गेले दोन दिवस दोन कडव्यात अडकलो होतो, आता झटक्यात बाकीचे डोक्यात आले. =)) इथं पण सुचनांचं स्वागतच आहे.
काळा असे कुणाचा आक्रंदतात कोणी
मज पांढरा रुतावा हा दैवयोग आहे
सांगू कसे कुणाला कळ आपल्या रुप्याची?
चिल्लर कमावयाचा मज श्राप हाच आहे
थांबू घरी पहातो, होती 'अनर्थ' नोटा
रांगेत राहणेही विपरीत होत आहे
ही बँक, पोस्ट ते की, काहीच आकळेना
बंदीत सापडोनी मी 'रिक्तहस्त' आहे!
- स्वामी संकेतानंद
प्रतिक्रिया
17 Nov 2016 - 6:51 am | स्वामी संकेतानंद
शीर्षक संपादित करा प्लिझ. काळा ऐवजी काळ आले. :(
अति घाई, स्वाम्याला नेई
17 Nov 2016 - 1:17 pm | टवाळ कार्टा
अश्लील अश्लील =))
17 Nov 2016 - 1:19 pm | पाटीलभाऊ
अगदी हेच म्हणायला आलो होतो :D
17 Nov 2016 - 8:22 am | अत्रुप्त आत्मा
=)) जबराट्ट! =))
अता एक~ "काळ्या पैशातील कविता" , असा विडंबन काव्य संग्रह प्र सिद्ध करा हो स्वामिज्जीईईईई! =))
कारण मार्च पर्यंत अजून 10/१५ तरी होतील तुम्हाला! (कविता हं! ;) )
17 Nov 2016 - 9:27 am | नाखु
काही कविता हे शीर्षक जास्त उपयुक्त होईल असे वाटते.
अर्थात शीघ्रकवी आणि खंदे समीक्षक यांच्या समोर मज वाचकाने बोलणे म्हण्जे ल.तो.मो.घा.
आस्वादक नाखु पांढरापेषा
17 Nov 2016 - 9:24 am | चाणक्य
एकदम कडक.
17 Nov 2016 - 11:10 am | सस्नेह
चपखल !
17 Nov 2016 - 1:14 pm | पुंबा
विडंबन छान आहे. पण, प्रतिविडंबनाचा अमर्याद स्कोप आहे हे सांगून ठेवतो.
17 Nov 2016 - 2:25 pm | कंजूस
ढवळ्यासंगे बांधला काळा
तरी काम होत होते !
आता पाहू मी कुणाला
तुकव मान पुढे।
17 Nov 2016 - 2:28 pm | अनुप ढेरे
=))
अश्लील अश्लील
17 Nov 2016 - 2:30 pm | सूड
शीर्षक व्दयर्थी नसतं तरी चाललं असतं.
17 Nov 2016 - 3:12 pm | स्वामी संकेतानंद
शप्पथ!!! तुम्ही सगळ्यांनी कमेंट करेपर्यंत माझ्या डोक्यात दुसरा काही अर्थ आलाच नव्हता. आता मी स्वतःच लोळतोय! अशक्य आहात तुम्ही लोक! =))
17 Nov 2016 - 3:26 pm | मोदक
"स्वामी साळसुदानंद" अशी सही पण लिहायची की मग..!
17 Nov 2016 - 3:30 pm | पाटीलभाऊ
स्वामीजी किती तो निरागसपणा... :P
18 Nov 2016 - 6:04 pm | टवाळ कार्टा
रेशिस्ट पण म्हण्णार होतो =))
18 Nov 2016 - 6:18 pm | सूड
ह्यावर मी फुटलोच!! =))
18 Nov 2016 - 7:34 pm | टवाळ कार्टा
=))
18 Nov 2016 - 8:23 pm | आदूबाळ
मी 'व्हाईट'साईट विचार कराचा नाही असं ठरवून कालपासून हा धागा उघडला नव्हता.
18 Nov 2016 - 9:44 pm | अत्रुप्त आत्मा
'व्हाईट'साईट
णविण शब्द!
17 Nov 2016 - 2:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं ! =)) =))
18 Nov 2016 - 11:14 am | पैसा
स्वाम्याच्या प्रतिभेला अचानक बहर आलाय! =))
18 Nov 2016 - 6:54 pm | अजया
=)))))