अटी शर्थी लागु!!
सुबक सुंदर मनोवेधक वाचताना जाहिरात
खालील तळटीप लक्ष वेधुन घेत असते
अटी शर्थी लागु!!
एखाद्या आकर्षक योजनेच्या सादरीकरणात
गुंतुन जत असताना आपण स्वप्ण रंजनात
सांगितले जाते.. नियम शर्थी लागु!!
सवलतींच्या दिलखेचक जाहिरातीत भुरळतो
आपण, अन शेवटी कळते आपल्याला अगदी
अटी शर्थी चार्जेस लागु!!
जन्माच्या जोडीदाराशी संसाराची स्वप्ण रंगवताना
हळूच कोणी अनुभवी जाणवून देते नकळत.. इथेही
नियम अटी असतातच लागु!!
असचं कहीस असतं की सगळ्याच नात्यात
सुबक सुंदर नात्यांच्या वेष्टणां खाली
अपेक्षांच्या अटी लागु!!
कित्येकदा तर घुसमटतांना या अपेक्षात वाटंत राहतं
एखादा तरी क्षण असावा, अटींच्या न अडकता जंजाळात
उमगतं अचानक शेवटी, अरे ही पण अपेक्षाच!
अटी शर्थी लागु!!
अटी शर्थी लागु!!
सुचेता सुळे
प्रतिक्रिया
9 Feb 2009 - 1:12 pm | परिकथेतील राजकुमार
माझ्यामते शर्थी हा शब्द अयोग्य असुन, योग्य शब्द शर्ती हा असतो.
जाणकार अधिक खुलासा करतीलच.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
9 Feb 2009 - 3:57 pm | दशानन
सहमत.
मी जाणकार आहे असे काही जण समजतात... पण मी नसावे :?
तरी देखील परा म्हणतो आहे ते बरोबर आहे...
शर्थी हा शब्द अयोग्य असुन, योग्य शब्द शर्ती हा आहे !
बाकी
तो शब्द योग्य देखील असावा व पराचा शब्द अयोग्य असावा असे पण होऊ शकेल
जाणकार ह्या वर उत्तर देतीलच ही अपेक्षा !
धन्यवाद.
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
9 Feb 2009 - 4:04 pm | अवलिया
जन्माच्या जोडीदाराशी संसाराची स्वप्ण रंगवताना
हळूच कोणी अनुभवी जाणवून देते नकळत.. इथेही
नियम अटी असतातच लागु!!
हे फारच छान त्यातलात्यात अंडरलाईन केलेले अंमळ छान :)
--अवलिया
9 Feb 2009 - 4:05 pm | दशानन
१००% सहमत.
अनुभव कुठे कामाला येइल सांगता येणार नाही हे नक्कीच :)
सुंदर भावार्थ !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
9 Feb 2009 - 4:09 pm | अवलिया
अनुभव कुठे कामाला येइल सांगता येणार नाही हे नक्कीच
फक्त अशा अनुभवांचे सर्टिफिकेट आपल्याकडे नसते ;)
--अवलिया