बरेच दिवसानी मी कोकणातल्या शिरोडे गावात गेलो होतो.गोव्यातपण एक शिरोडे आहे.रेडीचा समुद्र किनारा जवळच आहे.ह्या समुद्रामुळे जवळच्या या गावात हवामानवर खूपच परिणाम होत असतो.
आपण ज्यावेळी भेटतो त्यावेळी बहुदा हवामान हा विषय म्हणून कधी कधी आपल्या बोलण्यात येत असतो.हवामान हे एक कारण आहे.ते आपला दुवा सांधून वास्तविकतेला आकार देते.आपण त्या हवामानातून श्वसन करतो.आपण त्यातच असतो.
आता ह्या क्षणी मी शिरोड्या गावात आहे तिथे असाधारण गरम, ह्युमीड आणि स्थीर अशी हवा आहे.जमिनीकडून समुद्रावर आणि उलट जाणारे वारे हे आपले नैसर्गिक एअरकंडिशनर आहेत.
शिरोड्याचं हवामान प्रसिद्ध आहे.तुम्हाला ते हवामान आवडत नसेल तर एक मिनीट थांबा,ते लागलीच बदलेल.एकाएकी वावटळ येऊन आकाश ढगानी भरून जाऊन पावसाचे शिंतोडे पडायला वेळ लागणार नाही. कधीही तुम्ही पेपरात इकडचं हवामान बघीतलंत तर ते नेहमी गरम,ह्युमीड असंच लिहिलेलं असेल.आणि ते पण दिवसभर. सदाची इकडे हिटवेव्ह असते.
माझे मित्र नेहमीच मला सांगतात की पृथ्वीवरचं हवामान कसं बदलत राहिलंय ते.
धृवावरचं बर्फ वितळायला लागल्या पासून तिकडची अस्वलं पाण्यात डुबत आहेत.आणि कुठे प्रचंड दुष्काळ पडतोय तर कुठे वाळवंटं तयार झाली आहेत.सध्यातरी ही परम-प्रिय धरती सोडून जायची आपल्यावर पाळी आलेली नाही.मला वाटतं जरा आपल्याच आजूबाजूला न्याहाळून ह्या धरतीची काळजी घेण्याची वेळ आली आहे. वनस्पती,प्राणी,वारे,पाऊस,सूर्य आणि चंद्राचे आभार मानले पाहिजेत.ह्या सर्वानी आपली इतकी वर्ष काळजी घेतली आहे आणि आपली जोपासना केली आहे.आणि त्या विधात्याचे पण आभार मानले पाहिजेत.आपण इतकं सगळं सहजगत्या स्विकारलं असंच करतो.बरेच आपल्यातले आपण ह्या धरतीवर खरोखर कोण आहोत हे विसरून गेलो आहोत.
माझा एक ह्या विषयावर अभ्यास केलेला मित्र सांगतो,
"हे एका टोकाला गेलं तर?-आणि ते जाणारही-जर का आपण आपल्याच वागणुकीत बदल केला नाही तर.?
आपल्याला परत आदिवासी व्हावं लागेल." वनस्पती,प्राणी आणि वार्यांची स्तुतीसुमनं गावी लागतील,की ज्यांच्यामुळे आपण जगलो आहो.मला वाटतं,आताच सुरवात केली पाहिजे.हवामान अनुकूल आहे आणि ते आपल्या विचारांचं आणि क्रियेचं समापन आहे.
काल शिरोडे गावात खेळाचे सामने झाले.खो खो,हुतुतू,आट्यापाट्या,आणि कुस्तिचे खेळ.हे खेळ कौशल्याचा आधारावर आहेत.एक तरी भिडू शेवट पर्यंत टिकण्यावर त्याचं कौशल्य दिसून येतं. कुस्तिच्या खेळातून आपल्याला रोजच्या आयुष्यात शक्तिमान बनायला मदत होते.त्यामुळे घरातली जड वजनं उचलायला मदत होईल.बाजारातून जड पिशव्या घरी आणायला सोपं जाईल.आणि चालायचा व्यायाम केला किंवा धावायचा व्यायाम केला तर कदाचीत जवळपास पायी जायला सोपं जाईल.आणि गाडीत इंधन कमी घातलं जाईल.आणि त्यामुळे प्रदुषण कमी होईल.आणि चिकन तंदुरीचे पाय भिरकावून दिल्यास?चरबी सकट तळलेले तिन चार पाय खाऊन झाल्यावर जरूरी नसलेला उरलेला पाय किती लांब भिरकावता येतो ते पाहिल्यावर तुमचं काही पौन्ड वजन कमी होईल आणि कदाचीत एकाददोन वर्षानी आयुष्य वाढवील.
आपण प्रत्येकजण असेच जीवनातल्या खेळात सामिल झालेलो आहोत.आणि ही धरती आपलं खेळाचं मैदान आहे.जन्माला येऊन जीवन कंठताना आपलं चैतन्य घेऊनच आपण जगणार आहोत.आपल्याला आव्हान असं आहे की,आपल्या यशापयशाची एक चमकदार कहाणी आपल्याकडून निर्माण झाली पाहिजे. आपलं हताशपण आणि आपली प्रसन्नता याचा उपयोग- आपल्या एकमेकाची आणि एकमेकाच्या योग्यतेची- काळजी घेण्यात झाला पाहिजे.
कधी अगदीच कंटाळा आला की मग मी रेडीच्या समुद्रावर जाऊन एखाध्या काळ्या खडकावर बसून पाडगांवकरांच्या कविता वाचत बसतो.खडकावर आपटणार्या लहान लहान लाटा परत जाताना फेसाळपणा सोडून जातात.त्या फेसात जमलेली हवा पुन्हा लाट येई पर्यंत बाहेर पडताना आवाज करते.तो आवाज ऐकून ग्लासात सोडावाटर ओतल्यावर फेसाळ पाण्याला आवाज येतो तसाच काहीसा वाटतो.क्रिया एक असल्याने परिणाम सारखेच असणार.हेच तर पदार्थ-शास्त्राचं तत्व आहे.रेडीच्या किनार्यावरून -आकाश स्वच्छ असेल तर- दूरवर वेंगुर्ल्याच्या बंदराचा भाग दिसतो.दुपारची वेळ असेल तर शुभ्र स्पटिकासारखी वाळू तापल्यानंतर चमकते आणि कधी कधी किनार्याच्या पाण्याचं प्रतिबिंब दिसतं.ते विलोभनीय असतं.बंदरावर येणार्या बोटीना रात्रीचा मार्ग दाखवायला भर समुद्रात लाईट हाऊस असतात.त्या रात्रीच्यावेळी रेडीच्या समुद्रावरून स्पष्ट दिसतात.
शिरोडा सोडून परत जायला खूप वाईट वाटतं.पण काय करणार.?
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
13 Feb 2009 - 11:17 am | सुमीत
शिरोडे आवडले
13 Feb 2009 - 11:34 am | सुनील
शिरोड्याचे वर्णन आवडले.
अवांतर - वि.स.खांडेकर जेथे शिक्ष़क म्हणून होते ते शिरोडे हेच काय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Feb 2009 - 11:44 am | योगी९००
अरे वा..छान...
मी सुद्धा लहानपणी या भागात हिंडायचो त्याची आठवण झाली.
आमचे मुळ गाव आरोंदा हे शिरोड्याहून जवळच आहे. कदाचित तुम्हाला ते चांगलेच परिचयाचे असेल.
श्री सातेरी भद्रकाली प्रसन्न!!
खादाडमाऊ
13 Feb 2009 - 11:46 am | सर्किट (not verified)
शिरोड्याच्या हवामानाविषयी माहिती आवडली. सामंतकाका, एक माहिती पूर्ण संकेतस्थळ आहे उपक्रम नावाचे. तिथेही असले माहितीपूर्ण लेखन टाकत जा. तिकडे बरेच लोक सध्या चित्रे टाकून त्याला माहिती म्हणतात.
(ता. क. सामंतकाकांना उपक्रमावर आणण्याचे श्रेय मी घेणारच !!!!)
-- सर्किट
14 Feb 2009 - 5:18 am | श्रीकृष्ण सामंत
हलो सुनील,
होय तेच हे शिरोडे.
हलो सर्किट,
उपक्रमावर अवश्य माझे लेखन टाकीन.
सुचने बद्दल आभार.श्रेय नक्कीच मिळणार.
सुमीत,खादाडमाऊसह सर्वांचे प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
14 Feb 2009 - 7:22 am | रेवती
मीही रेडीच्या समुद्र किनार्यावर एकदा गेलीये.
शिरोड्याबद्दल छान सांगितले आहे आपण, तसेच बरोबरीने आलेल्या सूचनाही आवडल्या.
रेवती
14 Feb 2009 - 5:44 pm | chipatakhdumdum
ओ भाउ, शिरोडे काय? शिरोडा अस म्हणा.
काय एक एक लोक भेटतात ..
15 Feb 2009 - 12:27 am | योगी९००
सामंत साहेब हे मि.पा.वर एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे.
त्यांच्याकडून शिरोडे असा चुकीचा उल्लेख झाला असेल..म्हणून लगेच काय एक एक लोक भेटतात .. अशी तिरसट प्रतिक्रिया व्यक्त करू नये.
कदाचित त्यांचे तुम्ही इतर लेख वाचले नसावेत. जरूर वाचा आणि मग तुम्हालाच तुमच्या वरील प्रतिक्रियेनिम्मित्त पश्चाताप होईल. मला खात्री आहे की तुम्ही म्हणाल.."अशीच लोकं भेटली पाहिजेत".
खादाडमाऊ
15 Feb 2009 - 6:00 am | रेवती
खादाडमाऊंशी सहमत.
सामंतकाकांसारख्या ज्येष्ठ मिपाकरांचा उल्लेख (खरं तर सर्वांचाच) आदराने व्हावा असे वाटते.
रेवती
16 Feb 2009 - 3:09 am | चतुरंग
सर्वांचाच उल्लेख आदराने व्हावा. सामंतकाका हे मिपावरचे आतापर्यंतचे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांच्या वयाचा मान ठेवला जावा.
चतुरंग
15 Feb 2009 - 8:17 am | पिवळा डांबिस
पण शिरोड्याला स्वतंत्र भारतात शिरोडे असेच म्हणतात......
जसं ठाना ला ठाणे आणि पूना ला पुणे म्हणतात तसेच!!!!
शिरोड्याला जायचं असेल तर 'सावंतवाडी - शिरोडे' किंवा 'वेंगुर्ला - शिरोडे' ह्या एस्ट्या पकडाव्या लागतात असं मला वाटतं!!!!!
बाकी तुमचं चालू द्या.....
:)
15 Feb 2009 - 3:57 am | प्राजु
काका,
खूप दिवसांनी लेखन आलं. मस्त आहे सगळं वर्णन.
चिकन तंदुरीचे पाय भिरकावून दिल्यास?चरबी सकट तळलेले तिन चार पाय खाऊन झाल्यावर जरूरी नसलेला उरलेला पाय किती लांब भिरकावता येतो ते पाहिल्यावर तुमचं काही पौन्ड वजन कमी होईल आणि कदाचीत एकाददोन वर्षानी आयुष्य वाढवील.
हे मात्र मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Feb 2009 - 8:03 am | दशानन
सामंत साहब,
+१ नेहमी प्रमाणेच उत्त्तम लेखन !
आवडले शिरोडे पाहण्याची इच्छा आहे आता मनात.
कोणाकडे ह्या शिरोड्याचे काही फोटो आहेत का :? जरा चिटवा मिपावर पण... कसे / कधी जावे ह्या बद्दल पण कोणी तरी लिहा ही विनंती.
:) Keep Smiling !!!!!!
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips! ;)
15 Feb 2009 - 10:43 pm | पक्या
शिरोड्याचे वर्णन आवडले, सामंतकाका
16 Feb 2009 - 3:06 am | चतुरंग
तुमचं लेखन अगदी सहज जाता जाता गप्पागोष्टी केल्यासारखं असतं. विषयही अगदी सोपे आणि नेहेमीच्या जगण्यातले असतात.
तुम्हाला सतत इतके विषय दिसत रहातात, खुणावत रहातात आणि तुम्ही त्यावर लिहीत रहाता ह्याचं खरंच कौतुक वाटतं! :)
चतुरंग
19 Feb 2009 - 10:26 pm | श्रीकृष्ण सामंत
आपण सर्वांनी माझ्या विषयी दाखवलेला आदर,आणि प्रेम पाहून मला आनंद होतोच आणि हा आदर आणि हे प्रेम असेच रहावे ह्यासाठी माझी जबाबदारी पण वाढते.
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com