अवखळ अवखळ या भावना...।
तुझ्याविना जिव माझा आहे रिकामा ।।
तू साद दे
मी ऐकतो...
बघता तुला
मी हरवितो...
ही स्पंदने.....तुझीच आता.....।।
अवखळ अवखळ या भावना...।
तुझ्याविना जिव माझा आहे रिकामा ।।
शोधत होतो तुला, चारही दिशा जरी ।
कळले ना कधी, होते जवळी तरी ।।
शब्द जेव्हा तुझे, येती कानावरी ।
प्रेमळ दवबिंदू जणू, बनती पानावरी ।।
श्रावण सरीनीं मला भिजु दे आता ।
भेटल्याचा तू आनंद कळू दे जगा ।।
परी समान स्पर्श तुझा जाहला मना ।
परीस स्पर्श ऐकून होतो मिळाला पुरावा ।।
अवखळ अवखळ या भावना...।
तुझ्याविना जिव माझा आहे रिकामा ।।
प्रतिक्रिया
9 Nov 2016 - 9:28 pm | ज्योति अळवणी
नाही जमली
22 Nov 2016 - 12:14 am | विनायकपाटील८९
जमेन कधीतरी... प्रयत्न करतोय...
22 Nov 2016 - 4:45 pm | Bhagyashri sati...
चांगला प्रयत्न!
23 Nov 2016 - 10:53 am | विनायकपाटील८९
धन्यवाद ....