मला माहिती आहे की ह्या टॉपिक चं शिर्शक वाचुन तुम्हाला जरा दचकल्या सारखं झालं असेल. पण मला हा विषय जरा विशेष महत्वाचा वाटला. मॉरल पोलिसिंग हा प्रकार हल्ली जरा जास्तच वाढलाय. तुम्ही पण ही बातमी वाचली असेलच, आणि वाचुन हॅः काय फालतु पणा आहे म्हणुन दुर्लक्ष केलं असेलं.
इथे ह्या विषयावर लिहिलंय..
माझा मुद्दा एकच..
मॉरल पोलिसिंग कुठल्याही राजकिय पक्षाने करणे कितपत योग्य आहे?
प्रतिक्रिया
12 Feb 2009 - 11:52 am | घाशीराम कोतवाल १.२
हे काय नविन गुलाबी चड्डी अहो असे पांचट प्रकार चर्चेला नका आनु राव
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
12 Feb 2009 - 11:53 am | विनायक प्रभू
मिपाकर धक्काप्रुफ आहेत.
12 Feb 2009 - 11:58 am | महेंद्र
हा प्रकार पांचट म्हणता येणार नाही..
एका मुलिला भर रस्त्यावर मारहाण होते..
आणि ही मारहाण करणारे आपले संस्कृतीचे रक्षक..
त्याच बरोबर, एक मंत्री पब भरो आंदोलन करते आहे...
एक सोशल गृप गुलाबी अंडरविअर्स भेट देउ पहातोय..
ह्या सगळे जे सुरु आहे ते आपली संस्कृती आहे कां??
आणि मोरल पोलिसिंग कितपत असावं? कि नसावं? हा मुख्य मुद्दा आहे..
12 Feb 2009 - 12:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
राहिलंच महेंद्रराव!
गुलाबी चड्ड्यांनंतर 'रिटर्न गिफ्ट' म्हणून खादीची साडी.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
12 Feb 2009 - 12:02 pm | महेंद्र
:)