहना's picture

12 Dec 2016 - 2:02 am | साहना

> उगाच उपास मोडला तर पाप लागेल अन श्रावण नाही पाळला तर नरकात जावे लागेल. अमका प्राणी मारून खाल्ला तर धर्म नियमाचे उल्लंघन होईल अशा तद्दन भिकार गोष्टी बोलून स्वतःच्या आणि समोरच्याच्या डोक्याची मंडई करू नका.

नरकाची भीती वाटून लोक श्रावण करतात का ? अतिशय धार्मिक वातावरणात सुद्धा मी असल्या प्रकारचे तर्क कधीही ऐकले नाही. अगदी भटजीबुवा सुद्धा कधी नरकाची भीती दाखवलेले ऐकले नाहीत. असले तर्क मी फक्त टोकाची भूमिका घेणारे फुले इत्यादींच्या लेखनात वाचले आहेत.

खरपूस भाजलेला कबाब दोन्ही हातानी खाणे हि जर खाद्य संस्कृती आहे तर विविध कारणासाठी उपास करणे, अन्न ग्रहण करण्याच्या प्रक्रियेला, निर्माण करणाऱ्या प्रक्रियेला एक साधना समजणे हि सुद्धा त्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भागच आहे.

गामा पैलवान's picture

12 Dec 2016 - 2:28 am | गामा पैलवान

साहना,

नरकाची भीती वाटून लोक श्रावण करतात का ?

बहुतेक त्यांना श्रावणाच्या जागी रमझान म्हणायचं होतं.

आ.न.,
-गा.पै.

आदित्य कोरडे's picture

12 Dec 2016 - 6:44 am | आदित्य कोरडे

अर्थात,उपासासाठी म्हणून मानले गेलेले पदार्थ म्हणूनच मी हि आवडीने खातो फरक एवढाच कि चतुर्थी किंवा एकादशीला कबाब किंवा बिर्याणी खाताना मला काही वाटत नाही. आणि हो तुमचा पहिला मुद्दा मला अनेक लोक भेटले आहेत जे अशा गोष्टी न मानणे हे पाप समजतात . माझा कामावरच मित्र आहे त्याच्या बायकोने ६ वर्षपूर्वी काही कारणाने आत्महत्या केली, अर्थात त्याला ह्याचा खूप त्रास झाला ( त्याचे नाव सांगू शकत नाही पण हि खरी गोष्ट आहे )तो दिवस अंगारकी चतुरथीचा होता आणि आपल्याकडून त्यादिवशी चतुर्थीचा उपास धरला गेला नाही म्हणून आपल्यावर हि वेळ आल्याचे त्याने स्वात: मला सांगितले आहे . चतुर्थी, श्रावण किंवा रमझान सगळ्या गोष्टी सारख्याच ....

संदीप डांगे's picture

12 Dec 2016 - 2:24 pm | संदीप डांगे

माझा कामावरच मित्र आहे त्याच्या बायकोने ६ वर्षपूर्वी काही कारणाने आत्महत्या केली, अर्थात त्याला ह्याचा खूप त्रास झाला ( त्याचे नाव सांगू शकत नाही पण हि खरी गोष्ट आहे )तो दिवस अंगारकी चतुरथीचा होता आणि आपल्याकडून त्यादिवशी चतुर्थीचा उपास धरला गेला नाही म्हणून आपल्यावर हि वेळ आल्याचे त्याने स्वात: मला सांगितले आहे .

हे जरा जास्तच होतंय. पत्नीच्या निधनाचा त्रास समजू शकतो पण त्याला असे काही कारण देणे व तेच खरे आहे असे मानून इतरांनाही सांगणे विचित्र आहे.

डिप्रेशनमुळे अशा विचित्र वाटणार्‍या गोष्टी घडतात.

एखाद्या घटनेचे मनाला पटेल असे स्पष्टीकरण मिळाले नांही की माणूस अशी कारणे शोधून त्याला उत्तर मानतो, मग ते कितीही चुकीचे किंवा विचित्र असले तरीही..!

संदीप डांगे's picture

12 Dec 2016 - 3:08 pm | संदीप डांगे

बरं मग?

मोदक's picture

12 Dec 2016 - 4:13 pm | मोदक

>>>हे जरा जास्तच होतंय. पत्नीच्या निधनाचा त्रास समजू शकतो पण त्याला असे काही कारण देणे व तेच खरे आहे असे मानून इतरांनाही सांगणे विचित्र आहे.

या अनुमान + निष्कर्षाच्या अनुषंगाने आहे.

संदीप डांगे's picture

12 Dec 2016 - 4:15 pm | संदीप डांगे

बरं मग?

तुम्ही काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे.

संदीप डांगे's picture

12 Dec 2016 - 6:06 pm | संदीप डांगे

मी निष्कर्ष काढला हा तुमचा अंदाज चुकीचा आहे.

"हे जास्तीच होतंय व विचित्र आहे" त्यामुळे सादर व्यक्तीचे समुपदेशन झाले पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. बाकी 'कुणीतरी' काहीही लिहिले तरी 'मेरी मुर्गी कि एकीच टांग' करणारे असतात याचा अनुभव येतो आहेच

मी निष्कर्ष काढला हा तुमचा अंदाज चुकीचा आहे.

ओके.

बाकी 'कुणीतरी' काहीही लिहिले तरी 'मेरी मुर्गी कि एकीच टांग' करणारे असतात याचा अनुभव येतो आहेच

बरं मग?

संदीप डांगे's picture

12 Dec 2016 - 7:27 pm | संदीप डांगे
ओके.

धन्यवाद!

बरं मग?

उत्तम आहे.

१००% मांसाहारी किंवा शाकाहारी नसणारे प्राणीसुद्धा जगात आहेत आणि माणूस त्यापैकीच एक आहे. आजूबाजूला उपलब्ध आहारावर त्या परीसरामधील प्राण्यांचे जीवनमान ठरत असते. उदा. अस्वलांच्या बर्‍याचश्या प्रजाती उभयाहारी असतात, मर्कटवर्गातील प्रजातीदेखील उभयाहार करतात, लांडग्याच्या कुळातील काही प्राणी गरजेप्रमाणे उभयाहारी जीवन जगतात. इतकेच नाही तर काही प्राणी पोषणमुल्यांच्या गरजेनुसार आपल्या आहारात बदल देखील करतात. काही हरणांना छोटे पक्षी किंवा ससे खाताना पाहिले गेले आहे, तर खारींना देखील पक्षांच्या घरट्यातून अंडी व पिले पळवताना पाहिले गेले आहे. पक्षी स्वतःदेखील उभयाहारी असतात.

थोडक्यात माणूस हा शाकाहारी"च" किंवा मांसाहारी"च" होता, किंवा शाकाहाराने किंवा मांसाहाराने नुकसान"च" होते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न म्हणजे केवळ हट्टीपणा आहे. आपल्या ताटात काय वाढले जातेय एवढ्याकडे लक्ष दिले की झाले, बाजूचा काय खातोय ते बघून मते देण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. :)

पाटीलभाऊ's picture

12 Dec 2016 - 2:44 pm | पाटीलभाऊ

माणूस शाकाहारी कि मांसाहारी हा वाद निरर्थक आहे.
जाता जाता "खा आणि खात राहा"...!

तुषार काळभोर's picture

12 Dec 2016 - 6:00 pm | तुषार काळभोर

640

प्रसाद गोडबोले's picture

12 Dec 2016 - 7:52 pm | प्रसाद गोडबोले

आपल्या धर्मात ह्या गोष्टी उपासाला देखील चालतात.

आपला धर्म म्हणजे नक्की कोणता हो ? बरं उपासाला कोणत्या गोष्टी चालतात अन कोणत्या चालत नाही ह्याची यादी कोणत्या धर्मग्रंथात पहावयास मिळेल ?

अमका प्राणी मारून खाल्ला तर धर्म नियमाचे उल्लंघन होईल अशा तद्दन भिकार गोष्टी बोलून स्वतःच्या आणि समोरच्याच्या डोक्याची मंडई करू नका.

कोणता प्राणी ? कोणता धर्म नियम , जरा संदर्भ देता का ?

संदर्भ देता येत नसतील तर अभ्यास न करता अशा तद्दन भिकार गोष्टी बोलून स्वतःच्या आणि समोरच्याच्या डोक्याची मंडई करू नका. ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

संदीप डांगे's picture

12 Dec 2016 - 8:07 pm | संदीप डांगे

मेरे मनको भाया मै कुत्ता काटके खाया

आपला धर्म, प्राणी, नियम, संदर्भ, अभ्यास, यादी, धर्मग्रंथ सगळं वरच्या वाक्यात सापडेल.. =)) =))

प्रसाद गोडबोले's picture

12 Dec 2016 - 9:35 pm | प्रसाद गोडबोले

हा हा हा

एकच नंबर डांगे !

आदित्य कोरडे's picture

14 Dec 2016 - 2:12 pm | आदित्य कोरडे

उत्तम आहे...चालू द्या....मला असल्या बाष्कळ बडबडीत रस नाही....मी आता प्रतिसाद देणे थांबवतोय.....

प्रसाद गोडबोले's picture

14 Dec 2016 - 4:41 pm | प्रसाद गोडबोले

असं करु नका ना गडे !

आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या ना असतील तर ... आपला धर्म म्हणजे नक्की कोणता हो ? बरं उपासाला कोणत्या गोष्टी चालतात अन कोणत्या चालत नाही ह्याची यादी कोणत्या धर्मग्रंथात पहावयास मिळेल ?

उगाचच धर्माविषयी ऐकीव माहीती वरुन मते बनवुन पिंका टाकण्यापेक्षा जरा मुळ ग्रंथ पहा ना , मुळ धर्म समजुन घ्या ना गडे

हे पहा गृह्य सुत्रे :
http://merki.lv/vedas/Grihya%20Sutras%20(eng).pdf
See page no. 141 , verse 48 and 49.

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

इरसाल कार्टं's picture

13 Dec 2016 - 2:44 pm | इरसाल कार्टं

"कोकणात अनेकांच्याकडे गणेशोत्सवात जेव्हा गौरी बसतात तेव्हा त्यांना मांसाहाराचा / मत्स्याहाराचा नैवेद्य असतो. "
हे खरं आहे, आमच्या पालघर जिल्ह्यात(पूर्वीचा ठाणे जिल्हा) गौरीच्या दुसऱ्या दिवशी मांसाहाराचा नैवेद्य असतो. स्वतः आमच्या घराचा श्रावण याच दिवशी संपतो.
सर्वपित्री अमावसेलाही कावळ्याला घातल्या जाणाऱ्या घासात भाजी मध्ये सहसा सुके मासे असतातच.
आमचा शेजारी तर थोडीशी गावठीपण ठेवतो तटाजवळ :)

श्रीकृष्ण सामंत's picture

14 Dec 2016 - 7:49 am | श्रीकृष्ण सामंत

 शास्त्रीय विचार केल्यास

१)  शाकाहारी जीव आपल्या ओठाने पाणी पितात.(गाय,म्हैस,घोडे,बकरी,हरण,ऊंदीर,घूशी,हत्ती(सोंडेने म्हणजेच जीभेने नव्हे) आणि (मा-णू-स -प-ण-पि-तो) आणि मांसाहारी जीव आपल्या जीभेने पाणी पितात.(वाघ,सिंह,कुत्रा,मांजर,कोल्हे,वगैरे,वगैरे)
२) शाकाहारी जीवांचं आंतडं बरंच लांबीने मोठं असतं.(माणसाचे लहान आंतडं जवळ जवळ ३२ फूट असतं) म्हशीला तर दोन पोटे असतात.
असे करण्यात निसर्गाचा उद्देश असा असावा, पालापाचोळा खाणारा शाकाहारी जीव बराच वेळ ते अन्न आंतड्यात ठेवू शकावा,(आंतड्याच्या लांबीमुळे)आणि शरिराच्या बाहेर पडे पर्यंत त्यातून   पुरंपुर ज्यूस काढून शरिराच्या पोषणाला वापरला जावा.पालापाचोळा मांसा एव्हडा कुजून घाण होत नाही. आंतड्याविषयीच्या    अनेक कारणातील हे एक कारण असावं.
आणि गम्मत पहा, माणूस सोडून ईतर कोणत्याही शाकाहारी जीवाच्या समोर,मांसाहार ठेवला तर तो हूंगून मान दुसरीकडे करतो. कारण ते न खाण्याची बुद्धि त्याला निसर्गाने दिली आहे किंवा असं म्हणा ते खाण्याची बुद्धि निसर्गाने त्याला दिली नाही.माणूस मात्र जे समोर दिसेल ते खातो.गाय ही देवता मानून गाईची पूजा करणारे लोक जेव्हा पाश्चात्य देशात येतात आणि शाकाहारी असोत किंवा
मांसाहारी असोत (गाय,म्हैस,डुकराचे मांस) कसलाही विचार न करता,तावमारून खातात.  (काही अपवाद असतील ही)
३)या उलट मांसाहारी जीवांचं आंतडं फारसं लांब नसतं.जेमतेम चार पाच फूट असतं.मांस पोटात जास्त वेळ राहिल्यास त्याची कुजण्याची   प्रतीक्रिया चालूं होऊन नंतर  त्याचा शरीराला धोका उत्पन्न होऊ नये म्हणून निसर्गाचा हा उद्देश मांसाहारी जीवाना मोठं आंतडं न देण्याचा असावा.हे पण अनेक कारणातील एक कारण असावं.इथं पण ह्या मांसाहारी जीवा समोर पालापाचोळा आणून ठेवला तर तोही मान फिरवून दुर्लक्ष  करतो. कारण ते न खाण्याची बुद्धि त्याला निसर्गाने दिली आहे किंवा असं म्हणा ते खाण्याची बुद्धि निसर्गाने त्याला दिली नाही.
हा झाला आंतड्यातील फरक.
४)आता दांतांचा विचार केल्यास असं दिसून येईल,मांसाहारी आणि शाकाहारी जीवांच्या दांताची रचना,ठेवण,आणि प्रकार,हे मांस आणि पाला चावण्याच्या अनुशंगाने दातांची निर्मीती झाली असावी.मोठ्मोठाले सुळे,कटर्स,दाढा आणि त्यांची ठेवण आणि आकार,तसेच जबडयाचा आकार हे निरखून पाहिल्यास खूप विचार करून निसर्गाने दातांचे डिझाईन केले आहे असं दिसून येईल.
या दृष्टीकोनातून माणसाचे दांत, आंतडे,जबडा आणि ओठाने पाणी पिण्याचं त्याचंहे कार्य पाहून तो शाकाहारी गटात (group मधे) असण्याच्या संभवाची चांगलीच साक्ष देतो.
तेव्हा थोडक्यात सांगायचे झाल्यास,
अ)लांब आंतड(वीस पंचवीस फुटाच्या वर)असलेले जीव
ब)ओठाने(ओठ पाण्यात बुडवून)पाणी पिणारे जीव
क)दातांची ठेवण,जबडा, उपयुक्तता, पालापाचोळा खाण्याच्या दातांची क्षमता असलेले हे दांत वापरणारे जीव हे शाकाहारीच असावेत.
आणि
ड)छोटंसच आंतड(जेमतेम चार पांच फूट) असलेले जीव
ई) जीभेने (जीभ बाहेर काढून) पाणी पिणारे जीव
फ) दातांची ठेवण,जबडा,उपयुक्तता, मांस खाण्याच्या दातांची क्षमता असलेले हे दांत वापरणारे जीव हे मांसाहारीच असावेत. मनुष्यजातीला निसर्गाने उपजतच वैचारीक शक्ति आणि कल्पना करण्याचे सामर्थ्य दिले असताना, तिचा मुखोद्वारे किंवा लेखाद्वारे प्रचार करणेही शक्य असताना, युगानयुगे जमलेल्या ज्ञानाचा, नितीमत्ता आणि बरे,वाईट यातला योग्य निर्णय घेण्याचेही  सामर्थ्य असताना, त्यांचा स्वतःच्या खाजीसाठी विशेषेकरून भूक किंवा अन्नआहारच्या दृष्टीने आवश्यक्यता नसताना, ज्या जीवाना भावना आणि अंतरज्ञान असते त्यांचा केवळ चवीष्ट मांस म्हणून जीव घेण्याचा अधिकार मनुष्य म्हणून आपल्याला आहे काय?
 
तेव्हां हे माणसा! विचार कर.केवळ बुद्धि आहे म्हणून निसर्गाविरूद्ध वाटेल ते प्रयोग करू नकोस बाबा,पुढच्या पिढीसाठी आणि आत्ता जगताना संभाळून जग.

अधीक डिटेल माहितीसाठी माझा लेख वाचावा
मनुष्यप्राणी हा मुलतःशाकाहारीच

http://www.misalpav.com/node/2459

प्रसाद गोडबोले's picture

14 Dec 2016 - 8:40 am | प्रसाद गोडबोले

धन्यवाद

आपण हिलरीबाई क्लिंटन ह्यांच्या पराभवाच्या धक्क्यातून सावरलात ह्यातच आम्हाला आनंद आहे :)

शुभेच्छा

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Dec 2016 - 1:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या काहीश्या स्वैर निरिक्षणांबद्दल काही करत टिप्पणी नाही, पण त्यांचा कार्यकारण भाव मात्र चुकीचा आहे.

निसर्ग स्वतःहून काहीही करत नाही किंवा काहीच करूही शकत नाही. निसर्ग ही वस्तूस्थिती आहे पण त्याने सक्रियतेने काही बदल घडवून आणावे असे नसते. निसर्गातल्या गोष्टी भौतिक शास्त्रांच्या (फिजिक्स, केमिस्ट्री, इ) नियमांप्रमाणे घडतात.

'जनुकिय उत्परिवर्तने' आणि इपिजेनेटिक प्रक्रिया' यामुळे सतत होत असलेल्या बदलांमुळे जीवांत (प्राणी, वनस्पती व इतर) सतत उत्क्रांती होत असते. त्यापैकी ज्या बदलांमुळे ज्या जीवांना त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीत (एन्व्हिरॉनमेंट) जगून राहणे व प्रगती करणे शक्य होते; ते जीव जास्त काळ जगू शकतात, जास्त प्रजनन करू शकतात व त्यांच्यातले बदल पुढच्या पिढ्यांकडे जास्त प्रमाणात संक्रमित होऊ शकतात. ज्या बदलांमुळे असे शक्य होत नाही ते बदल असले जीव काळाच्या ओघात नष्ट होतात.

अनेक सहस्रकांवर होणारे असे जनुकांतले आणि त्यांच्या मूलभूत प्रवृत्तींतले बदल जीवांना एकमेकापासून वेगळे (वेगवेगळे सबस्पेसिज, स्पेसिज, फॅमिलीज, फोरा, फायला, किंगडम्स, इ) करतात.

मोदक's picture

14 Dec 2016 - 5:00 pm | मोदक

बाकी जाऊदे.

पण गाय म्हैस सरसकट 'शाहाकारी जीव' मध्ये का गणले आहेत..?

न्यूझीलंड की हॉलंड मध्ये गायीम्हशींच्या आहारात मांसाचा समावेश असतो (असे शरदचंद्ररावजी पवार साहेबांच्या आत्मचरित्रात वाचले आहे.)

श्रीकृष्ण सामंत's picture

14 Dec 2016 - 9:05 am | श्रीकृष्ण सामंत

म्हणजे आपण माझे सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श ह्या ११ व्या भागापर्यंत आलेलं लेखन वाचत नाही का?
असो.

गामा पैलवान's picture

14 Dec 2016 - 7:16 pm | गामा पैलवान

डॉक्टर सुहास म्हात्रे,

निसर्गातल्या गोष्टी भौतिक शास्त्रांच्या (फिजिक्स, केमिस्ट्री, इ) नियमांप्रमाणे घडतात.

खरंतर प्रवास उलटा असायला हवा. निसर्गात वारंवार घडणाऱ्या गोष्टींवरून मानवाने भौतिकशास्त्रांचे नियम बनवले आहेत. तर मग निसर्ग स्वत:हून काही करतो असं म्हणायचं का?

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

14 Dec 2016 - 7:21 pm | संदीप डांगे

मानवाने भौतिकशास्त्रांचे नियम बनवले आहेत.

>>>> नो नो. बनवले नाहीत, शोधलेत..

लेखात बरेच मुद्दे चांगले आहेत. रेशिम, कातडी, दुग्धजन्य पदार्थ उपवासाला चालणे. त्याबद्दल नंतर.

अ) मानवाची जीवशास्त्रीय जडण घडण
१) मानवाची शरीर रचना मुळात शाकाहारासाठी झालेली आहे.
२) तुम्ही पाणी कसे पिता? ओठांनी की कुत्र्या प्रमाणे व इतर मांसाहारीप्राण्यांप्रमाणे चिभल्या चाटत? थोडे आजु बाजुला निरिक्षण करा. चिंपांझी, घोडा, सर्व शाकाहारी प्राणी ओठांचा वापर करुन पाणी पितात. मानव याला अपवाद का असावा?
३) मानवाचा जबडा हा चर्वण करुन खाण्यासाठी झालेला आहे. आपण लचके तोडून जेवत नाही. आपण चर्वण करुन जेवतो. आपला जबडा डोक्याच्या आकारमानाने खूप कमी उघडला जातो. मांसाहारी प्राण्यांचा जबडा त्यांच्या डोक्याच्या मानाने मोठ्या प्रमाणात उघडला जातो. हे मांस खाणे व लचके तोडण्याच्या दृष्टीने सोयीचे आहे.
(यावर शास्त्रशुद्ध सविस्तर माहिती जालावर उपलब्ध आहे. )
४) आपल्याला पंजे नखे व तीक्ष्ण दात नाहीत जेणे करुन धावत्या प्राण्याला आपल्याला पकडता येईल.
५) आपल्या शरीराचे तापमान कमी होण्यासाठी आपल्याला घाम येतो. मांसाहारी श्वापदांचे तापमान पॅन्टिंग ने कमी होते.
६) आपण दिवसातून दोन तीन वेळा जेवतो/खातो. मांसाहारी प्राण्यांना हे परवडण्यासारखे नाही. एका शिकारी मध्ये त्यांची प्रचंड ऊर्जा खर्च होते. कल्पना करा वाघाला सकाळी न्याहरी साठी ससा दुपारच्या जेवणासाठी हरीण व रात्रीच्या जेवणासाठी रेडा मारायचा आहे. असं ते रोज करु शकतील का? मांसाहारी प्राणी आठवड्यातून एकदा वगैरे यशस्वी रित्या शिकार करु शकतात व एकदाच भसाभसा मांसाचे तुकडे गिळतात. चर्वण करत नाहीत. उलट गाय माकड मानव व इतर शाकाहारी प्राणी दिवसभर चरत असतात.
७) आतड्यांची रचना व आकार. शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांची लांबी शरिराच्या १२ पट असते. मांसाहारी प्राण्यांच्या आतड्यांची लांबी शरिराच्या लांबीच्या ३ पट असते. ८) मांसाहारी प्राण्याचे मूत्र कॉन्सन्ट्रेडेट असते. शाकाहारी व मानवाचे डायल्यूटेड.
९) पोटातल्या द्रवांचा सामू (पीएच लेव्हल) (यावर काही मतभेद आहेत) पण सर्वसाधारण पणे मांसाहारी प्राण्यांच्या पोटातल्या द्रवांची आम्लता अधिक असते. या कारणामुळेच ते कच्चे मास खाऊ व पचवू शकतात
१०) क जीवनसत्व मांसाहारी प्राणी स्वतःचे क जीवनसत्व स्वतः बनवतात. त्यांना जेवणातून क जिवनसत्व मिळवायची आवश्यकता नसते. उलट शाकाहारी प्राण्यांना क जीवनसत्व भाज्या व फळे यामधून मिळते.

ब) धार्मिक अंग
क) प्राण्यांबद्दलची सहिष्णुता याबद्दलचे नैतिक अंग
ड) मांसाहारामुळे होणारे आरोग्यावरचे परिणाम हे एक अंग

(ब, क ड व अधिक विस्ताराने लिहिण्याची गरज नाही त वरून ताकभात समजणारे मिपाकर आहेत)
असे अनेक मुद्दे शाकाहारी लोकांकडून मांडले जातात. वरील मुद्द्यांवर आपण व इतर मिपाकरंना काय वाटते हे जाणून घ्यायला आवडेल.

निल्या१'s picture

15 Dec 2016 - 4:03 am | निल्या१

बरेचसे मुद्दे श्रीकृष्णरावांच्या प्रतिसादात आले आहेत. पुनरावृत्ती बद्दल क्षमस्व. लेख सकाळी वाचला होता तेव्हा बहुतेक त्यांची प्रतिक्रिया नव्हती.

तुषार काळभोर's picture

15 Dec 2016 - 6:24 am | तुषार काळभोर

वर दोन प्रतिसाद मानवी शरीर कसे शाकाहारासाठी अनुकूल आहे, त्याचे विवेचन/विश्लेषण करतात.

शाकाहारी प्राण्यांचे डोळे चेहऱ्याच्या बाजूला असतात, जेणेकरून त्यांचा पाहण्याचा कोन जास्तीत जास्त होऊन त्यांना येणाऱ्या हल्लेखोराची चाहूल लागावी. उदा. गाय, हरीण, ससा
मांसाहारी प्राण्यांचे डोळे चेहऱ्याच्या समोर असतात, त्रिमितीय दृष्टीसाठी. आवाजावर हल्ला करताना, त्याच्यावर नजर फोकस करून अंतराचा अंदाज येण्यासाठी. उदा. मार्जारकूळ, श्वानकूळ, मर्कटकूळ

शाकाहारी प्राण्यांना सुळे (दात!!) नसतात.
मांसाहारी प्राण्यांना सुळे असतात.

(डिस्क्लेमर: मी शरीर रचना तज्ञ नाही. वरील माहिती वाचीव आहे.फक्त मला ती लॉजिकल वाटते व निरीक्षणशी जुळते म्हणून मांडली आहे. मिपाक्सच्या चर्चेतून 369 प्रतिसादानंतर मानव हा शाकाहारी असल्याचे जागतिक पातळीवर सिद्ध झाले, तरी हा मानव देह मिश्राहारीच राहील.)
-ड्रंकन उर्फ बीयर बम चिकनचा चाहता पैलवान

सावजावर हल्ला करताना, त्याच्यावर नजर फोकस करून