खरं तर मी कधीच चहा पीत नाही, बनवत तर त्याहून नाही. पण एकदा चुकून पहाटे उठलो. मस्त थंडी होती. गरम चहाचा मूड आला. अर्धवट झोपेत एक कप चहात ४-५ चमचे साखर पडली. पहिल्या घोटातच झोप उतरली. मग बराच वेळ तो कप तसाच ठेवला होता. पुढचा घोट घ्यायची हिंमत होत नव्हती . तेवढ्यात चहासाखरेचे डबे वर कपाटात ठेवताना कपाला धक्का लागून तो कलंडला, तो चिकट चहा ओट्यावरून ओघळला आणि मी संकटातून वाचलो. तर त्या स्मृती प्रीत्यर्थ:
***
किती साखर पडली चहात हे बघितले
आणि पोटात अगदी ढवळून आले
गुर्हाळातली काकवी तसा हा चहा
कसा करावा हा कप रिकामा रिकामा?
*
तेवढ्यात उलथला कप, जन्माला घालून
ओट्यावरून उतरलेला चहाचा घट्ट चिकट ओघळ
जणू अशक्य असं दालीचं गूढ घड्याळ
"असला चहा आपण पिणार होतो?"
नुसत्या कल्पनेनेच हादरलो मी
***
णम्र विनंति: मला मात्रांचा वगैरे छंद नाही, गंध तर त्याहून नाही. त्यामुळे माझ्या अतिशय आवडत्या अशा 'मुक्तछंदा'मधे ही रचना गुंफली आहे. आणि रचना अतिशय भिकार आहे हे मला माहित आहे त्यामुळे काय हाणायचे ते हाणून घ्या. आगाऊ धन्यवाद.
प्रेरणा: धनंजयमास्तरांची धुकट सकाळ
प्रतिक्रिया
4 Feb 2009 - 1:17 am | विसोबा खेचर
लै भारी रे बिपिनशेठ! :)
तात्या.
4 Feb 2009 - 2:01 am | संदीप चित्रे
विडंबन करायचा :)
----
तू रंग्या अजूनही 'कच्चा माल' शोधतोय का?
4 Feb 2009 - 5:24 am | शितल
सहमत.:)
4 Feb 2009 - 2:02 am | प्राजु
बिप्स.... यू टू???? :O
छान आहे विडंबन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Feb 2009 - 2:05 am | धनंजय
"चहा आहे की चहाची खीर?" इति माझी पुण्याची आजी. (चहात साखर कितीही टाकली तरी म्हणत असे.)
4 Feb 2009 - 4:05 am | धमाल नावाचा बैल
बिपीनदा,
कविता मस्तच पण नाव तेव्हढं बदला बॉ! चिकट सकाळ म्हटल की आमच्या डोक्यात नाय नाय ते येतं! :)
4 Feb 2009 - 5:39 am | शुभान्गी
झक्कास..............
4 Feb 2009 - 6:52 am | टारझन
ईईईईईईईईईईईईई चिक्कट सकाळ ?
च्यायला सकाळ सकाळ आसलंच हेडिंग वाचायचं का ? बाकी कवितेबद्दल णो कमेंट्स .. कळत णाय णा ..
स्वगत : ह्म्म ऑलराउंडर बणण्याची तयारी चालू झालेली दिसतेय.
- टारझण कार्यकर्ते
4 Feb 2009 - 7:59 am | सहज
विडंबन व कविता दोन्ही चालुन जाईल अशी भारी :-)
4 Feb 2009 - 9:26 am | अवलिया
ठ्ठो....
बिप्स यु टु............. :)
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
4 Feb 2009 - 9:54 am | प्रकाश घाटपांडे
चिकट आन ते बी सकाळी सकाळी म्हन्ल्याव आमचा शब्दच ताठला. वाचल्याव मंग नरामला.
खी खी खी
प्रकाश घाटपांडे
4 Feb 2009 - 11:00 am | ब्रिटिश
तुमच्या शब्दाला कंट्रोल मदी ठेवा.
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
5 Feb 2009 - 2:36 am | आचरट कार्टा
=))
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
4 Feb 2009 - 10:16 am | नितिन थत्ते
बिपिन भौ
तू पण या प्रांतात ?
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
4 Feb 2009 - 10:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
लय भारी बिका! पण खरंच "चिकट सकाळ" या शब्दांचा अर्थ भलताच वाटला ...
मग कधी बोलावणार मला चहा प्यायला? ;-)
(कडवट) अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
4 Feb 2009 - 4:45 pm | आनंदयात्री
कधी बोलावनार चहा प्यायला !!
-
(तुरट) आंद्या
4 Feb 2009 - 5:12 pm | बिपिन कार्यकर्ते
आता तुम्ही दोघे विचारता आहात, चहाला कधी बोलावणार म्हणून. जेव्हा बोलावलं होतं तेव्हा पातेलंभर दूध आटवून मस्त बासुंदी केली होती. तुम्ही टांग दिली. नंतर ४ दिवस लागले बासुंदी संपवायला. :(
बिपिन कार्यकर्ते
4 Feb 2009 - 4:54 pm | श्रावण मोडक
'बिकट सकाळ', 'मातकट सकाळ', 'विकट सकाळ', 'फुकट सकाळ'.... (वाढवत रहा) कोण लिहिणार आहे?
वाट पाहतो. :)
बाकी, याला विडंबन का म्हणावे? नवकवितेचा नियम लावला तर ही नवकविताच की!!! फसलेल्या चहाची एक हुच्च 'अनुभूती' आहेच की हिच्यात.
4 Feb 2009 - 8:56 pm | बिपिन कार्यकर्ते
प्रतिक्रिया दिलेल्यांना धन्यवाद, न दिलेल्यांना मनापासून धन्यवाद!!!!!!!!!
***
सहज, श्रावण मोडक
अहो याला विडंबनच म्हणा. कविता म्हणली की ती कशी मात्रा, वृत्त, छंद, ताल, उपमा वगैरेंनी भरलेली असली पाहिजे. आम्हाला फक्त हे शब्द माहित आहेत. कवितेत कुठून येणार मग? ;)
***
बर्याच लोकांनी 'चिकट सकाळ'चा भलताच अर्थ घेतला. खरंतर मला हे अपेक्षितच होतं. पण 'मास्तराकडून'. टार्या, अदिती, बैलोबा वगैरेंकडून नव्हे. ;)
(भारी) बिपिन कार्यकर्ते
4 Feb 2009 - 9:24 pm | ब्रिटिश
मास्तरची शीकवनी, दुसर कं बाला ?
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
4 Feb 2009 - 9:18 pm | llपुण्याचे पेशवेll
एकूणच कवितेचा आराखडा बघता कविता ठीक वाटली. कवितेचे पहीले कडवे अगदीच फुटकळ आहे. पोट अगदी ढवळून निघाले त्याने. पण ही ढवळ सामाजिक प्रश्नाच्या पोटतिडकीमुळे आलेली नव्हती. काकवीच्या चवीमुळे आली होती. पहील्या कडव्यात सामाजिक जाणीव नसल्याने पहीले कडवे बाद.
दुसरे कडवे मात्र दालीच्या चित्रामूळे रोचक झाले आहे. एकूणच कविता प्रवाही आहे. अजून थोडी सुधारणा करून कविता सामाजिक बनवता येईल.
( यशस्वी समिक्षा कशी करावी याची शिकवणी सध्या मी प्रा. तिळवे, प्रा. राजापुरे यांच्याकडे लावली आहे. त्यामुळे वरील परिच्छेद समिक्षेच्या दृष्टीकोनातून लिहीला आहे. कविता छान आहे मला आवडलीही पण समिक्षेच्या परीक्षेत एखाद्या कवितेवर टीका केल्याशिवाय पास करत नाहीत ना! )
(फुटकळ समिक्षक)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
4 Feb 2009 - 9:23 pm | बिपिन कार्यकर्ते
पेशव्या!!!!!!!!!!!!
फुटलो रे. जबरदस्त समिक्षा. मला शंका आलीच होती की तू शिकवणी लावली आहेस की काय म्हणून. तूच कबुली दिलीस. =)) =)) =))
अवांतरः ती तू दिलेली बातमी जबरदस्तच होती.
बिपिन कार्यकर्ते
4 Feb 2009 - 9:30 pm | प्रकाश घाटपांडे
समीक्षक म्हन्ल कि असच ल्हाव लागल्तय नाहीत मंग कोन सर्टिफिकेट देनार? प्रा पेशवे
प्रकाश घाटपांडे
4 Feb 2009 - 9:35 pm | श्रावण मोडक
आता एक काम करा पेशवे, या प्रत्येक सकाळीचा संदर्भ घेत एक समीक्षण लिहून टाका. स्वतंत्र लेख म्हणून. भन्नाट प्रकरण होईल.
मागं एकदा आमच्या एका मित्रानं असंच एका विडंबनाचं समीक्षण केलं होतं, ते अंधुकसं आठवतं. इथंच प्रकाशीत झालं होतं ते.