आयुष्य

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जे न देखे रवी...
2 Nov 2016 - 3:14 pm

पायाला लागली ठोकर तिथे बांधायचे घर
जिथे काहिच नाही तिथे आभाळ आहेच वर
जिवनाचे पुस्तक लिहिले मी स्वत:च्या चेहर्यावर
वाचता आले तर विश्वास ठेव वेदनांच्या त्या शब्दांवर
तूला कधीच ह्या मनाचा मजकूर समजला नाही
मी बंद लिफाफा आहे जो कुणी उघडलाच नाही
मी समजवण्याचा प्रयत्न केला पण तो कुणाला समजलाच नाही
मन माझे कुणाला कळलेच नाही, तळ हातावर पोट घेऊन
कष्टकरी बनवत फिरत होते, इवल्याशा पोटाची भुक
भागावी म्हणूनच तर रक्त जाळत होते...!

भावकवितामुक्त कविताकरुणजीवनमानरेखाटन

प्रतिक्रिया

कवि मानव's picture

2 Nov 2016 - 5:25 pm | कवि मानव

मस्त !!

Bhagyashri satish vasane's picture

3 Nov 2016 - 8:44 pm | Bhagyashri sati...

धन्यवाद

मराठी कथालेखक's picture

7 Nov 2016 - 12:51 pm | मराठी कथालेखक

प्रयत्न चांगला आहे पण शेवटच्या दोन ओळी नीट कळत नाहीत. म्हणजे मनावरुन एकदम पोटापर्यंत कशी काय गेली कविता ?

तळ हातावर पोट घेऊन
कष्टकरी बनवत फिरत होते, इवल्याशा पोटाची भुक
भागावी म्हणूनच तर रक्त जाळत होते...!

सच६४८६'s picture

9 Nov 2016 - 10:19 am | सच६४८६

छानच ...

ज्योति अळवणी's picture

9 Nov 2016 - 7:55 pm | ज्योति अळवणी

शेवटी थोडी गडबडली का? भावना नेमक्या कळल्या नाहीत