डॉ प्रकाश वेरेकर सेक्सॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी स्त्री-पुरुष संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असलेल्या पिडीएफमधे वाचता येतील. सदर पुस्तिकेत लैंगिक संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (प्युबिस रींग), इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे हा लेख त्यांच्या रिंगची जाहिरात नाही, पण उपाय नामी आहे हे नक्की.
तर मुद्दा असा की वरकरणी डॉ वेरेकरांचे विचार कितीही एकांगी वाटले आणि पारस्पारिक आदर आणि समानता यावरुन स्त्री-पुरुष संबंधात वाद दिसले तरी ते स्त्रीची अतृप्ती आणि पुरुषाचं असामर्थ्य या फंडामेंटल गोष्टीतून निर्माण होतात. याचा अर्थ स्त्रीला कामतृप्त करुन पुरुष पारस्पारिक आदर आणि समभाव यांना हरताळ फासू शकतो असा नाही. किंबहुना प्रणयतृप्त स्त्री आणि पुरुषात विनासायास अनुबंध निर्माण होतो. स्त्री दीर्घकाल आकर्षक दिसू आणि राहू शकते. आणि पुरुषाला अर्थ आणि मोक्ष हे पुरुषार्थ अचंबित होण्याइतपत साधता आले नाहीत तरी, काम हा पुरुषार्थ साधल्यानं तो समाधानी राहून सुखाचा संसार करु शकतो.
प्रतिक्रिया
1 Nov 2016 - 6:24 pm | अजया
पत्नी म्हणजे प्रयोगशाळेतले चंचुपात्र असते का संसारातले?
मी कसे वेगवेगळे प्रयोग करतो पत्नीवर हे ओपन फोरमवर न सांगता लेख असता तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानले असते.ज्या माणसाला आपण पत्नीची प्रतिष्ठा जपत नाहीये हे कळत नाही त्यांनी पत्नीला मिळणार्या कामतृप्तीची चर्चा करणे हा प्रचंड संभावितपणा आहे.खरंतर विकृतीकडे झुकणारा.
सौ संक्षींसाठी अतिशय वाईट वाटत आहे.
1 Nov 2016 - 6:27 pm | पैसा
त्यांच्यापर्यंत हे पोचत नसेलच का? समजा त्या मिपावर किंवा अनाहितामध्ये असल्या तर?
1 Nov 2016 - 6:32 pm | सूड
तर एव्हाना दिवाळी साजरी होऊन शिमगा देखील सुरु झाला असेल. =))
1 Nov 2016 - 7:02 pm | टवाळ कार्टा
समजा त्या मिपावर असल्याच आणि त्यांना काही वावगे वाटले नसल्यास?
1 Nov 2016 - 7:05 pm | पैसा
एवढ निरागस फक्त लग्न न झालेला शोनुच असू शकतो!
2 Nov 2016 - 7:47 am | टवाळ कार्टा
मग, आहेच मी निरागस
बाकी मिपाचे साचलेपण घालवायला आणि आपण प्रगल्भ आहोत हे दाखवायला "तसली खेळणी" या विषयावर धागा काढावा का?
2 Nov 2016 - 11:55 am | पैसा
तसली म्हणजे कसली?
- यत्ता दुश्ली ब निरागस.
1 Nov 2016 - 7:08 pm | अप्पा जोगळेकर
समजा त्या मिपावर असल्याच आणि त्यांना काही वावगे वाटले नसल्यास?
तर त्यांना अगदी योग्य जोडीदार मिळाला असे म्हणता येईल.
पण उद्या त्यांनासुद्धा त्यांचे वैयक्तिक अनुभव इथे न टंकण्याची बुद्धी झाली तर सदस्यांवर मेहेरबानी होईल.
जर त्यांनाही वावगे वाटत असेल तर वरच्या दया ,करुणा इत्यादी भावनांशी सहमत.
1 Nov 2016 - 7:29 pm | बोका-ए-आझम
तो त्यांना प्रत्यक्षात आलाय असं तुम्ही गृहीत का धरतात? जर हा सगळा लेखकाचा कल्पनाविलास असला तर? पुलंनी ' मी आणि माझा शत्रुपक्ष ' मध्ये लिहिल्याप्रमाणे - दाखवायला आणलेल्या पहिल्या चि.सौ.कां.च्या गळ्यात माळ घालणाऱ्या अनेक लेखकांनी प्रेमकथा आणि कादंबऱ्या नाही लिहिल्या?
1 Nov 2016 - 7:39 pm | पिलीयन रायडर
मला वाटतं आक्षेप रिंगने आलेल्या अनुभवांवर नसुन; "हा प्रतिसाद लिहीण्याच्या आधी जस्ट रिंग वापरुन आलोय" ह्या वाह्यातपणाला आहे..
तुमचा नाहीये का?
1 Nov 2016 - 7:49 pm | अजया
जेव्हा ते मी लेख लिहिण्याआधीच रिंग वापरून बघितली लिहितात तेव्हा ते भलेही कल्पना रंगवताना असले तरी पत्नीला पात्र म्हणून वापरत आहेत.आणि त्यात अशा प्रकारे एका स्त्रीचा उल्लेख होणे हा खटकणारा भाग आहे.यावर आक्षेप आहे.कोणत्या स्त्रीला तिच्या कामतृप्तीची चर्चा नवरा ओपन फोरमवर करतो हे वाचायला आवडेल? तिचा असा उल्लेख केला गेलाय याची तिला कल्पना नसताना?
1 Nov 2016 - 10:52 pm | श्रीगुरुजी
सहमत
2 Nov 2016 - 1:15 am | बोका-ए-आझम
मुळात स्वतःचे असे intimate अनुभव मांडणं - खरे किंवा काल्पनिक - आणि तेही ज्या व्यक्तीबरोबर तो अनुभव घेतलाय त्या व्यक्तीच्या भावनांचा विचार न करता - हे घृणास्पद आहे. पण कसं आहे की माणसाचं मन fantasize करु शकतं. तशी fantasy धागाकर्त्याने मनात कल्पिलेली असण्याचा एक benefit of doubt त्यांना देणं किंवा निदान तसा विचार करणं हे आपण करु शकतो. पैसाताईंनी मागे एकदा एका लेखाच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे - इथे आंतरजालावर लोक एकमेकांना प्रत्यक्ष पाहू शकत नसल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया या टोकाच्या असतात. तशा प्रतिक्रिया ते समोरासमोर भेटल्यावर देणार नाहीत. मीही धागाकर्त्याने असं का लिहिलंय यावर वैतागलो होतोच. पण ही एक शक्यता मी विचारात घेतली, एवढंच. (हुश्श!)
2 Nov 2016 - 1:21 am | संदीप डांगे
बोकेशा, हाईट आहे राव तुमची! इतका निरागसपणा...
2 Nov 2016 - 7:33 am | सतिश गावडे
सर्वसाधारणपणे हे बरोबर असले तरी यालाही अपवाद असतात.
माझ्या पलीकडे एक सोसायटी सोडून एक मिपाकर राहत असे. तो समोर आला की माझ्याशी जिभेवर साखर ठेऊन बोलत असे. मात्र मिपावर मी काही प्रतिसाद दिला रे दिला की हा त्यावर तुटून पडत असे. हातात भाकरी घेऊन लहान मूल अंगणात आले की कावळा जसा झडप घालतो तसा.
मात्र हा अपवादात्मक अनुभव झाला. बहुतांशी वेळा एखाद्या व्यक्तीशी प्रत्यक्ष भेट झाली की प्रतिसादात तुटून पडणे अवघड जाते; प्रोव्हायडेड दॅट तुमच्यातील मतभेद विकोपाला गेले नाहीत.
2 Nov 2016 - 7:41 am | टवाळ कार्टा
कोण हो ते मिपाकर?
2 Nov 2016 - 8:26 am | सतिश गावडे
जे तुमच्या मनात आहेत ते नाही. ते समोर राहतात. आणि ते लाखोलीच्या ऐवजी पुरणपोळी खाऊ घालतात.
2 Nov 2016 - 2:06 pm | मराठी कथालेखक
कदाचित त्यांचं लग्न झालंय हीच एक फॅन्टसी (त्यांची) असेल आणि प्रत्यक्षात ते अविवाहित असतील.
1 Nov 2016 - 10:57 pm | सूड
हे वाचून देखील तुम्हाला वाटतं की मिपाकर गृहीत धरत आहेत? आता कोणी काय आणि किती मोकळेपणाने सांगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण जी गोष्ट सांगतोय ती आपल्यापुरती मर्यादित नसून काही अंशी जोडीदाराशीही संबंधित आहे याचं भान असावं.
आणि आता सांगतच आहे तर मिपाकरांचा अज्ञानातून उद्धार करायला आपला अवतार झालाय असे आव आणू नयेत. मूळ मुद्द्यावर यावेत.
या अशा स्वभावावर मला एक मिपाच्याच एका कट्ट्यात ऐकलेला संवाद नेहमी आठवतो...तो येणेप्रमाणे (अर्थात पात्रांची नावं बदलून):
"सुमे तुला सांगते शेजारणीचा चकलीचा सोर्या पाहून मी माझ्या नवर्याकडे धोशाच लावला मलाही असाच सोर्या हवा. तात्पुरता म्हणून जावेच्या माहेरुन सोर्या घेऊन आले. माझ्या जावेचं माहेर म्हणजे ते अत्तर वाले केळकर आहेत कीनईऽऽऽ, ते!!"
वरील सगळ्या पाल्हाळात जसा सोर्या हा महत्वाचा नसून शेवटचं बडेजावाचं वाक्य अधोरेखित करायचं आहे, त्यातलाच एकूण प्रकार हा धागा आहे. असे लोक प्रचंड डोक्यात जातात.
1 Nov 2016 - 11:40 pm | संदीप डांगे
तंतोतंत!
1 Nov 2016 - 7:15 pm | गामा पैलवान
अप्पा जोगळेकर,
ती जिलबी वायली आन ह्यो वायली.
आ.न.,
-गा.पै.
1 Nov 2016 - 9:18 pm | आनंदी गोपाळ
१.
पुरुषाला तृप्त करू न शकणारी स्त्री असा काही प्रकार अस्तित्वात असतो का? की रतिक्रीडेत मनापासून सहभागी न होणारी स्त्री हा प्रकार इथल्या कुणाला सापडलेलाच नाहिये? आपल्याकडलेच नव्हे, तर जगभरातले 'संस्कार' हे स्त्रीची कामेच्छा मारून कशी टाकता येईल, यावरच जास्त भर देणारे आहेत.
२.
स्तंभन, उर्फ तुमचा घासाघीस करण्याचा स्टॅमिना वाढवणे हा पुरुषार्थ कधीपासून झाला?
नॅचरलीच स्त्रीला उद्दिपीत व्हायला अधिक कालावधी लागतो. पूर्ण उद्दिपनानंतर, मानसिक रिप्रेशन नसेल, तर स्त्री व पुरुष दोघांचाही अॅक्चुअल कॉयटस टाईम सारखा आहे.
रिंगेसारख्या सेक्स-एड्स (संभोगासाठीच्या मदतीची साधने) या लैंगिक आजारांसाठी, योग्य तपासण्या झाल्यानंतर वापरावयाच्या बाबी आहेत. 'नॉर्मल' वापरासाठी अजिबात नाहीत.
शेवटी,
या जगात खरे लैंगिक शिक्षण अतीव गरजेचे आहे...
1 Nov 2016 - 9:28 pm | पिलीयन रायडर
चपखल!
1 Nov 2016 - 11:42 pm | संदीप डांगे
सहमत!
2 Nov 2016 - 12:38 am | संजय क्षीरसागर
पुरुषाला तृप्त करू न शकणारी स्त्री असा काही प्रकार अस्तित्वात असतो का? की रतिक्रीडेत मनापासून सहभागी न होणारी स्त्री हा प्रकार इथल्या कुणाला सापडलेलाच नाहिये? आपल्याकडलेच नव्हे, तर जगभरातले 'संस्कार' हे स्त्रीची कामेच्छा मारून कशी टाकता येईल, यावरच जास्त भर देणारे आहेत.
पुरुषाची कामतृप्ती इजॅक्युलेशनवर अवलंबून आहे पण स्त्रीच्याबाबतीत ती बरीच काँम्प्लेक्स आहे. माझ्या मते प्रिती हा अत्यंत फंडामेंटल सायकॉलॉजिकल फॅक्टर, टाईम लॅग हा शारीरिक फॅक्टर, स्त्रीच्या चित्ताची निर्वेधता आणि अपराधभावाचा आभाव (गिल्ट फ्री स्टेट ऑफ माइंड) या सर्वांच्या एकत्रित परिणामातून स्त्रीच्या कामतृप्तीची संभावना निर्माण होते.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जगभरातले 'संस्कार' हे स्त्रीची कामेच्छा मारून कशी टाकता येईल, यावरच जास्त भर देणारे आहेत . त्यामुळे स्त्रीची कामेच्छा गिल्ट फ्री माइंडवर अवलंबून असावी.
युगुलातला पारस्पारिक अनुबंध आनंद घेण्यापेक्षा `देण्याची' भावना निर्माण करतो. त्यामुळे माझ्या अनुभावनं संभोग हा `शेअरींग एक्स्पिरियंस' (सम-भोग) आहे.
पारस्पारिक प्रिती, निर्वेध चित्तदशाआणि अपराधशून्य मनोदशा, कोणत्याही साधनाचा वापर न करता दोघांनाही एकाच वेळी कामतृप्त करतात. तरीही शारीरिक परिमाणावर पुरुषाचा स्तंभन काल काही वेळा कमी पडू शकतो त्यामुळे प्युबिस रिंगचा उपयोग होतो इतकाच लेखाचा विषय आहे.
स्तंभन, उर्फ तुमचा घासाघीस करण्याचा स्टॅमिना वाढवणे हा पुरुषार्थ कधीपासून झाला?
अर्थ, काम आणि मोक्ष हे तीन पुरुषार्थ प्राचिन कालापासून मान्य आहेत. धर्म हा मोक्षाचा भाग आहे त्यामुळे तो वेगळा पुरुषार्थ नाही. माझ्या अनुभवानं अर्थ या पुरुषार्थाला कोणताही निर्वैयक्तिक निकष नाही. म्हणजे नक्की किती संपत्ती म्हणजे पुरुषार्थ याला मोजमाप नाही. तद्वत मोक्ष हे अध्यात्मिक परिमाण आहे आणि जवळपास दुर्लभ आहे त्यामुळे तो ही पुरुषार्थ कितपत साधेल हे साशंक आहे. काम हा पुरुषार्थ मात्र स्त्रीला कामतृप्त करणे, खरं तर दोघांनी एकाच वेळी कामतृप्त होणे यात आहे. त्याचं मोजमाप हे सखीच्या कमालीच्या शांत झालेल्या चेहेर्यावरचा आनंद, तिच्या देहात निर्माण झालेली उब, संपूर्ण शरीरात आलेलं रिलॅक्सेशन आणि श्वासाची शांत झालेली लय आहे. त्यामुळे प्रतिसादातली ग्राम्य कल्पना आणि अपेक्षित पुरुषार्थ यात फरक आहे.
नॅचरलीच स्त्रीला उद्दिपीत व्हायला अधिक कालावधी लागतो. पूर्ण उद्दिपनानंतर, मानसिक रिप्रेशन नसेल, तर स्त्री व पुरुष दोघांचाही अॅक्चुअल कॉयटस टाईम सारखा आहे.
स्त्रीच्या पूर्ण उद्दिपनात रिप्रेशनच्या आभावाखेरिज समर्पणभावाचा फार मोठा हात आहे आणि त्यासाठी पारस्पारिक अनुबंध आवश्यक आहे. शिवाय दोघांची चित्तदशा निर्वेध असल्याशिवाय समसमयावच्छेद शक्य होईलसे वाटत नाही.
रिंगेसारख्या सेक्स-एड्स (संभोगासाठीच्या मदतीची साधने) या लैंगिक आजारांसाठी, योग्य तपासण्या झाल्यानंतर वापरावयाच्या बाबी आहेत. 'नॉर्मल' वापरासाठी अजिबात नाहीत.
प्युबिस रिंग नॉर्मल पुरुषानं वापरु नये याच्याशी मी सहमत नाही. ती सर्रास वापरण्याची गरज नाही पण इट इज जस्ट अ जॉय डिवाइस. सदस्यांनी प्रतिसादातून केवळ वाचलेल्या माहितीवरुन निर्माण केलेला धसका निराधार आहे.
या जगात खरे लैंगिक शिक्षण अतीव गरजेचे आहे...
लेखावरच्या एकूण प्रतिसादांवरुन माझं ही असंच मत झालंय.
2 Nov 2016 - 1:47 am | चित्रगुप्त
'काम' या संकल्पनेचा अतिशय संकुचित, विपर्यस्त अर्थ.
धर्म म्हणजे सर्वसाधारणपणे मानवी जीवनातील नानाविध प्रकारची कर्तव्यकर्मे, अर्थ म्हणजे जीवनयापनासाठी करण्याची कर्मे, तर 'काम' म्हणजे मनुष्याच्या 'मनोकामना' आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मे. अर्थात 'काम' हे अगदी तान्ह्या बाळापासून मरणसन्न अवस्थेत असलेल्या कोणत्याही वयाच्या प्रत्येक स्त्री, पुरुष आणि तृतीय पंथी व्यक्तीच्या ठायी क्षणोक्षणी उत्पन्न होणार्या इच्छांना दिलेले सर्वसमावेशक नाव होय.
या तिन्हीत अडकून पडलेली व्यक्ती म्हणजे 'बद्ध'... पुढे यातून मुक्त होण्याची आस निर्माण झाली की ती अवस्था म्हणजे 'मुमुक्षु' ... मग त्यातून मुक्त होण्यासाठी प्रयास करणारा तो (किंवा ती) म्हणजे 'साधक' आणि अंतिमतः ती मुक्ती वा मोक्ष प्राप्त होणारी व्यक्ती म्हणजे 'सिद्ध' अशी संपूर्ण मानव जीवन व्यापणारी विराट व्यवस्था आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली आहे, त्याचा एक अगदी छोटासा अंश म्हणजे रतिक्रिया या शब्दातून ध्वनित होणारा 'काम'. चार 'पुरुषार्थ' फक्त 'नर' - पुरुष याचेसाठी नसून प्रत्येक मनुष्यप्राण्याच्या जीवनाची एक विचारपूर्वक केलेली मांडणी आहे.
2 Nov 2016 - 6:38 pm | संजय क्षीरसागर
'काम' म्हणजे मनुष्याच्या 'मनोकामना' आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मे.
यात पुरुषार्थ कसा जोखणर ?
अर्थात 'काम' हे अगदी तान्ह्या बाळापासून मरणसन्न अवस्थेत असलेल्या कोणत्याही वयाच्या प्रत्येक स्त्री, पुरुष आणि तृतीय पंथी व्यक्तीच्या ठायी क्षणोक्षणी उत्पन्न होणार्या इच्छांना दिलेले सर्वसमावेशक नाव होय.
नवजात अर्भकानं, तृतीय पंथीयानं किंवा मरणासन्न व्यक्तीनं काय पुरुषार्थ साधावा अशी अपेक्षा असेल ?
चार 'पुरुषार्थ' फक्त 'नर' - पुरुष याचेसाठी नसून प्रत्येक मनुष्यप्राण्याच्या जीवनाची एक विचारपूर्वक केलेली मांडणी आहे.
स्त्रीच्या बाजूनं विचार केल्यास `चार पुरुषार्थांचं' मापन कसं करणार?
शिवाय पूर्ण प्रतिसादात `अर्थाचा' उल्लेख नाही.
2 Nov 2016 - 6:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रतिसादातच हे सर्व आले आहे की !
अर्थ म्हणजे जीवनयापनासाठी करण्याची कर्मे,
हे आहेच वरच्या प्रतिसादात. गरज नाही पण तरीही याचा अजून इक्साटून अर्थ सांगायचा तर "जीवन सुखात जावे यासाठी मिळविण्याची साधनसंपत्ती" असे म्हणता येईल.
तर 'काम' म्हणजे मनुष्याच्या 'मनोकामना' आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मे. अर्थात 'काम' हे अगदी तान्ह्या बाळापासून मरणसन्न अवस्थेत असलेल्या कोणत्याही वयाच्या प्रत्येक स्त्री, पुरुष आणि तृतीय पंथी व्यक्तीच्या ठायी क्षणोक्षणी उत्पन्न होणार्या इच्छांना दिलेले सर्वसमावेशक नाव होय.
ह्यात अजून काय इस्काटून सांगणार ??
***************
"पुरुषार्थ" या विशाल अर्थाच्या शब्दाचा अर्थ केवळ शय्यागृहापुरता संकुचित ठेवणारे "विचारी" लोक आहेत हे आश्चर्यकारक आहे ! शब्दभांडाराच्या अर्थाचे प्रत्येकाने आपल्या मनाने पुनर्लेखन करणे भाषेसाठी योग्य होणार नाही असे वाटते.
बाकी चालू द्या.
2 Nov 2016 - 7:28 pm | अजया
+१००००००
अगदी तीव्र सहमत!
2 Nov 2016 - 11:14 pm | संजय क्षीरसागर
तस्मात, देहाची सार्थकताच कामसक्षम असण्यात आहे. जो देह कामदुर्बल झाला तो वृद्धत्वाकडे झुकू लागतो. याचा अर्थ व्यक्तीनं कामुक असावं असा नाही पण प्रणयसक्षम असणं हिताचं आहे मग तो देह स्त्री असो वा पुरुष.
"पुरुषार्थ" या विशाल अर्थाच्या शब्दाचा अर्थ केवळ शय्यागृहापुरता संकुचित ठेवणारे "विचारी" लोक आहेत हे आश्चर्यकारक आहे !
इतर पुरुषार्थांचा उल्लेख लेखात आणि प्रतिसादात आहे त्यामुळे पुरुषार्थ केवळ कामापुरताच मर्यादित आहे असा कुठेही दावा नाही. तरीही कामाचा अर्थ `मनुष्याच्या 'मनोकामना' आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मे'. असा काढला तर त्यात पुरुषार्थ तो काय ? नक्की कोणत्या मनोकामनांची पूर्ती झाली की पुरुषार्थ साधला असे म्हणता येईल? आणि हे मानदंड कसेही प्रस्थापित केले तरी ते व्यक्तीपरत्वे बदलतील.
शिवाय पुरुषार्थ हा लेखात आलेला अनुषंगिक भाग आहे. पारस्पारिक कामतृप्तीनं एकमेकात अनुबंध निर्माण होतो, तारुण्य दीर्घकाल टिकू शकतं आणि संसार सुखाचा होतो इतका साधा विषय आहे.
चर्चेत विषयांतर नको म्हणून उद्देश अधोरेखित करणारा सातीजींचा एकमेव समंजस प्रतिसाद पुन्हा उधृत करतो :
सेक्श्युअल कंपॅटीबिलिटी आणि सटायटी (अर्थातच दोघांचीही) जोडप्यातले विसंवाद बरेच कमी करते आणि इतर बरेच प्रश्नही शांतपणे हाताळले जातात असा निष्कर्ष बर्याच मनोविकारतज्ज्ञांच्या अभ्यासातून दिसतो.
2 Nov 2016 - 11:33 pm | संजय क्षीरसागर
पुरुषार्थ चार है - (1) धर्म (religion 0r righteouseness), (2) अर्थ (wealth) (3) काम (Work, desire and Sex) और (4) मोक्ष (salvation or or liberation)।
2 Nov 2016 - 11:44 pm | अभिजीत अवलिया
जी गोष्ट आपण आपल्या जीवनभराच्या सोबत्यासोबत चार भिंतींच्या आत करतो ती सार्वजनिक संस्थळावर 'कशी करतो' हे जगजाहीर करणे हा पण एक 'पुरुषार्थ' असेल.
2 Nov 2016 - 7:42 pm | सूड
तुम्हाला सगळं बाल की खाल काढून सांगावं लागतं म्हणून.
जर मी चुकत नसेन तर 'काम' हे नाम संस्कृत 'कम्' (थांबा इतक्यात कान टवकारुन डोळे विस्फारु नका) या धातुपासून आहे. याचा अर्थ 'इच्छा बाळगणे' असा होतो. इच्छा मग ती कोणत्याही गोष्टीची असू शकते. आता जर तुम्ही लहान मुलाशी याचा काय संबंध म्हणाल तर आठवा ते दिवस, जेव्हा मुलं दुसर्याच्या हातातल्या चॉकलेट आदि गोष्टींकडे टकामका बघत असतात. अर्थात ते हवं आहे अशी त्यांची इच्छा असते. तर जे जे आपल्याला हवं असतं, त्याचा तुम्हाला अभिप्रेत असलेला हा रिंगवाला काम एक छोटासा भाग आहे. तुम्ही मात्र सगळं उचलून बेडरुमशी कनेक्ट करत आहात.
याहून काही समजावता येईल असं वाटत नाही. त्यामुळे समजलं तर ठीक नाहीतर रिंगा रिंगा चालू देत.
2 Nov 2016 - 8:05 pm | पिलीयन रायडर
संक्षींना इथे काहीही बोलणे म्हणजे त्यांना "टारगेट" करणे आहे असा काही लोकांचा समज आहे. पण तुम्ही ३-४ जणांनी वर कितीही मुद्देसुदपणे "काम" ह्या संकल्पनेचा अर्थ सांगितला तरी संक्षी तो मान्य करणार नाहीत अशी माझी अटकळ आहे.
आपली बेसिक कन्सेप्ट्च टोटली गंडली आहे हे संक्षी कधीच मान्य करत नाहीत हे मात्र काही लोक सोयीस्कररित्या विसरतील.
संक्षीच्या लिखाणाचा टोन बदललाय हे मी सुद्धा मान्य करते. पुर्वीसारखी समोरच्याची अक्कल आता ते काढताना दिसत नाहीत. अजुनही काही खटकणार्या बाबी आहेतच पण बदल झालाय हे मान्य आहे.
पण जर त्यांनी "काम" ह्या संकल्पनेची आपली व्याख्या चुकली आहे आणि ही चर्चा करताना वैयक्तिक बाबी इथे आणायची गरज नव्हती हे मान्य केलं, तर मात्र तो माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का असेल.
2 Nov 2016 - 8:31 pm | चित्रगुप्त
पूर्वी शास्त्रार्थाचे वेळी अथवा नवीन ग्रंथ लिहीताना आपल्या विधानाला कोणकोणत्या शास्त्रांचा आधार आहे, हे सप्रमाण सांगावे लागायचे त्याची आठवण झाली हे वाचून. ओशोंच्याच साहित्यात सापडेल सर्व. शोधले तर सापडेल.
2 Nov 2016 - 8:26 pm | चित्रगुप्त
एक ऐरागैरा, बाजारबुणगा मिपाकर म्हणून लई म्हंजे लईच मज्जा आली हे वाचून.
2 Nov 2016 - 8:03 am | बोका-ए-आझम
त्यांच्यात ही सुधारणा कौतुकास्पद आहे!
2 Nov 2016 - 9:30 am | गणामास्तर
चौफेर टोलेबाजी लावलीय राव तुम्ही तर =))
2 Nov 2016 - 1:51 pm | आनंदी गोपाळ
इथे प्रतिसाद टंकणार्या काहींत सुधारणा होइल अशी अपेक्षाही नसल्याने मी नेहेमीच आनंदी असतो.
बादवे,
ही असली सर्फिटिक्टं वाटायचा परवाना कुटं व केवड्यात मिल्तो मिपावर?
1 Nov 2016 - 9:42 pm | नमकिन
आहे,
रिंग सोडा व स्किन धारण करा.
बघा मग सांगाल की " पहले क्यों नहीं बताया "
स्वानुभव आहे तर तो जाहीर केला तर इतरांनी स्वतःच्या भावना नियंत्रित करण्यात येणारे अपयश व अपराधाचे रूपांतर करूणेत केले यावरुन आपल्या संकुचित मनाचे प्रदर्शन झालेय. जाओ पहले उस आदमी का साइन लेके आओ टाईप.
टीप- तथाकथित संशोधन न वाचता दिलेला प्रतिसाद. मुद्दामच, प्रसारकाला वकील बनवण्याचा हा राजरोस प्रकार.
1 Nov 2016 - 10:22 pm | माम्लेदारचा पन्खा
हे जे डॉक्टर आहेत त्यांना तर जन्मठेपच व्हायला हवी....
मुलगाच होण्याचे उपाय ?? मूर्खपणा आहे सगळा...रस्त्याशेजारचा तंबूतला युनानी हकीम आपली जाहिरात करतोय असं वाटतंय !
1 Nov 2016 - 10:32 pm | पिलीयन रायडर
इथे दोन-तीनद उल्लेख आला म्हणुन जाऊ पाहिली ती पीडीएफ परत. खरंच त्यात चक्क हेच लिहीलय की "मुलगाच होण्यासाठी रिंग सहाय्य करते.."
ह्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते ना?
अजुन एक म्हणजे, इथे तर किंमत १०००/- सांगितली आहे. शिवाय फोन करुन माझ्याशीच बोला असंही लिहीलंय. =))
1 Nov 2016 - 10:49 pm | माम्लेदारचा पन्खा
तिथल्या दिलेल्या पत्त्याची खात्री करायला हवी आणि असे प्रकार जर तिथे चालत असतील तर कायदेशीर पध्दतीने गुन्हा दाखल करता येईल.
1 Nov 2016 - 10:57 pm | आदूबाळ
हो ना! पण सरांना ९०% डिस्काऊंट मिळालेला दिसतोय.
2 Nov 2016 - 1:02 am | संजय क्षीरसागर
टाईम लॅग आणि प्युबिस रिंगचा उपयोग इतकंच मर्यादित होतं. वेरेकरांच्या जेंडर प्रेफरन्साचा पहिल्या पानावर निषेध केला आहे आणि रिंग इतरत्र उपलब्ध आहे असं लेखातच लिहीलंय. वेरेकरांवर जेंडर प्रेफरंशियल ट्रिटमंटबद्दल दावा दाखल करायचा का लेखातल्या मुद्यावर चर्चा करायची हे ज्याचं त्यानं ठरवावं.
2 Nov 2016 - 7:39 am | स्रुजा
बाकीची सगळी बडबड राहु द्या . तुमच्या बायकोने तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवुन चार भिंतीच्या आत तुम्हाला साथ दिली आणि त्याचे तुम्ही चार चौघात प्रदर्शन मांडले आहे त्याबद्दल आधी माफी मागा त्यांची. अत्यंत अपमानास्पद आहे हे त्यांच्यासाठी.
2 Nov 2016 - 2:34 pm | श्रीगुरुजी
आपण काही चुकीचं केलंय किंवा दोन व्यक्तींमधील अशा पूर्णतः यक्तिगत गोष्टी चव्हाट्यावर मांडून औचित्यभंग केलाय हेच त्यांना मान्य नाही. त्यामुळे अजूनही त्यांचे नवीन प्रतिसाद सुरूच आहेत. माफी वगैरे तर फार लांबची गोष्ट झाली.
2 Nov 2016 - 7:00 pm | स्रुजा
हो ना !! अवघड आहे..
2 Nov 2016 - 7:44 am | आदूबाळ
सर, पण तुम्ही निषेध करून वेरेकर exonerate होत नाहीत ना.
2 Nov 2016 - 10:32 am | संजय क्षीरसागर
त्यामुळे लेखाचा विषय वेरेकररहित आणि एकदम सरळ झाला आहे.
2 Nov 2016 - 7:03 pm | स्रुजा
वेरेकर राहू देत. तुमच्या नको इतक्या तपशीलांबद्दल कधी बोलताय? तुम्ही औचित्यभंग तर केलाच आहे , पण हे तुमच्या बायकोने कधी वाचलं तर त्यांना ह्युमिलिएटिंग वाटेल असं कधी चुकुन देखील वाटलं नाही का ? ते काय अद्वैत का काय असतं तुमच्या मते नवरा बायकोत त्यात एकमेकांची खाजगी स्पेस जपणे, आदर करणे एवढ्या साध्या गोष्टी येत नाहीत का?
2 Nov 2016 - 3:49 am | चित्रगुप्त
"पुरुषाचे खरे पुरुषत्व हे मादीला पूर्ण शरीर सुख देवून तिच्या लैंगिक इच्छेचे संपूर्ण शमन करण्यात आहे. मग ती त्याची पत्नी असो, मैत्रीण असो, अकस्मात प्रेमिका असो किंवा पैश्याच्या मोबदल्यात शरीर देणारी वेश्या असो...." (पृ.२)
"प्युबिस रिंग ही भारतात कुठेही उपलब्ध नाही. डॉ. वेरेकर यांचेकडेच ती मिळते."..... (पृ.१४)
" या प्युबिस रिंगची किंमत सध्या रु. १०००/- फक्त आहे. या रिंग किंमतीत दर सहा महिन्यात वाढ होत जाते..."
"ज्यांना फक्त मुलीच होतात मुलगा होत नाही ...... प्युबिस रिंगच्या उपयोगाने मुलगाच होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते...."
"नव्या स्त्री पार्टनरला इंप्रेस करण्यासाठी -- जीवनात संधी मिळाल्यास, नवी स्त्री जीवनात आल्यास ......... आजच पैसे पाठवून मागवून घ्या आणि नेहमी जवळ ठेवा. अशी संधी कधी येईल ते सांगता येत नाही. जेंव्हा संधी येईल तेंव्हा 'दैव देते आणि कर्म नेते' अशी अवस्था व्हायला नको...." (पृ. १६)
1 Nov 2016 - 10:37 pm | श्रीगुरुजी
स्वतःचे व आपल्या पत्नीचे संपूर्णत: खाजगी व चार भिंतीच्या आत असलेले वैयक्तिक असलेले अनुभव सार्वजनिक करणे हे अनुचित आहे हे मी आधीच लिहिले होते. परंतु काही जणांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रगल्भता असे मुद्दे काढून लेखाला विरोध केला नाही.
1 Nov 2016 - 10:51 pm | श्रीगुरुजी
खालील बातमीचे शीर्षक वाचल्यावर धक्काच बसला.
Spy ring: 16 more Pakistan high commission officials are involved!
http://m.rediff.com/news/report/spy-ring-16-more-pakistan-high-commissio...
2 Nov 2016 - 7:50 am | संदीप डांगे
संक्षी,खरंच? खरंच तुम्हाला रिंग च्या उपयुक्ततेबद्दल हा धागा काढायचा होता? तुमचे प्रतिसाद नीट वाचले तर असं दुरान्वयेही वाटत नाहीये.
बाकी, ते डॉक्टर नाशकातलेच आहेत, भेटून येतो आता जरा त्यांना...
लेख असू देत पण संपादक मंडळाने किमान ती पीडीएफ लिंक नाहीशी करायला हवी होती, विनासायास मिपाचा प्लॅटफॉर्म वाह्यात अशा फुकट जाहिरातीसाठी वापरला जातोय.
2 Nov 2016 - 7:59 am | बोका-ए-आझम
रच्याकने एखादी गोष्ट बेकायदेशीर असेल तर तिचा प्रचार आणि प्रसार हाही बेकायदेशीर असतो, बरोबर? उद्या इथे कोणीतरी गांजाबद्दल लिहील. काय करावे ब्रे अशावेळी?
2 Nov 2016 - 11:07 am | संजय क्षीरसागर
त्यामुळे वेरेकरांचा आणि लेखाचा संबंध टाईम लॅग आणि प्युबिस रिंग पुरताच मर्यादित राहिला आहे.
2 Nov 2016 - 8:12 am | सौन्दर्य
ह्या विषयावर खूपच चर्वण झाले आहे, त्यामुळे आता पुढचे प्रतिसाद वाचायचा देखील कंटाळा येऊ लागलाय.
2 Nov 2016 - 9:48 am | गणामास्तर
धागा, पीडीएफ आणि सगळी चर्चा वाचली.
पीडीएफ वाला डॉक्टर 'पुत्रजीवक बीज' आणि 'वैद्य रंजन' वगैरे छाप यझ माणूस वाटला.
धागाकर्ते अनुभवांनी बोलत असल्याने त्यावर आपला पास ;)
काही सदस्यांना हे विषय हाताळायला मिपा प्रगल्भ न वाटण्याची कारणे बघून तेचं अजून प्रगल्भ नाहीत असे वाटून गेले.
2 Nov 2016 - 1:01 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
संक्षी,अजया व इतर महीला सदस्या जे म्हणाल्या तेच म्हणतो.स्वतःच्या पत्नीला तुम्ही इथे ऑब्जेक्टीफाय करत आहात असे वाटले.लेख प्रथमपुरुषी एकवचनी ऐवजी द्वीतीयपुरुषी अनेकवचनी असता तर आक्षेप घ्यायचे काही कारण न्हवते.
2 Nov 2016 - 2:36 pm | संदीप डांगे
द्वीतीयपुरुषी अनेकवचनी असता तरी स्वतःच्या काय किंवा दुसऱ्याच्या काय कोणाच्याही पत्नीला ऑब्जेक्टिफाय केले जाणारच!
2 Nov 2016 - 2:45 pm | सूड
माझं मत असं आहे की आपण कसा लोकांचा उद्धार करण्यासाठी अवतरलो आहेत असे भाव आणून नयेत. बडेजाव करायचाच आहे तर सरळ मुद्द्यावर यावे, उगाच वेड घेऊन पेडगावला जाऊ नये. सिम्पल!!
तसेही कोणी आरती ओवाळली नाही तर तबकासमोर आपलं श्रीमुख ओवाळून घेणारी मंडळी कमी नाहीत.
2 Nov 2016 - 2:57 pm | पोप
संक्शी आप वापस क्यों आये ?और आये तो पुरानी शराब नये बोतल में क्यों लाये?
2 Nov 2016 - 3:05 pm | पोप
संक्शी आप वापस क्यों आये ? और आये तो पुरानी शराब नये बोतल मे क्यों लाये?
2 Nov 2016 - 11:46 pm | बॅटमॅन
तो वेरेकर एक येडा अन हा संक्षी दहा येडा. त्या दोघांनाही एंटरटेन करणारे मिपाकर शंभर येडे आहेत असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.
(येडा) बॅटमॅन.
2 Nov 2016 - 11:48 pm | पिलीयन रायडर
त्यांना कोण एंटरटेन करतंय..? इथं लोक स्वतःला एंटरटेन करत बसलेत ना भाऊ! वेळ कसा घालवायचा एवढा!!
3 Nov 2016 - 3:36 am | चित्रगुप्त
छ्या... टंकाळा आला बुवा आता स्वतःला एंटरटेनवून घेण्याचा. तिकडे सरजी पण आता 'कामा'त गुंतलेत. (म्हणजे 'काम' म्हणजे नेमके काय, 'पुरुषार्थ' कशास म्हणावे वगैरे विकि-शोधात, ओशोंचं कोणतं वाक्य कोट करता येईल ते हुडकण्यात.. वगैरे) त्यामुळे काहीकाळ मिपासंन्यास घ्यावा आता.
पीडीयफ वाचून, रिंग मागवून त्यानंतर होणार्या पोरा-पोरींची नावं कळायला अजून टैम लागेल.... रिंग्नेश, रिंगेंद्र, रिंगप्पा, रिंगकुमार, रिंगपाल, रिंगसिंह, रिंगेबिहारी, रिंगेंदर सिंग, रिंगेंदर कौर, रिंगबाला, रिंगरिका, अशी असणार कायतरी (मुलगे ज्यास्त होणार म्हणून मुलग्यांची नावे ज्यास्त).
.... आता "पीडीयफ हटी, पब्लिक छटी" असं होणार. चालायचंच.
1 Feb 2018 - 10:06 pm | चित्रगुप्त
असले भारी धागे अधून मधून वरती यायला हवेत .
29 Mar 2020 - 1:54 am | सुबोध खरे
अगदी बरोबर
29 Mar 2020 - 3:52 am | कंजूस
धागे अधून मधून वरती आणण्यापेक्षा -
ट्याक्सविषयीचे धागे
जीएसटी - २०१९-०७-०१,
जीएसटी - २०२०-०१-०१,
जीएसटी - २०२०-०७-०१,
असे पुन्हा नवीन काढणे गरजेचे आहे. त्यात मागचा आढावा आणि आगामी बदलाचे परिणाम चर्चेला घेता येईल.
((बजेट येऊन नंतर कायमचे बदल होतात. कधी मध्येच नवीन बदल होतात.)) नवीन धाग्यात जुन्या धाग्याची लिंक असावी.
4 Jun 2020 - 4:33 am | श्रिपाद पणशिकर
उपरोल्लेखीत रींग ह्या चाईना तुन आयात होतात का?
आर्डर करावयाची असल्यास कशी करावि ?
4 Jun 2020 - 9:39 am | संजय क्षीरसागर
पाठवला आहे.