समर्थकांच्या देशात
सर्वत्र मंगल वातावरण आहे,
प्रत्येक माणूस अतिशय आनंदात आहे,
देशप्रेमाची लाट आहे,
विजयाचा जयघोष आहे!
विरोधकांच्या देशात लुटालूट, दंगे,
अराजक माजलय, लोक मरत आहेत,
पोरं उपाशी, रुग्ण रस्त्यावर आहेत,
सर्वत्र फक्त आक्रोश आहे!
आपण आपलं चाचपून बघावं,
खिशात किती कॅश आहे,
मनात किती संतोष आहे,
किती असंतोष आहे!
प्रतिक्रिया
14 Nov 2016 - 12:42 pm | एस
देशाची अशी फाळणी का झालीये हा प्रश्न मात्र सुटत नाहीये...
14 Nov 2016 - 12:48 pm | संदीप डांगे
:(
14 Nov 2016 - 12:52 pm | चांदणे संदीप
पेराल तेच उगवेल हेच जो तो
सीमेपार, विसरून गेला आहे!
चेहऱ्यावर जळकी स्मिते आणि
काखेत सुरी बाळगून आहे
Sandy
14 Nov 2016 - 1:12 pm | हृषीकेश पालोदकर
विरोध असो की समर्थन
रोगराया या जुन्याच
आज मुळासकट जाळू
नवी पहाट येण्यास
(न जमल्यास वस्त्रहरण करू नये)
14 Nov 2016 - 1:58 pm | महासंग्राम
मी ना समर्थकांच्या देशात राहतो,
ना हि विरोधकांच्या देशात राहतो
मी फक्त
सामान्य माणूस असलेल्या भारत देशात राहतो.
14 Nov 2016 - 5:08 pm | नाखु
कधी कधी नाही तर भारत नेहमीच माझा(ही) देश आहे.
भारतीय नाखु.
14 Nov 2016 - 5:04 pm | कवि मानव
छान !!
15 Nov 2016 - 8:09 am | चाणक्य
नेमकं अगदी.
15 Nov 2016 - 9:11 am | पैसा
आपण सगळेच सामान्य लोक. भाषणं करून भांडणं लावणारे तिकडे एकत्र पार्ट्या करतात न तुम्ही लोक इथे एकमेकांच्या उरावर बसता समर्थक आणि विरोधक म्हणून एकामेकाना शिव्या देत.