(तुडुंब)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
7 Dec 2016 - 8:22 pm

प्राजुची कदंब कविता वाचली. छानच आहे. आता इतकी सुरेख लयबद्ध कविता वाचून आमचं मन आनंदाने तुडुंब झालं! मग राहवेना....ईर्शाद...

कळवळणार्‍या अवजड देहा, दिसता कुक्कुट छान
उपवासाची ऐशीतैशी, सुटे 'मिती'चे भान

खवचट टवळे, डँबिस भोचक, विशाल ललना फुले
येताजाता खुसफुसणाऱ्या, कन्या आणिक मुले

हिरवापालक तांबूसगाजर, मिक्सर फिरवी त्वरे
चेंडूवरती साक्षात्कारी, तटतटता अंबरे!

खाद्यसखा की म्हणू तुडुंब, जणु मैद्याची बोरी
पानोपानी पहा खिजविते संकल्पा वासरी

जिमेत भवती नाचत झुंबा तरुणींच्या लीला
मोह वाटुनी सोडुन निद्रा सत्वर ये बावळा

रुंद–रुंदशा देहाची बघ भव्य असे सावली
तुमान करते रोज अचंबा तनू कशी मावली!!

-चतुरंग

हास्यविडंबन

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

7 Dec 2016 - 8:38 pm | अत्रुप्त आत्मा

ह्हा ह्हा हा!
भारी एकदम.

गवि's picture

7 Dec 2016 - 8:43 pm | गवि

वाह...

पुरानी जीन्स..
पण पोट फार..
कुल्याच्या वरती..
चढेनाच यार..

हे आमचं जुनं अपूर्ण काव्य आठवलं

मारवा's picture

7 Dec 2016 - 9:45 pm | मारवा

पुरानी जीन्स..
पण पोट फार..
कुल्याच्या वरती..
चढेनाच यार..

विडंबन आवडलंही खुप आणि एका आवडत्या गाण्याचा बाप भाऊ करुन टाकल्याने वाईटही वाटलं. दोन्ही भावनांचा संगम झाला एकाच वेळी.
बाकी फार गप्प गप्प असता तुम्ही हल्ली.
तुमचा आमिरखान झालाय का ?
सालमे एखादाच पिक्चर ? एखादाच स्टेटमेंट पन ऐसा की
पुरा हिन्दुस्थान हिला देंगे !
स्मिताल्या ( एकुण चार पहाव्या )

अजया's picture

9 Dec 2016 - 12:34 pm | अजया

+१००

संदीप चित्रे's picture

7 Dec 2016 - 10:35 pm | संदीप चित्रे

>> तुमान करते रोज अचंबा तनू कशी मावली!!
हहपुवा! :)

शार्दुल_हातोळकर's picture

7 Dec 2016 - 10:54 pm | शार्दुल_हातोळकर

मौज भारी !!

खटपट्या's picture

8 Dec 2016 - 2:17 am | खटपट्या

लैच भारी बाबा...

पैसा's picture

8 Dec 2016 - 2:16 pm | पैसा

आम्हीही अचंबित! हे कसं काय ब्वा जमलं याना! =))

अप्रतिम आहे!! तुम्ही मुहुर्त केला आहातच तर आता इतर जुन्या लोकांनीही लिहायचं मनावर घ्यावं. शिळोप्याच्या गप्पांचे धागे वाचावे तरी किती?

टवाळ कार्टा's picture

8 Dec 2016 - 2:50 pm | टवाळ कार्टा

खिक्क

एस's picture

8 Dec 2016 - 5:04 pm | एस

तुफान!

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Dec 2016 - 12:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

रुंद–रुंदशा देहाची बघ भव्य असे सावली
तुमान करते रोज अचंबा तनू कशी मावली!!

हे तर अतिशय आवडले

पैजारबुवा,

अजया's picture

9 Dec 2016 - 12:35 pm | अजया

मस्त जमलंय विडंबन.

दमामि's picture

10 Dec 2016 - 11:15 am | दमामि

मस्तच!!!

>> तुमान करते रोज अचंबा तनू कशी मावली!!
हा हा हा !!!! गडाबडा लोळतोय !!!!

काही जुने धागे बघत असतांना हा धागा दिसला! सुटला कसा नजरेतून कोण जाणे..!!
पण ते तुमानीचं मत आता एकदम रिलेट झालंय बघा आपल्याला पण!

हा हा हा.. बाब्बौ.. फक्त त्या शेवटच्या शेरावर मागचे दहा मिनिटं हसतोय! दंडवत घ्यावा रंगाशेठ! _/\_