मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचावयास मिळेल! धन्यवाद...
बे एरिया मध्ये महाराष्ट्र मंडळाने येत्या फेब्रुवारी मध्ये पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन करण्याचे ठरवले आहे. त्या बाबत बरीचशी जाहिरातबाजी, स्वतःची पाठ थोपटून घेणे हे प्रकार सुरु झाले आहेत. परंतू या संमेलना मागचा हेतू काय? त्याने नेमक्या कोणत्या गोष्टी साध्य होणार आहेत? आणि हे सर्व करताना कोणाची पोळी भाजून घेतली जाणार आहे? हे आणि असे अनेक प्रश्न बे एरियातील असंख्य मराठी लोकांना पडले आहेत.
मुळात हे संमेलन भरवताना जे मुद्दे लपवले गेलेत अथवा खोट्या पध्दतीने सांगीतले गेलेत त्याचे कारण काय? ही धुळफेक करण्याचे प्रयोजन काय? बे एरिया महाराष्ट्र मंडळ किती खोटे बोलते आहे हे लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून हा प्रयत्न.
१. मंडळाने असा दावा केला आहे कि त्यांचे २००० सदस्य आहेत:
नक्की? मुळीच नाही. मंडळाची सदस्य संख्या २५० च्या वर नक्कीच नाही. मंडळ हे अमेरिकेत ना-नफा (नॉन प्रॉफिट) तत्वावर चालणारी संस्था आहे. ह्या संस्थेच्या साठी असणार्या मार्गदर्शक तत्वानुसार मंडळाच्या सदस्यांची संख्या आणि नावे सर्वांना खुली असली पाहिजेत. मंडळ ही यादी प्रसिध्द करू शकते का? त्याच प्रमाणे कॅलिफोर्निया नॉन प्रॉफिट गव्हर्निंग बॉडी कडे याची यादी द्यावी लागते. ती तशी दिली आहे का? त्याच नियमानुसार नॉन प्रॉफिट संस्थेने दरवर्षी अहवाल प्रसिध्द करणे आणि तो सगळ्या सदस्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. मंडळाने गेली कित्येक वर्षे अहवालच प्रसिध्द केला नाही. का? कारण मंडळाच्या कार्यक्रमांना भरगोस(?) प्रतिसाद मिळाला असा तद्दन खोटारडेपणा आणि मागल्या दाराने केलेले व्यवहार उजेडात येतील ना!!
2. मंडळाचा असा दावा आहे कि मंडळ असे मोठे कार्यक्रम करू शकते आणि असे कार्यक्रम करण्यासाठी लागणारे कौशल्य, पैसा आणि मनुष्यबळ मंडळाकडे आहे. आता हे कसे फसवे आहे हे आपण बघूया:
- मंडळाचे बहुतांशी कार्यक्रम तोट्यात जातात.
- मंडळाचा एप्रिलमध्ये होणारा चैत्रधुन हा कार्यक्रम २००० सालापासून सदैव नफ्यात व्हायचा. २००७ आणि २००८ या दोन्ही वर्षी हा कार्यक्रम १००० डॉलर तोट्यात का आहे?
- मंडळाच्या इतिहासात नाटक हे सदैव दुभती गाय होती. २००५ साली मंडळाला ३५०० डॉलर्स इतका निव्वळ फायदा नाटकामुळे झाला. असे असताना २००७ साली झालेल्या नाटकात ५०० डॉलर्स तोटा आणि २००८ साली केलेल्या सुयोगच्या नाटकांना पण प्रचंड तोटा सहन का करावा लागला? सुयोगची नाटके झालीत त्याची तिकीटविक्री होती अवघी १२५. सभागॄहाची क्षमता ४५०. म्हणजे फक्त १/४ सभागॄह फक्त भरले होते. लोकांनी दिलेला हा भरगोस(?) प्रतिसाद बघून मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव सभागॄहाकडे फिरकलेसुध्दा नाहीत. सुयोगचे कलाकार त्यादिवशी मंडळावर भयंकर उखडले होते हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे.
3. इतर कार्यक्रम अंदाजे २००० डॉलर्सचा तोटा. का? कारण कुठल्याही कार्यक्रमांना लोकंच येत नाहीत. मंडळाने २००७-०८ मध्ये जे ठळक कार्यक्रम केलेत त्याला उपस्थित असलेल्या संख्याच पुरेशी बोलकी आहे. बे एरियात जर १००० मराठी कुटुंबे रहातात तर ही संख्या एव्हढी कमी कशी आणि का?
- २००७ नाटक - १३०
- २००७ चैत्रधून - १७०
- २००८ सुयोग नाट्यमहोत्सव १२५
- २००८ चैत्रधून - १००
- २००८ मराठी सिनेमा (वासूदेव बळवंत फडके) - ५५
4. मंडळाने साहित्य संमेलन भरवताना स्थानिक लोकांना विश्वासात घेतले होते का?
नाही. या बातम्या वर्तमानपत्रातुन कळल्या. जर कार्यक्रम स्थानिक लोकांसाठी आणि त्यांच्या जिवावर करायचा तर त्यांना सांगायला देखील नको? परस्पर घाई घाईत मंडळाकडून १००० डॉलर्स महामंडळाला पाठवायचे. महामंडळानेही त्वरेने त्यांना सदस्य म्हणून मान्यता द्यायची आणि महाराष्ट्रातील इतर संस्थांच्या तोंडाला पाने पुसायची, यात कोणालाच काही काळेबेरे दिसत नाही? ही घाई आणि लपवाछपवी कशासाठी? मग यात मंडळाचे किंवा साहित्यपरिषदेचे काही आर्थिक हितसंबंध तर गुंतले नाहीत ना? अशीच शंका येते.
५. लपवाछपवीचे आणखी एक उदारहण म्हणजे, मंडळाला नक्की किती वर्षे झालीत? मंडळाला २५ वर्षे झालीत मग मंडळाच्याच संकेत स्थळावर १९६९ साली झालेल्या सहलीचे छायाचित्र (सौजन्यः सौ. अलका करंदीकर) दिसते आहे. तसेच मंडळाने प्रसिध्द केलेल्या 'स्पंदन' या वार्षीक अंकात देखील याचा उल्लेख आहे. (या 'स्पंदन' अंकासाठी सौ. कर्हाडे यांनी प्रचंड मेहनत घेतली पण मंडळाने अंकातील साहित्य टाईपसेटर कडुन परस्पर पळवून छापला आणि त्यावर संपादक म्हणून सौ. कर्हाडे यांचे नाव न टाकता कोणातरी भलत्याच माणसाचे नाव संपादक म्हणून छापले. का? तर सौ. कर्हाडे यांनी मंडळातील गैरकारभार उजेडात आणण्याचा गुन्हा केला म्हणून.) आणि त्याच पानावर 'MMBA’s 25th Year Celebration!!!' असेही लिहिले आहे. काय खरे मानायचे? हे काय गौडबंगाल आहे? २५ वर्षे नक्की कशाची पुर्ण झालीत? या बाबत अधिक संशोधन केले असता मंडळाने घुमजाव करून उत्तर दिले कि मंडळाची घटना लिहून २५ वर्षे झालीत म्हणून हे रौप्यमहोत्सवी वर्ष. हरकत नाही भारत नाही का १९४७ साली स्वतंत्र झाला आणि घटना १९५० साली अस्तित्वात आली? पण मग ही माहीती स्पष्ट शब्दात आधीच का नाही सांगता आली? ही धुळफेक का? हा संदिग्धपणा काय साधण्यासाठी केला जातो आहे?
आज या घटनेला २५ वर्षे झालीत म्हणून हा खटाटोप चालला आहे त्याच घटनेला काळीमा फासणारी कॄत्ये मंडळाने गेली दोन वर्षे केलीत त्याचे काय? मंडळाच्या कार्यकारणीतील काही लोकांनी तर 'आम्ही ही घटना-बिटना ओळखत नाही' अशी मुक्ताफळे उधळली होती. आणि या मनमानी कारभाराचा जाब विचारायला गेलेल्या श्री. डॉ. भिवंडकर यांचे सदस्यत्वच मंडळाने रद्द केले. हे डॉ. भिवंडकर म्हणजे मंडळाचे संस्थापक. काय गंमत आहे पहा, आपला स्वार्थ साधण्यासाठी, मनमानी कारभार करण्यासाठी आणि लपवाछपवी साधण्यासाठी, संस्थेच्या संस्थापकालाच हाकलून देण्यापर्यंत मंडळाच्या कार्यकारीणीची मजल जाते. या आणि अशा अनेक सुरस कथांनी भरलेला इतिहास आहे या मंडळाचा. मग ही मनमानी करण्यासाठीच का ही २५ वर्षाची सबब?
6. मंडळ बे एरियात ग्रंथालय चालवते असे म्हणतात, मला तर ते कधी रांगताना देखील दिसले नाही. किती नियमीत वाचक आहेत मंडळाच्या ग्रंथालयाचे? २०-२५. मंडळ त्या पुस्तकांमध्ये दरसाली किती भर घालतं? शुन्य. मंडळाच्या कार्यकारीणीपैकी किती लोक ही पुस्तकं वाचतात? यु-ट्युबवरती मुलाखत बघीतल्यावर मनात आलेला आकडा, शुन्य. बाकी काही म्हणा भारतीयांनीच लावलेला शुन्याचा शोध हा फारच उपयुक्त शोध आहे.
यु-ट्युब वरती मंडळाच्या प्रतिनिधींनी 'आमच्या लायब्ररीमध्ये ५०० पुस्तके आहेत' (अरे चुकलो! खरं म्हणजे 'बुक्स' म्हणायला हवं नाही का? कारण यु-ट्युब वर तर त्यांनी असेच म्हटले आहे.) अशा प्रकारचे निवेदन केले आहे. मंडळाच्याच संकेतस्थळावर मात्र फार तर २३६ पुस्तकांची यादी दिलेली आहे. ही त्या संबधीची लिंकः http://www.mmbayarea.org/main/library.htm
म्हणजे एकतर मंडळ या बाबतीतही दिशाभूल करते आहे किंवा मंडळाच्या ग्रंथालयात जर खरेच ५०० पुस्तके असतील तर त्यांची सुची करण्या इतपत देखील त्यांना आस्था नाही.
आणि मग असे अचानक मंडळाचे मराठीवरचे प्रेम एकाएकी का उतू जाते आहे? या कार्यकारीणी पैकी कोणी साहित्तिक आहे? नाही. कोणी साहित्य, कला, नाटक, संगीत याच्यासाठी काही केले आहे? नाही. यांच्यापैकी कोणी साहित्यसंमेलनाला तरी गेले आहे? नाही. यांच्यापैकी कोणी मराठी साहित्य नियमीत वाचतो? यु-ट्युब वरच्या यांच्या मुलाखती बघून तर ही मंडळी मराठी बोलतात तरी का अशीच शंका येते. मग का? याचे उत्तर मला तरी एकच दिसते 'प्रसिध्दी'. एक वचन आहे:
घटं भिंद्यात, पटं छिंद्यात, कुर्यातरासभरोहणं,
येनकेनप्रकारेण, प्रसिध्द: पुरुषो भवेत।
याचाच प्रत्यय येतो आहे.
7. जुलै महिन्यात मंडळाने 'मैत्र' संमेलन सॅन फ्रन्सिस्को येथे आयोजीत केले होते. भयंकर गर्दी झाली होती (म्हणे)!! १७५-२०० लोकं आली होती, आख्ख्या अमेरिकेतून!!! म्हणजे ५० राज्यातून २००, तर प्रत्येक राज्यातून ४!!!! साहित्य संमेलानाची गत याहून वेगळी असण्याचे कारण नाही. आणि त्या साठी ३ लाख डॉलर्स इतका खर्च! का?
8. वर्तमानपत्रात दिलेल्या प्रसिध्दीवरुन असे लक्षात येते कि या संमेलनाला भारतातून लोक आणण्याचा प्रयत्न चालला आहे. राजा-राणी ट्रॅवल्स याच्या साठी पॅकेज देते आहे. तुमचे आई-वडिल, भाऊ-बहिण, काका-मामा यांना संमेलनाला अमेरिकेत बोलवा असा प्रचार चालू आहे. थोडक्यात म्हणजे इथे संमेलनाच्या नावाखाली अमेरिकेत पिकनिक करायला या (जमल्यास तुमच्या मुलीचे/सुनेचे बाळंतपण सुध्दा उरकून घ्या, तेव्हढेच पॅकेजमुळे जरा स्वस्त पडेल. नशीब पॅकेजच्या नावावर मुलाला/मुलीला कळवायला सांगीतले नाही कि यंदा येतोच आहोत तेव्हा बाळंतपणाचे मनावर घ्यावे इ. इ. इ.). तुमचा साहित्याशी (अथवा संमेलनाशी) काही देणे-घेणे असो किंवा नसो. (नशीब संमेलनाला येणार्या प्रत्येकाला एक विदेशी मद्याची बाटली मोफत भेट म्हणून देत नाहीयेत. नाही तर महाराष्ट्रात निवडणुकीच्या वेळेला जसे ट्रक भरून माणसं आणतात आणि जय-जय ओरडायला ५० रू., मोर्च्यात नाचायला २०० रु आणि मतदानाला जाण्यासाठी एक मोसंबी-नारंगीची बाटली देतात तसलाच प्रकार केला असता.). हे असेच पॅकेज राजा-राणी ट्रॅवल्सने या पुर्वी महा इतर राष्ट्रातल्या संमेलनाला दिल्याचे कधी स्मरत नाही. मग यंदाच का? कि 'आर्थिक (गैर?) व्यवहार' हेच या मागचे कारण आहे? संमेलन वगैरे सोडा हो! त्याचा आमच्या ट्रॅवल्सशी काय संबध?
9. या यात्रेत किती फुकट्यांची वर्णी लागणार आहे? नक्की साहित्तिक किती? नुसतेच फुकटात हिंडायला मिळते म्हणून येणारी पदाधीकारी किती? ज्यांचा साहित्याशी कसलाही संबंध नाही असे राजकारणी किती? आणि यांचा खर्च नेमका कोण करणार? कि तो भुर्दंड सामान्य सदस्य, जो स्वतःचा वेळ आणि पैसा मोजून जाणार त्याच्याच खिशातून उपटणार?
एकंदर अपेक्षीत खर्च आहे 1.5 लाख डॉलर्स. हा खर्च करण्यापेक्षा मंडळाचेच लोकं महाराष्ट्रात संमेलनाला का नाही जात? तिकडून येणार्या लोकांना पॅकेज देण्यापेक्षा इथून संमेलनाला जावू इच्छीणार्या लोकांनाच का नाही प्रोत्साहन देत? वाटल्यास ह्या पैशातून महाराष्ट्रातच एखादा प्रकल्प का नाही चालू करत? हे विधायक काम संमेलन भरवण्यापेक्षा चांगले नाही का?
आणि या सगळ्यांमुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस संमेलनाला मुकणार नाही का? एव्हढेच नाही तर दरसाली पुस्तकांची कोट्यावधींची उलाढाल होते, ते प्रकाशकांचे नुकसान कोण भरून देणार? मराठी भाषेच्या कल्याणाच्या गोष्टी करायच्या पण आपल्याच मराठी लोकांना खड्ड्यात घालायचे, 'अस्सल मराठी बाणा' दुसरे काय?
10. आणखी एक गोष्ट मंडळ सांगते आहे कि संमेलनाला बर्कले-स्टॅनफर्ड यांचे प्राध्यापक वगैरे येतील आणि या विश्वविद्यालयातून मराठी शिकवायला प्रोत्साहन मिळेल. स्टॅनफर्ड मध्ये १८ भाषा शिकवल्या जातात. त्यात हिंदी, पंजाबी आणि संस्कॄत या भारतीय भाषांचा समावेश आहे. तेलगू, तामिळ, गुजराथी, मल्याळी यांची संख्या मराठी लोकांपेक्षा जास्त असून त्या भाषा शिकवल्या जात नाहीत तर मराठी का शिकवतील? आणि त्यांनी असे प्रयत्नही केलेत. मग जर ह्या भाषा या विश्वविद्यालयांनी शिकवायला सुरू नाही केल्यात तर मराठीच का करतील? बरं असे किती प्राध्यापक संमेलनाला येणार आहेत? आणि संमेलनाला आल्याबरोबर मराठीचा उदोउदो सुरू करतील अशी अपेक्षा करणेच मुर्खपणाचे नाही का?
११. या संमेलानाला ज्या-ज्या व्यक्तींनी विरोध केला त्या त्या प्रत्येकाला मंडळाने त्रास द्यायचा भरपूर प्रयत्न केला. का तर त्यांनी "हे साहित्य संमेलन आहे डोंबार्याचा खेळ नाही" हे सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून? काही लोकांच्या विरोधात मंडळाने अमेरिकन सरकारकडे त्यांचा व्हिसा रद्द करा अशा प्रकारची पत्रेही पाठवलीत. खरे तर मंडळाने इथे स्थायीक झालेल्या (वा होवू इच्छीणार्या) व्यक्तीला मदत केली पाहीजे नाही का? मग हे कॄत्य कशासाठी? आपल्याला हवे तसे नाचायला आक्षेप घेणार्या लोकांना फक्त त्रास देण्यासाठी?
12. सुरुवातीला '२५०० लोकांची उत्साहवर्धक उपस्थीती' असे जाहीर करण्यात येत होते, त्यावेळेस बुकिंग जवळ्पास शुन्य होते. आता परिस्थीतीची जाण आल्यावर कार्यक्रमाची जागा बदलली ज्यात फक्त ७०० लोकांची सोय होवू शकते. त्यात देखील ३००-४०० लोक भारतातून येणार आहेत, जर व्हिसा मिळाला तर. म्हणजे फक्त ३०० लोक सबंध अमेरिकेतुन हजर रहाणार. त्यातही संमेलनात भाग घेणार्या कलाकारांनाही तिकीट घेणं अनिवार्य केले आहे. म्हणजे एव्हढा आटापिटा करुन फक्त २०० च्या दरम्यान लोक येणार. काय काही गणीत जमतय का?
13. या संबध कार्यक्रमात साहित्या विषयक कार्यक्रम किती आहेत? अंकुष चौधरी, र्हुदयनाथ मंगेशकर, प्रशांत दामले, भरत जाधव, यांना साहित्तीक दर्जा देवून काय साध्य करायचे आहे? कि साहित्य संमेलनाच्या नावावर नाच-गाणी आणि गल्लाभरु कार्यक्रमच करायचे आहेत? कि साहित्य परिषदेचे सदस्य पण फक्त फुकटात अमेरिकावरी वारी करायला मिळते आहे म्हणून याच्या कडे डोळेझाक करून बसलेत?
थोडक्यात म्हणजे हे संमेलन करण्यामागचा हेतू जरी उदात्त दाखवण्यात येत असला तरी तो नक्की तितका उदात्त नाही ही शंका घ्यायला भरपूर जागा आहे. या प्रश्नांची मुद्देवार उत्तरे मंडळ देऊ शकेल काय? आणि दिलीत तर 'एव्हढे मोठे कार्य करायचे म्हणजे विरोध होणारच' अशी मंत्र्याच्या थाटातली गुळमुळीतच असणार.
- श्रीपाद कुलकर्णी
बे एरिया, अमेरिका
प्रतिक्रिया
26 Jan 2009 - 11:21 am | प्रभाकर पेठकर
भरपूर घोळ दिसतो आहे.
मंडळाची बाजूही ऐकून घेतली पाहीजे. कोणी आहे का बाजू मांडणारं?
मिपावर मिपासदस्यांना माहिती मिळाली. ह्यापलीकडे मिपाकर काही करू शकतात का? तिथे, अमेरिकेत ह्या सर्वाचा प्रसार, पत्रके छापून, केला आहे का? दबावगट निर्माण केला आहे का?
एकूण सर्वत्र एखाद्या संघटणेच्या छत्राखाली एकत्र होण्याबाबत 'सुशिक्षित मराठी माणूस' उदासिन असतो असेच दिसते.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
26 Jan 2009 - 11:38 am | सुक्या
मलाही सुरुवातीला हे सम्मेलन अमेरिकेत का होत आहे हे कोडे पडले होते.
पाणी नक्कीच मुरते आहे. परंतु दोन्ही बाजु विचारात घेतल्यानंतरच काही भाष्य करने ईष्ट होइल.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
6 Feb 2009 - 3:45 am | सर्किट (not verified)
आज सकाळमध्ये ही बातमी वाचायला मिळाली:
http://beta.esakal.com/2009/02/04234428/vishwa-marathi-sahitya-sammela.html
मजा अशी, की ज्यांनी ती माहिती पुरवली, ते लगेच खाली लिहितात "की हे सर्व चुकीचे आहे".
मजाच मजा.
-- सर्किट
6 Feb 2009 - 3:51 am | चतुरंग
मिपावरच्या 'श्रीपाद कुलकर्णी' ह्यांनी ई-सकाळवरच्या त्या बातमीत 'सुधीर सेवेकर' नावाने प्रतिक्रिया दिलेली आहे की काय? :B
चतुरंग
6 Feb 2009 - 4:00 am | भाग्यश्री
तो लेख वाचून मी कितीतरी वेळ हसत बसले होते!!
विशेषत: हे वाक्य --->
संपूर्ण परिसर कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो.
उद्या म्हणाल, पुणे हा परिसर महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो!!
http://bhagyashreee.blogspot.com/
6 Feb 2009 - 4:41 am | धनंजय
ग्रँड सॅनियन नावाचा लाल डोंगर दाखवणार असतील तर मीसुद्धा जायचे ट्रिपवर म्हणतो आहे.
(कुठेसा आहे? बहुधा ग्रँड कॅन्यन नावाची लाल दरी उकरून काढताना मोठ्या प्रमाणात लाल दगड-माती निघाली असेल. त्या लाल दगडामातीचा प्रचंड ढीग = ग्रँड सॅन्यन डोंगर असेल का?)
6 Feb 2009 - 4:53 am | कोलबेर
मी तर 'बेव्हरसेहिल' दाखवता आहेत म्हंटल्यावरच इतका एक्साइट झालो की ग्रँड सॅनियन नावाचा लाल डोंगर दिसलाच नाही. :D
चला तर मग धनंजय शेठ, 'लॉस वेगास' मध्ये भेटूच!! =))
6 Feb 2009 - 5:44 am | भाग्यश्री
हो हो, ते राहीलंच !
बेव्हरसेहील आणि ग्रँड सॅनियन नावाचा लाल डोंगर मी ही नाही पाहीला अजुन!! =))
http://bhagyashreee.blogspot.com/
6 Feb 2009 - 11:09 am | मराठी_माणूस
एक वेळ भारतातले नीट माहीत नसलेले तरी चालेल , अमेरिकेतले मात्र पाहीजे नाहीतर लोक हसतात.
6 Feb 2009 - 12:48 pm | भाग्यश्री
अहो, पेपरात छापताना निदान प्रुफ रिडींग करावं नं? लेख पाठवायच्या आधी लेखकाने आणि छापायच्या आधी सकाळने!
ती नावं बरोबर आहेत की नाहीत हे गुगलवर काही मिनिटात कळतं.. !
कायच्या काय!
6 Feb 2009 - 1:02 pm | मराठी_माणूस
चुकलेल्या नावात हसण्यासारखे काहीच नव्हते.
6 Feb 2009 - 10:01 pm | भाग्यश्री
मला आलं हसू, म्हणून हसले!!! मी कुठल्या जोकला हसावं हे लोकांनी का म्हणून ठरवावं !
असो, हे फार अवांतर होतंय. माझ्याकडुन मी हा विषय संपवत आहे.
http://bhagyashreee.blogspot.com/
26 Jan 2009 - 1:34 pm | कपिल काळे
<<- श्रीपाद कुलकर्णी
बे एरिया, अमेरिका>>
असे का बरं बुवा लिहिले आहे?
26 Jan 2009 - 1:44 pm | दशानन
त्यांचे टोपण नाव असेल ते... !
बाकी,
मराठीला तुम्ही लोकांनी चांगलेच गोल्बल केले आहे राव ;)
छान खुप प्रगती पथावर आहात.... खास मराठी सवयी तुम्ही तीकडे जाऊन देखील सोडल्या नाहीत हे पाहू आनंद झाहला !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
3 Feb 2009 - 11:49 am | घाशीराम कोतवाल १.२
खास मराठी सवयी तुम्ही तीकडे जाऊन देखील सोडल्या नाहीत हे पाहू आनंद झाहला !
=)) =)) =)) =)) =))
काय राजे काय हे...........
___________________________________________________
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
मंडळ आपले आभारी आहे.......
26 Jan 2009 - 1:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपले मुद्दे विचारकरण्याजोगे आहेत.
-दिलीप बिरुटे
26 Jan 2009 - 2:35 pm | सर्किट (not verified)
आपला लेख बे एरिया महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. संदीप देवकुळे ह्यांना फॉरवर्ड केलेला आहे.
श्री. देवकुळे ह्यांना विनंतीदेखील केलेली आहे, की त्यांनी ह्या स्थळावरच सदर मुद्द्यांचे खंडन करावे.
(त्यांच्या लेखाच्या अपेक्षेत :-)
-- सर्किट
26 Jan 2009 - 2:39 pm | अवलिया
विनंती मराठीत केली की इंग्रजीत?
काय आहे की बरेच लोक महाराष्ट्रात मराठी शब्द तोंडातुन बाहेर पडणार नाही याचीच दक्षता घेत वावरत असतात अन अमेरिकेत जावुन महाराष्ट्र मंडळे काढतात असे ऐकिवात आहे. म्हणुन विचारतो..
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
26 Jan 2009 - 2:45 pm | सर्किट (not verified)
प्रा डॉ बिरुटेंनी मला कळवले होते, की "अरे ती मराठी मंडळाची साईट इंग्रजीत आहे" म्हणून ! तेव्हा संबंधित लोकांना ती इमेल पाठवली, तेव्हा ती साईट मराठी ल्यांग्वेजमध्ये झाली. कसे ?
तेव्हापासून मी यम यम बी ये च्या लोकांशी इंग्रजीत (स्वारी, इंग्लिशमध्ये) बोलतो. कसे ?
आणि काहीही झाले, तरी यू नो, द व्ही एम एस एस इज अ प्राईम ग्यादरिंग ऑफ द मराटी स्पीकिंग फोक्स. राईट ?
सो व्हाय आर द बे एरिया पिपल अपोझिंग इट, आय वंडर ;-)
-- सर्किट
26 Jan 2009 - 2:47 pm | दशानन
>>>यू नो, द व्ही एम एस एस इज अ प्राईम ग्यादरिंग ऑफ द मराटी स्पीकिंग फोक्स. राईट ?
सो व्हाय आर द बे एरिया पिपल अपोझिंग इट, आय वंडर
=))
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
26 Jan 2009 - 2:50 pm | अवलिया
सर्केश्वर .... दणक्यात... :)
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
26 Jan 2009 - 2:53 pm | दशानन
:)
असु दे ! खुप दिवसानंतर त्यांचा टॉप गियर लागला आहे !
***
पण सर्केश्वर त्यांचे उत्तर येईल का ?
आले तर ते मराठीतून येईल व ते येथे मिपा वर प्रसिध्द होईल असे तुम्हाला ही वाटते का ?
जे काही घालण्याचा घाट घालता आहे मराठी मंडळाने त्या बद्दल तुमचे मत कुठे आहे ?
उतरांची वाट पाहत आहे.. !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
26 Jan 2009 - 3:00 pm | सर्किट (not verified)
पण सर्केश्वर त्यांचे उत्तर येईल का ?
आले तर ते मराठीतून येईल व ते येथे मिपा वर प्रसिध्द होईल असे तुम्हाला ही वाटते का ?
जे काही घालण्याचा घाट घालता आहे मराठी मंडळाने त्या बद्दल तुमचे मत कुठे आहे ?
राज,
मिसळपाव हे काही सर्व बातम्या मिळण्याचे स्थळ नव्हे.
इतरत्र बघितले तर सगळ्या बातम्या मिळतील. कसे ?
-- सर्किट
26 Jan 2009 - 3:02 pm | दशानन
अडाणी असण्याचं सुखंच वेगळ हे तुम्हाला नाय कळणार म्हणा... !
शोधत कुठतरी गुगलून बगघतो मी बापडा !
धन्यवाद साहेब.
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
26 Jan 2009 - 9:13 pm | खुसपट
झकास..! लय भारी..! अगदी तिकडे जावून मराठीचा पट काढतात.
कशाला त्यांचे धोतर ओढता ?
खुसपट न काढणारा वाचक
26 Jan 2009 - 4:22 pm | विसोबा खेचर
आपला लेख बे एरिया महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. संदीप देवकुळे ह्यांना फॉरवर्ड केलेला आहे.
श्री. देवकुळे ह्यांना विनंतीदेखील केलेली आहे, की त्यांनी ह्या स्थळावरच सदर मुद्द्यांचे खंडन करावे.
हा हा हा! फोकलिचा देवकुळ्या कसले खंडन करतोय, या लेखाने त्या बिचार्याची तर साफ बोलतीच बंद होईल! :)
तात्या.
27 Jan 2009 - 2:53 pm | चापलूस
तात्याशी पूर्णपणे सहमत.
26 Jan 2009 - 2:57 pm | सर्किट (not verified)
दरम्यान,
ममंबेए कडे वाचनालयात फक्त ५०० मराठी पुस्तके आहेत, असे श्रीपाद म्हणतात. माझ्याकडे त्यापेक्षा अधिक पुस्तके आहेत (किमान चौपट).
पण ते जाऊ द्या.
विमसासं च्या सर्व ऑर्गनायजर्सनी लहानपणापासून वाचलेल्या मराठी पुस्तकांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या कशी ठरेल ? जास्त ? कमी ? *इक्वल* ?
-- सर्किट
26 Jan 2009 - 3:04 pm | अवलिया
विमसासं च्या सर्व ऑर्गनायजर्सनी लहानपणापासून वाचलेल्या मराठी पुस्तकांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या कशी ठरेल ? जास्त ? कमी ? *इक्वल* ?
त्यांनी मराठी पुस्तके वाचली असतील असे काहीसे म्हणायचे आहे का तुम्हाला?
अहो मराठीचे नाव काढले की भडकणारी माणसे महाराष्ट्रात आहेत ... तुम्ही अमेरिकेत मराठी वाचायच्या गोष्टी करता?
छे छे... असे काही नाही. मराठीत पुस्तके छापली जातात आणि लोक ती वाचतात असे कळले तर ब-याच जणांना फेफरे येते
आणि अशीच मंडळी ऑर्गनायजर्स असतात ....
बाकी आपले सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते... पदरचा पैसा मोडुन मराठी जगवणारे तेच खरे.
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
26 Jan 2009 - 3:44 pm | सर्किट (not verified)
सतरंज्याच उचलायला कार्यकर्ते हवे असतील, तर तासाला डॉलर देऊन सतरंज्याच नव्हे, तर आणखी बरेच काही उचलणारे (आणि वाईपणारे) मिळतात.
ओके. दॅट्स युवर बॉटमलाईन. गेज द रेस्ट ऑफ द एक्स्पेंडिचर्स फ्रॉम धिस !
-- सर्किट
26 Jan 2009 - 4:03 pm | अवलिया
अरेरे! घाव वर्मावरच बसला काय तुमच्या? :)
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
26 Jan 2009 - 4:07 pm | सर्किट (not verified)
येस वर्म् इज अ नाईस वर्ड नाना..
कीप देम कमिंग..
(अल्मोस्ट मेक्स मी टर्न माय नेम टू संदीप उन्नी...)
-- सर्किट
26 Jan 2009 - 4:10 pm | अवलिया
खी खी खी
लिहिलेय मस्तच
पण तात्याने मराठित लिहायला सांगितलेले विसरु नका ....
तुम्ही जुने आणि जाणते आहात... :)
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
26 Jan 2009 - 4:18 pm | विसोबा खेचर
श्रीपादराव,
आपला लेख इतका अप्रतीम आणि मुद्देसूद आहे की सदर लेखाला आम्ही आपली परवानगी न घेता, उत्स्फूर्तपणे या आठवड्याच्या "मिपा - संपादकीय" चा दर्जा देऊन दाद देण्याचा प्रयत्न केला आहे. सदर लेखाच्या 'साप्ताहिक संपादकीय' निवडीविषयी आपला काही आक्षेप असल्यास अवश्य कळवा, आम्ही शीर्षकातील 'मिपा संपादकीय' हे शब्द वगळू!
तात्या.
26 Jan 2009 - 4:20 pm | अवलिया
तात्यानु योग्य निर्णय...
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
26 Jan 2009 - 11:14 pm | पिवळा डांबिस
हा लेख काल स्टँन्ड अलोन म्हणून वाचला. मिपावरच्या लेखनस्वातंत्र्याचे आम्ही पुरस्कर्ते असल्याने वाचून काणाडोळा केला. इथे कुणालाही काहीही प्रगटन करण्याचा आमच्याइतकाच अधिकार आहे असे आम्ही मानतो. परंतू आज हाच लेख "मिपा संपादकीय" म्हणून प्रसिद्ध झाल्यामुळे हा प्रतिक्रियाप्रपंच!
लेखकाच्या बाकी मुद्द्यांवर श्री. देवकुळे यांचा प्रतिसाद मागितला गेला आहे. तो आणण्यास आमचे स्नेही बे-एरिया मठाधिपती श्री. सर्किटस्वामी समर्थ आहेतच. तेंव्हा आम्ही त्या प्र(ति)सादाची शांतपणे प्रतिक्षा करू.
परंतू एका मुद्याबाबत मात्र इथे लिहिणे मिपाहिताच्या दृष्टीने आवश्यक वाटत आहे....
काही लोकांच्या विरोधात मंडळाने अमेरिकन सरकारकडे त्यांचा व्हिसा रद्द करा अशा प्रकारची पत्रेही पाठवलीत.
हा अत्यंत गंभीर आरोप आहे. अमेरिकन घटनेच्या पहिल्या दुरुस्तीमधील अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला आणणारे हे कॄत्य आहे. एखादा लेख जेंव्हा त्या संस्थळाचे संपादकीय म्हणून प्रसिद्ध केला जातो तेंव्हा त्यातील विधानांच्या सत्यतेची खात्री करून घेणे केंव्हाही योग्य. तेंव्हा मिपाव्यवस्थापनाने या आरोपामागील सत्यासत्यतेच्या पुराव्याची पडताळणी केली असेलच.
मंडळाने जर खरोखरच अशी पत्रे पाठवली असतील तर ते निंद्य आहेच. पण वस्तुस्थिती जर तशी नसेल तर एखाद्या मुळात मराठी पण आता अमेरिकन नागरीक असलेल्या व्यक्तिच्या तक्रारीवरून यात डिपार्टमेंट ऑफ इंटर्नल सिक्युरिटी (ज्यात एफ्.बी. आय. ही येतं!) इन्व्होल्व्ह होऊ शकते.
तेंव्हा अशी विधाने "संपादकीय" म्हणून प्रकाशित करतांना पूर्ण खात्री करूनच करावी हा इशारा!!
मिपाचा हितचिंतक,
पिवळा डांबिस
26 Jan 2009 - 11:33 pm | विसोबा खेचर
साला हे आम्हाला माहितीच नव्हतं. एरवी श्रीपादरावांचा लेख खूपच सडेतोड, मुद्देसूद वाटला म्हणूनच केवळ त्याची संपादकीय म्हणून निवड केली. डांबिसरावांच्या मुद्द्यावर श्रीपदरावांनी अवश्य खुलासा करावा..
आपला,
(न्यायप्रेमी) तात्या.
26 Jan 2009 - 11:41 pm | पिवळा डांबिस
डिपार्टमेंट ऑफ इंटर्नल सिक्युरिटी (ज्यात एफ्.बी. आय. ही येतं!)
मला डिपार्टमेंट ऑफ होमलॅन्ड सिक्युरिटी असं म्हणायचं होतं, चुकून इण्टर्नल लिहिलं पण त्यामुळे बाकी काही फरक पडत नाही...
-पिडां
26 Jan 2009 - 11:47 pm | सर्किट (not verified)
कला ह्या संस्थेच्या एका कार्यकर्त्याला भारतातून अमेरिकेत येण्यासाठी व्हिसा मिळू नये ह्यासाठी यूएससीआयएस ला पत्र पाठवण्यात आले होते, अशी बातमी मीही (एका खात्रीलायक स्रोताकडून) ऐकलेली आहे. नक्की कुणी पाठवले होते, ह्याबद्दल साशंक आहे. परंतु, हे पत्र सदर सदस्याने, लोकमत, मायबोली, मिसळपाव ह्या सर्व स्थळांवर विमसासं ला विरोध करणारा लेख प्रकाशित केल्यावर पाठवण्यात आले होते, हे नक्की.
-- सर्किट
26 Jan 2009 - 11:53 pm | पिवळा डांबिस
मराठी तितुका मेळवावा,
महाराष्ट्रधर्म वाढवावा!!
:)
27 Jan 2009 - 12:26 pm | प्रभाकर पेठकर
आक्षेप आमचाही नाही. पण सदर लेख हे एकतर्फी लिखाण आहे. दुसरी, बाजू समोर आलेली नाही. त्यामुळे 'मिपा - संपादकीय' चे निकष काय? असा प्रश्न मनात उभा राहतो. अर्थात, 'मालकांची मर्जी ' हा मुद्दा विचारात घेतला आहेच.
26 Jan 2009 - 6:11 pm | कलंत्री
हाच खरा कार्यक्रम व्हायला हवा. २०/२५ वर्षांनंतरही मराठी माणसे हवी आहेतच ना?
26 Jan 2009 - 11:51 pm | सर्किट (not verified)
कलंत्रीकाका,
हाच खरा कार्यक्रम व्हायला हवा.
हा कार्यक्रम अमेरिकेतही होतोच (स्वानुभवः-) पण संमेलनात नको, असे वाटते. कारण १५० डॉलरचे तिकीट लावून बघण्याइतका इंटरेस्टिंग कार्यक्रम नाही हो तो !
-- सर्किट
26 Jan 2009 - 9:24 pm | प्राजु
आता देवकुळे साहेबांकडून उत्तरे अपेक्षित आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Jan 2009 - 10:35 pm | धनंजय
पैकी मुद्दा क्र १, २, ३ आर्थिक गैरव्यवहार, किंवा हल्गर्जीबद्दल आहेत. ते योग्य वाटतात.
४. हा मुद्दा ठीक वाटतो. मंडळ एक संस्था आहे, राज्यशासन नव्हे. संस्थेने जास्तीतजास्त लोकसंग्रह करण्यात संस्थेचा नावलौकिक होतो, संस्थेचे भले होते. पण लोकांना विश्वासात घेतलेच पाहिजे असे कर्तव्य नाही. (मिसळपावाचा निर्माण तात्यांनी पैसे टाकून, नीलकांत-वगैरेंनी वेळ खर्चून जितका केला, त्याबद्दल आम्हाला अप्रूप वाटते. इथे खूप लोकांना वाव मिळतो. पण सुरुवातीला मिसळपाव बनवणार्यांनी "मराठी जालविश्वाला" विश्वासात घेतले नाही, असे म्हणणे म्हणजे जरा फारच होईलस वाटते.)
५. संस्थेचा जन्मदिवस नेमका काय? हा प्रश्न पडला तर लपवाछपवीच होते आहे, असे वाटत नाही. एवढ्या मोठ्या विद्यापीठातला आमचा विभाग - पण विद्यापीठाने विभाग उघडण्याबद्दल चर्चा केली, की तसा ठराव मांडला, की पहिला प्राध्यापक नेमला, की हंगामी-हंगामी सत्र थांबवून पहिला स्थायी प्रमुख नेमला... जन्मतारीख कुठली म्हणायची त्याबद्दल विभागात एकमत नाही. तरी मागच्या वर्षी विभागाच्या २५व्या वाढदिवसाचा सोहळा झाला. एकमत नाही, म्हणजे गैरविचारांची लपवालपवी आहे असे नाही.
६. कार्यकारणीतले लोक पुस्तके वाचत नसावेत असे लेखकाच्या मनात आले, हा मुद्दा नव्हे. ही विनोदी टिप्पणी आहे. वाचनालय लहान आहे, कारण संस्था लहान आहे, असे वाटते. संस्थेत किती थोडे सदस्य आहेत ते लेखकाने वरती नमूद केले आहेच.
७. वरीलप्रमाणेच - संस्था लहान आहे, म्हणून कार्यक्रमांत हजेरीचा आकडा लहान आहेत.
८. कार्यक्रमाला दुरून येणार्या लोकांनी पर्यटनही करावे, यात मला फारसे वाईट वाटत नाही. वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये भरती होण्यासाठी मुलाखती देत होतो, तेव्हा त्या गावांत थोडेबहुत पर्यटन केल्याचे मला आठवते. कॉलेजच्या माहितीपत्रांत, मुलाखतीसाठीच्या निमंत्रणपत्रांत "आमच्या गावांतली काही आकर्षणे" म्हणून पर्यटनस्थळांबाबत माहितीसुद्धा होती. पुण्याच्या कॉलेजात मुलाखतीसाठी गेलो होतो, तेव्हा पुण्यातील नातेवाइकांना भेटलो. एवढे काही पातक केले नाही, असे मला वाटते. लेखकाचा हा मुद्दा मला केवळ क्रोधामुळे दूषित झालेला वाटतो.
९. हा चांगला प्रश्न आहे. पण हा केवळ वर्गणीदार सदस्यांना विचारायचा हक्क आहे. मोठे नाव असलेल्या "चांद-तार्यांना" आणून फुकटात फिरवून जर सोहळ्यात झगमग होणार असेल, तर त्या झगमगाटाबद्दल नेमका किती खर्च करावा? ५ रुपये, ५० रुपये, ५ लाख रुपये? हा नफा-तोट्याबद्दल "बिझिनेस डिसिजन" आहे. फुकट्यांमुळे तिकिटाची किंमत वाढत असेल तर सदस्य नसलेल्यांनी तिकीट विकत घेऊ नये - तक्रारीला काय जागा? मात्र सदस्यांच्या वर्गणीतून पैसे निघणार असतील, तर सदस्यांनी तक्रार करावी. व्यवहार कार्यक्षम नसेल तर आयोजकांना बडतर्फ करावे. पण वर्गणीदार सदस्यांनीच.
१०. हा वारुळाचा वाल्मिकी केलेला आहे. मोठ्या कार्यक्रमांत असली बारीक-सारीक उप-उद्दिष्ट्ये भरपूर असतात. हा विद्यापीठांतील प्राध्यापकांना निमंत्रणपत्रे धाडण्यात नेमका किती खर्च होतो आहे? गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली!
११. "व्हीसा"बाबत आश्चर्य वाटते. कोणाला स्थायिक-व्हीसा नाकारा असे पत्र सरकारला धाडायचा हक्क कुठल्या निव्वळ सांस्कृतिक संस्थेला कसा आहे, असा प्रश्न मला पडतो. सरकारी ऑफिसात ते पत्र मिळाल्यावर संस्थेचे हसे होईल! पण अशी ढवळाढवळ कोणी केली तर ते पाजी वागणे होय - सहमत.
१२. बरे २५०० या ऐवजी २००-५०० लोक आले. व्यवस्थापन फसले. संस्थेच्या पदाधिकार्यांना हवेत महाल बांधायचे होते - कोसळले. गरीब बिचारे. वर्गणी देणार्या सदस्यांनी त्यांना पदच्युत करावे. नाहीतर बे एरियातल्या हजारो मराठी लोकांनी या २००-३०० सदस्यांच्या मंडळाकडे यथेच्छ दुर्लक्ष करून नवीन भव्य मंडळ काढावे.
१३. हा मुद्दा मुळीच समजला नाही. वर मंडळ तोट्यात जाते आहे, म्हणून दोष दिलेला आहे. इथे गल्लाभरू म्हणून कार्यक्रमाची हेटाळणी केली आहे. हृदयनाथ मंगेशकर, प्रशांत दामले, भरत जाधव, यांना बोलवायचे नाही, म्हणजे "साहित्यिक" शब्दाचा कीस पाडणे, असे मला वाटते. शुद्ध साहित्यिक, शुद्ध सांगीतिक, शुद्ध नाट्यकला अशी संमेलने भरवायला मोठ्या लोकसंख्येत मराठी लोक लागतील. मराठी मुलुखापासून दूर एकाच जंगी कार्यक्रमात मराठी नाटके-गाणी-साहित्य सर्वांचा सोहळा केला तर काय वाईट? "मराठी साहित्य आणि सांस्कृतिक संमेलन" असे नेमके नाव दिले नाही म्हणून बिचार्या हृदयनाथांवर का डाफरा?
बाकी बे एरियामधल्या मराठी लोकांच्या हेव्यादाव्यांबद्दल मला काहीच माहिती नाही. तरी असे वाटते, की श्री. श्रीपाद कुलकर्णी यांनी काही वस्तुनिष्ठ मुद्दे मांडले आहेत, ते बाकी क्रोधविवश आणि व्यक्तिनिष्ठ मुद्द्यांपासून वेगळे करायला हवे होते. पण त्यांचा लेख अधिक परिणामकारक झाला असता.
27 Jan 2009 - 12:17 am | भास्कर केन्डे
श्री धनंजय यांच्या मुद्द्यांशी सहमत.
लेख वाचताना संख्येबद्दल मला जरा शंका आली. बे एरियात केवळ १००० मराठी कुटुंबे? ह्यूस्टन सारख्या शहरात तसेच कनेटिकट सारख्या छोट्या राज्यात मराठी कुटुंबांचा आकडा पाचशेच्या पुढे नक्कीच आहे. तसेच कनेटिकटच्या मागील काही कार्यक्रमात २५० पेक्षा जास्त लोक काही प्रयत्न न करता येत आहेत. जर साहित्य (तसेच सांस्कृतिक) संमेलनाला तेवढेच लोक येणार असतील तर मला आपल्या मराठी म्हणून घेण्याची कीव करावी असे वाटू लागले आहे. नक्की हे अकडे असेच आहेत का?
ममबेए कडून खुलासा झाल्याशिवाय पडताळणी होणे नाही.
27 Jan 2009 - 12:40 am | केदार
श्रीपाद राव,
मंडळाचा आढावा चांगलाच घेतला आहे. :) काही गोष्टीत सहमत, काहीत माहीती नाही त्यामुळे मुग गिळने हे आलेच.
शिकागो मंडळाचा एक प्रमूख म्हणून मलाही असे सांगावेसे वाटते की एक न्युजर्सी सोडले तर इतर ठिकानी मंडळाचा कार्यक्रमांना फारसा प्रतिसाद लाभत नाही. प्रत्येक कार्यक्रमात तीच ती ठराविक टाळकी असतात. मंडळ भलेही २००० लोक सदस्य आहेत असे सांगत असुदे, प्रत्यक्षात लोक येत नाहीत असाच अनेक वर्षांचा अनूभव आहे. कदाचित देवखुळ्यांनी टोटल ( नॉन ऍक्टीव + सदस्य) लोकांना एकत्रीत करुन तो आकडा दिला पण त्या आकड्याचा प्रत्यक्षात किती फायदा होणार हे त्या दिवशीस दिसेल.
मराठी साहित्य समेंलन हे महाराष्ट्रातच व्ह्यायला पाहिजे असे वाटते. कारण सा संमेलनात पुस्तक विक्री हा एक प्रमुख उद्देश असतो. प्रत्यक्ष लेखकाच्या मुलाखती, भेटगाट हे ही होत असते. इथे अमेरिकेत किती जणं पुस्तक विकत घेऊन त्या साहित्यीकांचा जिवनाला हातभार लावणार आहेत ते देवजाणे. आणी ते ही शक्य नाही कारण पुस्तक हे भारतीय रु मध्ये असतात तर कार्यक्रमात मंडळ हे वर २-५ डॉलर जास्त लावून विकनारे असते, त्यामुळे तिथेही फायदा पाहीला जातो. मागे कुठली तरी ग्रंथ यात्रा ही फेल गेली होती. ( नक्की ती ग्रंथ यात्रा आठवत नाहीये पण पुस्तके विकन्याचा प्रयोग झाला होता). विश्व साहित्य परिषदेत असे होणार आहे की नाही हे माहीत नाही.
धनंजय तुमचा कलाकारांचा मुद्दा बरोबर असला तरी इथे कलाकार जास्त अन साहित्यीक कमी असे दिसतेय म्हणून श्रीपाद रावांनी तसे लिहीले असेल.
देवखुळेंनी प्रतिसाद द्यायलाच पाहिजे असे काही नाही कारण आता फार उशीर झाला आहे. त्यामुळे जे काही होत आहे त्यास आमच्या शुभेच्छा.
27 Jan 2009 - 12:41 am | पिवळा डांबिस
देवखुळेंनी प्रतिसाद द्यायलाच पाहिजे असे काही नाही
अहो केदारराव,
मला वाटतं त्याचं आडनांव "देवकुळे" आहे हो!!
देवखुळे नाही काही!!!!!
:)
27 Jan 2009 - 12:42 am | मुक्तसुनीत
"फ्रॉईडीयन स्लिप्" म्हणजे कायसेसे ते हेच काय हो !? ;-)
27 Jan 2009 - 1:00 am | केदार
नावांत गडबड झाली. त्याबद्दल मनापासून दिलगीर आहे. असे चूकन झाले ह्याची देवकुळ्यांनी नोंद घ्यावी.
27 Jan 2009 - 12:45 am | सर्किट (not verified)
कलाकार जास्त अन साहित्यीक कमी
साहित्यिकांच्या यादीत डॉ. विजय भाटकर देखील आहेत, हे विसरू नका.
-- सर्किट
27 Jan 2009 - 1:17 am | विसोबा खेचर
एकंदरीत पाहता हे संमेलन मजेशीरच होणार असं दिसतंय!
संमेलन फार छान झालं, सुरेख झालं अश्याच बातम्या छापून येतील. अर्थात, श्रीपादरावांकडून आम्हाला आतल्या गोटातील मजामजा कळेलच म्हणा! ;)
असो, संमेलनाला आमच्या शुभेच्छा! महाराष्ट्रातील जनतेच्या २५ लाखांवर तिकडे अमेरीकेत मजा करा लेको..! खा लेको आमच्या पैशांनी अमेरीकन मटाराची उसळ आणि शिक्रण! :)
तात्या.
3 Feb 2009 - 12:01 pm | घाशीराम कोतवाल १.२
महाराष्ट्रातील जनतेच्या २५ लाखांवर तिकडे अमेरीकेत मजा करा लेको..! खा लेको आमच्या पैशांनी अमेरीकन मटाराची उसळ आणि शिक्रण!
च्यामारी साहित्य संमेलन तिकडे अमेरिकेत आणी पैशे मात्र महाराष्त्राचे हे का म्हनुन बर
ईकड किति हाल तिकडे मात्र सर्व मालामाल
___________________________________________________
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
मंडळ आपले आभारी आहे.......
4 Feb 2009 - 1:44 pm | नितिन थत्ते
अमेरिकेतील मंदी घालवण्याच्या अनेक उपायांपैकी हा एक दिसतो.
पूर्वी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असे म्हणायची पद्धत होती.
आता कोणाच्या मदतीला धावला म्हणायचे?(अमेरिकेतल्या पर्वताचे नाव माहीत नाही. आमचा भूगोल पहिल्यापासून कच्चाच).
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
5 Feb 2009 - 7:47 am | घाटावरचे भट
>>ईकड किति हाल तिकडे मात्र सर्व मालामाल
अहो सध्या तिकडेच जास्त हाल आहेत...
27 Jan 2009 - 10:21 pm | श्रीपाद_कुलकर्णी
नमस्कार,
सर्व प्रथम या लेखाला 'मिपा संपादकीय' हा दर्जा दिल्या बद्दल तात्या अभ्यंकरांचे मनापासून धन्यवाद. मिपाकर मंडळींनी दाखवलेल्या समंजस आणी चौकस पणाबद्दल पण त्यांचे धन्यवाद.
या धाग्यावर अनेक प्रकारची मते प्रदर्शीत झालेली आहेत. प्रश्न विचारणे, आवाज ऊठवणे हे लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे. अशा प्रकारची मते येणार हे मी गृहीत धरलेच होते. आमचे एक गुरुजन नेहमी म्हणायचे कि एखादा नविन विषय शिकल्यावर जर तुम्हाला प्रश्न पडले नाहीत तर त्याची दोनच कारणे असू शकतात, एक तुम्हाला हा विषय पुर्णपणे समजला किंवा दुसरे म्हणजे तुम्हाला या विषयातले काही म्हणता काही कळले नाही. मिपावर प्रश्न नसते आले तर ती या लेखाची फार मोठी हार होती. परंतू मिपाकरांनी माझ्या या विश्वासाला तडा जावू दिला नाही, धन्यवाद.
त्या सगळ्यांची उत्तरे मी निश्चितच देईन. मी स्वतः संगणक क्षेत्रात काम करत नसल्याने मराठी टंकलेखनात (एकंदरीत संगणकाबद्द्लच म्हणाना) मला खास प्राविण्य नाही. हा लेख लिहावयास मला एक आठवडा लागला. त्यातून काही घरगुती अडचणींमुळे मला काल सबंध दिवस वेळ मिळाला नाही. थोड्याच कालावधीत मी या सर्व शंकांचे समाधान करण्याचा जरुर प्रयत्न करेन. आणखी एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे, ती म्हणजे मी हा लेख लिहीताना कोणावर ऊगाच गरळ ओकण्याच्या उद्देशाने लिहीला नाही. यात कोणावरही वैयक्तीक स्वरुपाचे आरोप केलेले नाहीत. सगळीकडे मंडळाची कार्यकारिणी असे नमुद केले आहे. हे काही आकसापोटी केलेले लिखाण नसुन जे समोर चालले आहे ते चुकीचे आहे आणी त्याला वाचा फोडली पाहिजे याच हेतूने लिहीले आहे.
धन्यवाद,
श्रीपाद कुलकर्णी
28 Jan 2009 - 12:15 am | विसोबा खेचर
धन्यवाद श्रीपादराव. आपल्याला संगणकाचा फारसा सराव नाही हे समजले. तरीही आपल्या सवडीने येथील काही मंडळींनी उपस्थित केलेल्या शंकांना उत्तर मात्र अवश्य द्या..
आपला,
(पुराव्याने शाबित) तात्या.
28 Jan 2009 - 11:43 am | श्रीपाद_कुलकर्णी
नमस्कार,
परंतू एका मुद्याबाबत मात्र इथे लिहिणे मिपाहिताच्या दृष्टीने आवश्यक वाटत आहे....
काही लोकांच्या विरोधात मंडळाने अमेरिकन सरकारकडे त्यांचा व्हिसा रद्द करा अशा प्रकारची पत्रेही पाठवलीत.
हा अत्यंत गंभीर आरोप आहे. अमेरिकन घटनेच्या पहिल्या दुरुस्तीमधील अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला आणणारे हे कॄत्य आहे. एखादा लेख जेंव्हा त्या संस्थळाचे संपादकीय म्हणून प्रसिद्ध केला जातो तेंव्हा त्यातील विधानांच्या सत्यतेची खात्री करून घेणे केंव्हाही योग्य. तेंव्हा मिपाव्यवस्थापनाने या आरोपामागील सत्यासत्यतेच्या पुराव्याची पडताळणी केली असेलच.
मंडळाने जर खरोखरच अशी पत्रे पाठवली असतील तर ते निंद्य आहेच. पण वस्तुस्थिती जर तशी नसेल तर एखाद्या मुळात मराठी पण आता अमेरिकन नागरीक असलेल्या व्यक्तिच्या तक्रारीवरून यात डिपार्टमेंट ऑफ इंटर्नल सिक्युरिटी (ज्यात एफ्.बी. आय. ही येतं!) इन्व्होल्व्ह होऊ शकते.
तेंव्हा अशी विधाने "संपादकीय" म्हणून प्रकाशित करतांना पूर्ण खात्री करूनच करावी हा इशारा!!
---- पिवळा डांबिस साहेब, अहो मी सुध्दा अमेरिकेतच रहातो आणि मी येथील कायद्यांचा देखील अभ्यास केला आहे. या मुद्दयामध्ये जे काही लिहीले आहे त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. तात्याराव अभ्यंकरांना मी व्य. नि. पाठवून हे कळवले देखील आहे.
धनंजय,
आता आपल्या हरकतींना/मु्द्यांना ऊत्तरे:
पैकी मुद्दा क्र १, २, ३ आर्थिक गैरव्यवहार, किंवा हल्गर्जीबद्दल आहेत. ते योग्य वाटतात.
४. हा मुद्दा ठीक वाटतो. मंडळ एक संस्था आहे, राज्यशासन नव्हे. संस्थेने जास्तीतजास्त लोकसंग्रह करण्यात संस्थेचा नावलौकिक होतो, संस्थेचे भले होते. पण लोकांना विश्वासात घेतलेच पाहिजे असे कर्तव्य नाही. (मिसळपावाचा निर्माण तात्यांनी पैसे टाकून, नीलकांत-वगैरेंनी वेळ खर्चून जितका केला, त्याबद्दल आम्हाला अप्रूप वाटते. इथे खूप लोकांना वाव मिळतो. पण सुरुवातीला मिसळपाव बनवणार्यांनी "मराठी जालविश्वाला" विश्वासात घेतले नाही, असे म्हणणे म्हणजे जरा फारच होईलस वाटते.)
---- तात्यांनी विश्वजालाला विश्वासात घेतले नाही याची तुलना ईथे करू नका. मिपाचा सगळा खर्च तात्या उचलत आहेत, तसेच मिपा सदस्यांकडुन तात्यांनी सदस्यत्व घेतलेले नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे मिपा हे ना नफा (नॉन प्रॉफिट) तत्वावर चालणारी आणि अमेरिकेत रजिस्टर्ड झालेली संस्था नाही. त्यामुळे ही तुलनाच चुकीची ठरते. मंडळ आपल्या सदस्यांकडुन वार्षीक सदस्यत्व घेते. तसेच अमेरिकेत ८०(क) या नियमाप्रमाणे रजिस्टर्ड झालेली, ना नफा (नॉन प्रॉफिट) तत्वावर काम करणारी संस्था आहे. त्याच्या नियमावलीत जे नियम आहेत त्यानुसार जर ते वागले नाहीत तर संस्थेचे रजिस्ट्रेशन रद्द होवू शकते. आधी म्हटल्या प्रमाणे मी कायद्याचा अभ्यास केला आहे हे लक्षात ठेवावे.
५. संस्थेचा जन्मदिवस नेमका काय? हा प्रश्न पडला तर लपवाछपवीच होते आहे, असे वाटत नाही. एवढ्या मोठ्या विद्यापीठातला आमचा विभाग - पण विद्यापीठाने विभाग उघडण्याबद्दल चर्चा केली, की तसा ठराव मांडला, की पहिला प्राध्यापक नेमला, की हंगामी-हंगामी सत्र थांबवून पहिला स्थायी प्रमुख नेमला... जन्मतारीख कुठली म्हणायची त्याबद्दल विभागात एकमत नाही. तरी मागच्या वर्षी विभागाच्या २५व्या वाढदिवसाचा सोहळा झाला. एकमत नाही, म्हणजे गैरविचारांची लपवालपवी आहे असे नाही.
---- एकमत नसणे आणि गोष्ट मुद्दाम लपवून ठेवणे यात फरक आहे असे नाही वाटत? तुमच्या आजीचे वय ८० आहे कि ८५ हे तुम्हाला (आणी तिला देखील) ठावूक नाही ह्याने फरक पडत नाही पण जर तुमच्या मुलीचे वय सध्या ३० आहे आणि तिला पहायला आलेल्या मंडळींना तुम्ही २५ सांगीतले तर? ही फसवणूक नाही का? कोणाच्या का फायद्याची असेना!!
६. कार्यकारणीतले लोक पुस्तके वाचत नसावेत असे लेखकाच्या मनात आले, हा मुद्दा नव्हे. ही विनोदी टिप्पणी आहे. वाचनालय लहान आहे, कारण संस्था लहान आहे, असे वाटते. संस्थेत किती थोडे सदस्य आहेत ते लेखकाने वरती नमूद केले आहेच.
--- संस्था लहान नाही आहे. पण ह्या सगळ्या गैर-कारभारामुळे संस्थेच्या कार्यक्रमांना कोणी जात नाही ही वस्तुस्थीती आहे. तसे नसते तर १९९९ साली झालेल्या संमेलनाला ४००० लोक आले नसते. २००५-२००६ पर्यंत सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होतच होती. त्या नंतर मंडळात जे काही राजकारण चालू झाले कि ज्यांना मनाची चाड आहे तो माणूस तिकडे फिरकेनासा झाला.
७. वरीलप्रमाणेच - संस्था लहान आहे, म्हणून कार्यक्रमांत हजेरीचा आकडा लहान आहेत.
--- वरीलप्रमाणेच
८. कार्यक्रमाला दुरून येणार्या लोकांनी पर्यटनही करावे, यात मला फारसे वाईट वाटत नाही. वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये भरती होण्यासाठी मुलाखती देत होतो, तेव्हा त्या गावांत थोडेबहुत पर्यटन केल्याचे मला आठवते. कॉलेजच्या माहितीपत्रांत, मुलाखतीसाठीच्या निमंत्रणपत्रांत "आमच्या गावांतली काही आकर्षणे" म्हणून पर्यटनस्थळांबाबत माहितीसुद्धा होती. पुण्याच्या कॉलेजात मुलाखतीसाठी गेलो होतो, तेव्हा पुण्यातील नातेवाइकांना भेटलो. एवढे काही पातक केले नाही, असे मला वाटते. लेखकाचा हा मुद्दा मला केवळ क्रोधामुळे दूषित झालेला वाटतो.
---- कसा काय क्रोधामुळी दूषित झाला? मुख्य कार्यक्रमाला नुसती नावापुरती हजेरी लावायची आणी नंतर गावभर उंडारायचे हे बरोबर का? साहित्य संमेलन करता आहात ना मग मुख्य कार्यक्रम मराठी साहित्याशी निगडीत ठेवा ना!! साहित्याशी संलग्न असलेले कार्यक्रम ४-५ आणी नाच-गाणी, फुल्टू धमाल यांची मात्र ३ दिवस रेलचेल असे का?
एक उदारहण देतो: समजा तुम्ही पुण्याच्या कॉलेजात मुलाखतीसोडून गावभर भटकलात असता तर? किंवा १० कॉलेजात न जाता फक्त १-२ कॉलेजातच गेला असतात तर? यात काही पातक केले असे तुमच्या पालकांना नाही वाटणार का? जेव्हा तुम्ही मुळ उद्देशच विसरता त्याला तुम्ही पातक केले असे नाही म्हणणार? पर्यटन जरूर करा, पण आपले मुळ काम सोडुन किंवा त्याला दुय्यम लेखून कराल का?
याही पेक्षा जालीम उदारहण देतो. समजा तुमचे चिरंजीव अभ्यासवर्गासाठी कुठेतरी गेलेत आणी नंतर त्याच्या शाळेतून तक्रार आली की अभ्यासवर्गात अभ्यास न करता तुमचे चिरंजीव तास दोन तास कसेबसे बसून, हजेरी लावून दिवसभर ईकडे-तिकडे उंडारून संध्याकाळी तमाशाच्या कनातीत सापडले. याला काय आपण थोडे-फार पर्यटन म्हणाल? मला वाटतं थोडे-बहूत पर्यटनाचा अर्थ आता आपल्या ध्यानी आला असावा..
९. हा चांगला प्रश्न आहे. पण हा केवळ वर्गणीदार सदस्यांना विचारायचा हक्क आहे. मोठे नाव असलेल्या "चांद-तार्यांना" आणून फुकटात फिरवून जर सोहळ्यात झगमग होणार असेल, तर त्या झगमगाटाबद्दल नेमका किती खर्च करावा? ५ रुपये, ५० रुपये, ५ लाख रुपये? हा नफा-तोट्याबद्दल "बिझिनेस डिसिजन" आहे. फुकट्यांमुळे तिकिटाची किंमत वाढत असेल तर सदस्य नसलेल्यांनी तिकीट विकत घेऊ नये - तक्रारीला काय जागा? मात्र सदस्यांच्या वर्गणीतून पैसे निघणार असतील, तर सदस्यांनी तक्रार करावी. व्यवहार कार्यक्षम नसेल तर आयोजकांना बडतर्फ करावे. पण वर्गणीदार सदस्यांनीच.
---- हा प्रश्न विचारणार्यांनाच धमकावले गेले ना साहेब.
१०. हा वारुळाचा वाल्मिकी केलेला आहे. मोठ्या कार्यक्रमांत असली बारीक-सारीक उप-उद्दिष्ट्ये भरपूर असतात. हा विद्यापीठांतील प्राध्यापकांना निमंत्रणपत्रे धाडण्यात नेमका किती खर्च होतो आहे? गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली!
---- अश्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये छोटी उद्देश असतात/असावीत हा मुद्दा मान्य. मुद्दा खर्चाचा आहेच कुठे? एव्हढे पैसे खड्ड्यात टाकता आहात आणखी थोडे गेलेते. पण जेव्हा केवळ प्रसिध्दीसाठी अशा गोष्टी केल्या जातात त्याचे वाईट वाटते. दुसरे म्हणजे आपण काय बोलतो याचे भान ठेवणे आवश्यक नाही का? जेव्हा एखाद्या संस्थेतर्फे आपण बोलता तेव्हा आपली संस्था मराठी लोकांचे प्रतिनिधीत्व करते आहे याचा विसर पडून कसा चालेल? तसे नसते तर जया बच्चन जेव्हा 'हम युपी वाले है हम हिंदीमेही बात करेगे' असे बोलल्या तेव्हा एव्हढा गजहब करण्याचे काय प्रयोजन होते?
आणखी एक उदारहण देतो: समजा तुमच्या कंपनीतील एखाद्या जवाबदार व्यक्तीने सगळ्या कामगारांना भरमसाठ आश्वासने दिलीत आणि ती नंतर पुर्ण केली नाहीत तर 'गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली' असे म्हणून सोडुन द्याल?
११. "व्हीसा"बाबत आश्चर्य वाटते. कोणाला स्थायिक-व्हीसा नाकारा असे पत्र सरकारला धाडायचा हक्क कुठल्या निव्वळ सांस्कृतिक संस्थेला कसा आहे, असा प्रश्न मला पडतो. सरकारी ऑफिसात ते पत्र मिळाल्यावर संस्थेचे हसे होईल! पण अशी ढवळाढवळ कोणी केली तर ते पाजी वागणे होय - सहमत.
१२. बरे २५०० या ऐवजी २००-५०० लोक आले. व्यवस्थापन फसले. संस्थेच्या पदाधिकार्यांना हवेत महाल बांधायचे होते - कोसळले. गरीब बिचारे. वर्गणी देणार्या सदस्यांनी त्यांना पदच्युत करावे. नाहीतर बे एरियातल्या हजारो मराठी लोकांनी या २००-३०० सदस्यांच्या मंडळाकडे यथेच्छ दुर्लक्ष करून नवीन भव्य मंडळ काढावे.
---- असे दुसरे मंडळ काढा असे म्हणणे सोपे आहे साहेब. ज्या लोकांनी या मंडळाची स्थापना केली आणि हे मंदीर उभारले ते काय बडव्यांच्या हाती किल्ल्या देण्यासाठी?
१३. हा मुद्दा मुळीच समजला नाही. वर मंडळ तोट्यात जाते आहे, म्हणून दोष दिलेला आहे. इथे गल्लाभरू म्हणून कार्यक्रमाची हेटाळणी केली आहे. हृदयनाथ मंगेशकर, प्रशांत दामले, भरत जाधव, यांना बोलवायचे नाही, म्हणजे "साहित्यिक" शब्दाचा कीस पाडणे, असे मला वाटते. शुद्ध साहित्यिक, शुद्ध सांगीतिक, शुद्ध नाट्यकला अशी संमेलने भरवायला मोठ्या लोकसंख्येत मराठी लोक लागतील. मराठी मुलुखापासून दूर एकाच जंगी कार्यक्रमात मराठी नाटके-गाणी-साहित्य सर्वांचा सोहळा केला तर काय वाईट? "मराठी साहित्य आणि सांस्कृतिक संमेलन" असे नेमके नाव दिले नाही म्हणून बिचार्या हृदयनाथांवर का डाफरा?
---- आपल्या समजण्यात काहीतरी चुक झाली आहे. मी मंगेशकर आणी ईतर कलाकारांवर डाफरलो नाही तर 'साहित्यिक' या नावावर खपवण्याच्या वृत्तीवर टिका करतो आहे. हा दोष हृदयनाथांवर मंगेशकरांचा कसा?
---- दुसरी गोष्टः "शुद्ध साहित्यिक, शुद्ध सांगीतिक, शुद्ध नाट्यकला अशी संमेलने भरवायला मोठ्या लोकसंख्येत मराठी लोक लागतील. मराठी मुलुखापासून दूर एकाच जंगी कार्यक्रमात मराठी नाटके-गाणी-साहित्य सर्वांचा सोहळा केला तर काय वाईट?" हा प्रश्न आपल्याला पडला आहे. मग अशी स्पेशलाईज्ड संमेलने करायचीतच कशाला. कुठल्यातरी खेड्यात विज नसलेल्या ठिकाणी संगणक विक्री आणि दुरुस्तीचे दुकान काढाल का आपण? समजा काढले आणी नाव ठेवले 'अलाणा-फलाणा काँपुटर - विक्रि आणी दुरुस्ती' आणी तिथे विकायला ठेवला साबणचुरा, पान-तंबाखू, इ. इ. इ. आपल्या पुलंनी म्हटलय ना तस 'नाव काय राजे-भोसले आणी चालवतात पिठाची गिरणी'. काही अर्थ आहे का?
आणि आपण म्हणता तसे सर्वगुण संपन्न संमेलन होतेच की. याच वर्षी आहे फिलाडेल्फियात, येताय का? http://www.bmm2009philadelphia.org/bmm2009/index.htm
त्याला कधी नाही म्हटले. पण सांगताना आव आणायचा की आपण 'साहित्य संमेलन' भरवतो आहोत म्हणून आणि करायची नाच-गाणी. हा ताकाला जवून भांडे लपवण्याचा प्रकार का? हीच मी म्हणतो ती लपवा-छपवी!!
एक उदारहण आपल्याला देतो म्हणजे कदाचीत कळेल. समजा आपल्याला एक १७-१८ वर्षाचा मुलगा आहे आणि त्याने एके दिवशी आपल्याकडे 'नृत्याच्या कार्यक्रमा'ला जायचे म्हणून तिकिटासाठी पैसे मागीतले. तुम्ही पैसे दिलेत आणि मागाहून आपल्याला कळले कि तो 'चांदनी डान्स बार' मध्ये जावून पैसे उडवून आला. आता आपण काय करणार? नृत्याचा कार्यक्रमच, फक्त 'बारमध्ये' हा शब्द घालायचा राहीला!! आणि जर आपले चिरंजीव आपल्याला म्हणाले की तुम्ही फक्त 'नृत्याचा कार्यक्रम' या शब्दाचा किस पाडता आहत तर?
बाकी बे एरियामधल्या मराठी लोकांच्या हेव्यादाव्यांबद्दल मला काहीच माहिती नाही. तरी असे वाटते, की श्री. श्रीपाद कुलकर्णी यांनी काही वस्तुनिष्ठ मुद्दे मांडले आहेत, ते बाकी क्रोधविवश आणि व्यक्तिनिष्ठ मुद्द्यांपासून वेगळे करायला हवे होते. पण त्यांचा लेख अधिक परिणामकारक झाला असता.
---- या लेखात कुठलाच मुद्दा वैयक्तीक आरोप करणारा किंवा रागाच्या भरात लिहीलेला नाही. आपल्याला यात राग/क्रोध कुठे दिसला? मला जर या लेखात एखादे जरी उदारहण दाखवले तर बरे होईल साहेब. नाही पुढच्या वेळेस लिहीताना कोणालाही दुखावणार नाही या बेताने तरी लिहीन. अहो आपल्या पुलंनी म्हटलेच आहे एखाद्याची हजामत केली तर त्याला स्वच्छ दाढी केल्या सारखे वाटावे वस्तर्याने ईजा होवू नये. काय पटते का?
=======================
आता काही नवीन मुद्दे.
तात्यांनी म्हटल्या प्रमाणे महाराष्ट्र सरकार या संमेलनासाठी २५ लाख रुपये देणार आहे आणि हे मंडळ निर्लज्ज पणे घेणार आहे. अरे काही जनाची नाही तर मनाची. भारतातून पैसे आणून ईथे चंगळ करण्याचा एव्हढा का अट्टाहास? खरं म्हणजे एन. आर. आय. लोकांनी भारतातल्या लोकांसाठी काही करावे ही अपेक्षा असते/आहे. या २५ लाख (आणी हे मंडळ करणार आहे तो खर्च वेगळाच) रुपयात महाराष्ट्रात कितीतरी गावात बोअरवेल बांधता येतील. कित्येक ठिकाणी शाळा सुरु करता येतील. किंवा आणखी काही विधायक कार्ये करता येतील.
आणी एव्हढाच जर मराठी साहित्या विषयी कळवळा असता तर भारतातील एखाद्या ग्रंथालयाला भरीव मदत करता आली असती किंवा असे आणखी बरेच उपक्रम आहेत की ज्यांना मदत करता येईल. कलाने मराठी पुस्तकांचा प्रकल्प चालू केला आहे त्याला मदत करता आली असती. याच कला या संस्थेने या पुर्वी 'लेखक आपल्या भेटीला' या सारखे उपक्रम बे एरिया मध्ये राबवले होते, त्याला मंडळाने किती हातभार लावला? शुन्य. कला सारख्यासंस्थेने मराठी सहित्य, नाट्य, संगीत या साठी नुकसान सोसून प्रकल्प राबवले. आणी याच साठी कलाच्या श्री. मुकुंद मराठे यांनी या संमेलनाला विरोध केला. पण दुर्दैवाने त्यांचे सांगणे अरण्यरुदनच ठरले. आजही कला सारखी संस्था नुकसान सोसून हे प्रकल्प चालवते आहे. या संस्थेला विश्वासात घेवून जर हा कार्यक्रम आ़खला असता तर मला नक्की खात्री आहे की हे साहित्य संमेलन खरोखरच दॄष्ट लागण्या सारखे झाले असते. परंतू विश्वासात घेणे तर सोडाच पण साधे सांगण्याचे देखील कष्ट मंडळाला घ्यावेसे वाटले नाही. अहो बरोबरच आहे तसे केले असते तर हवे तसे नाचायला नसते ना मिळाले.
या सगळ्या उदाहरणा वरून काही गोष्ट लक्षात येतातः
१. या मंडळाला साहित्याविषयी कसलाही कळवळा नाही. केवळ खोटे बोलून प्रसिध्दीसाठी धडपड चालू आहे.
२. अशा प्रकारच्या कार्यक्रमाची आखणी करण्याचा या मंडळाला कोणताही अनुभव नाही.
३. बे एरियात अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाची कोणतीही आवश्यकता नाही.
माझी मिपाकरांना एक विनंती आहे कि ही माहिती आपल्याला जे जे कोणी मराठी लोक माहिती असतील (ज्यांना मराठी साहित्य/कला या बद्दल आस्था आहे असेच लोकं मी गॄहीत धरतो आहे) त्यांना पाठवा. न जाणो यातून महाराष्ट्र शासनाला जाग आली तर निदान यापुढे अश्या कार्यक्रमांसाठी निधी देताना ते विचार करतील.
आणखी एक विनंती आहे, आपल्याला जर प्रतिक्रिया द्यावीशी वाटली / प्रश्न विचारावेसे वाटले तर निश्चीतच विचारा परंतू कृपया करून ते मुळ मुद्द्याला धरून असतील याची काळजी घ्या.
लोभ आहेच तो वाढावा ही ईच्छा..
-- श्रीपाद कुलकर्णी
28 Jan 2009 - 11:47 am | दशानन
माझे तर काही प्रमानात समाधान झाले आहे बघू बाकीचे काय लिहतात ते !
धन्यवाद कुलकर्णी साहेब.
*******
येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.
28 Jan 2009 - 11:53 am | छोटा डॉन
खरं तर आत्तापर्यंत हा संपादकीय लेख व त्याला पडलेले वेगवेगळे प्रतिसाद मी "निरपेक्ष" भावनेने वाचत होतो.
माझे संभेलनाबद्दल "झाले काय आणि नाही काय, सगळे एकच " असे मत होते, पण ह्या लेखात विवीध मुद्द्यांच्या शब्दशः कीस पाडल्याने व सर्व शंकानां व्यवस्थीत उत्तरे देणारा श्रीपादरावांचा विस्तॄत प्रतिसाद पाहिल्यावर मलासुद्धा ह्या "राजकारणात" रुची वाटु लागली आहे.
आता अजुन व्यवस्थीत अभ्यास करुन माझे मत मांडेन ..!
तरी सध्यापुरते, जर नुसत्याच प्रसिद्धीसाठी पैशाचा अपव्याय घडावुन व सामान्य जनतेच्या करतुन २५ लाख रु. घेउन हे संभेलन होणार असेल व त्यातुन काहीच "चांगले" घडणार नसेल तर संबंधित वरिष्ठांनी ह्याचा पुनर्विचार करुन योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती ...
"देवकुळे साहेबांचे" उत्तरही वाचायला आवडले असते पण आता ते शक्य नाही असे दिसतेय ..
तुर्तास, लेख लिहणार्या श्रीपादसाहेबांचे व विस्तॄत चर्चा करणार्या समस्त मिपाकरांचे आभार व अभिनंदन ..!
------
छोटा डॉन
28 Jan 2009 - 12:30 pm | सुक्या
श्रीपादसाहेब,
सुरुवातीला मलाही हे साहेत्यसंमेलन महराष्ट्रापासुन वेगळे का होत आहे ते कळत नव्हते. मराठी साहेत्य सम्मेलन हे महाराष्ट्रात्च व्हायला हवे या मताचा मी आहे. मी देवकुळे साहेबांच्या उत्तराची वाट पहात होतो परंतु आपल्या मुद्देसुद प्रतीसादानंतर बर्याच शंका कमी झाल्या. धन्यवाद. मंड्ळाला मराठी सम्मेलनासाठी अगदीच काही करायचं होतं तर महाराष्ट्रात होनार्या सम्मेलनाला भरगच्च मदत करुन त्याला अगदी भव्य दिव्य करता आलं असतं. असो. इथले सम्मेलन कसे होते, किती लोकं येतात हे काही दिवसात समजेलच.
आषाढीला विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपुरातच जायला हवं, इथे कितीही मोठे मंदीर बांधले तरी ते समाधान कुठे.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
3 Feb 2009 - 5:18 am | Dyaneshwar
Mitrano aaNi MaitriNino, now to English; not that my Marathi is bad, but its just easy to type in English. And fonts don't show well on a MAC.
The author of this article seem to have lot of bias against the Mandal, or even every program organized. The data given by the author seems to show that the author has inside information about Mandal. Looks like the author is unable to settle his / her scores with the Mandal and hence taking the anger on this misal pav. The author seems to have misal but no pav.
As an independent audience, I am not interested in what shenanigans the organizers are playing to make this event possible, I think we are following our Marathi tradition of pulling the legs. I have seen and participated in many conventions of other Indian languages and other professional ones. I don't think drop in participation has anything to do with Mandal. When you watch a movie you don't care what actors or directors have done to make the production. You just care about the product.
The author seem to be a Sahityik and I would recommend spending the energy on positive efforts rather than spoiling the mass psyche.
I feel this is a historic occasion, a change, and we can choose to sit on the sidelines, or even throw rubbish at the organizers; or try to help in every small way possible. You choose your side.
Just the mere fact that we will be surrounded by 40 sahityiks is raising excitement in my spine. How do I care if few people are coming for free. When there is a Sahityasammelan in India, we had invited Praatibha Tai Patil, as a president, we can dig deeper and can find her relation to the Sahitya. So if we are getting few political figures to increase the seriousness, the clout, why get so upset with it?
Why raise concerns about Mandal finances and what is its relation to the event?
Well, since I can not help for the event, at least I will give my best wishes; hopefully I am not on the wrong side. Hope all of us who have contributed to this article come forward and help the cause.
Cheers,
3 Feb 2009 - 11:49 am | सुक्या
ज्ञानेश्वर साहेब,
आपली मते आम्हाला समजली. तुमच्या मतांचा आम्ही आदरही करतो. परंतु तुमच्या मताशी आम्ही सहमत होउ शकत नाही.
now to English; not that my Marathi is bad, but its just easy to type in English
यावरुनच मराठीविषयी वाटनारी तुमची तळ्मळ आम्हाला समजली. tumachi mate amhala ashi vachayala avadali asati.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
3 Feb 2009 - 11:50 am | श्रीपाद_कुलकर्णी
ज्ञानेश्वर साहेब,
आपल्याला मराठी टंकलेखन नाही करता येत हे समजण्यासारखे आहे, अहो पण वाचता येते ना? मी या लेखात काय लिहीले आहे हे पुन्हा एकदा निट वाचावे. बरं हे उत्तर म्हणजे मंडळाकडून आलेला प्रतिसाद समजायचा का? कारण मी यात अगदी स्पष्ट लिहीले आहे की या मुद्यांना मुद्देसुद उत्तर लिहावे म्हणून, पण लेखातील एकाही आक्षेपाला आपण एका ओळीचे देखील उत्तर दिलेले नाही. तात्यांनी लिहिलेल्या मुद्याला तरी उत्तर आहे का?
दुसरी गोष्ट म्हणजे माझे नाव श्रीपाद कुलकर्णी आहे, या नावावरून तरी मी पुरूष (ईंग्रजीत ज्याला MALE म्हणतात ना!) आहे हे आपल्या लक्षात येत नसेल तर मराठी साहित्य संमेलन भरवण्या ऐवजी मराठी शिशू वर्ग चालू करण्याची गरज आहे. मंडळ चालवते म्हणतात मराठीचे वर्ग! नाही तर आपण "Looks like the author is unable to settle his / her scores with the Mandal" असे लिहीले नसते. की या चार ओळींच्या आगापिछा नसलेल्या उत्तरातून तुम्हाला कोणा दुसर्याच व्यक्तीवर शरसंधान करायचे आहे? नाही जर तसे असेल आणी जर आपली बाजू सत्य असेल तर येऊ द्या की लोकांसमोर. अहो मी काही मंडळ किंवा मराठीच्या विरुद्ध नाही. माझा विरोध आहे तो फक्त संमेलनाला आणी तो देखील का याचे सगळे मुद्दे मांडलेत की मी.
आपले आणखी एक म्हणणे आहे की हे एक historic occasion आहे. अहो इतिहास काय हो कसाही निर्माण करता येतो. सत्यम काँपुटर्स ने नाही का इतिहास घडवला!! तसाच हितेन दलालने देखील घडवला होता. हर्षद मेहता, चार्ल्स शोभराज, रंगा/बिल्ला, रामन राघव यांनी पण घडवला. पण कसा आणी काय ह्याला महत्व नाही का?
बरं जर मंडळ इतके उदात्त कार्य करते आहे तर अमेरिकेतील एकाही मंडळाच्या वेब साईटवर किंवा बृहन-महाराष्ट्र मंडळाच्या वेब साईटवर या साहित्य संमेलनाचा साधा उल्लेखही नसावा हे आश्चर्य नाही का? पण खरी गोष्ट अशी आहे कि या पैकी एकाही संस्थेला हे संमेलन अमेरिकेत पळवून आणणे आवडलेले नाही. त्याच प्रमाणे बे एरियामध्ये रहाणार्या आणी ज्यांचा साहित्याशी संबंध आहे अशा एकाही व्यक्तीला इथे संमेलन होणार आहे याच्याशी काहीही घेणेदेणे नाही, असे कां?
आणी अहो ह्या तुमच्या उत्तरात तुम्ही डोंगर पोखरून उंदीर पण नाही हो काढलात. फार तर एक गांडूळ काढला असेल. आणी हो गांडूळाला कणा नसतो बरं, त्यामुळे त्याच्या मणक्यातून तुम्ही काय ती म्हणता ना तसली शिरशिरी वगैरे जाण्याचा प्रश्नच येत नाही!!
आपण असे ही म्हटले आहे कि या लेखाचा लेखक सहित्यिक असावा. वा! वा!! काय पण जबरा की काय ती म्हणतात ना तसली निरीक्षणशक्ती!! अहो माझ्या आधीच्या उत्तरात स्पष्ट लिहीले आहे की मी कायद्याचा अभ्यास केला आहे म्हणून.
चला बघू परत एकदा हा लेख निट वाचा आणी मग काय ती तुमची शिरशिरी वगैरे येते का बघा! आणी हो पुढच्या वेळेला उत्तर लिहीताना जरा निट वाचून मग लिहा. (हे लिहायचे नव्हते पण काय करणार परिक्षेला जाताना लहान मुलांना असे सांगायची पद्धत आहे ना)
जाता जाता आणखी एक: हा लेख जर तुम्हाला मॅकवर दिसत नसेल ना तर सर्कीट साहेबांना एकदा विचारा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर मॅक वर सगळे काही निट दिसते, याच मिपावर त्यांनी या पुर्वी या बद्दल आपले मत इतरत्र मांडले आहे. की ही देखील एक लोणकढी...
श्रीपाद कुलकर्णी
++++++++
3 Feb 2009 - 11:12 pm | सर्किट (not verified)
जाता जाता आणखी एक: हा लेख जर तुम्हाला मॅकवर दिसत नसेल ना तर सर्कीट साहेबांना एकदा विचारा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर मॅक वर सगळे काही निट दिसते, याच मिपावर त्यांनी या पुर्वी या बद्दल आपले मत इतरत्र मांडले आहे. की ही देखील एक लोणकढी...
मॅकवर सर्व युनिकोडित मराठी संकेतस्थळे व्यवस्थित दिसतात. नव्हे, गेली तीन वर्षे आम्ही फक्त मॅकच वापरून मराठी संकेतस्थळांना योगदान देत आलेलो आहे. (कोण रे तो, उचापती म्हणाला ?)
जाता जाता एकः आपला अभ्यास बघता, आपले खरे नाव श्रीपाद कुलकर्णी नाही, ह्यावर माझा ठाम विश्वास आहे. इतकी आतली माहिती असणारे बे एरियात सुमारे ४ लोक आहेत (सध्याची कार्यकारिणी वगळता.)
-- सर्किट
4 Feb 2009 - 2:17 pm | एक
आपले खरे नाव श्रीपाद कुलकर्णी नाही, ...ह्यावर माझा ठाम विश्वास आहे
१०००% सहमत.
तरी सुद्धा मांडलेले सगळे मुद्दे मला पटले आहेत. नावात काय आहे असं संत रामदास म्हणूनच गेले आहेत.
3 Feb 2009 - 5:56 am | विसोबा खेचर
Just the mere fact that we will be surrounded by 40 sahityiks is raising excitement in my spine.
अहो पण स्वत:च्या पैशांनी कण्यात हव्वी तेवढी एक्साईटमेन्ट भरा की! नाय कोण बोल्तो?
पण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या २५ लाखांवर स्वत:चे कणे ताठ ठेवण्यात काय प्वॉईंट आहे? लेको तुम्ही तिकडे खोर्याने कमावता! मग आमचे २५ लाख का वापरता?
तात्या.
3 Feb 2009 - 7:39 am | पक्या
>> Looks like the author is unable to settle his / her scores with the Mandal and hence taking the anger on this misal pav. The author seems to have misal but no pav.
अहो श्रीपाद कुलकर्ण्यांनी उत्तरादाखल दिलेल्या प्रतिसादात नमूद केलंच आहे की कोणावर गरळ ओकण्याच्या हेतूने हा लेख लिहीला नाही. वाचा जरा प्रतिसाद नीट. म्हणे historic occasion .
बा़की तात्यांच्या (महाराष्ट्रातील जनतेचे २५ लाख) मुद्याशी १०० % सहमत. एवढा सोस आहे संमेलन भरवण्याचा तर स्वत:च्या जोरावर मंडळाने का नाही उभारले पैसे ? कशाला हात पसरले महाराष्ट्र शासनासमोर?
3 Feb 2009 - 10:36 am | पिवळा डांबिस
---- पिवळा डांबिस साहेब, अहो मी सुध्दा अमेरिकेतच रहातो आणि मी येथील कायद्यांचा देखील अभ्यास केला आहे. या मुद्दयामध्ये जे काही लिहीले आहे त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. तात्याराव अभ्यंकरांना मी व्य. नि. पाठवून हे कळवले देखील आहे.
उत्तम!
तुम्ही जर तो पुरावा तात्यांबरोबर शेअर केला असेल तर मग आमचं काही म्हणणं नाही.
आम्ही तात्यांना दिलेला इशारा हा फक्त आणि फक्त मिपाचं हित जपण्यासाठी होता. मंडळाची बाजू घेण्यासाठी वा तुमच्यावर टीका करण्यासाठी नव्हे हे कृपया ध्यानात घ्यावे ही विनंती.
आपला नम्र,
पिवळा डांबिस
बाकी,
पण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या २५ लाखांवर स्वत:चे कणे ताठ ठेवण्यात काय प्वॉईंट आहे? लेको तुम्ही तिकडे खोर्याने कमावता! मग आमचे २५ लाख का वापरता?
तात्या, या मुद्द्यावर तुमच्याशी पहिल्यापासून सहमत आहोतच!
:)
3 Feb 2009 - 8:47 pm | नीधप
कुलकर्णी साहेब,
तुमचा लेख आणि नंतरचा उहापोह वाचून बर्याचश्या शंका फिटल्या.
मुकुंद मराठ्यांचे आणी 'कला' चे काम मी जवळून अनुभवले आहे आणि 'कला'शी सोयरीक जोडल्यामुळे 'कला' च्या हितशंत्रूंकडून असहकार आणि टिकाटिप्पणी झाली तेही न विसरण्यासारखे. मुकुंद मराठे आणि 'कला' यांनी आपल्याकडून खूप मेहनत केली होती आम्हाला मदत करण्यासाठी त्या पार्श्वभूमीवर हा असहकार आणि टिका अस्थानी होती.
पण तरी हा लेख म्हणजे थोडंसं वरातीमागून घोडं आहे असं वाटतं.
मुळात इथल्या साहित्यप्रेमीला आणी होतकरू साहित्यिकाला वंचित करून त्यांच्याच करातून येणार्या रकमेवर स्वतःचे अमेरिका दौरे करू बघणार्यांना मुळात अमेरिकेतून मराठ्यांचं म टा मधलं पत्र वगळता विरोध झाला नाही ही वस्तुस्थिती नजरेआड करता येणार नाही.
इथल्या विरोधाला नजरेआड करायचे हे पहिल्यापासून ठरलेले असल्यासारखेच असावे असं वाटत होतं.
तेव्हा तुमचा लेख अत्यंत योग्य आणि मुद्देसूद असला तरी आता त्याचा काय उपयोग असं वाटल्याशिवाय रहात नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
4 Feb 2009 - 10:57 am | सर्किट (not verified)
मला तरी वाटते, की हा महत्वाचा विषय आहे, म्हणून सध्या तरी त्याला पहिल्या पानावर ठेवायला हवे, म्हणून हा प्रतिसाद.
-- सर्किट
5 Feb 2009 - 12:04 am | Dyaneshwar
अरे खेकड्या मित्रांनो, जसा चुल्हा तव्या वर,
आधी हाताला चटके, तेंव्हा मिलते भाकर!
अरे खेकड्या मित्रांनो, किती चिखल फेकताहो,
जरी मंडळ वाईट, पहिले संमेलन सही होणार!
अरे खेकड्या मित्रांनो, मी जरी असे ईजिनियर,
मेक वर बसणार, मराठीची पुजा करणार!
अरे खेकड्या मित्रानो, किती जरी प्रेक्शक येणार,
साहित्याची सेवा करु, तुम्ही घरी बसणार!
अरे खेकड्या मित्रानो, किती खर्च करणार,
शासन जरी म्दत करो, तुम्हा पोटात दुखणार!
अरे खेकड्या मित्रांनो, किती कागाळ्या करणार,
मराठी चा प्रसार, आम्ही नक्की करणार!
अरे खेकड्या मित्रानो, ग्रंथ किती ठेवणार,
तुम्ही प्रकाषक असो, आम्ही गुगल बघणार!
अरे खेकड्या मित्रानो, जरी अंकुष, प्रशांत येणार,
आणी द.मा. फ.मु. येवो, आम्ही भांडी घरी धुणार!
अरे खेकड्या मित्रांनो, आजी मामा पाहू येणार,
जरी कवी घरी येवो, तुम्ही डबक्यात डुंबणार!
अरे खेकड्या मित्रांनो, किती चर्चा करणार,
मराठी माणुस पुढे जावो, आम्ही पाय खेचणार!
अरे 'कला, कला' मित्रानो, वर्तमान पत्रे लिहीणार,
मैत्रिचा हात पुढे करो, आम्ही खोडा घालणार!
अरे माझ्या मित्रांनो मित्रांनो, तुम्ही वकील असणार,
जरी घाला बहिष्कार, माझे शत्रू नसणार!
5 Feb 2009 - 4:10 am | सर्किट (not verified)
तुमची तळमळ समजली.
पुढील कवितेसाठी शुभेच्छा.
-- सर्किट
5 Feb 2009 - 8:50 am | नीधप
>>साहित्याची सेवा करु, तुम्ही घरी बसणार!<<
काय करणार इक्ता खर्च करून अमेरिकेपोत्तूर येणं परवडत न्हाय खिशाला.
>>शासन जरी म्दत करो, तुम्हा पोटात दुखणार!<<
आवो आमच्या म्हाराष्ट्रात लई लई गुणी लोक हायत ज्यांच्यासाठी शास्नाकडे पैसं न्हायीत पण तुम्हा अमेरिकावाल्या धनिकांच्या बोडक्यावर घालायला हायीत.. पोट दुखंल नाहीतर काय!!
>>मराठी चा प्रसार, आम्ही नक्की करणार!<<
म्हंजी नक्की काय?
>>जरी अंकुष, प्रशांत येणार,आणी द.मा. फ.मु. येवो, आम्ही भांडी घरी धुणार!<<
आगं बाबौ.. अंकुश (ष नव्हे काय!) आणि प्रशांत ह्ये कोन? नट हायीत म्हायती होतं. साहित्तिक बी हेत का? द.मा., फ.मु. अजून कोनीबी आना घरची भांडी आमची आम्हालाच घासावी लागतात की वो? तसं तर तुमच्या अमेरिकेमंदी पण धुण्याभांड्याला बाई नसतीच!
>>जरी कवी घरी येवो, तुम्ही डबक्यात डुंबणार!<<
कवी घरी आल्यावर कोन कंच्या ग्लासात डुंबणार तेची फिकीर करा राव!
>>अरे 'कला, कला' मित्रानो, वर्तमान पत्रे लिहीणार,
मैत्रिचा हात पुढे करो, आम्ही खोडा घालणार!<<
काय पन विनोदी बोलता तुम्ही...
>>अरे माझ्या मित्रांनो मित्रांनो, तुम्ही वकील असणार,
जरी घाला बहिष्कार, माझे शत्रू नसणार!<<
त्ये गांधीवादी कुटं गेलं हे?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
5 Feb 2009 - 10:11 am | विसोबा खेचर
अरे खेकड्या मित्रानो, किती खर्च करणार,
शासन जरी म्दत करो, तुम्हा पोटात दुखणार!
अहो पण शासनाचे पैसे म्हणजे आमचेच पैसे ना? मग ते महाराष्ट्रात राहणार्या आम साहित्यप्रेमींसाठीच खर्च झाले पाहिजेत ना?
पोटात दुखेल नायतर काय भांचोत?
आणि ज्ञानेश्वरा, तू कसल्या रे मराठीच्या गप्पा मारतोस? तुला लेका अजून तुझा आयडी नाय मराठीत करता आला! :)
अरे खेकड्या मित्रांनो, किती चिखल फेकताहो,
जरी मंडळ वाईट, पहिले संमेलन सही होणार!
चला, म्हणजे मंडळ वाईट आहे हे तुलाही मान्य आहे तर! :)
आपला,
(मराठी भाषेचा प्रसार करू अश्या केवळ गप्पा न मारता अंतरजालावर तिचा प्रसार आणि प्रचार करणारा!) तात्या.
6 Feb 2009 - 4:27 am | केदार
ही मराठी कविता (की विडंबन)निदान कोणाकडून तपासून घ्यायची होती. मग कवितेचा प्रसार करता आला असता.
5 Feb 2009 - 9:23 am | मुक्तसुनीत
सर्वप्रथम मला हे लिहायला हवे की, माझे प्रस्तुत मत एक सामान्य मराठी भाषक /वाचक या नात्याने आहे. त्यात संमेलनाच्या बाजूने किंवा विरोधी अशी भूमिका घेण्यात मला बिलकुल राजकीय किंवा इतर कुठला स्वार्थ नाही. गेले काही महिने चाललेला वाद-विवाद मी वाचतोय. ते लिखाण आणि हा धागा वाचून मला जे वाटले तेच लिहितो आहे.
ज्ञानेश्वर यांच्यासारखे , संमेलन-कर्त्यांच्या वतीने जे बोलत आहेत त्यांच्या बाजूचा एक मोठा कमकुवत पैलू मला हा दिसतो की , त्यांच्याकडे प्रतिवाद करायला ठोस मुद्दे दिसत नाहीत. खुद्द ज्ञानेश्वर हे सुद्धा, संमेलन कर्त्यांचे अधिकृत प्रवक्ते किंवा साधे कार्यकर्ते आहेत असे त्यांनी कुठेही म्हण्टलेले दिसत नाही.
थोडक्यात असे, की मिसळपावच नव्हे तर अनेकानेक वृत्तपत्रे , संस्था , व्यासपीठे यांच्यावर , या संमेलनाला विरोध झाला आहे आणि ही आजची गोष्ट नव्हे. यापैकी कुठल्याही आघाडीवर , देवकूळे आणि पार्टीने संवाद साधला आहे , आरोपांचे खंडन केले आहे, काही सफाई दिली आहे असे माझ्यासारख्या सामान्य मराठी भाषकास माहिती नाही. (मराठी आंतरजालावरच्याना , या उत्तरदायित्त्वाच्या अभावाच्या या घटनेवरून काही गोष्टींची आठवण येऊ शकेल ..)
ज्ञानेश्वर यांच्यासारख्या लोकांकडे अभिनिवेश आहे पण त्यांच्या तात्त्विक किल्ल्याला जी भगदाडे पडलेली आहेत त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि या भगदाडांना "झारीतल्या शुक्राचार्यांनी पाडलेली छिद्रे" असे समजून मोकळे होतात. किंबहुना , आता ही गोष्ट स्पष्ट आहे की , "तात्विक बाजू" या गोष्टीचा , या मंडळीना फारसा थांगपत्ता नसावा. त्यांनी कनेक्शन्स जुळवली आहेत , मंत्री-संत्री , कला-क्रीडादि क्षेत्रातली मंडळी , ट्रॅव्हल एजन्ट्स, व्हिसा ...सर्व सर्व तय्यार आहे. मात्र ज्या लोकांकरता हे करायचे त्या लोकांकरताचे उत्तरदायित्त्व धाब्यावर बसलेले आहे. माझी स्मृती मला दगा देत नसेल तर , २६ नव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यानंतर रत्नागिरीचे संमेलन रद्द झाले. सॅन होजे वाल्यानी इथेदेखील कोळून प्यालेली दिसते.
संमेलनकर्त्यांपेकी कुणी मिपावरच काय , कुठल्याही व्यासपीठावर येऊन काही एक भूमिका , काही मुद्देसूद उत्तरे देण्याची अपेक्षा व्यर्थ आहे हे तर सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
5 Feb 2009 - 9:57 am | विसोबा खेचर
मुक्तरावांचा प्रतिसाद आम्हाला अत्यंत आवडला. अगदी पटण्याजोगाच आहे..
"तात्विक किल्ल्याला भगदाडे" हे शब्द आवडून गेले! :)
तात्या.
5 Feb 2009 - 11:07 am | एक
आपली माहिती बरोबर आहे.
सॅन होजे वाल्यानी इथेदेखील कोळून प्यालेली दिसते
१०००% सहमत. पैशाला हपापलेले आहेत साले...
6 Feb 2009 - 12:11 am | सर्किट (not verified)
संमेलनाच्या पहिल्या दिवशी, मुंबईत अतिरेकी हल्ल्याला बळी पडलेल्यांना मंडळ श्रद्धांजली अर्पण करणार आहे. त्यासाठी त्यांना धीरगंभीर आवाजाचे कुणीतरी हवे आहे, म्हणून माझ्याकडे विचारणा झाली होती. परंतु पहिल्या दिवशी मी संमेलनात अनुपस्थित असल्याने मला जमणार नाही, असे कळवले. इथे कुणाचा आवाज धीरगंभीर असेल, तर त्यांनी मंडळाशी संपर्क साधावा.
-- सर्किट
6 Feb 2009 - 3:03 am | कोलबेर
म्हणजे, दुसर्या दिवसापासून तुम्ही तिकडेच असणार असे गृहीत धरायचे का?
च्यायला, नेमके तुम्ही कुठल्या पार्टीतले ते (नेहमी प्रमाणेच) कळेना झालंय राव!!
6 Feb 2009 - 3:26 am | सर्किट (not verified)
रीतसर खिशाला चोट देऊन तिकीट काढले आहे (१५० डॉलरचे). त्यामुळे संमेलनाला हजर राहणारच आहे. फक्त पहिल्या दिवशी कामानिमित्त परगावी असल्याने जमणार नाही.
च्यायला, नेमके तुम्ही कुठल्या पार्टीतले ते (नेहमी प्रमाणेच) कळेना झालंय राव!
चालायचेच !
:-) :-)
-- सर्किट
6 Feb 2009 - 4:05 am | मुक्तसुनीत
जर का कुणी पक्षनिरपेक्ष भूमिका घेतली असेल तर (निदान अशा बाबतीत तरी) हे स्वागतार्ह मानायला हवे. "जर तुम्ही आमच्याबरोबर नसाल तर तुम्ही आमच्या विरोधातच असला पाहिजे" असा, निर्बुद्ध "झिरो सम" खेळ खेळणारे टेक्सास रांचला गेले परत.
थोडासा ठोकताळा करायचाच झाला तर :
साहित्य संमेलन अमेरिकेला होते हे चांगले का ? अशा प्रकारचा पायंडा पडणे योग्य का ? : हो.
देवकुळे आणि कंपणीने हे मिशन एका स्वयंसेवी आणि विश्वस्त भूमिकेतून केले असल्यास त्यांच्या उपक्रमशीलतेची , श्रमांची , प्रयत्नांची दखल घेतली पाहिजे का ? : हो
मात्र हे करताना या मंडळींनी अनेकविध पातळ्यांवरचा विधिनिषेध , उत्तरदायित्व यांचे दर्शन घडवले असे म्हणता येईल का ? : मोठ्या प्रमाणावर सांगायचे , तर नाही.
याकरता २५ लाख रुपये बुडीत खात्यातल्या महाराष्ट्र सरकारकडून घेतले असले तर ते बरोबर का ? : नाही.
२६ नव्हेंबरच्या घटनानंतर , जेव्हा या संमेलनाचे भावंड रद्द केले जाते तेव्हा हे संमेलन भरवणे योग्य का ? नाही.
तेव्हा , माझ्या दृष्टीने , गोळाबेरीज करताना , अनिष्ट बाबींचे पारडे वरचढ ठरते असे दिसते.
आता संमेलन होणार हे तर अटळ आहे. मग देवकुळे नि कंपनीला थोडेसे परिमार्जन कसे करता येईल ?
- २५ लाख रुपये परत देणे (घेतले असल्यास !). किंवा त्याचा विनियोग महाराष्ट्रात समाजोपयोगी कार्याला करणे.
- संमेलनाचे सूप वाजल्यानंतर तरी, कुठल्या ना कुठल्या व्यासपीठावर काही स्पष्टीकरणे देणे.
- संमेलनातून काही आर्थिक फायदा झाला असेलच तर , साहित्योपयोगी/समाजोपयोगी कार्याला हे पैसे देणे.
-
6 Feb 2009 - 4:36 am | कोलबेर
खिशाला 'चोट' देणे म्हणजे काय हो?
खिशाला चाट लावणे ऐकले होते, 'चोट देणे' हे काही नविन आहे का? :D
आजकाल मिपावर शब्दांना चोट हा प्रत्यय लागला की चांदण्या पडत आहेत. तसली तर काही भानगड नाही ना? ;)
6 Feb 2009 - 4:48 am | मुक्तसुनीत
अनेक शक्यता :
१. सर्वाधिक शक्यता : फ्रॉईडीयन स्लिप् (मागे कुणीतरी "देवखुळे" असे म्हणून केली होती तशी) . म्हणजे मजे खरोखरी म्हणायचे होते ते "चुकून" म्हणून जाणे ;-)
२. मराठी " खिशाला चाट देणे" आणि हिंदी "पैसेकी चोट खाकर" या दोन भाषांचा गंगाजमनी मनोहारी संगम. =))
३. दादाकोंडके सदृष काहीतरी भयभीषण कोटी - जी आपण सर्व पामरांस झेपणार नाही अशी !
28 Nov 2010 - 1:22 pm | तिमा
रीतसर खिशाला चोट देऊन
आँ ? आपल्याला चाट असे म्हणायचे आहे का ? आम्हाला भलतीच शंका आली.
6 Feb 2009 - 12:14 am | सर्किट (not verified)
खुद्द ज्ञानेश्वर हे सुद्धा, संमेलन कर्त्यांचे अधिकृत प्रवक्ते किंवा साधे कार्यकर्ते आहेत असे त्यांनी कुठेही म्हण्टलेले दिसत नाही.
असे स्पष्ट म्हणायला कशाला हवे ? मिसळपावाच्या चालकांना त्यांचा इमेल आयडी माहिती आहेच की ! आणि त्यांना मिसळपावाच्या चालकांचा मोबाईल नंबर माहिती आहे.
-- सर्किट
6 Feb 2009 - 12:02 am | मानस
कवी घरी आल्यावर कोन कंच्या ग्लासात डुंबणार तेची फिकीर करा राव!
नुसते कवी कशाला ..... इतके स्वच्छ आणि सरळ छान छान कलाकार आहेतच, ग्लास कसा पुरेल ..... टाक्या लागतील.
या संमेलनाला जो खर्च होणार आहे, तेव्हढा खर्च बे एरिया मराठी मंडळाने महाराष्ट्र शासनाला द्यावा नंतर 'Dyaneshwar' सारख्या लोकांनी गप्पा माराव्यात.
8 Feb 2009 - 8:03 am | जीएस
मंडळाने आधी स्वतः सगळा खर्च करतो, कौतिकराव (फुकटे) पाटील यासह अनेकांना फुकट वारी घडवतो अशी प्रलोभने दाखवून संमेलनाला मान्यता मिळवली आणि आता लटपटी खटपटी करून महाराष्ट्र शासनाकडूनच जनतेचे पैसे लाटण्यात यश मिळवले आहे.
आता संमेलन होतेच आहे तर जे काही करायचे ते स्वतःच्या पैशांनी करा, आम्हा करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारुन गल्ला भरू नका एवढेच बे एरिया महाराष्ट्र मंडळाला सांगणे आहे.
बीएमेमनेही त्यांच्या उपक्रमांसाठी सरकारकडून मदत पदरात पाडून घेणे गैर आहे.
या लुटीविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असे वाटते.
10 Feb 2009 - 11:56 am | श्रीपाद_कुलकर्णी
आताच सकाळ मध्ये 'संमेलनाध्यक्ष पानतावणे यांची आयोजकांवर नाराजी' ही बातमी वाचली. एकंदरीत 'घोळ इथला संपत नाही' अशी परिस्थीती झाली आहे.
--> श्रीपाद कुलकर्णी
11 Feb 2009 - 5:34 pm | रमेश जोशी
जे येथे तेच तेथे. व्वा व्वा .
8 Mar 2009 - 10:51 am | अडाणि
बरेच दिवस होउन गेले ह्या लेखाला पण संमेलन झाल्यानंतर कोणी इथे टिप्पणी केलेली दिसत नाही. संपादकीय लेखाला असे वार्यावर सोडणे बरे नाही. सर्किट ह्यांना काही उत्तर आले का देवकुळेंचे? एकंदर संमेलनाचे कार्यक्रम (दिवसभरातले... संध्याकाळी किंवा रात्रीचे नाहीत) बघून संमेलन चांगले झाले असे वाटते. धर्माधिकारी आणि बाकी व्यक्त्यांचे विचार फार मुद्देसुद होते.
ह्या लेखातील बरेचसे मुद्दे खोडले गेलेत असे वाटते. जाणकार लोकांनी ह्यावर प्रकाश टाकावा....
अफाट जगातील एक अडाणि.