एक स्वप्न होत माझं...!

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जे न देखे रवी...
5 Nov 2016 - 4:43 pm

एक स्वप्न होत माझं
तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं
तुझ्यासाठी कोणत्याही परिस्थितिला
निडरपणे सामोरं जायचं
माझ्या सुखात तुला हसवायचं
अन् तुझ्या मी रडायचं
तुझ्या ओठांवरच्या एका हास्यासाठी
काहिहि करायचं
एक स्वप्न होत माझं
तुझं मन जिंकायच
एक स्वप्न होत माझं
तुझ्यासोबत तुझ्या घरात राहायचं
त्या घराला आपलं घर बनवायचं
आपल्या घराला सजवायचं
घरातल्या प्रत्येक गोष्टीसोबत
आपलं नात जपायचं
घर फुलाप्रमाणे फुलवायचं
फक्त एक स्वप्न होत माझं
तुझी अर्धांगिनी बनुन जगायचं...!

प्रेम कविताजीवनमान

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

7 Nov 2016 - 12:40 pm | मराठी कथालेखक

छान आहे कविता

अन् तुझ्या मी रडायचं

ही ओळ टंकताना चुकलीये का ?

हो ती ओळ अपुर्न राहिली आहे ती अशी आहे " अन् तुझ्या दुखात मी रडायचं"