रिहॅब चे दिवस ( भाग ४) !!!

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
26 Sep 2016 - 11:15 pm

दुसऱ्या दिवशी उठलो, कानावरती इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर ना होना
..हे गाणं येत होतं. मन भरून आलं. रूम मध्ये पाहिलं तर कोणच नव्हतं. जरा वेळाने सगळे आले.
योगा करायला गेले होते खाली. गाण्यामुळे माझे डोळे भरून आले , हुंदकेही येत होते बहुधा . तितक्यात खांद्यावर एक हात पडला . गप बाला गप... हे त्यांचं पहिला वाक्य. हे साहेब पनवेल चे .सिडको एअरपोर्ट अश्या ठिकाणी जमीन गेलेली. काही कोटींचे धनी. मात्र मोहाची दारू, मच्छी ,पनवेल या व्यतिरिक्त जगातील कुठल्याही गोष्टींशी त्यांचा संबंध नव्हता. काही बोलो तरी आमच्या पनवेल ला काय होता हे व्याख्यान परत ऐकावं लागे . एके दिवशी तर डॉक्टर लेक्चर ला आलेले त्यांचा प्रश्न होता कि तुमची बायको प्यायली तर तुम्हाला काय वाटेल ह्या साहेबानी यावर आमच्या पनवेल ला असं होतच नाही असा उत्तर दिला होतं . पण माणूस मनाचा खूप चांगला आणि साधा. माझे सर्वात जास्त सूर ह्याच्यासोबत जुळले. सगळेच आयुष्यभराचे मित्र मिळाले . वयाने कोणी मोठे छोटे सगळेच (सगळ्यात छोटा मीच होतो.. असो) मला सवय नव्हती रांगेत उभा राहून जेवण घ्यायची. कधी गरज असेल तर कपडेही धुवावे लागत. त्याची हि सवय नव्हती. अश्या कित्येक गोष्टी, त्यावेळी हाच मुलगा मला सांगायचं तू बस मी करतो. तू काळजी नको करू. कदाचित माझंही कर्जत ला दुसरं घर होतं त्यामुळे होणाऱ्या समांतर गावांच्या चर्चेवरून करत असावा कारण रायगड हा त्याच्यासाठी एक देश होता .....जोक्स अपार्ट .माझे तिसरे रूम पार्टनर सोलापूर चे प्रथितयश डॉक्टर . रिहॅब ला यायची तिसरी वेळ. सांगायची गोष्ट राहिली ज्यांचा ज्यांचा मी उल्लेख करतोय त्यांना फक्त दारू आणि सिगरेट ह्याचाच व्यसन होतं. ड्रुग्स पिणारे किंवा इतर काही व्यसन असणारे दुसरीकडे होते. आमचा वॉर्ड काहीप्रमाणात व्ही. आय. पी आणि वेगळा होता. तर डॉक्टरसाहेब एकदम जबरदस्त माणूस , गप्पा मारताना त्यांचे विषय ज्ञान ऐकून मजा यायची. पुढे आमच्या दिवसभर अश्या गप्पांच्या मैफिली बसायच्या ना.. आणि मला सांभाळून घेणं हि
डॉक्टरसाहेब आणि पनवेलकरांचीही रिहॅब ची दुसरी तिसरी वेळ,त्यामुळे अनुभवही मोठे आणि मला सांभाळून घेणं ही.
मेन व्ही. आय. पी वॉर्ड मध्ये ४ रूम मध्ये फक्त १२ लोकं. काही सेमी रूम मध्ये, असे मिळून २८ .सर्व फक्त अल्कोहोलिक. बाकी वर लेडीज वॉर्ड त्यावर मेंटल वॉर्ड आणि सगळ्यात वर कुठल्याही व्यसनाने वाया गेलेली लोकं. असो बरच विषयांतर झालं तर बाजूच्या रूम मध्ये हडपसर चं युवा नेतृत्व हे महाशयही होते .त्यांना भेटण्यासाठी बऱ्याच गाड्या यायच्या पण भेटणं काय साधं मजल्याबाहेरही पडणं अलाऊड नव्हता पहिला महिना त्यामुळे गाड्या परत जायच्या. कोण गुंठामंत्री कोण बँक मॅनेजर असे बरेच लोक होते .
एक साहेब होते कर्नाटक चे माजी खासदार. प्रचंड रागावलेले आले तेव्हा. घरच्यांनीच आणलेलं. घरचे हि आजूबाजूला फ्लॅट घेऊन राहिले होते भाड्याने तोवर. दिवसाला ५-७ हजार ची स्कॉच लागायची फक्त रोज. एकदम अस्सल पु. लं. चं रावसाहेब व्यक्तिमत्व. भाषाही तशीच. ते ही रुळले नंतर. अजून एक होता घरच्यांच्या स्वतःच्या शाळा होत्या ,फिजिक्स मास्टर स्वतः , नेव्ही मध्ये नोकरी पण सोडली नंतर तरुण.. होता मुलगा तो . सर्वात जास्त पिण्याचा प्रमाण त्याचा होतं. पण तो १५ दिवसाचं होता सोबत कारण त्या आधी त्याने ६ महिने इथेच काढले होते. ७ वि वेळ रिहॅब ला येण्याची!!!
एक गुज्जुबंधू होते. अमेरिकेत व्यवसाय. कुठला तो कळलंच असेल. तिथेही उपचार झाले पण शेवटी घरच्यांनी इथे पाठवला भारतात प्रतिष्ठेला घाबरून.. गम्मत म्हणजे इथेही त्याची हि ४ वेळ होती. वेगवेगळ्या रिहॅब ला बरका.
कोण इंजिनियर कोण डॉक्टर कोण आय. टी मधलं अश्या वातावरणात ग्रुप जमला आमचा. दिवसभर रम्मी किंवा कॅरम. दोन दिवसांनी खाली आवारातच क्रिकेट खेळायला न्यायचे . सकाळी रोज योगा आणि कधीतरी लेक्चर हेच लाइफ. दारू सिगरेट तर नव्हतीच पण एक गायछाप पुडी मिळायची आठवड्याला. एकदा .तीच पुरवून खायची . ह्याला कारण होतं कारण अचानक व्यसन सुटलं तर काहीवेळा गंभीर परिणाम होतात म्हणून. मुक्तांगण सारख्या ठिकाणीही द्यायचे पूर्वी. आधी कधी खात नव्हतो पण शेवटी बॉटमलाईन एकच व्यसन !! ते हि खायला चालू केलं.
हे असला तरी प्रत्येकाच्या मनात एक खंत होती .आम्हाला तर जास्तच कारण सगळं असताना आपल्या चुका .आयुष्यातले कित्येक अमूल्य क्षण वाया जात होते . बोलणार तरी किती आणि पत्ते वैगरे खेळणार तरी किती. सगळेच एकांतात निराश होते रडत होते .कोणाशी बोलायलाही मिळाला नव्हतं अजून घरी. घरच्यांचा रोज संपर्क फक्त डॉक्टरांशी . आता २० च्या वर दिवस झाले होते
(बाकी पुढील भागात)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

26 Sep 2016 - 11:21 pm | पिलीयन रायडर

वाचतेय...

निओ१'s picture

26 Sep 2016 - 11:47 pm | निओ१

your missing your story.
you need to focus on your line sir. please don't mind.

महासंग्राम's picture

27 Sep 2016 - 11:16 am | महासंग्राम

मराठीत लिहायचा प्रयत्न करा

गुगल इनपुट टूल वापरा जमेल मराठीत लिहिणं

उदय के'सागर's picture

28 Sep 2016 - 3:41 pm | उदय के'सागर

किंवा निदान इंग्रजी तरी नीट आणि अचूक लिहा. Please don't mind:)

एस's picture

27 Sep 2016 - 12:57 am | एस

वाचतोय. पुभाप्र.

निशाचर's picture

27 Sep 2016 - 1:03 am | निशाचर

पुभाप्र

अत्रुप्त आत्मा's picture

27 Sep 2016 - 6:56 am | अत्रुप्त आत्मा

वाचिंग.. ऐकिंग!

अजया's picture

27 Sep 2016 - 7:03 am | अजया

पुभाप्र

संजय पाटिल's picture

27 Sep 2016 - 12:04 pm | संजय पाटिल

पण एक शंका आहे. हे चार वेळा, सात वेळा... येतात, म्हणजे या रिहॅबचा खरोखर काही उपयोग होतो, कि...

वरुण मोहिते's picture

27 Sep 2016 - 12:37 pm | वरुण मोहिते

फरक पडतो कारण गॅप पडते. पण तरी प्रत्येकाच्या विचार करण्यावर आहे. रिहॅब किंवा इतर काहीही उपचार काही जादू नव्हे आपण ठरवलं तर सगळं होतं. नाही ठरवलं तर नाही होत . आणि रिहॅब ला हि गेलेले कितीका दिवस असेना १००% परत वळतात एकदातरी त्या व्यसनाकडे. पण बदल होणं महत्वाचं.

नंदन's picture

27 Sep 2016 - 1:35 pm | नंदन

चारही भाग वाचले. लिहित रहा.

यशोधरा's picture

28 Sep 2016 - 5:27 pm | यशोधरा

असेच म्हणते.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Sep 2016 - 2:15 pm | बिपिन कार्यकर्ते

सगळे भाग आत्ताच वाचले. लिहित राहा भाऊ. अजून तपशीलात येऊ द्या.

प्रभास's picture

28 Sep 2016 - 12:33 pm | प्रभास

छान लिहिलंय... वाचण्याची उत्सुकता वाढत आहे...

स्वीट टॉकर's picture

28 Sep 2016 - 1:21 pm | स्वीट टॉकर

अशी हकीकत From the horse's mouth कधीच ऐकलेली वा वाचलेली नव्हती. अतिशय कुतूहल आहे. येऊ द्या!

सूड's picture

28 Sep 2016 - 2:53 pm | सूड

वाचतोय.

एक गायछाप पुडी मिळायची आठवड्याला -- हे का बर? म्हणजे एखाद्याला फक्त दारूचं व्यसन असेल तर त्याला तंबाखू खायला द्यायची काय गरज? सिगारेट ओढणाऱ्याला तंबाखू दिली तर एक वेळ ठीक आहे....

वरुण मोहिते's picture

28 Sep 2016 - 10:30 pm | वरुण मोहिते

गायछाप घेणं न घेणं ऐच्छिक होतं .आग्रह नव्हता घ्याच असा. मी घेतलं कारण मी सिगारेट हि पित होतो. काही फक्त दारूचं पिणारे हि होते तरीही त्यांनी घेतलं कारण एकच काहीतरी आधार असावा म्हणून कदाचित.

टुकुल's picture

28 Sep 2016 - 5:55 pm | टुकुल

चांगल लिहित आहात.

--टुकुल

निओ's picture

29 Sep 2016 - 2:09 am | निओ

सगळे भाग वाचले..नवीनच आहे. पु भा प्र.