'चले जाव' चळवळः- काही प्रतिक्रिया

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जनातलं, मनातलं
12 Nov 2016 - 7:42 am

समजा १९४२ साली आतासारखी उठवळ माध्यमे असती तर काय बातम्या असत्या?

१. गांधींनी जनतेस चिथावले ' करो या मरो', जनजीवन विस्कळीत

२. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रूळ उखाडले, तारा कापल्या, जनतेचे हाल

३. गांधीसमर्थकांचा देशभर उच्छाद, आम आदमी घरात दडून!

४. वेळेत तार न पोचल्याने मुलगा आईच्या अंतिम दर्शनास मुकला

५. रेल्वे बंद, हजारो विद्यार्थी परीक्षेस मुकले

६. सर्वत्र अराजकतेचे दृश्य, आम आदमीची होत आहे गैरसोय

७. मजुरी बुडाल्याने गोदी कामगारांचा सवाल, 'आज चूल कशी पेटणार?'

८. इंग्रज सोडून गेल्यावर त्यांचे आर्दर्ली कुटुंबाचे पोट कसे भरणार? गांधींनी इंग्रजांना 'चले जाव' म्हणण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे- अमुक कामगार नेते यांचे प्रतिपादन

९. आम्हालाही स्वातंत्र्य हवे आहे, पण सामान्य नागरिकांना वेठीस धरून मिळणार असेल तर अशा आंदोलनास आमचा विरोध राहील! - विरोधी पक्षनेते

१०. गांधीनी आताच का 'करो या मरो' ची घोषणा दिली? टायमिंग संशयास्पद! What's the deal, Mahatma?- ट्विटरविंद बवाल

११. 'ह्या ज्या स्वस्त धान्य दुकानसमोर जी ही रांग लागली आहे, त्यामुळे हे जे रांगेत उभे असणारे हे जे लोक आहेत, हे त्रस्त झाले आहेत. हे जे आंदोलन आहे, त्यामुळे हा जो त्रास होतोय, तो फक्त आम आदमीलाच होत असून, 'कुठे आहेत ह्या आंदोलनामुळे घाबरलेले इंग्रज अधिकारी', असा हा प्रश्न जो आहे, तो जे हे गांधी आहेत, त्यांना हा इथे विचारावा वाटतो" - घी 12 तास चॅनेलचा वार्ताहर

१२. ' स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रजांना लक्ष्य करण्याऐवजी भारत बंद ची हाक देऊन सामान्य जनतेला वेठीस धरणे योग्य आहे का?' - ज. गा. वेगळे

१३. " इंग्रज अधिकारी आपल्या बंगल्यात बसून ऍपल पाय खात दार्जिलिंग टी चे घोट निवांतपणे घेत असताना गोरगरीब जनता मात्र गांधींच्या आंदोलनापायी भरडली जात आहे. ही गांधींची हुकूमशाही आहे. " - युवा नेते

१४. " ही तर गांधींची मुस्लिम लीगच्या वेगळ्या पाकिस्तानच्या मुद्द्यापासून जनतेचे लक्ष भरकटवण्याची युक्ती! " - सुश्री नेत्या

१५. " Gandhiji, Target British Officers, not the common man." -ट्विटराणा

१६. " Is independence is the only solution for India's problem? Mr. Mahatma, There are more important issues to solve!" - ट्विटरिका

-स्वामी संकेतानंद

( अवांतर:- थोडाफार इतिहास वाचलेला असल्याने काही तत्कालीन नेत्यांनी चलेजाव चळवळीचा विरोध केला होता, हे मला माहित आहे. पण इथे ते मुद्दे घेऊन नका. )

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

12 Nov 2016 - 8:11 am | अत्रुप्त आत्मा

ह्हा ह्हा हा. ! स्वामिज्जींचा हतोडा! =))

@ट्विटरविंद बवाल››› =))

एक महत्त्वाचं राहिलं- इंग्रजांना हटवल्या-नंतर , येणारे नवे सरकार कशावरून परत तीच किंवा अधिक गुलामी आणणार नाही!? ? ? ? ? मरं win the , देशी Wall. ;)

तुषार काळभोर's picture

12 Nov 2016 - 8:27 am | तुषार काळभोर

n) या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? - इति "सगळं माझा" वार्ताहर

नाखु's picture

12 Nov 2016 - 9:36 am | नाखु

असली आंदोलनं केली पण कधी जाहीर चिथावणी हाक नाही दिली..गुर्मीत गंवार.

असल्या आंदोलनापेक्षा आम्च्या शाखेत पहा कसली कामे चाललीत ते, उद्याच्या सामन्यात राऊतांचे दळण वाचा म्हणजे कळेल तुम्हाला..... उठाठेव टॉक रे

अत्रुप्त आत्मा's picture

12 Nov 2016 - 12:36 pm | अत्रुप्त आत्मा

@गुर्मीत गंवार., उठाठेव टॉक रे››››› अफाट! =)) (स्वत:च्याच डोक्या~वरची) टोपी उडविण्यात येत हाए! =))

बोका-ए-आझम's picture

12 Nov 2016 - 12:30 pm | बोका-ए-आझम

तेव्हा मिपा असतं तर मिपावरच्या साकार आणि निराकार आयडींनी काय केलं असतं असा प्रश्न पडतोय. गांधींना किती लोकांनी - चान चान, मोठे व्हा, ह्यापी बड्डे वगैरे शुभेच्छा दिल्या असत्या; गांधींच्या समर्थकांना भक्त म्हणून शिव्या घातल्या असत्या; स्वातंत्र्याची प्रांजळपणाशी भेट वगैरे धागे आले असते - काय काय झालं असतं.

पुंबा's picture

13 Nov 2016 - 7:53 pm | पुंबा

Hahaha

सही रे सई's picture

16 Nov 2016 - 7:55 pm | सही रे सई

चांगले शाल जोडीतले आहेत... हसून हसून पुरेवाट.

मूकवाचक's picture

17 Nov 2016 - 5:24 pm | मूकवाचक

+१

मारवा's picture

13 Nov 2016 - 8:05 pm | मारवा

भारी आहे

पैसा's picture

13 Nov 2016 - 8:42 pm | पैसा

लै भारी!

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Nov 2016 - 8:40 am | कैलासवासी सोन्याबापु

"गांधींनी असले फालतू आंदोलन करून टाकल्यामुळे मी बीफ खाणार अन वाटेल ते बोलणार"
जस्टिस मारकुंडे कट्टीफु

विवेकपटाईत's picture

14 Nov 2016 - 8:45 am | विवेकपटाईत

खरे म्हणाल तर कुणीही गरीब रडत नाही आहे दिहाडी वाल्या मजदूरांना रोजगार मिळाला आहे (जनधन खात्याचा खरा अर्थ आत्ता कळला). बाकी सर्वात जास्त रडणारा एकच इमानदार माणूस दंगे भडकविण्याच्या गोष्टी करतो आहे.

ज्योत्स्ना's picture

14 Nov 2016 - 9:30 am | ज्योत्स्ना

गांधीजींना खलनायक ठरवलं असतं हे नक्की! हाहाहा

पाटीलभाऊ's picture

14 Nov 2016 - 5:31 pm | पाटीलभाऊ

लय भारी

मराठी कथालेखक's picture

14 Nov 2016 - 7:12 pm | मराठी कथालेखक

मस्त.. वाचून मजा आली.

स्वामी संकेतानंद's picture

14 Nov 2016 - 9:09 pm | स्वामी संकेतानंद

" तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूँगा - नेताजी बोस "

-- Such a brazen display of fascist, jingoistic,chest-thumping,violent politics! - खाजडीप खरडेसाई

तुषार काळभोर's picture

14 Nov 2016 - 10:28 pm | तुषार काळभोर

कहर!!!

शलभ's picture

17 Nov 2016 - 6:21 pm | शलभ

खतरनाक..

अजया's picture

14 Nov 2016 - 10:30 pm | अजया

खाजडिप!
मजा आली वाचायला!

संदीप डांगे's picture

15 Nov 2016 - 3:15 am | संदीप डांगे

मिपा फेमस सदस्यांनी कसे प्रतिसाद दिले असते त्याकाळात तेही यिवू दे!

चाणक्य's picture

15 Nov 2016 - 3:59 am | चाणक्य

भारीये. स्वामी काय लिहील नेम नाही, पण जे लिहील ते एकदम बैलाचा डोळा.

तेजस आठवले's picture

16 Nov 2016 - 7:44 pm | तेजस आठवले

मस्त लिहिले आहे.

तेजस आठवले's picture

16 Nov 2016 - 7:52 pm | तेजस आठवले

चले जाव चळवळ करणे हे कधीही चांगलेच.पण आपल्या भाट लोकांना सांभाळण्यात हा पंचाधारी कमी पडला. चार माणसे गोळा करून चरख्यावर सूत काढण्याने स्वातंत्य्र मिळत नाही हे माझ्या शिवाय कोणाला समजणार ?( तसे पण मला सगळ्यातले सगळे कळते) - खोटीश भिकेर.

तेजस आठवले's picture

16 Nov 2016 - 7:55 pm | तेजस आठवले

स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे - बबन :)

बोका-ए-आझम's picture

16 Nov 2016 - 9:15 pm | बोका-ए-आझम

- विदर्भ.

तेजस आठवले's picture

16 Nov 2016 - 8:50 pm | तेजस आठवले

चरख्यावर सूत कातून झाल्यावर मी बैलगाडीतून घरी निघालो होतो. वाटेत मी आणि माझ्या बैलांनी लिंबू सरबत घेऊन विश्रांती घेतली(लिंबं वाटेतल्या शेतातून ढापली होती मी). बघतो तर समोर एक सुंदर तरुणी उभी.मला दांडीयात्रेच्या स्टार्टींग पॉईंट पर्यंत सोडा असे म्हणाली आणि उत्तराची वाट न पाहता बसली की हो बैलगाडीत. थोड्या वेळाने तिच्या घराजवळ गाडी थांबवून मला म्हणाली कि सव्वा रुपया द्याल का, मला फी भरायची आहे. त्याकाळी आमचे वार्षिक उत्पन्न जेमतेम आठ रुपये होते. (आमचे अण्णा तर मला दहा पैसे पण देत नसत उडवायला) मी वरून कितीही सभ्यपणा दाखवत असलो तरी मी आतून पक्का लोचट आहे.दिले लगेच. गांधीजींचे पुढचे उपोषण सुरु व्हायच्या आधी परत देईन म्हणाली.मला काय, तसाही काही कामधंदा नाहीच. आणि ह्यांची उपोषणे तर सारखी असतातच,येणे होईलच, म्हटलं करू मदत तीला. कदाचित १९४२ - अ लव्ह स्टोरी माझीच असेल.पण कसले काय. पुढच्या महिन्यात मी पैसे परत आणायला गेलो तर ती गायब झाली होती.माझी फसवणूक केली हो तिने. आता मी माझ्या पुढच्या जन्मात ह्यावर एक लेख लिहिणार आहे. लिंक आत्ताच देऊन ठेवतो.

महागात पडलेलं स्त्रीदाक्षिण्य

-तुमचा लाडका,
ब्रह्मे

-कृपया हलके घेणे. विनोदी अंगाने लिहावेसे वाटले. १९४२ च्या चळवळीची व स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांची टर उडवण्याचा कुठलाही हेतू नाही.

पैसा's picture

16 Nov 2016 - 10:31 pm | पैसा

=))

शरभ's picture

17 Nov 2016 - 5:27 pm | शरभ

मी वरून कितीही सभ्यपणा दाखवत असलो तरी मी आतून पक्का लोचट आहे.

हा हा..

- श

संदीप डांगे's picture

16 Nov 2016 - 9:38 pm | संदीप डांगे

खोटीश भिकेर कोण?

स्वामी संकेतानंद's picture

17 Nov 2016 - 5:57 am | स्वामी संकेतानंद

गिरीश कुबेर

रामपुरी's picture

16 Nov 2016 - 10:29 pm | रामपुरी

ही तर अल्पसंख्यांकांच्या हक्कावर गदा आहे. त्यांना त्रास देण्याची नविन युक्ती आहे. - हाग्विजय हिंग

चावटमेला's picture

16 Nov 2016 - 11:47 pm | चावटमेला

हाग्विजय हिंग

अगागागा, हसून हसून खुर्चीतून उडालो राव;:) :)

सस्नेह's picture

17 Nov 2016 - 5:06 pm | सस्नेह

=)))
स्वामीजी फॉर्मात !!

तत्कालीन मिपाकरांचे काही धागे:

- चले जावच्या नार्‍यात गुंतला शेतकरी राजा (गझल) (लेखकः पत्ता_द्याना)
- जनक्षोभाचे आगामी निवडणुकांवर परिणाम (लेखकः वुड्रो विल्सन) (कारण क्लिंटनसाहेबांचा जन्म व्हायचा होता.)
- सुतासंगे जुळले मनाचे धागे (लेखिका: मेगी)
- मोर्चातली भुताटकी (लेखकः गोल्डमॅन)
- स्वदेशी करडईच्या पाककृती
- राष्ट्रकूटकालीन विदेशी कपड्यांच्या होळ्या
- सुताची नाडी आणि तिचं भविष्य
- दिलकश चळवळ

जनक्षोभाचे आगामी निवडणुकांवर परिणाम (लेखकः वुड्रो विल्सन) (कारण क्लिंटनसाहेबांचा जन्म व्हायचा होता.

रोफललो, मेलो हसून हसून!

पैसा's picture

19 Nov 2016 - 8:34 am | पैसा

=)) =))

तीन दिवसात आंदोलन मागे घ्या नाही तर .. नाही तर... चावेन बरं का- कुमारी कटुता

प्रसाद गोडबोले's picture

17 Nov 2016 - 7:22 pm | प्रसाद गोडबोले

टीका

करा करा भक्तानों अजुन टीका करा विरोधकांवर , आडुन लपुन छपुन करा . ;)

स्वाम्या दुष्टा राक्षसा , चलेजाव च्या आडुन सकारात्मक आणि प्रामाणिक विरोध करणार्या विपक्ष नेत्यांवर उपहासात्मक राळ उडवतोस , जर दम असेल तर भक्तांच्या प्रतिक्रिया कशा असत्या ते लिहि की ! =)))))

( खरं तर भक्तांच्या प्रतिक्रिया कशा असत्या ते लिहायची गरज नाही गेली ७० वर्षे तेच पुराण चालु आहे , दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल , उचललेस तु मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया =)))) )

संदीप डांगे's picture

17 Nov 2016 - 7:41 pm | संदीप डांगे

वोक्के! म्हणजे फक्त मुर्त्या बदलल्या, मंदिर, कर्मकांड, मनीचा भाव तसंच आहे, मग ह्यात 'डिफरन्स' तो काय?

मागे एका धाग्यावर कुणाच्या तरी पायाला विष चोपडले तर सकाळी बरेच मरून पडलेले दिसतील असं काही लिहिलं होतं, बेडवरचा माणूस बदलला तर आधीच्या कैक पटीत आता सापडतील असे दिसतंय एकूण.

प्रसाद गोडबोले's picture

17 Nov 2016 - 7:53 pm | प्रसाद गोडबोले

फक्त मुर्त्या बदलल्या, मंदिर, कर्मकांड, मनीचा भाव तसंच आहे,

अगदी अगदी हेच म्हणायचे होते ! परवाच मोदी हे देवाचे अवतार आहेत अशा अर्थाचा एक फेसबुक वरील मेसेज वाचुन तर अक्षरशः पोट दुखे पर्यंत हसलो , पण काय करणार , भक्तांना सगळाच दोषही देता येत नाही , गेली ७० वर्ष जे पाहिले आहे त्याचेच अनुकरण चालु आहे , फक्त मुर्त्या बदलल्या इतकेच !

पोकळ 'आदर्श'वादाचे अन आंधळ्या एकांगी व्यक्तीपुजेचे एक ग्रहण जराकुठे सुटायला लागले होते तोवरच हे दुसरे ग्रहण लागले अन हे तर नुकतेच सुरु झाल्याने किती काळ चालेल ते देखील माहीत नाही !!

जानु's picture

19 Nov 2016 - 10:49 am | जानु

भारतीय मानसिकता ही तारणहाराच्या शोधातच असते. त्यातुन बाहेर पडु की नाही ते माहित नाही. असो पण केजरीवाल सारखे पुन्हा पुन्हा झाले की काही पिढया नंतर आपण यातुन नक्कीच बाहेर येणार. आशा अमर असते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Nov 2016 - 1:01 am | डॉ सुहास म्हात्रे

स्वामिजींनी समाधीअवस्थेत भूतकालात जावून वेचून आणलेले मोती ! =)) =))

आठव्या क्रमांकापासून हसून हसून पडायची वेळ आली !

काही प्रतिक्र्त्याही तोडीस तोड आहेत :)

श्रीगुरुजी's picture

20 Nov 2016 - 1:03 pm | श्रीगुरुजी

This writing is now on WhataApp. Just now I got following on WhataApp without naming author.

समजा १९४२ साली चले जाव आंदोलनावेळी अरविंद केजरीवाल अथवा राहुल गांधी सारखे कोणत्याही गोष्टीचे घाणेरडे राजकारण करणारी मंडळी असती अथवा भडक बातम्या देणारी माध्यमे असती तर काय बातम्या असत्या?

१. गांधींनी जनतेस चिथावले ' करो या मरो', जनजीवन विस्कळीत

२. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रूळ उखाडले, तारा कापल्या, जनतेचे हाल

३. गांधीसमर्थकांचा देशभर उच्छाद, आम आदमी घरात दडून!

४. वेळेत तार न पोचल्याने मुलगा आईच्या अंतिम दर्शनास मुकला

५. रेल्वे बंद, हजारो विद्यार्थी परीक्षेस मुकले

६. सर्वत्र अराजकतेचे दृश्य, आम आदमीची होत आहे गैरसोय

७. मजुरी बुडाल्याने गोदी कामगारांचा सवाल, 'आज चूल कशी पेटणार?'

८. इंग्रज सोडून गेल्यावर त्यांचे आर्दर्ली कुटुंबाचे पोट कसे भरणार? गांधींनी इंग्रजांना 'चले जाव' म्हणण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे-

९. आम्हालाही स्वातंत्र्य हवे आहे, पण सामान्य नागरिकांना वेठीस धरून मिळणार असेल तर अशा आंदोलनास आमचा विरोध राहील! -

१०. गांधीनी आताच का 'करो या मरो' ची घोषणा दिली? टायमिंग संशयास्पद! What's the deal, Mahatma?- ट्विटरविंद बवाल खुजलीवाल

११. 'ह्या ज्या स्वस्त धान्य दुकानसमोर जी ही रांग लागली आहे, त्यामुळे हे जे रांगेत उभे असणारे हे जे लोक आहेत, हे त्रस्त झाले आहेत. हे जे आंदोलन आहे, त्यामुळे हा जो त्रास होतोय, तो फक्त आम आदमीलाच होत असून, 'कुठे आहेत ह्या आंदोलनामुळे घाबरलेले इंग्रज अधिकारी', असा हा प्रश्न जो आहे, तो जे हे गांधी आहेत, त्यांना हा इथे विचारावा वाटतो" - घी 12 तास चॅनेलचा वार्ताहर

१२. ' स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रजांना लक्ष्य करण्याऐवजी भारत बंद ची हाक देऊन सामान्य जनतेला वेठीस धरणे योग्य आहे का?' - ज. गा. वेगळे

१३. " इंग्रज अधिकारी आपल्या बंगल्यात बसून ऍपल पाय खात दार्जिलिंग टी चे घोट निवांतपणे घेत असताना गोरगरीब जनता मात्र गांधींच्या आंदोलनापायी भरडली जात आहे. ही गांधींची हुकूमशाही आहे. " - युवा नेते

१४. " ही तर गांधींची मुस्लिम लीगच्या वेगळ्या पाकिस्तानच्या मुद्द्यापासून जनतेचे लक्ष भरकटवण्याची युक्ती! " - सुश्री नेत्या

१५. " Gandhiji, Target British Officers, not the common man." -ट्विटराणा

१६. " Is independence is the only solution for India's problem? Mr. Mahatma, There are more important issues to solve!" - ट्विटरिका