माझ्या एका जुन्या चारोळीला घेऊन मीटरमधे कविता लिहायचा प्रयत्न. पहिले कडवे ही जुनी चारोळी.
कसल्या या खुणा
कोण येउन गेलं इथे
कुणाच्या ह्या वेणा
रूतल्यात जिथे तिथे
गेली असतिल इथून
काही आतूर पावले
थोडे घुंगरू पैंजणातून
अलवार ओघळले
वाळलेल्या पानावर
हे खळ्ळकन पाणी
आत आत कुठेतरी
दुखली असेल राणी
झाडे काळवंडलेली
हवाही काळीशार
थिजलेला गारवा
रूततोय आरपार
कुणी मंतरून ठेवले
की शाप हा भोवला
उभ्या राजस संध्येचा
सूर असाच गोठला
-नी
प्रतिक्रिया
13 Feb 2009 - 11:49 am | घाशीराम कोतवाल १.२
काय कळले नाहि बुवा :?
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
13 Feb 2009 - 12:43 pm | नीधप
तेच बरंय. नाहीतर कुणाच्या तरी नावावर माझी कविता छापलेली आढळेल उद्या.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
13 Feb 2009 - 12:09 pm | महेंद्र
वेणा म्हणजे कळा काहो?
13 Feb 2009 - 12:19 pm | नितिन थत्ते
वेणा म्हणजे कळा हे बरोबर पण
कुणाच्या ह्या वेणा
रूतल्यात जिथे तिथे
हे कळले नाही
(काव्यापासून दूर राहणारा)
खराटा
13 Feb 2009 - 12:28 pm | महेंद्र
खुप वर्षांनी ऐकला शब्द हा.. :)
13 Feb 2009 - 12:39 pm | आनंदयात्री
छान कविता.
गेली असतिल इथून
काही आतूर पावले
थोडे घुंगरू पैंजणातून
अलवार ओघळले
हे कडवे अगदीच उत्तम जमले आहे. आतुर पावलातुन ओघळलेली घुंगरु ही कल्पना सुरेखच आहे.
13 Feb 2009 - 12:45 pm | दशानन
+१
हेच म्हणतो... सुंदर कविता.
भिरभिर फिरलो उन्हातानात मी !
चकरा मारल्या अनंत मी !
तुला पाहण्यासाठी...
यमालाही थोपवलं मी !
पण आता बाय-बाय =))
13 Feb 2009 - 12:45 pm | अवलिया
कविता छान आहे.
--अवलिया
13 Feb 2009 - 12:48 pm | नीधप
बर.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
13 Feb 2009 - 2:06 pm | अवलिया
अरे हो अजुन एक सांगायचेच राहिले ....
कविता चांगली असल्याचे अजुन एक लक्षण म्हणजे तिचे विडंबन झाले की नाही? ;)
तर, ते करण्याचा थातुर मातुर प्रयत्न आम्ही केला आहे. गोड मानालच याची खात्री आहे. :)
--अवलिया
13 Feb 2009 - 8:02 pm | नीधप
हं आभार!
वाचते!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
13 Feb 2009 - 12:56 pm | अनिरुद्धशेटे
अलवार
या शब्दाचा अर्थ काय
-- अनिरुद्ध--
13 Feb 2009 - 8:02 pm | नीधप
अलवार = हळुवार, अलगद
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
13 Feb 2009 - 1:58 pm | अभिष्टा
नी, मस्त जमलिये.
---------------------------------
जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित
हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा
13 Feb 2009 - 2:02 pm | सहज
सेट कुठला आहे? कुठली जागा आहे इथे का अश्याच एका हळव्या सायंकाळी, कोणी भुतकाळात डोकावुन पहात आहे?
थोडे विवेचन आले तर समजायला सोपे जाईल
13 Feb 2009 - 7:42 pm | मुक्तसुनीत
ही कविता आहे. कथा नाही :-) (ह.घ्या. !)
13 Feb 2009 - 2:17 pm | जयवी
नी.....आवडेश :)
13 Feb 2009 - 3:03 pm | अश्विनि३३७९
अलवार म्हणजे अलगद, हळूवार..
13 Feb 2009 - 6:21 pm | मुक्तसुनीत
कविता आवडली. संध्याकाळचा मूड शब्दात पकडला आहे असे वाटले. एकूण रचनेत एक अंतर्गत सुसंगती वाटली. कवयत्रीची एकूण काव्याबद्दलची खोल जाणीव कविता वाचताना दिसली.
अवांतर : एक गमतीची गोष्ट म्हणजे ही कविता वाचताना , ओळीओळीतून जुन्या कितीतरी छान कवितांच्या आठवणी जाग्या झाल्या. "या तुम्ही शिकविल्या खुणा" , "आज कुणीतरी यावे" , "काटा रुते कुणाला" ही अगदी थोडी उदाहरणे ! कविता बनताना जसे कवी कळत न कळत आपल्या मनात रुतलेल्या प्रतिमा-प्रतीके वापरतो तसे वाचकाच्याही बाबतीत असे होते. कालांतराने या शब्दांची उभयपक्षी अतिपरिचयादवज्ञा होण्याचा धोका निर्माण होतो. (हे माझे या कवितेबद्दलचे भाष्य नव्हे. मनात आलेला एक विचार.)
13 Feb 2009 - 8:03 pm | नीधप
>>कालांतराने या शब्दांची उभयपक्षी अतिपरिचयादवज्ञा होण्याचा धोका निर्माण होतो.<<
खरंय..
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
13 Feb 2009 - 6:57 pm | यशोधरा
अतिशय सुरेख कविता नी.. खूप आवडली.
13 Feb 2009 - 7:03 pm | बिपिन कार्यकर्ते
सुंदर कविता, नी.
शब्द रचना छानच. कविता खूपच आवडली.
बिपिन कार्यकर्ते
13 Feb 2009 - 7:19 pm | चतुरंग
संध्येचा एक उदासवाणा सूर कवितेत जाणवतो.
जाणवलेले काही -
पहिल्या दोन कडव्यात पहिली - तिसरी आणि दुसरी - चवथी ओळ यमक साधून आली आहे.
तसे पुढच्या तीनही कडव्यात नाहीये तिथे फक्त दुसरी - चवथी ओळ यमकात आहे.
याकारणाने पहिल्या दोन कडव्यांची गेयता जास्त आहे, त्याला एकप्रकारचा प्रवाहीपणा आलाय. तसेच इतरही कडव्यात असते तर कविता आणखीन गेय झाली असती असे वाटते.
गेली असतिल इथून
काही आतूर पावले
थोडे घुंगरू पैंजणातून
अलवार ओघळले
वाळलेल्या पानावर
हे खळ्ळकन पाणी
आत आत कुठेतरी
दुखली असेल राणी
चतुरंग
13 Feb 2009 - 7:22 pm | अनामिक
सुरवातीला घाईत वाचताना शब्द जरा जड वाटले... पण दुसर्यांदा वाचली तेव्हा अगदी भिडली...
"उभ्या राजस संध्येचा...सूर असाच गोठला"
खरंय... मनात वेदना असतील तर मग भोवतालचं सगळचं उदास वाटायला लागतं.
खुप आवडली कविता!
अनामिक
13 Feb 2009 - 7:32 pm | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Feb 2009 - 7:33 pm | सुनील
चांगली रचना. वेणा, अलवार असे काही विस्मृतीत गेलेले शब्द पुन्हा दिसले. बरे वाटले.
अवांतर - मी सुरुवातीला "कुणाच्या ह्या वेण्या" असे वाचले होते!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Feb 2009 - 7:51 pm | लिखाळ
वा .. कविता छान आहे .. आवडली..
वेणा -रुतल्या हे काही समजले नाही.. याचा अर्थ काय? (वेणा म्हणजे कळा!..अजून काही अर्थ आहे का या शब्दाला?)
-- लिखाळ.
14 Feb 2009 - 12:46 pm | सुचेता
सुरेख , भावसस्पर्शी रचना, मनाला भिडणारी
सुचेता