नारायण धारपांच्या या पुस्तकांपैकी कोणती तुमच्याकडे आहेत का ? -
अवकाशाशी जडले नाते , अधःपात , अघोरी हिरावट , कालगुंफा , आसमंत, गुढात्मा , चेटूक , तळघर , न्यायमंदिर ,पानघंटी, बहुरूपी , बंध , मोहिनी , मैफल , युगपुरुष , विलक्षण सूड , विश्वसम्राट , विश्वव्यूहाचा भेद , विषारी वारसा , शोध , शिवराम , कुलवृत्तांत , किमयागार, कृष्णा , सरिता .
प्रतिक्रिया
29 Sep 2016 - 11:16 pm | विजुभाऊ
सगळी मिळतील लायब्ररीत आहेत पार्ल्याच्या
1 Oct 2016 - 8:57 pm | nishapari
धन्यवाद . पण मी मुंबईत राहत नाही . मुंबईहून खूप लांब एका लहान गावात राहते . आणि इथल्या जवळपासच्या सर्व वाचनालयांमधील धारपांची पुस्तकं मी वाचली आहेत आणि छायाचित्रे काढून माझ्या संग्रहातही ठेवली आहेत ( अर्थात जी बाजारपेठेत कुठेच उपलब्ध नाहीत तीच . )
3 Oct 2016 - 5:19 pm | राजाभाउ
बुकगंगावर पाहीले का ?
3 Oct 2016 - 7:17 pm | अमर विश्वास
सहज बुकगंगावर शोधले.. ही पुस्तके बुकगंगावर उपलब्ध आहेत..