गेल्या काही रात्री, मी झोपलोच नाही,
उजेड लोचनांचे, कधी संपलेच नाही,
हे देह फार क्षीणले, जाड पापण्या तरी ही,
ते....स्वप्न दिसले, जे पाहिलेच नाही !!१!!
त्या लक्ख प्रकाशात, गूढ अंधार होते,
कल्पनेचे ते महेर, बहुत दार होते,
दर्या, पर्वतांना ओलांडून पोचलो तर,
ते शब्द कानी पडले, जे ऐकलेच नाही !!२!!
ती पाहुनी पुण्यभूमी, मी जाहलो कृतार्थ,
सहवास दिग्गजांचा, सह शारदेची साथ,
कर जोडता तयांना, जी लागली समाधी,
असे काव्य सुचले, जे वाटेलच (लिहिलेच) नाही !!३!!
प्रतिक्रिया
14 Nov 2016 - 5:31 pm | कवि मानव
महेर = माहेर
14 Nov 2016 - 6:16 pm | चांदणे संदीप
सेल्फ चेकिंग काय परकार अस्तो का न्हाय?
"वाटेलच नाही"
चांगल्या चित्रावर शाई सांडली!
Sandy
14 Nov 2016 - 6:20 pm | कवि मानव
क्षमा असावी !!