रासलीला

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
5 Feb 2009 - 6:43 pm

लाख चांदण्या लखलख करीती
आणि तारका दळे उतरती
आज पोर्णिमा उतरुन आलि
कालिंदीच्या तटी
खेळतो रास सखा श्रीहरी

भरल्या मेघा परि सावळा
मोरमुकुट शिरी मदनची दुसरा
श्रृंगाराला स्वरात भिजवी
अधरी धरुनी बासरी
खेळतो रास सखा श्रीहरी

गोप गोपिका जमले सारे
टिपरी वरती टिपरी गाजे
त्या नादाला भूलूनी आले
शिवही यमुनातिरी
खेळतो रास सखा श्रीहरी

वाळ्वंटी त्या यमुनाकाठी
रास रंगता हरी संगती
तनमन अवघे विसरुन जावे
प्रेम भरूनिया उरी
खेळतो रास सखा श्रीहरी

विषय नव्हे हा ही तर भक्ती
विसरूनी रमणे देहासक्ती
देवांनाही वेड लावते
अशी रासमाधुरी
खेळतो रास सखा श्रीहरी

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

मुकुन्द डेरवणचा's picture

5 Feb 2009 - 7:01 pm | मुकुन्द डेरवणचा

सुन्दर ह्ं

प्राजु's picture

5 Feb 2009 - 7:51 pm | प्राजु

प्रत्येक ओळ सुंदर जमली आहे..
या काव्याने.. "किती सांगू मी सांगू कुणाला... " या गाण्याची आठवण झाली.

भरल्या मेघा परि सावळा
मोरमुकुट शिरी मदनची दुसरा
श्रृंगाराला स्वरात भिजवी
अधरी धरुनी बासरी
खेळतो रास सखा श्रीहरी

क्या बात है! केवळ सुरेख.. !! भक्ती आणि प्रेम यांचा सुंदर मिलाफ!!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शंकरराव's picture

5 Feb 2009 - 7:55 pm | शंकरराव

अप्रतिम... काव्य रचना आवडल्या