असेच दिवस जात होते. २६ वा दिवस उजाडला एक फोन करण्याची परवानगी घेतली . वर गेलो ऑफिस मध्ये आईला फोन लावला . एकट्याला बोलण्याची परवानगी नव्हतीच. फोन एकीकडे आणि रिसिव्हर आपल्याकडे असं होतं. मध्ये ग्रील त्यामुळे वैयक्तिक काही बोलता येणं कठीण होतं. तरीही मी नेटाने माझा मुद्दा बोलो मला काय वाटतं आणि मी परत असं करणार नाही या प्रकारचं. आईने एकच प्रश्न केला काय काम आहे . एका क्षणात बहुराष्ट्रिय कंपनी मध्ये असलेली नोकरी, आपला घरचा व्यवसाय त्या जीवावर आपण दाखवलेला माज गळून पडला. मी पुढे बोलो तरी.." ओके ठीक आहे" डॉक्टरांशी बोलते मग बघु हेच उत्तर आलं . माझे डोळे भरले होते तिथें काही बोलता येत नव्हतं कारण समोर लोकं होती. नर्सिंग च्या विद्यार्थिनी हि होत्या कारण माझ्या मते त्यांना २ ऱ्या वर्षी सायकियाट्रिस्ट हॉस्पिटल ला विझिट देणं असतं. आमचं हॉस्पिटलही त्या अंडर यायचं. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या हॉस्पिटल ला जाणं आणि अनुभव घेणं होतं. ( जाणकारांनी प्रकाश टाकावा ) त्या समोरच असायच्या ग्रील पलीकडे त्यामुळे काही बोलता आला नाही .लक्षात आलं आई आपल्याशी बोलत नाही तर बाकी ठिकाणी मी किती चुकलो असेन जाणते अजाणते पणी. होणारी बायको जी सतत सोबत होती तिच्याशीही चुकीचा वागलो असेन. आज हे बोलायला सोपं वाटतं पण त्यावेळी आपल्या चुका मान्य करून पुढे जाणं खूप कठीण होतं.
रोज मच्छी मटण चिकन शिवाय जेवण नाही पण इथे पालकाची भाजी हि आवडीने खाल्ली. नॉन व्हेज एकदाचं मिळायचं आठवड्यातून तेही थोडंच. रस्यावरच समाधान असं..
२-४ संस्था होत्या जिथे घरचे काही मदत करायचे त्यावेळी आवडीने जायचो. पुढे सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी च्या माध्यमातून हि जाणं झालं होतं. नोकरी करत असताना. एकदिवस एक संस्था आलेली हॉस्पिटलला त्यांचा एक व्हिडीओ होता तो पाहायला देणार होते आम्हाला . आणि एक छोटं लेक्चर देणार होते . ऐकलं ते पुढे वडापाव हि देणार समजलं तेव्हा चेहरे उजळले आमचे .आमच्या वॉर्ड मधील सर्वांचे .सर्व करोडपती लोकं होती पण शेवटी भूक सर्वात महत्वाची असते हे पुन्हा कळलं. खाल्ला आम्ही वडापाव कारण तो खाऊनही कित्येक दिवस झाले होते. त्यावेळी सगळ्यांना खाली बोलावलेलं पूर्ण हॉस्पिटल ला . छोटंसं गॅदरिंग हि होतं.
एक महिला होत्या ४० च्या आसपास गाणं गात होत्या उंदीरमामा आले गॉगल लावून ...पुढचा ऐकू शकलो नाही माझ्या डोळ्याळून पाणी . नंतर कळलं घरच्यांनी इथे आणून सोडला होतं त्यांना . ३ वर्षांपूर्वी .
काय वाटत असेल त्यांना. असे कित्येक अनुभव चांगल्या चांगल्या घरातली मुलं माणसं कोण मानसिक रुग्ण तर कोणाचा काही अजून प्रॉब्लेम. शेतकरी कुटुंबातले ,नोकरीवाले , कुठेतरी फसलेले, कोणी आयुष्यात पराभूत झालेले, असे भरपूर. सुन्न व्हायला व्हायचं जेव्हा आम्हाला एकत्र बोलवायचे पूर्ण हॉस्पिटल ला खाली . ह्या सगळ्यांना पाहून . पुस्तक बरीच वाचली होती हे काय नवीन नव्हतं पण जेव्हा आपण डोळ्यांनी पाहतो तेव्हा चित्र वेगळा असतं .२-२ वर्ष घरचे घ्यायला येत नाहीत ना फोन करत असं कसं होऊ शकतं लोकांचं पण होतं यावर विश्वास बसला.
थोडे दिवस गेले एके दिवशी दुपारी हाक आली वर बोलावलंय म्हणून नेहमीच चेक अप असावं असं वाटलं मी गेलो वर. समोर होणारी बायको आणि आई बसलेली ऑफिस मध्ये काही न बोलताच होणाऱ्या बायकोकडे पाहून डोळे भरून आले.......
अजून १-२ लोक होती तरी थोडा रडलो ह्यावेळी . काय काय खायला आणि पुस्तक घेऊन आलेल्या मला वाचायला पण तुला इथून घेऊन जाणार कधी बोल्या नाहीत त्या . बाकी सगळं बोलल्या पण मी एकाच मुद्दा पकडून होतो घरी कधी??? हतबल झालेलो मी पण काही उपाय नव्हता.
(बाकी पुढील भागात )
प्रतिक्रिया
29 Sep 2016 - 3:38 am | खटपट्या
सर्व भाग एकदाच वाचून काढले.
चांगले लीहीताय.
पु.भा.प्र.
29 Sep 2016 - 4:03 am | निशाचर
एका वेगळ्या जगाची ओळख होत आहे. पुभाप्र..
29 Sep 2016 - 8:25 am | मिसळलेला काव्यप्रेमी
दर भागाला प्रतिसाद नाही देता आला तरी वाचतोय प्रत्येक भाग..
पुढचा भाग?
29 Sep 2016 - 8:31 am | चैदजा
तुमच्या होणाऱ्या बायकोला लक्ष प्रणाम !!!!!
29 Sep 2016 - 9:24 am | एस
वाचतोय. अगतिकता पोचली. पुभाप्र.
29 Sep 2016 - 9:43 am | नाखु
लिहिताय म्हणून फार भावलं,
भावी सहचरीच्या धैर्याला सलाम
पुभाप्र
29 Sep 2016 - 10:39 am | राजाभाउ
असच म्हणतो.
30 Sep 2016 - 1:57 pm | तुषार काळभोर
होणारा नवरा व्यसनात वाहून गेलेला असताना, तो रिहॅबमधून 'बरा' होऊन परत येईल, या आशेवर त्याची वाट बघणारी बायको मिळायला तुम्ही प्रचंड नशीबवान आहात!
29 Sep 2016 - 11:02 am | विनटूविन
आत्तापर्यंतचे भाग वाचून.
सहवास असताना आपण आपल्या माणसाना गृहित धरतो.
आशा आहे, की तुम्ही यातून खुप चांगल्या रीतीने बाहेर पडलेले आहात आणि सुखात आहात.
सगळे भाग लवकर पूर्ण करा. म्हणजे motivation मिळेल
29 Sep 2016 - 12:52 pm | आस्तिक शिरोमणि
आपल्याला सादर वंदन. आपण आपली हकिगत धाडसाने मांडत आहात. यालाही प्रणाम.
फक्त रिहॅब मधले अनुभव कथन करता करता त्याला धरून व्यसन होतानाच्या काळातलेही अनुभव कथन करा. मी मुक्तांगणला चालणाय्रा काही अनुभवकथन सभा ऐकल्या आहेत. ज्यात असे कथन होते. व जे ऐकल्यामुळे इतर व्यसनासक्तांना "असे असलेले आपण जगात एकटे नाही. " असा दिलासा मिळतो. व आपणंही असेच आहोत, हे ही कळते.
धन्यवाद आपले पुन्हा एकदा. शुभदिन.
29 Sep 2016 - 8:03 pm | पिलीयन रायडर
फारच छान लिहीत आहात. तुषार नातु हे सुद्धा अगदी हेच्च लिहीत आहेत. त्यांच्या कथेत ते ही असेच घरच्यांनी सर्व उपाय थकले म्हणुन तक्रार करुन तुरुंगात पाठवलेले. ते ही अशीच घरी जायची वाट पहात आहेत.
तुम्ही दोघंही लवकरच घरी परताल अशी आशा वाटते.
29 Sep 2016 - 8:35 pm | निओ१
आधि शक्यतो मि चुकलो होतो प्रतिसाद देताना...
Sorry!
29 Sep 2016 - 8:53 pm | वरुण मोहिते
ओके निओ सर .
बाकी पिरा ताई नातूंचे किंव्हा मुक्तांगण चे अजूनही,, काही असतील हे अनुभव फार वेगळे आहेत. सगळं असताना काही लोकांचं असं होऊ शकतं म्हणून लिहतोय. जे सोबत होते त्यांचीही खूप वेगळी बॅकग्राऊंड होती. कोणीही काही टेन्शन आहे म्हणून पिणारे नव्हते ना कोणाला दोष देणारे ना कधी काही प्रॉब्लेम करणारे. तरीही असं होऊ शकतं सवय किंवा काहीही असेल .लिहीन पुढे .
30 Sep 2016 - 1:30 pm | संजय पाटिल
वाचतोय...
लिहीत रहा..
30 Sep 2016 - 4:33 pm | समीरसूर
जबरदस्त लिखाण! तुमच्या धाडसाला मनापासून सलाम! थोडे मोठे भाग टाका प्लीज. वाचतांना चित्र उभे राहतेय डोळ्यासमोर.
30 Sep 2016 - 6:02 pm | स्वराजित
जबरदस्त . आपण आपली हकिगत धाडसाने मांडत आहात. यालाही प्रणाम.+१+१+१