कातर वेळ

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
23 Oct 2016 - 11:01 am

कातर वेळी आभाळ भरुन
येणं फार वाईट असतं
----
संध्याकाळची ती वेळ
एकटाच खिडकीत उभा राहून
नुकत्याच अवतरलेल्या चंद्राकडे
पहात उभा होतो
कशी कोण जाणे पण
तुझी आठवण
त्या भरून आलेल्या
ढगांबरोबर वाहत आली
---
कातर वेळी आभाळ भरुन
येणं फार वाईट असतं
----
आभाळ इतकं भरलं
ढगांनी इतकी दाटीवाटी केली की
त्यांना आभाळ पुरेना
कोणता ढग कोणत्या ढगात
विलीन होतोय तेच कळेनास झालं
आणि मग गडगडाटाने सारा
आसमंत भरुन गेला
या सगळ्या गोंधळात
तो चंद्र दिसेनासा झाला
अन्
उगाच जीव कासाविस झाला
----
कातर वेळी आभाळ भरुन
येणं फार वाईट असतं
----
पाहता पाहता
त्या ढगांना ओझं असह्य होऊन
त्यांनी शरणागती पत्करली
जश्या समुद्राच्या लाटां वर लाटा
येतात
किनार्‍यावर
तश्या धारांवर धारा
बरसायला सुरवात झाली
आसुसलेल्या धरेवर
मला कळेचना की
असं थांबून थांबून
का बरसतोय आज पाऊस
मध्येच चंद्रही डोकावत होता
तो ही बहुतेक गोंधळला होता
बावरला होता
----
कातर वेळी आभाळ भरुन
येणं फार वाईट असतं
----
मग क्षणात पाऊस थांबला
थैमान शांत झालं
कोणीतरी वेदना शोषून घ्यावी
तसे ढगही नाहीसे झाले
आभाळं मोकळं झालं
चंद्र आपलं शितल तेज
पुन्हा ओतायला लागला
तेव्हा अचानक माझं लक्ष
खिडकीच्या काचेवरील माझ्याच
प्रतिबिंबाकडे गेले
माझेच डोळे मला रिकामे रिकामे
वाटायला लागले
त्या मोकळ्या झालेल्या आभाळासारखे
----
कातर वेळी आभाळ भरुन येणं
अन्
अश्या वेळी तुझी आठवण येणही
फार वाईट असतं

|- मिसळलेल्या काव्यप्रेमी -|
(२३/१०/२०१६)

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

ही कविता तितकीशी पोहोचली नाही. काहीशी कृत्रिम पावसासारखी वरवरच बरसून गेली. काही पाऊस नुसताच देह भिजवतात. आतून माणूस लख्ख कोरडाच राहतो. कवितांचंही तसंच असतं का?

शार्दुल_हातोळकर's picture

23 Oct 2016 - 12:33 pm | शार्दुल_हातोळकर

श्री.एस यांना कदाचित कवितेच्या वृत्तबद्धतेबद्दल किंवा गेयतेबाबत म्हणायचे असावे असे वाटते....
भारलेली कातरवेळ....

कातरवेळी कशामुळे गं
मी मला हरवुन जातो
आसवांच्या संगतीने
मी तुझ्या स्मृतींत न्हातो

चांदणे संदीप's picture

23 Oct 2016 - 1:09 pm | चांदणे संदीप

मुक्तछंद, रिस्की छंद!

Sandy

अत्रुप्त आत्मा's picture

23 Oct 2016 - 3:34 pm | अत्रुप्त आत्मा

एंडिंग नोट आवडली.

नाखु's picture

24 Oct 2016 - 9:19 am | नाखु

एका अजरामर लेखाची आठवण काढ्ली नेमके शीर्षकही तेच आहे.

नक्की काय गौडबंगाल आहे याचा शोध घेणे आले.

राजेंद्र देवी's picture

25 Oct 2016 - 2:18 pm | राजेंद्र देवी

अप्रतीम...आवडली..भरुन आलं...

अभ्या..'s picture

25 Oct 2016 - 2:42 pm | अभ्या..

अप्रतिम लिहिलय मिका.
आवडलं लेखन.

शब्दबम्बाळ's picture

25 Oct 2016 - 3:14 pm | शब्दबम्बाळ

कातरवेळी बसलो होतो आठवणींचा पिंजत कापूस... तशात पाऊस!
हि गुरु ठाकूर ची कविता आठवली... छान लिहिलीये आपणही...