(मित्रांनो शेवटचे ३ कडवे आधीच्या कवितेला जोडल्या आहेत)
माझ्या फाटक्या दारिद्र्याला
ठिगळ लावीत होतो,
ज्यांनी मज बहिष्क्रीत केले,
त्यांची थोरवी गाजवत होतो !!
त्यांनी माझ्या प्रेमाची
बहुत लावली बोली,
मी निस्सीम जगाचा प्रियकर,
फुकटच वाटत होतो !!
इथे प्रत्येकेचा हेतू,
प्रत्येकाला अहंकाराने डसले,
पांढऱ्या पेशींच्या जगता मध्ये,
तो रंग सोडवीत होतो !!
किती देऊ परीक्षा खरा असण्याची,
दर वेळी पराभूत होतो,
मी या अजब दुनियेचा विद्यार्थी,
कधी ना मोठा होतो !!
जेव्हा रुतला अवहेलनेचा काटा,
मी तेव्हा पोटभर रडलो,
कधी होतो फूल देवाऱ्यातला,
आता उककिरड्यावर पडलो होतो !!
मी केला फार पाठपुरावा,
माझ्या या सात्विकतेचा,
मग तेव्हा भान हे आले,
मी कौरवांच्या कडेनी होतो !!
देव दिले ही विद्या (कला) अंगी,
मी उगाच मिरवीत होतो,
मज वाटे स्वयें प्रकाशित झालो,
पण मी तर एक काजवा होतो !!
प्रतिक्रिया
3 Nov 2016 - 9:06 pm | Bhagyashri sati...
आधीची पण कविता छान होती ही पण छान वाटली।:)
3 Nov 2016 - 9:14 pm | कवि मानव
धन्यवाद !!