खरे तर हे साहित्य "पाककृती' या कलमाखालीच प्रसिद्ध व्हायला हवे होते. परंतु, हा प्रकार खाण्या-खिलवण्यापेक्षा अनुभवण्याचा जास्त आहे, असे सांगण्यात आल्याने, पाककृतीच्या गटातून त्याचे हात कलम करण्यात आले. त्यामुळे ते या गटात प्रसिद्ध करीत आहोत.
- लेखक.
(वरील मताशी मॉडरेटर सहमत नसतीलच, असे नाही.)
----------
मित्रहो,
आपण अनेक पदार्थ खातो, पाहतो, अनुभवतो. त्यांची रेसिपीही माहिती करून घेतो. काही घरी बनवायला जमतात, काही जमत नाहीत. मग ते आपण आयते मिळवून खातो.पण इच्छा नसतानाही काही पदार्थांची चव चाखावी लागते. अशाच काही अनोख्या पदार्थांची माहिती देण्याचा हा अल्पसा प्रयत्न...
सध्या भाग पहिला ः पचका वडा
आपण मोठ्या उत्साहानं काही करायला जावं आणि तोंडघशी पडावं, असे अनुभव जागोजाग येत असतात. त्यातूनच हा रुचकर पदार्थ तयार होतो. हा पदार्थ आपण ज्या परिस्थितीत, किंबहुना, ज्या "स्थिती'त अनुभवू, त्यावर त्याची चव अवलंबून असते. उदा. समजा, एखाद्या तरुणानं तरुणीच्या हृदयापर्यंत आपल्या हृदयींचे गूज पोचवण्याचा घाट घातलाय आणि तिला कुठेतरी "बरिस्ता', "कॉफी डे' मध्ये बोलावलंय समजा. आणि ती बया त्याच्या भावना, प्रेम, एवढी वर्षं दिलेल्या गिफ्ट, गुलाब, तिची भरलेली बिलं, सगळं धाब्यावर बसवून "तुला तसल्या नजरेनं बघितलंच नाही रे राजा' असं सांगते किंवा "मी ऑलरेडी एंगेज आहे,' असा बॉंब त्याच्या तोंडावर फेकते, तेव्हा या घायाळ प्रेमवीराचा होतो, तो "पचका वडा.'
एखाद्याला "एप्रिल फूल' करायला जावं आणि त्यानं आपल्यालाच "मामा' बनवावं, असंही अनेकदा होतं. त्याला "आंबूस वडा'ही म्हणता येईल.पचक्याचा दणका जेवढा जास्त, तेवढी त्याची चव अस्सल. विशेषतः बरोबर कुणी असेल, तर त्याला केवळ दुसऱ्याचा वडा होत असताना चाखायला मिळणारी चव लाजवाब! तिला तोडच नाही.
टीप ः शक्यतो स्वतः एकदा करून घेतल्यानंतर दुसऱ्यालाही या पदार्थाची चव चाखायला द्यावी.
प्रतिक्रिया
30 Jan 2008 - 8:21 pm | मुक्तसुनीत
तुमचा विनोदी लेख आवडला. त्यावरचा "बाळकराम"चा प्रभाव स्पष्ट दिसतो.
31 Jan 2008 - 6:46 am | नंदा प्रधान
खरे तर हे साहित्य "पाककृती' या कलमाखालीच प्रसिद्ध व्हायला हवे होते. परंतु, हा प्रकार खाण्या-खिलवण्यापेक्षा अनुभवण्याचा जास्त आहे, असे सांगण्यात आल्याने, पाककृतीच्या गटातून त्याचे हात कलम करण्यात आले. त्यामुळे ते या गटात प्रसिद्ध करीत आहोत.
- लेखक.
(वरील मताशी मॉडरेटर सहमत नसतीलच, असे नाही.)
म्हणजे कय? मोडरेटर सहमत नाहीत म्हणुनच तुम्हाला इथे लिहायला लाग्ले ना? निट समजले नहि!
31 Jan 2008 - 6:48 am | नंदा प्रधान
मला आलेल्या एका इमेल मधे हे वचले होते. इमेल इथे दिलेले मोडरेटर्ना चालते का?
31 Jan 2008 - 3:47 pm | आपला अभिजित
मित्रा, गम्मत केली.
मी याच गटात हा लेख टाकला होता.
दुसर्या कोणत्याही नाही.
वो अपना इश्टाइल है...!