कैलास लेणी आणि परिसर.........अनुभव-१

वैभव पवार's picture
वैभव पवार in जनातलं, मनातलं
19 Oct 2016 - 3:59 pm

आमच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सर, त्यांनी विद्यार्थ्यांकडे 'वेरूळ-लेणी' भेट देण्याबाबद कल्पना मांडली. मी स्वतः औरंगाबाद (संभाजीनगर) मध्ये राहत असून हि एकदाही 'वेरूळ-लेणी' बघण्यास कधी गेलेलो नव्हतो. जवळच घृष्णेश्वर आणि खुलताबाद(रत्नापूर) भद्रा मारोतीला शंभर वेळा जाऊन आलेलो आहे. पण 'कैलास लेणी', अजून नाही!
आमच्या हडको ब्रँचचे ५-६ विद्यार्थी तयार झाले. औरंगपुरा आणि सिडको ब्रँच मध्ये जास्त उत्साही कार्यकर्ते होते.
दिवस ठरला आम्ही ६ जणांनी दुचाकीवर जाण्याचे ठरवले. औरंगपुरा आणि सिडको ब्रँचवाले मिनी बस करून येणार होते. मी माझ्या मित्रांना म्हणालो ,"आपण हि मिनी बसने जाऊया". पण सोमा म्हणाला,"नको ! सरांसमोर सिगरेट 'मारता' येणार नाही, आपण बाईकवरच जाऊ".
सकाळी ७:०० वा. आम्ही तीन-बाईकवर सहा जण निघालो. वाटेत दौलताबाद (देवगिरी )ला थांबलो. चहा वगैरे घेतला. सिगारेट घेतली . आज सिगारेट ओढण्याची , मारण्याची पिण्याची माझी तिसरी वेळ. पण पहिला कश ओढल्यावर आजही काही किक-फिकं बसली नाही. मी वैतागून मित्रांना म्हणालो," काय यार तुम्ही पण? फुकट धुव्वा ओढतात, मला तर काही फरक पडत नाही कितीहि सिगारेट ओढली तरी."
श्री म्हणाला,"वैभव तू चुकीच्या पद्धतीने सिगारेट ओढतो"
बरोबर आहे! मी सिगारेट ओढते वेळी धुवा ओढायचो पण गळ्याच्या खाली जाऊ न देता बाहेरच्या बाहेर सोडायचो. मग श्री ने मला सिगारेट ओढायची पद्धत शिकवली. 'थोडा थोडा धुवा ओढायचा मग तो पोटात ओढायचा मग हळूहळू बाहेर सोडायचा. मग काय ! मी 'जादा रोमांच के खोज मे' जरा जास्तच धुवा ओढला. डोळे लाला_ डोळ्याला पाणी _ जबरदस्त खोकला_ आणि _थोडी चक्कर. चांगलीच फजिती झाली. असो .
देवगिरी किल्ला बऱ्याच वेळा बघितला असल्यामुळे आम्ही पुढे खुलताबादला निघालो.
खुल्ताबादला भद्रा मारोती देवस्थान आहे. पूर्वीच्या काळी खुल्ताबादला रत्नापूर म्हंटले जायचे, इथल्या राजाला आकाशातून काहीतरी उल्कासादृश्य प्रकाशमान वस्तू पडतांना दिसली. घटनास्थळी राजाने सैनिकांना पाठवले तर तिथे एक दगड पडला होता आणि तो झोपलेल्या हनुमानासारखा दिसत होता . मग नियमाप्रमाणे मारोती राजाच्या स्वप्नात आले. आणि राजाला सांगितलं कि मी रत्नापूरला आलेलो आहे. जे भक्त माझी मनोभावे भक्ती करतील त्यांच्या मनोकामना मी पूर्ण करेल आदी आदी आदी.
आज भद्रा मारोती खूप प्रसिद्ध आहे. लांब-लांबून भक्त मंडळी येतात. लोटांगण घालत , नाक घासत आदी आदी आदी पद्धतीने आपापले नवस पूर्ण करतात. आम्ही संभाजीनगरवासी सुद्धा हनुमान जयंतीच्या आधल्या रात्री पायी खुलताबादला जातो.
bhadra maroti
भद्रा मारोतीचे दर्शन वगैरे घेऊन, फोटो वगैरे काढून आम्ही वेरूळला निघालो. पुढच्या १०-१५ मिनिटात आम्ही घृष्णेश्वराच्या मंदिरात होतो. कारण सर आणि ग्रुप येईपर्यंत आम्ही घृष्णेश्वराचे दर्शन करून घेण्याचे ठरवले.
घृष्णेश्वर
एकदा महादेव देवी पर्वतीवर रुसून वेरूळला निघून आले. मग देवी पण महादेवाच्या माघे माघे आली. आणि दुसऱ्या रूपामध्ये महादेवा समोर आली. दोघांचे प्रेम जुळले. इथे त्यांनी भरपूर रोमान्स केला. महादेवीला तहान लागली. मग काय!! जमिनीवर आताच एका गाईच्या खुरांचे निशाण उमटलेले होते, त्या ठिकाणी महादेवाने असे का जोरात त्रिशूळ मारले कि, पाताळातली गंगा वरती आली.
इकडे एक आमुक आमुक राजा तमुक तमुक शापाने ग्रस्त होता. रोज रात्री त्याचं शरीरावर किडे-आळ्या पडायच्या. बिचारी राजाची राणी रोज रात्री त्या किडे-आळ्या साफ करायची. एकदा राजा शिकारीला इथे आला, जिथे शंकराने पाताळगंगा पृथ्वीवर बोलावली होती. खूप दमला, तेव्हा याठिकाणी पाणी वगैरे पिऊन हात-पाय-तोंड वगैरे धुतले. पण आज रात्री राणीने बघितलं कि राजाच्या तोंडावर, हातावर, पायावर किडे पडलेले नाहीये. मग सकाळी राणीने विचारपूस केली. राजाने एका चांगल्या पती प्रमाणे सर्व हकीकत राणीला सांगितली. त्या झाऱ्या विषयी सुद्धा. राणी चतुर होती, तिने ओळखले त्या पाण्यात काही तरी सत्व आहे. ती लगेच सैन्याच्या ताफ्यासह त्या ठिकाणी पोहोचली. तिने ठरवले कि या ठिकाणी तलाव बांधायचा. नियमाप्रमाणे आकाशवाणी झाली, आणि तलाव सूर्यास्ताच्या आत बांधून पूर्ण झाला पाहिजे असे सांगितले गेले. मग काय !!! राणी सुद्धा पतिव्रता होती. तिने सूर्याला सांगितलं कि," हे सूर्यनारायणा जो पर्यंत तलाव बांधून पूर्ण होत नाही तो पर्यंत अस्ताला जायचं नाही." तलाव बांधून झाला. राजा पापमुक्त झाला. आणि पुढे घृष्णेश्वर जोतिर्लिंग स्थापन झाले. असो
आमच्या सरांना फोने केला तर कळलं कि ते आणि ग्रुप देवगिरी किल्ला बघण्यास थांबले आहे. मग आम्ही जेवण वगैरे केलं. आणि कैलास लेणीमध्ये जाण्याचं ठरवलं.
लेणीच्या बाहेरील बाजूस दशावताराच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. नारायणाचा एक एक अवतार पाहून मन प्रसन्न झाले. माझ्या अभ्यासाप्रमाणे हि लेणी राष्ट्रकूटच्या काळात कोरली गेली आहे. फक्त कैलास लेणी कोरण्यासाठी २०० वर्षाचा कालावधी लागला.
मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही आत गेलो. "केव्हढे भव्य मंदिर!" ते हि दगडात कोरलेले. माझ्या मनाचा मोसम बदलला. मी मनाने हजार दिड हजार वर्षांपूर्वी जाऊन पोहोचलो. शिवमंदिराच्या आजूबाजूला सगळे प्रजाजन एकत्र जमलेले आहेत. सर्व लोक सोन्या-चांदीने युक्त. इकडे माझ्या पावलांसोबत राजा पाऊल टाकतो आहे आणि मंदिराकडे चालला आहे. आत मंदिरात ब्राम्हणांचा मंत्र उच्चाराचा ध्वनी येत आहे. इकडे तुताऱ्या,ढोल , ताशे ,नगारे वाजत आहे. राजावर फुलांचा वर्षाव होत आहे. राजा हसतमुखाने सर्व प्रजाजनांकडे बघत पुढे चालला आहे.
आणि चार पाच पाऊले चालल्यानंतर माझा भास तुटला. आता मी त्या जगप्रसिद्ध आश्चर्याला बघत होतो. माझ्या मनात पहिला प्रश्न हा आला कि ताजमहाल आश्चर्य का? आश्चर्य तर कैलास लेणी आहे. आश्चर्य म्हणून आश्चर्याची निवड करायची ठरली तर पहिले स्थान कैलास लेणीचेच. पण मला वाटत येथे वर्णभेद झालेला आहे. ताजमहाल पांढरा फटक आणि कैलास लेणी काळ्या दगडात कोरलेली. आश्चर्याची निवड करण्यास जर कृष्णवर्णियांची टीम बनवली. तर ताजमहाल पेक्षा जास्त पॉईंट कैलास लेणीला मिळतील. असो विनोदाचा भाग.
पण प्रामाणिकपणे सांगतो कळसापासून पायाकडे कोरलेली वस्तू म्हणजे सर्वात मोठा आश्चर्य.
भव्यता पाहून झाली, आता माझी नजर छोट्या छोट्या कलाकृतींकडे वळली. अरेरे ! काही मुर्त्यांची नाक, तोंड, हात तुटलेले आहेत. काहींना तर घासून घासून विद्रुप बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरंच कितीनी नशीबवान आहेत ते लोक ज्यांनी या मुर्त्यांची तोडफोड केली. कारण ते असे शेवटचे लोक आहेत ज्यांनी त्या मुर्त्यांचं पूर्ण सौंदर्य पाहिलं. एव्हडं असूनही त्या मुर्त्या अजूनसुद्धा मनमोहक आहेत. अनेक देवी देवता इथे कोरलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देत असलेली एक मूर्ती आहे. जिथे शिल्पकला आली तिथे भगवान शंकर आणि देव्या तर आल्याच. अशीच वेगवेगळी शिल्पे बघत बघत आम्ही पुढे गेलो. मंदिराच्या दोन्ही बाजूने दोन मोठे खांब आहेत आणि दोन मोठे हत्ती. हत्तीच्या सोंड, कान वगैरे तुटलेले आहे. पण खांब अगदी व्यवस्थित आहेत.
जिना चढून आम्ही मंदिरात शिरलो. आधी सभामंडप मग गाभारा. केव्हडी भव्य वास्तू !! मग आम्ही गाभाऱ्यात प्रवेश केला. इतर शिव मंदिर असतात तसेच. पण फुले, कुंकू वगैरे काहीही वाहण्यास बंदी पण काही लोक तिथे पैसे टाकत होते आणि ते घेण्यास एक माणूस बसलेला होता. मंदिरात भले मोठे शिवलिंग आहे. एकदम साधारण, मी विचार केला हे मंदिर आणि संपूर्ण कैलास लेणी किती भव्य, त्यावर नक्षीकाम वैभवसंपन्नतेचे प्रतीचं, वेगवेगळे देवीदेवता, यक्ष, गंधर्वांच्या प्रतिमा, आणि या सगळ्या वैभवाने वेढलेले हे शिवलिंग किती साधे. माणसानेही असेच जीवन जगायला हवे, वैभवसंपन्न पण साधे. आणि अजून एक गोष्ट सगळ्या संपन्नतेच्या केंद्रस्थानी शिव आहे. माझ्याही हृदयात आणि जीवनाच्या केंद्रस्थानी शिवाचं असला पाहिजे.
मंदिरातून बाहेर सभामंडपात आलो इथे संपूर्ण अंधार गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन दरवाजे, बहुदा गाभाऱ्याला फेरी मारण्यासाठी मग आम्ही डाव्या बाजूने माघे गेलो मंदिराच्या मागच्या अर्धगोलाकार भागात पाच मंदिरे आहेत. त्यात सध्या मुर्त्या नाहीत. मग उजव्या बाजूने आम्ही पुन्हा सभामंडपात प्रवेश केला.
इथे एक गाईड एका परिवाराला सभामंडपाची माहित देत होता. इथे अंधारात काही दिसत नव्हते म्हणून एक 'फ्लॅश लाईट' गाईडच्या हातात होता. त्याने समुद्रमंथन, वेगवेगळे गंधर्व, छताला कोरलेले शिल्प दाखवले. नंतर आम्ही बाहेर आलो.
घ्या!!! एव्हडा वेळ ज्यांच्या सोबत उभा राहून माहिती ऐकत होतो, ते खुद्द विश्वास नागरे पाटील होते. सध्या ते औरंगाबादचे ऍडिशनल सी.पी. म्हणून कार्यरत होते. आम्हा मित्रांसाठी तर दिवाळीच! पण बिना फटाक्याची, कारण जस कि ते फॅमिलीसोबत आलेले होतो, त्यामुळे ते जास्त बोलले नाही. आणि आम्ही हि त्यांच्या खासगी आयुष्याचा पुरेपूर मान ठेवला. पण त्याआधी त्यांनी आम्हाला आमच्या भावी जीवनासठी शुभेच्छा दिल्या. सभामंडपातून बाहेर आल्यावर तुम्ही जिन्याने खाली जाऊ शकता किव्हा सरळ पुढे जाऊ शकता. आम्ही समोरच्या बाजूस वरच्या मजल्यावर पोहोचलो.
eka paththyane photo kadhalach
इथून दोन मोठे हत्ती व मोठे खांब हे शिल्प एकानाजरेत पाहू शकतो. कैलास मंदिर व त्यावरील नक्षी हे सगळं एका नजरेत पाहू शकतो. इथे आम्ही भरपूर सेल्फी काढल्या
selfi

sond tutalela hatti

khamb

आणि एकदाचे सर आणि ग्रुप वेरूळला आले. ते आतापर्यंत देवगिरी किल्ला बघत होते. आम्ही कैलास लेणीच्या बाहेर गेलो उर्वरित लेण्या सरांच्या मार्गदर्शनाखाली बघायच्या असे ठरले.
पण परत सरांसोबत कैलास लेणीमध्ये आलो. सरांनी सांगितले कि मुर्त्यांची तोडफोड औरंगजेबाच्या काळात केली गेली आहे. पण माझ्या मनाला हि गोष्ट पटली नाही. कारण औरंगजेबाला जर ह्या मुर्त्यांविषयी एव्हडा तिरस्कार होता, तर त्याने स्वतः ची कबर बांधण्यास खुल्ताबादचा डोंगर का निवडला. त्यातल्या त्यात वेरूळ-लेणी डोंगरावरून औरंगजेबाची कबर सहज दिसते.[ लहानपणी मला वाटायचं कि जर औरंगजेब छ. शिवाजी महाराजांचा दुश्मन होता तर आपण त्याची कबर तोडून का टाकत नाही?] असो.
पण मग प्रश्न उरतोच मुर्त्यांची तोडफोड कुणी केली? पुन्हा माझ्या मनाचा मोसम चेंज झाला. मी पुन्हा हजार दीड हजार वर्ष पूर्वी जाऊन पोहोचलो. तिथे कळलं कि हा जो मूर्तिकार समाज आहे, यांना इथे कैलास लेणी कोरण्यास आमंत्रित करण्यात आले होते तेव्हा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना इथली १०-१२ गावे देण्यात आली. सारा वसुली करून हे लोक अन्नधान्याची व इतर गरज भागवत असत. पुढे २००-२५० वर्ष हे लोक इथे राहिले. पण या समाजाच्या पुढील पिढीच्या अपेक्षा वाढल्या. कैलास लेणी त्यांना स्वतः ची संपत्ती वाटू लागली. आणि ज्या गावातून ते सारा गोळा करीत ते त्यांना स्वतःची जहागीर वाटू लागली. ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहे. त्यामुळे पुढे चालून राजा ह्यांच्या साठी अडचणी निर्माण करू लागला. कारण त्याच्यासाठी कैलास लेणी महत्वाची होती. मग ह्या भागात संघर्ष सुरु झाला. ज्यावेळी राजाने ह्या मूर्तिकार समाजाला हुसकावून लावण्यासाठी सैन्याचा वापर केला. तेव्हा या समाजाच्या तरुणांनी येथे येऊन तोडफोड सुरु केली. सैन्य लेणीत येई पर्यंत तोडफोड चालू होती. यातील काहींना फाशी, काहींना कारावास, काहींना हद्दपार, करून राजाने प्रकरण मिटवल. माझा भास तुटला आणि मी वापस २०१५ मध्ये आलो.
खरंच या जगात सुंदर शिल्पांना उध्वस्त करण्याचे काम दोनच जाती करू शकतात. एक म्हणजे मूर्तिकार जात. कारण त्यांना विश्वास असतो कि आपण हि मूर्ती पुन्हा बनवू शकतो.
आणि दुसरी जात म्हणजे मुसलमान कारण त्यांना कुराणात तशी शिकवण आहे. या मुर्त्यांनी काय बिघडवल होत त्या मोहोम्मदच कि बिचाऱ्याने आपल्या अनुयायांमध्ये एव्हडा मूर्ती द्वेष भरला? कसलं काय !!!! सगळा येड्याचा बाजार.
यावेळी आम्ही जिन्याने वर चढून न जाता संपूर्ण मंदिराला गोल वळसा घालून आलो. मंदिराचा ग्राउंड फ्लोर ज्याला आपण म्हणू शकू तो म्हणजे केवळ मोठ्ठा दगड. त्यावर सिंह, हत्ती, साप, हरीण, घोडे, वाघ असे वेगवेगळे प्राणी कोरलेले आहे. जणू काही सर्व प्राण्यांनी संपूर्ण कैलास मंदिर आपल्या पाठीवर उचलून धरले आहे. आणि या सगळ्या प्राण्यांच्या पाठीवर पहिला मजला ज्यात मंदिराचा गाभारा, सभामंडप, आणि माघील बाजूस असलेले पाच छोटे छोटे मंदिर. अशा कैलास मंदिराच्या तिन्ही बाजूस (समोरची बाजू सोडून) गुफा कोरलेल्या आहेत. अशी हि भव्य वस्तू, कैलास लेणी. (क्रमशः)

मौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

स्वप्क००७'s picture

19 Oct 2016 - 4:40 pm | स्वप्क००७

फोटो दिसत नाही आहेत

वैभव पवार's picture

19 Oct 2016 - 6:33 pm | वैभव पवार

मी एफ बी वरुन लिंक घेतली होती। माहीत नाही का नाही दिसत आहे

मोहनराव's picture

19 Oct 2016 - 4:50 pm | मोहनराव

गणेशा झालाय

लेखनात काय सुधारना कराव्या तेही सांगा!

जे तुम्हाला वाटलं ते लिहिलंत हे आवडलं.असंच लिहा.

लिंक अड्रेसबारमध्ये टाकून पाहा फोटो दिसतो का. ती लिंक वापरा>>https://www.facebook.com/photo.php?fbid=1104475986310557&set=pcb.1104476...

रश्मिन's picture

20 Oct 2016 - 11:54 am | रश्मिन

>> इकडे तुताऱ्या,ढोल , ताशे ,नागडे वाजत आहे

वैभव पवार's picture

20 Oct 2016 - 12:03 pm | वैभव पवार

Aata edit karta yeil ka?
Spelling mistake.

अजया's picture

20 Oct 2016 - 12:09 pm | अजया

पुभाप्र.
फेबु फोटोला पब्लिक अॅक्सेस आहे का?

वैभव पवार's picture

20 Oct 2016 - 1:24 pm | वैभव पवार

हो आहे.