कुशी
अलगद जेंव्हा तू वळतो कुशीवर
रात्र पण करवट घेते
अनावर होते झोप अन
डोळ्यात स्वप्न उतरते
स्वप्नात जेंव्हा तू उतरतो
पहाट अपुरी पडते
वियोगाच्या कल्पनेने
झोप माझी उडते
देईन साथ मी कल्पांतापर्यंत
देशील ना तू पण ?
विचाराने या मी
रोज कुशी बदलते
राजेंद्र देवी
प्रतिक्रिया
2 Nov 2016 - 3:20 pm | Bhagyashri sati...
व्वा खूप छान कविता
9 Nov 2016 - 9:30 pm | ज्योति अळवणी
काही ठिकाणी समेवर येणं नाही जमलं. पण कवितेच्या भावना छान आहेत