आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले.
खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते.
विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर.
.
.
.
प्रतिक्रिया
18 Sep 2016 - 8:16 am | झेन
+11111
18 Sep 2016 - 8:43 am | खटपट्या
हमीद दाभोळकरला कोणीच गुरुस्थानी मानलेले नाही. बाकी वरील उद्गारावरून त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला.
18 Sep 2016 - 8:45 am | हेमन्त वाघे
केवळ त्यांच्या आडनावामुळे नव्हे तर निव्वळ त्यांच्या उज्ज्वल स्वकर्तृत्वामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सध्याचे सर्वेसर्वा बनलेले थोर विचारवंत श्री हमीद दाभोळकर (कोण रे तो घराणेशाही, घराणेशाही म्हणून ओरडतोय? गप्प करा त्याला. लोकशाहीविरोधी फाशीष्ट कुठला! ). तर असे थोर्थोर विचारवंत श्री हमीद दाभोळकर ह्यांनी 'मातीची बकरी' ह्या मोहिमेवरचे त्यांचे मौलिक विचार नुकतेच व्यक्त केले.
सकाळमध्ये आलेल्या बातमीनुसार बकरी ईदला खरीखुरी जिवंत बकरी कुर्बान न करता त्याऐवजी 'मातीची बकरी' करून ती कुर्बान करावी अशी एक मोहीम काही लोकांनी राबवली होती. थोर्थोर विचारवंत श्री दाभोळकर ह्यांच्या मते ही मोहीम चुकीची असून 'धर्माधर्मात तेढ वाढवण्याच्या खोडसाळ उद्देश्याने चालवलेली आहे'. 'धार्मिक संकल्पनांचे निव्वळ स्वतःला हवेतसे अर्थ लावण्याऐवजी त्यातील भावार्थ समजून घेण्याचा लोकांनी प्रयत्न करायला हवा' असे समंजस, मानवतावादी वगैरे आवाहनही त्यांनी लोकांना केले.
हमीद गुर्जींचे म्हणणे आहे की ईदला बकरा कापणे ह्या धार्मिक संकल्पेनाला भावार्थ आहे, पण दसऱ्याला बळी दिला तर ती मात्र अंधश्रद्धा असून त्या अंधश्रद्धेचा कसून विरोध करायला पाहिजे बर्का मुलांनो? आणि हो, ह्याला दुटप्पीपणा म्हणत नाहीत, हा एक थोर पुरोगामी विचार आहे. तेव्हा वाजवा आता जोरदार टाळ्या!
18 Sep 2016 - 8:47 am | हेमन्त वाघे
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=cB3JQI
खालील प्रतिक्रिया जरूर वाचा !
'मातीची बकरी' ही खिल्ली उडवणारी चर्चा मोहीम
- - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 सप्टेंबर 2016 - 06:32 PM IST
Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=cB3JQI
Tags: #dr hamid dabholkar, eid, religious, social networking, pune
नेटिझन्सच्या ‘ट्रोलिंग‘ला हमीद दाभोलकरांचे उत्तर, विवेक जपण्याचे केले आवाहन
पुणे- "सध्या केवळ कुणालातरी टोमणा मारावा आणि धर्मधर्मात तेढ वाढवावी, अशा नकारात्मक उद्देशाने काही समाजमाध्यमांतून बकरी ईद निमित्त खऱ्याखुऱ्या जिवंत बकरीऐवजी ‘मातीची बकरी‘ कुर्बान करावी, अशी खिल्ली उडवणारी चर्चा मोहीम राबवली जात आहे. मात्र, असे अपप्रचार करणाऱ्यांचा उद्देश पुरेसा स्वच्छ नाही, हे लगेच लक्षात येते. चुकीच्या प्रथेला विधायक पर्याय देण्याचा विचार आणि विरोधासाठी विरोध यात फरक आहे, हे लक्षात घ्यायला हवे," अशा शब्दांत डॉ. हमीद दाभोलकर यांनी समाजमाध्यमांवरील चर्चांना उत्तर दिले.
याचवेळी त्यांनी ‘भिन्न भिन्न धर्माचे सहअस्तित्व हे त्यांच्या वेगळेपणासह आणि विवेक जपत मान्य करायला हवे. धार्मिक संकल्पनांचे निव्वळ हवेतसे अर्थ लावण्याऐवजी त्यातील भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा,‘ असे आवाहनही केले.
बुधवारी एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असताना डॉ. दाभोलकर यांनी आपली ही मतं व्यक्त केली. ते म्हणाले, " खरंतर, धर्माधर्मात वितुष्ट न निर्माण करता त्यांच्या असणारा संवाद कसा उन्नत होईल, हे समाजमाध्यमांनी पाहायला हवे. आज ‘मातीची बकरी‘ करण्याचे सल्ले जेही कुणी देताहेत, त्यांनी एका अर्थाने कधीकाळी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस नको, मातीच्या गणेशमूर्ती हव्यात‘ ही आमच्याप्रमाणे अनेकांनी दिलेली हाक आज मान्य केली आहे आणि तिला त्यांचा आजवर असणारा विरोधही अप्रत्यक्षपणे मान्यच केला आहे. एका अर्थाने त्यांनी धर्म चिकित्साच तर मान्य केली आहे."
... हे समाजबदलाचे द्योतक
डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, " ‘विसर्जित गणपती दान करा‘, या आमच्या मोहिमेला वीस वर्षांपूर्वी प्रचंड विरोध झाला होता. आज मात्र हाच विचार न्यायालय, शासन-प्रशासन आणि अगदी नागरिकांच्या पातळीवरही स्वीकारला गेला असल्याचे दिसून येईल. आज आम्ही गणेश विसर्जन हे पर्यावरणपूरक करू, असे जेव्हा पुण्यातील मानाचे पहिले पाच गणपती म्हणतात, तेव्हा ते बदलत्या समाज मानसाचे द्योतक असते."
18 Sep 2016 - 8:47 am | हेमन्त वाघे
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=cB3JQI
खालील प्रतिक्रिया जरूर वाचा !
'मातीची बकरी' ही खिल्ली उडवणारी चर्चा मोहीम
- - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 सप्टेंबर 2016 - 06:32 PM IST
Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=cB3JQI
Tags: #dr hamid dabholkar, eid, religious, social networking, pune
नेटिझन्सच्या ‘ट्रोलिंग‘ला हमीद दाभोलकरांचे उत्तर, विवेक जपण्याचे केले आवाहन
पुणे- "सध्या केवळ कुणालातरी टोमणा मारावा आणि धर्मधर्मात तेढ वाढवावी, अशा नकारात्मक उद्देशाने काही समाजमाध्यमांतून बकरी ईद निमित्त खऱ्याखुऱ्या जिवंत बकरीऐवजी ‘मातीची बकरी‘ कुर्बान करावी, अशी खिल्ली उडवणारी चर्चा मोहीम राबवली जात आहे. मात्र, असे अपप्रचार करणाऱ्यांचा उद्देश पुरेसा स्वच्छ नाही, हे लगेच लक्षात येते. चुकीच्या प्रथेला विधायक पर्याय देण्याचा विचार आणि विरोधासाठी विरोध यात फरक आहे, हे लक्षात घ्यायला हवे," अशा शब्दांत डॉ. हमीद दाभोलकर यांनी समाजमाध्यमांवरील चर्चांना उत्तर दिले.
याचवेळी त्यांनी ‘भिन्न भिन्न धर्माचे सहअस्तित्व हे त्यांच्या वेगळेपणासह आणि विवेक जपत मान्य करायला हवे. धार्मिक संकल्पनांचे निव्वळ हवेतसे अर्थ लावण्याऐवजी त्यातील भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा,‘ असे आवाहनही केले.
बुधवारी एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असताना डॉ. दाभोलकर यांनी आपली ही मतं व्यक्त केली. ते म्हणाले, " खरंतर, धर्माधर्मात वितुष्ट न निर्माण करता त्यांच्या असणारा संवाद कसा उन्नत होईल, हे समाजमाध्यमांनी पाहायला हवे. आज ‘मातीची बकरी‘ करण्याचे सल्ले जेही कुणी देताहेत, त्यांनी एका अर्थाने कधीकाळी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस नको, मातीच्या गणेशमूर्ती हव्यात‘ ही आमच्याप्रमाणे अनेकांनी दिलेली हाक आज मान्य केली आहे आणि तिला त्यांचा आजवर असणारा विरोधही अप्रत्यक्षपणे मान्यच केला आहे. एका अर्थाने त्यांनी धर्म चिकित्साच तर मान्य केली आहे."
... हे समाजबदलाचे द्योतक
डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, " ‘विसर्जित गणपती दान करा‘, या आमच्या मोहिमेला वीस वर्षांपूर्वी प्रचंड विरोध झाला होता. आज मात्र हाच विचार न्यायालय, शासन-प्रशासन आणि अगदी नागरिकांच्या पातळीवरही स्वीकारला गेला असल्याचे दिसून येईल. आज आम्ही गणेश विसर्जन हे पर्यावरणपूरक करू, असे जेव्हा पुण्यातील मानाचे पहिले पाच गणपती म्हणतात, तेव्हा ते बदलत्या समाज मानसाचे द्योतक असते."
18 Sep 2016 - 8:52 am | टवाळ कार्टा
ते ठिकाय आहे पण तुम्ही डॉल्बीला सपोर्ट करता त्यामुळे तुम्हाला दुसऱयांकडे बोट दाखवायचा नैतिक अधिकार नाही
18 Sep 2016 - 8:58 am | संदीप डांगे
हाण च्यामारी! ;)
18 Sep 2016 - 8:58 am | चंपाबाई
रोज खारा नैवेद्य खाणारे हिंदु देव - देव्याही मातीच्या बकरी/कोंबडीवर समाधान मानतील का?
18 Sep 2016 - 6:35 pm | श्री गावसेना प्रमुख
ते ठिक आहे चम्पक राव पन एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ह्यांनिच(अनीस किंवा त्यांचे प्रोप्रायटर दाभोळकर ह्यांनी) सत्यनारायण का ठेवावा हे कळले नाही आणी त्यांचे उपदेश हे फक्त हिन्दुंना का असतात हे सुद्धा नाही उमगले.नाही म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या वापरु नका,नवसाला बळी देउ नका ई ई उपदेश फक्त हिंदुना का देतात्, सैतानाला दगड मारतांना किति मुस्लिम मरतात (मागे तिथल्या चेंगराचेंगरीत मेलेल्या मुस्लिमांचे मृतदेह तिथल्या सरकारने जे सि बी ने साफ केले होते)त्यांनाही सांगावे कि बाबांनो हे असे दगड मारने चांगले नव्हे.
19 Sep 2016 - 9:45 am | सुबोध खरे
त्यांनाही सांगावे कि बाबांनो हे असे सैतानाला दगड मारने चांगले नव्हे.
असे सल्ले दिले तर अत्यंत दयाळू धर्माचे अनुयायी फतवा काढतील ना ईश्वर निंदा(blasphemi) केली. याची शिक्षा फाशी आहे.
मग हमीद साहेबाना टोंगा किंवा सॉलोमन बेटे अशा कुठल्या तरी देशात आश्रय घ्यावा लागेल किंवा उत्तर ध्रुवावरील "अस्वलाच्या उवां"वर संशीधन करायला रशियन शिष्यवृत्ती घेऊन सैबेरियाच्या उत्तरेला जायला लागेल ना.
तुम्ही काय पण बोलता राव.
23 Sep 2016 - 4:30 pm | ओम शतानन्द
चम्पूताई,
रोज खारा नैवेद्य खाणार्या हिन्दु देव देव्या ची नावे सान्गशील का?
18 Sep 2016 - 9:25 am | विवेकपटाईत
कठपुतल्या नाचविनार्याच्या तालावर नाचतात. ताल जर सेकुलर असेल तर फक्त एका विशिष्ट धर्म परंपरांचा विरोध करतील बाकींचा नाही. हमीद साहेब हि एक कठपुतली आहेत. नुकतीच बातमी वाचली मुस्लीम राष्ट्रीय मंचाने जनावरांना आपल्या हाताने चारा खाऊ घालून बैतुल मध्ये ईद साजरी केलील. खरे अंधश्रद्धा विरोधी कोण आणि खोटे कोण सहज कळते.
18 Sep 2016 - 9:34 am | भोळा भाबडा
साहना हा आयडी अभिराम दिक्षीतचा आहे का??
18 Sep 2016 - 9:59 am | साहना
हे अभिराम दीक्षित कोण आहेत ? वरील छायाचित्र व्हाट्सअँप द्वारे कुणी तरी पाठवले होते.
18 Sep 2016 - 11:24 am | भोळा भाबडा
फेसबूक वर शोधा सापडतील ते!!
ते आमचे गुरू आहेत आणि मंगेश सपकाळ आमचे दैवत आहे.
23 Sep 2016 - 4:31 pm | ओम शतानन्द
१ नं
18 Sep 2016 - 9:51 am | प्रकाश घाटपांडे
हे अस काहीतरी होते अन अंनिस चा सहानुभूतीदार वर्ग वेगाने दुरावायला सुरुवात होते
असो
18 Sep 2016 - 12:18 pm | अनिरुद्ध.वैद्य
अॅडा आम्हास दुरावणार्यांमध्ये.
18 Sep 2016 - 1:25 pm | मोदक
अहो चांगले आहे की, बुरखे टराटरा फाटत आहेत.
18 Sep 2016 - 10:01 am | साहना
नैतिकतेचा माझा कंपास कधीच हरवलेला असल्याने मी खुशाल बोटे दाखवते.
18 Sep 2016 - 10:51 am | टवाळ कार्टा
Hats off then, you are different ....you accept it publicly :)
18 Sep 2016 - 2:32 pm | फेदरवेट साहेब
बहुदा तै फक्त मनात साठलेले गरळ ओकायला मिपावर येतात हे कबूल करीत असाव्यात असे वाटते
(घाबरलेला)
ढेल्या
18 Sep 2016 - 2:00 pm | क्षमस्व
लै भारी हाणलात।।।।
18 Sep 2016 - 2:09 pm | भालचंद्र_पराडकर
दणदणित बोलता एकदम...
18 Sep 2016 - 10:07 am | गॅरी ट्रुमन
याविषयीच ३-४ दिवसांपूर्वी फेसबुकवर आणि मिपाच्या खरडफळ्यावर लिहिले होते ते इथे पेस्ट करत आहे:
"ऐशी की तैशी या बुबुडाविपुमाधविंची (बुध्दीजीवी बुध्दीप्रामाण्यवादी डावे विवेकवादी पुरोगामी मानवतावादी धर्मनिरपेक्ष विचारवंतांची).हे बुबुडाविपुमाधवि असले काहीतरी बरळतात ना म्हणून जाम डोक्याला शॉट लागतो.
जर का मानवता हाच धर्म असेल तर कुठल्याही कारणामुळे कुणाही जीवाची हत्या करणे हे कधीच समर्थनीय होणार नाही.मग ते देवळांमध्ये कापल्या जाणार्या कोंबड्या बकर्यांप्रमाणेच बकरी ईदच्या दिवशी 'कुर्बान' केल्या जाणार्या बकर्यांनाही तितकेच लागू होते.मी शाळेत असताना नेपाळला गेलो होतो.तिथे एका देवळात शिरत असताना समोरच कोंबडा कापताना बघावा लागण्याचे दुर्भाग्य आले होते.त्या प्रकाराचा भयंकर संताप आला आणि असल्या ठिकाणी देव असूच शकत नाही हे लगेचच समजले.कुठले देऊळ होते हे आता लक्षात नाही पण बहुदा पोखर्यामधले बर्यापैकी महत्वाचे देऊळ असावे.त्या मूर्तीचे दर्शन न घेताच ताबडतोब तिथून बाहेर पडलो होतो हे स्पष्ट आठवते.
आता वळू या श्री.रा.रा हमीद दाभोळ(ल)कर काय म्हणतात त्याकडे.जर का मी ज्या कारणासाठी देवळांमध्ये बकरे कापू नयेत ही मागणी करतो त्याच कारणासाठी बकरी ईदलाही बकरे 'कुर्बान' करू नयेत ही मागणी केली तर ती टोमणा मारायला किंवा धर्माधर्मात तेढ वाढावी या उद्देशाने हा जावईशोध त्यांनी कुठून लावला? आणि वर 'हा अपप्रचार करणार्यांचा हेतू पुरेसा शुद्ध नाही हे लगेच लक्षात येते' ही मखलाशी हे करणार.म्हणजे कुणाचा हेतू शुध्द आणि कुणाचा अशुध्द हे हे दीडशहाणे ठरविणार का? अटरली युजलेस!!जर का आमचा हेतू पुरेसा शुध्द नाही हे कुणाच्या लक्षात येतच असेल तर ते असल्या गुडघ्यातल्या बिनडोक बुबुडाविपुमाधविंच्याच.
दाभोळ(क)र पुढे म्हणतात की धार्मिक संकल्पनांचे निव्वळ हवे तसे अर्थ न लावता त्याचा भावार्थ समजून घ्यायला हवा. वा.वा.वा. टाळ्या. हजारो टाळ्या वाजवाव्यात, इतक्या टाळ्या वाजवाव्यात की हात दुखायला लागावा अशी इच्छा होत आहे.काही दिवसांपूर्वीच मी इथेच फेसबुकवर लिहिले होते की आपल्या जुन्या परंपरांमध्ये विज्ञान कसे आहे याचा ओढूनताणून बादरायण संबंध जोडणार्या संस्कृतीवाद्यांची बकवास ऐकून डोक्याला शॉट जातो.आता हे दाभोळ(ल)कर साहेब बकर्याच्या मानेवरून सुरा फिरवून त्याच्या नसांमधून जास्तीत जास्त रक्त वाहून जास्तीत जास्त काळ जिवंत ठेऊन आणि त्याचे कसे हालहाल होत आहेत हे बघायच्या (साध्या शब्दात 'हलाल' करायच्या) नृशंस परंपरेचा भावार्थ समजावून घेतला पाहिजे असे म्हणतात? अरे एका मुक्या निरपराध जीवाला हालहाल करून मारायचा कसला भावार्थ आला आहे?आणि हे असले ढोंगी लोक वर मोठ्या तोंडाने मानवता मानवता ही जपमाळ ओढताना दिसले की तळपायाची आग मस्तकात नाही तर अस्मानात जाते. अटरली डिजगस्टींग!!
या दाभोळ(ल)करांची बडबड पुढे चालूच आहे. मातीचा बकरी कापा हे सल्ले देणार्यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरीस नको, मातीच्या गणेशमूर्ती हव्यात ही भूमिका आणि तिला त्यांचा आजवर असलेला विरोध अप्रत्यक्षपणे मान्य केला आहे आणि एका अर्थी धर्मचिकित्सा मान्य केली आहे!! म्हणजे मातीची बकरी कापा हे सल्ले देणारे सगळेच प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्तींना विरोध करणारे असतात का?अशांमध्ये माझ्यासारखेही अनेक लोक आहेत जे म्हणतात की गणेशोत्सवच नको--अगदी कुठलीच मूर्ती नको. मातीची पण नको आणि प्लॅस्टर ऑफ पॅरीसची पण नको.आमच्यासारख्यांचे काय?
या असल्या बुबुडाविपुमाधविंना नक्की काय म्हणावे?ढोंगी? पाताळयंत्री?दुटप्पी?आतल्या गाठीचे?की अन्य काही?"
18 Sep 2016 - 10:36 am | प्रसाद_१९८२
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत!
18 Sep 2016 - 10:38 am | संदीप डांगे
+11111111111
18 Sep 2016 - 10:55 am | प्रकाश घाटपांडे
सह्मत आहे
या पार्श्वभूमीवर एका पुरोगाम्याचे आत्मपरिक्षण व त्यावरील चर्चा वाचावी
न पटणारा विचार सोडून द्यावा बाकीचा तर घ्यावा. समजा दहातले चार मुद्दे पटत नाही तर उरलेल्या सहा मुद्द्यांवर सहमतीतून सकारात्मक काम करावे. आपल्या मनात देखील परस्पर विरोधी विचारांचे द्वंद्व असतेच की!
18 Sep 2016 - 1:23 pm | गॅरी ट्रुमन
याविषयी असहमत असायचा प्रश्नच नाही.
फक्त कधीकधी हे स्वयंघोषित पुरोगामी अनेक मुखवटे सादर करतात की त्यापैकी नक्की कोणत्या मुखवट्यावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न नक्कीच पडतो.आणि होते असे की असे वेगवेगळे मुखवटे परिधान करणारे लोक स्वतःची विश्वासार्हता पूर्ण गमावून बसतात आणि त्यामुळे त्यांचे बोलणे गांभीर्याने घेणे बंद केले तर मग परत "उरलेल्या ६ मुद्द्यांवरही सकारात्मक काम होत नाही" म्हणून उलटी कोल्हेकुईही करतात.
आमचा जातीपातीत विश्वास नाही हा यांचा दावा नेहमीच असतो.पण तो दावा किती फोल आहे हे काही गोष्टींवरून लक्षात आले.
अंतर्नाद या नियतकालिकात लेख लिहिणारे एक विचारवंत आहेत.माझ्या माहितीप्रमाणे तिकडे दिवाळी अंकातही ते बहुदा (वेगळ्या विषयांवर) लिहितात. त्यांचा दावा असतो की ज्या परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली त्या परशुरामाला आपला आद्य पुरूष मानणार्या ब्राह्मणांची मला किव येते!!पूर्वीच्या काळी पुरोहितशाहीने माजविलेल्या कर्मकांडांच्या स्तोमाला माझा तरी अगदी प्रखर विरोध आहे आणि त्यावर मी मिपावर लिहिलेही आहे. पण या विचारवंतांचे लॉजिक अगदीच पूर्णच गंडलेले आहे. याविषयी मी त्यांच्याशी अगदी भिडलोही आहे. त्याचा काही उपयोग झाला नाही ही गोष्ट वेगळी.
१. एक तर कोणी २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय कशी करू शकेल? हे बोलणे म्हणजे "आमच्या घराण्यात ब्रह्मचर्याची परंपरा आहे. माझे आजोबा ब्रह्मचारी होते, माझे वडिल ब्रह्मचारी होते, मी ब्रह्मचारी आहे आणि माझा मुलगाही ब्रह्मचारी असेल" असे म्हणण्यासारखे झाले. एकदा पृथ्वी नि:क्षत्रिय केली की झाले. मग परत दुसर्यांदा, तिसर्यांदा नि:क्षत्रिय करण्यासाठी क्षत्रिय येतीलच कुठून? बरं असे म्हटले की या कत्तलीतून लहान मुले आणि स्त्रियांना सोडले आणि लहान मुले मोठी झाली मग त्यातून क्षत्रिय वाढले आणि मग परत दुसर्यांदा, तिसर्यांदा ती नि:क्षत्रिय केली तरी याचा अर्थ परशुराम २१ पिढ्या कापून काढू शकेल इतकी वर्षे असला पाहिजे. एक पिढी २५ वर्षांची धरली तरी किमान ५२५ वर्षे तो असायला हवा. म्हणजे अर्थातच २१ वेळा नि:क्षत्रिय करणे वगैरे बकवास आहे, थाप आहे हे समजून यायला हरकत नसावी.
२. अगदी ही गोष्ट खरी आहे हे गृहित धरले तर मग मायथॉलॉजीमधील संदर्भ आपल्याला हवे तेव्हा घ्यायचे, हवे तेव्हा सोडायचे याला काय अर्थ आहे? म्हणजे मायथॉलॉजीमधील 'खुनी' परशुरामाला आपला आद्य पुरूष मानतात म्हणून हे ब्राह्मणांना झोडपणार पण मग मायथॉलॉजीमधीलच उल्लेखानुसार राम अयोध्येत जन्मला ही गोष्ट मात्र नाकारणार. हा ढोंगीपणा नाही का?
३. बरं परशुराम खरोखरच होऊन गेला, नाही गेला याचे कुठलेच पुरावे मिळणे शक्य नाही.म्हणजे एका काल्पनिक मनुष्याने केलेल्या काल्पनिक हिंसेसाठी हे सध्याच्या ब्राह्मणांना झोडपणार पण मग मध्यपूर्वेतल्या एका धर्माच्या संस्थापकांनी केलेल्या हिंसेचे काय?त्याविरूध्द हे मूग गिळून बसणार.बरं परशुरामाच्या नावावर २०१६ मध्ये दहशतवादी संघटना किती आहेत? जे.ई.एम मधील एम म्हणजे मधुसूदन नाही हे या पुरोगाम्यांना माहित असावे ही अपेक्षा.
४. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणाही माणसाकडे त्याची जात/धर्म इत्यादी लेबले न वापरता एक माणूस म्हणून बघावे हे एकीकडे बोलणार आणि परत ब्राह्मण या लेबलचा वापर करण्यात काही विसंगती आहे हे यांच्या गावीही नसते.
असल्या लोकांच्या १० पैकी ४ मुद्द्यांवर सहमती म्हणावी की ६ मुद्द्यांवर हे समजायचे कसे?कारण हे नक्की कुठला मुखवटा समोर ठेऊन बोलत आहेत हे समजायला लागणारी दिव्यदृष्टी माझ्याकडे तरी नाही.
या पुरोगाम्यांची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे या असल्या गोष्टींमुळे. उठल्यासुटल्या थोडे काहीतरी लिहितो आणि स्वतःला डायरेक्ट आगरकर आणि महर्षी कर्व्यांच्या परंपरेतला समजायला लागतो.त्या खरोखरच्या पुरोगाम्यांच्या आचार- विचार आणि उच्चारात एकवाक्यता होती.तिथेच हे स्वयंघोषित पुरोगामी गंडतात.आणि हो. कोण बोलत आहे याकडे लक्ष न देता काय बोलले जात आहे याकडे लक्ष द्यावे असल्या गोष्टी अत्यंत भाबड्या असतात असे माझे तरी स्पष्ट मत आहे. उद्या पॉल पॉट, हिटलर किंवा माओ उठून मानवाधिकारांवर लेक्चर द्यायला लागला किंवा आकंठ दारूत बुडलेला जर दारूबंदीवर लेक्चर द्यायला लागला तर ते "कोण बोलतोय यापेक्षा काय बोलतोय" याकडे लक्ष देऊन शिरसावंद्य मानण्याइतका भाबडा मी तरी नाही.
18 Sep 2016 - 3:32 pm | प्रकाश घाटपांडे
आपले मुद्दे पटणारे आहेत. आचार विचार यातील विसंगती हा सर्वांच्या बाबतीत लागू आहे.
बाकी पुरोगामी चळवळींची धर्मविषयक भूमिका हा सदानंद मोरे यांचा साधना साप्ताहिकातील जुना लेख इथे नमूद करतो.वाचनीय आहे.
18 Sep 2016 - 6:28 pm | गॅरी ट्रुमन
धन्यवाद
सहमत आहे.
पण होते कसे की स्वयंघोषित पुरोगामी इतरांना "तुम्ही मूर्ख आहात" अशा पध्दतीची भाषा वापरतात.त्यामुळे त्यांच्याविषयीच्या वर्तणुकीच्या अपेक्षा वाढतात.तू मूर्ख आहेस असे सांगितलेले कोणालाही आवडत नाही.हा मानवी स्वभाव झाला.अशी रोखठोक भाषा अगदी आगरकरांनीही वापरलेली आहे.पण गोपाळराव आगरकरांच्या आचार-विचार-उच्चारात एकवाक्यता होती त्यामुळे तत्कालीन समाजाच्या नसले तरी आजच्या समाजाच्या ते आदरास पात्र आहेत.पण अशी आचार-विचार-उच्चारात एकवाक्यता नसेल तर मात्र इतरांकडून कंबरड्यात लाथा पडणारच---तत्कालीन समाजाच्याच.भविष्यातील समाज अशा लोकांना लाथा घालायला जाणार नाही कारण 'एक ढोंगी' म्हणून अशांचा भविष्यात विसरही पडेल.
तेव्हा स्वयंघोषित पुरोगामी ज्या वाटेने जातात ती वाट अगदीच निसरडी आहे.समाजातील अनेक गोष्टी अगदी कोरडे ओढण्यायोग्य आहेत हे मान्य केले तरीपण ते करताना जर गोपाळराव आगरकरांसारखी एकवाक्यता असेल तर समाजाने कितीही टिका केली तरी एक ना एक दिवस आपले म्हणणे समाजाला पटेल हे कन्व्हिक्शन असेल आणि कितीही टिका झाली तरी विचलित व्हायला होणार नाही.पण तशी एकवाक्यता नसतील तर मात्र तुम्ही इतरांवर जितके लत्तेप्रहार करत आहात त्याच्या दहापट लाथा परत मिळणारच आहेत आणि मग तक्रार करून अजिबात उपयोग नाही.
एकेकाळी (म्हणजे फार जुनी गोष्ट नाही--५-६ वर्षांपूर्वी) मी पण बर्याच प्रमाणात स्वयंघोषित पुरोगाम्यांप्रमाणेच होतो.पण अजून आत्मपरिक्षण केल्यावर त्यातला फोलपणा माझ्या लक्षात आला.गोपाळराव आगरकरांप्रमाणे रोखठोक जरूर बोलावे पण त्यापूर्वी स्वतःला त्यांच्याइतक्या नैतिक उच्चतेच्या पातळीवर न्यावे आणि मगच बोलावे.त्या उच्च पेडेस्टलपासून मी कित्येक योजने दूर आहे हे समजले.असो.
18 Sep 2016 - 8:50 pm | प्रकाश घाटपांडे
अगदी मनातल बोललात. अनेक ठिकाणी मी हे मांडत असतो.
http://www.maayboli.com/node/49918?page=6#comment-3189597
18 Sep 2016 - 8:53 pm | संदीप डांगे
हेच म्हणणार होतो, अगदी घाटपांडे सर असच बोलतात
18 Sep 2016 - 8:52 pm | प्रकाश घाटपांडे
अगदी मनातल बोललात. अनेक ठिकाणी मी हे मांडत असतो.
http://www.maayboli.com/node/49918?page=6#comment-3189597
18 Sep 2016 - 8:57 pm | प्रकाश घाटपांडे
प्रतिसाद पेस्ट करतो. मिपावर पण हा कुठेतरी दिला होता.
"अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच.
बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्या अॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते.
दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही."
18 Sep 2016 - 9:31 pm | गॅरी ट्रुमन
अशा भूमिकेचे स्वागतच आहे. जर स्वतःला पुरोगामी म्हणणवणार्या सगळ्यांनाच हे भान असते तर या मेगाबायटी चर्चांची गरजच पडली नसती. असो.
अजूनही हमीद दाभोलकरांच्या विधानाचा निषेध स्वयंघोषित पुरोगामी लोक अन्यथा जेवढा आवाज करतात त्या मानाने फिकाच आहे हे पण नमूद करावेसे वाटते.हे विधान येऊन २-४ दिवसच झाले आहेत.यापुढील काही दिवसात अशा ढोंगीपणाविरूध्द स्वयंघोषित पुरोगामी लोकच आवाज उठवतील अशी आशा आणि अपेक्षा आहे.तसे झाले आणि अशा प्रकारच्या आगळिकींविरूध प्रत्येकवेळी या स्वयंघोषित पुरोगामींनी आवाज उठवला तरच ही अविश्वासाची भावना कमी व्हायला मदत होणार आहे. अर्थातच अशांचा आजपर्यंतचा इतिहास लक्षात घेता असे काही व्हायची शक्यता फार नाही पण अपेक्षा करायला काही हरकत नसावी. उम्मीद पे दुनिया कायम है असे काहीसे म्हणतातच.
18 Sep 2016 - 1:31 pm | मोदक
>>>>न पटणारा विचार सोडून द्यावा बाकीचा तर घ्यावा. समजा दहातले चार मुद्दे पटत नाही तर उरलेल्या सहा मुद्द्यांवर सहमतीतून सकारात्मक काम करावे. आपल्या मनात देखील परस्पर विरोधी विचारांचे द्वंद्व असतेच की!
दोन चार चुकार घटकांसाठी हिंदू धर्मावर घाऊक टीका करताना हे विचार कुठे जात असावेत?
18 Sep 2016 - 11:13 am | बोका-ए-आझम
बाकी सुरूवातीला ऐशी की तैशी म्हटल्यामुळे गैरसमज झाला होता ;)
18 Sep 2016 - 12:20 pm | अनिरुद्ध.वैद्य
सहमत!!
18 Sep 2016 - 2:02 pm | क्षमस्व
सहमत।।।।
20 Sep 2016 - 7:38 am | जोन
+११११११११११११
23 Sep 2016 - 4:39 pm | ओम शतानन्द
या वाक्यामुळे हमिदरावान्ची मुस्लिम धर्म, रुढी इ वर टीका करायची म्हटली की xxते हे सिद्ध होते
18 Sep 2016 - 11:26 am | सतिश गावडे
दाभोलकरांचे विधान अतिशय दुर्दैवी आहे. विवेकवादाच्या चळवळीतील व्यक्तीच्या तोंडी ही "आमची" आणि "त्यांची" भाषा शोभत नाही.
18 Sep 2016 - 11:32 am | अमितदादा
हमीद दाभोळकरांचं मत चुकीचं आहे, दुट्टपी आहे, परंतु ह्यामुळं अंनिस न भूतकाळात केलेल्या कामच महत्व कमी होत नाही. मला नेहमी अस वाटत कि हिंदू धर्मातील खरे आणि खोटे सुधारक इतर धर्मातील चुकीच्या प्रवृत्तीबद्दल बोटचेपी भूमिका घेतात , हि लोक ह्या धर्मातील कट्टरवाद्यांना भितात कि काय असा प्रश्न पडतो. प्रकाशजी नि वर मांडलेल्या मताशी सहमत
अवांतर: जेंव्हा मुस्लिम कायदा मंडळ सुप्रीम कोर्टाला ठणकावून सांगते की तलाक बद्दल निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही आणि आमच्या कायद्यात सर्वोच न्यायालयाने ढवळाढवळ करू नये! त्यावेळी एक हि पुरोगामी चकार शब्द उच्चारत नाही तेंव्हा डोक्यात तिडीक जाते.
18 Sep 2016 - 11:34 am | टवाळ कार्टा
+११११११११
18 Sep 2016 - 12:00 pm | साहना
कुठलाही विचार जर युनिफॉर्म पद्धतीने वापरला नाही तर चांगल्या विचाराचा सुद्धा अतिशय वाईट परिणाम होतो. हिंदू धर्मियांनी होळी सुद्धा खेळू नये पण इतर धर्मियांनी वाट्टेल ते करावे न्यायाने आपण पुढे जात राहिलो तर हिंदू धर्म नामशेष होईल.
18 Sep 2016 - 12:14 pm | अमितदादा
तुम्हाला highlight केलेलं वाक्य नीट समजलेलं दिसत नाही. कोण होळी खेळू नका असं बोललं तर ते पटत नाही म्हणून तुम्ही नाकारू शकता. एखादा उत्सवावेळी कायदे पाळा असे बोलला, तर ह्यावर सहमती होऊन होऊन हे अमलात आणले जाऊ शकते, ह्यातून धर्म पुढचं जाईल. सध्या सध्या सकारात्मक गोष्टीत सहमती करून आपण धर्म वाढवूच, तो स्वर्वव्यापी बनवू.
18 Sep 2016 - 12:34 pm | अत्रुप्त आत्मा
@
››› +++१११ फुर्रोगामी, फेक्युलर , खमुनिस्टांकडून गैरमुस्लिम समुदायाला दिली जाणारी अश्या हरेक प्रकारची वागणूक हाच भारतीय धर्मनिरपेक्षते मधला मोठ्ठा अडथळा आहे. टनाटनी मनुव्रुत्तीच्या लोकांचं यांच्यामुळेही भरपूर फावतं.
18 Sep 2016 - 2:06 pm | क्षमस्व
गुरुजी पक्षवात झालेल्या माणसाप्रमाणे काय बोलत आहात (आय मिन लिहीत) आहात?
लईच लाडात आलंय वाटतं।।।
19 Sep 2016 - 8:52 pm | आजानुकर्ण
असं सरसकट बोलल्याने नक्की काय साध्य होतं ते कळलं नाही. तलाकबाबतच्या निर्णयाबद्दल उच्चारलेले हे चकार शब्द. (निव्वळ थोडं गूगल केल्याने सापडले).
http://www.asianage.com/mumbai/secular-muslims-slam-aimplb-statement-779
http://www.indiaglitz.com/javed-akhtar-condemns-muslim-personal-law-boar...
http://scroll.in/article/724902/ban-triple-talaq-and-abolish-muslim-pers...
http://www.financialexpress.com/india-news/shabana-azmi-speaks-up-agains...
19 Sep 2016 - 9:45 pm | अमितदादा
धन्यवाद, हे वाचलं नव्हतं. इथे सरसकटी झालाय हे मान्य, परंतु हा मुद्दा सतत हिंदू धर्मातील चालीरीती यावरती बोलणारे बोलके पुरोगामी , leftis, आणि psudo-secular(काँग्रेस आणि आप) यांना उद्देशून होता. (ह्या लोकांच्या बाबत असणार माझं मत परत एकदा सरसकटी करण वाटेल, पण माझं ते ठाम आणि वैयक्तीक मत आहे). शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांची मते नेहमी आधुनिक राहिली आहेत यात शंका नाही. पण हे सत्य आहे की बहुतांश हिंदू धर्मावरती बोलणारी लोक अश्यावेळी गप्प राहणं पसंत करतात. एक उदाहरण म्हणून पाहिलं तर न्यायालयाचा महिला प्रवेशाबाबत नमते घेणारी महाराष्ट्रातील मंदिरे आणि सक्त विरोध करणारे मुंबई मधील दर्गा यातील फरक लोकांना समजत नसेल तर आश्चर्य आहे हे नक्की.
18 Sep 2016 - 11:50 am | प्रकाश घाटपांडे
ही प्रतिक्रिया मिळून सार्या जणी मासिकात २००१ म्ध्ये आलेल्या सुजाता देशमुख यांच्या पुरोगामी जमातवाद या लेखावर प्रतिक्रिया म्हणुन दिली होती. त्याच वेळी ९/११ झाल्याने त्याची आठवण आली म्हणुन खाली ती देत आहे. मूळ लेखा मुळे सुजाता देशमुख "मिळून सार्या जणी" च्या संपादक मंडळातुन बाहेर पडाव लागलं. महाराष्ट्र फाउंडेशन चे सुनिल देशमुख या अमेरिका स्थित असलेल्या पुरोगामी आधारस्तंभाची नाराजी ओढवली होती.
माझ्याकडे सुजाता देशमुख यांचा मूळ लेख नाही. त्यामुळे कदाचित थोडे सुसंगत वाटणार नाही. पण तरी स्वतंत्र्य रित्या पाहिले तरी चालेल. उपक्रमचे संकेतस्थळ रिड ओन्ली स्वरुपात देखील गंडते म्ह्णुन पेस्टवत आहे.
पुरोगामी जमातवाद
"पुरोगामी म्हटल्यावर सर्वसाधारणपणे 'डाव्या` असा शिक्का लोकांनी मारलेल्या सामाजिक, राजकीय, संघटना तसेच 'आम्ही डावं उजवं मानीत नाही. जात, धर्म पंथ वंश मानीत नाही. अशा विचारांचे लोक` असं चित्र डोळयासमोर येईल.
तुमचा कुत्रा कुठल्या जातीचा आहे असा प्रश्न विचारल्यावर पामेरियन, अल्सेशियन असं काही उत्तर मिळाल्यावर त्याची अंगकाठी, रंगरूप बांधा वगैरे गोष्टी डोळयासमोर येतात. तसं माणूस कुठल्या जातीचा आहे असं विचारल्यावर तो हलकट, काळा, गोरा, उंच, विद्वान असं अभिप्रेत नसंत. त्याची जन्मानुसार असलेली मराठा, महार, मांग, चांभार, ब्राम्हण वगैरे अभिप्रेत असतं. निसर्गात अभिप्रेत असलेली जात ही गुणधर्मानुसार असते. एकटया गुलाबाच्या सुद्धा भरपूर जाती आहेत. सरकारी नोकरीत बायोडाटा देताना मला जात विचारली तर 'मी मनुष्य जातीचा प्राणी आहे' व 'मानवता हा माझा धर्म' असे सांगितल्यावर सगळे हॅ हॅ करुन हसले. तुम्हाला जे अभिप्रेत आहे ते मी सांगणार नाही असे म्हटल्यावर त्याने नाही सांगितले तरी आम्हाला कळतं असे म्हणून स्वत:च तो कॉलम भरुन टाकला.
एखादा वाद आला म्हणजे मध्यवर्ती मुद्दा आला तसं पुरोगामी जमातवादाला सुद्धा मध्यवर्ती केंद्रबिंदू असतो. तो म्हणजे जन्माधिष्ठित नसलेले पुरोगामित्व. हे पुरोगामित्व सुद्धा कुठल्यातरी बिंदूमुळेच मिळालेली एका रेषेवरील दिशा आहे. त्याच अनुषंगाने प्रतिगामित्व ठरते. या बिंदूच्या सापेक्षते मुळेच पुरोगामित्वाचे शिक्के बसत असतात. त्या मुळे पुरोगामी कुणाला म्हणायचं या प्रश्नात प्रसंगी कुत्सितता वाटली तरी सापेक्षता पण आहे. लेखात नमूद केलेला पुरोगामी जमातवाद हा धर्म निरपेक्षतेशी निगडीत आहे. या धर्म निरपेक्षतेची सापेक्षता ही जन्माधिष्ठित असलेल्या धर्माशी सापेक्ष आहे. पुरोगामित्वाचं सोवळं हे लोकांनीच नेसवलेलं आहे. त्याला मी धर्मविरहित आहे असे सांगण्याची सोय नाही. त्याने स्वत:ला काहीही म्हणवले तरी जन्माधिष्ठित धर्म हा त्याला चिकटला जाणारच. सर्वधर्मसमभाव हे तर रिंगमास्टर एकमेकाचे हाडवैर असणारं प्राणी जस एका रिंगणात 'प्रेमानं` बसवितो तसा बसवलेला भाव आहे. हिंदुत्ववाद हा तरी कुठे एक आहे? त्यातही अनेक छटा आहेत. विविध जाती- जमातींची उतरंड असलेला हा समाज एक असणं हे मानण सुद्धा त्या रिंगमास्टरची कमाल आहे. धर्मनिरपेक्षतेची चिकित्सा करताना कुठलाही धार्मिक मूलतत्ववाद आणि धर्मांधता वगळता येत नाही. धर्मांधता आणि धार्मिक मूलतत्ववाद याचे मूल्यमापन करताना धर्मचिकित्सा ही अपरिहार्य बनते कारण धर्म तत्वांची त्याला जोड असते. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला एक प्रश्न नेहमी विचारला जातो काहो तुम्ही फक्त हिंदूच्याच अंधश्रद्धांवर झोड उठवता पण मुस्लिमांच्या अंधश्रद्धांविषयी फारसे बोलत नाही? हा पळपुटेपणा नाही काय? यात हिंदूंच्या अंधश्रद्धाविषयी बोलण्याचा अधिकार प्रश्नकर्त्याने मान्य केलेला आहे. किंबहुना हे काम तुम्ही चांगलच करता आहात असाही कधी कधी सूर असतो. पण तुम्ही पुरोगामी व धर्मनिरपेक्ष आहात तर मुस्लिम धर्मातील अंधश्रद्धांविषयी पण त्याच न्यायाने बोला ना! असे आवाहन अभिप्रेत असते. याची उत्तरे ही दिली जातात ती अशी की जवळजवळ ऐशी टक्के लोक हिंदू आहेत साहजिकच बहुसंख्य कार्यकर्ते हिंदूच असणार. त्यामुळे ऐशी टक्के अंधश्रद्धा हिंदूंबाबत असणार. दुसरं उत्तर दिलं जातं आम्ही हिंदू धर्मात जन्मलो साहजिकच संस्कार हिंदू झाले असल्याने आम्ही हिंदू धर्मातील अंधश्रद्धांविषयी अधिक संवेदनाशिल असणं स्वाभाविक आहे. आपण आपलं घर साफ करायचं नाही तर शेजाऱ्याच करायचं काय? या उत्तरांमध्ये चूक नाही पण सर्वसमावेशकताही नाही. चळवळ ही प्रबोधनाशी निगडित असल्याने जवळीक हा महत्वाचा दुवा आहे. अंधश्रद्धा ही सापेक्ष आहे ही बाब जरी घटकाभर बाजूला ठेवली तरी अंधश्रद्धा ही हिंदू धर्मातील काय किंवा मुस्लिम धर्मातील काय तितकीच अंध आहे.चळवळ जरी दोन्ही धर्माना समान लेखत असली तरी जन्माधिष्ठित चिकटलेल्या धर्मामुळे हिंदू कार्यकर्ते हिंदूत्ववाद्यांना मुस्लिमांपेक्षा जास्त जवळचे वाटण्यची शक्यता अधिक. हा एक भाग आणि दुसरा म्हणजे हिंदू धर्मात असलेले विविध, प्रसंगी परस्पर विरोधी विचार प्रवाह ही बाब. ग्रंथप्रामाण्य असलं तरी विशिष्ठ धर्मग्रंथ हाच एक प्रमाण हा भाग नाही. धर्मसंस्थापक ही कुणी एक व्यक्ती नाही. चार्वाक दर्शनाला सुद्धा मानाचे स्थान आहे या अर्थाने हा धर्म सर्वसमावेशक आहे. धर्मचिकित्सेलाही एक परंपरा लाभली असल्याने अंधश्रद्धा निमूर्लनाला पोषक असा विचार प्रवाह संतसाहित्यातच सापडतो. त्यामुळे हिंदू धर्मांधता ही मुस्लिम धर्माधते पेक्षा बोथट बनलेली आहे. त्यामुळे येथे अंधश्रद्धा निमूर्लन हे तुलनात्मक दृष्टया सोयीचे आहे. अगोदरच धर्मचिकित्सा हा संवेदनाशिल विषय असल्याने सोयीचा असलेला भाग हा प्राधान्यक्रमात असणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा धर्मांधता व मूलतत्ववाद हा राष्ट्रहिताशी निगडीत असते त्यावेळी ही चिकित्सा सोयीनुसार करुन चालणार नाही ती कठोरपणेच झाली पाहिजे ही बाब नाकारुन चालणार नाही. आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा बळी ठरलेली ९/११ ही न्यूयार्क मधील घटना ही त्याची साक्ष आहे."
18 Sep 2016 - 12:17 pm | वामन देशमुख
थेट उत्तर द्या/ स्पष्ट मत नोंदवा:
१. कुठल्याही धार्मिक कारणाने कोणत्याही प्राण्याचा हालहाल करून / हालहाल न करता बळी देणे योग्य आहे की अयोग्य?
२. सदर बातमीतील हमीद दाभोलकरांच्या मताशी आपण सहमत आहात का?
18 Sep 2016 - 12:18 pm | वामन देशमुख
आखीर कहना क्या चाहते हो?
18 Sep 2016 - 12:07 pm | इरसाल
हिंदु धर्म जरा जास्तीचा लवचिक आहे.
कमीत कमी माणुस तोंड इचकुन काहीही बरळला तरी कोणी "चॉप-चॉप स्क्वेअर" नेवुन तलवार चालवत नाही की चामड्याच्या चाबकाने (कोडे़) फटकवत नाही.
18 Sep 2016 - 12:11 pm | संदीप डांगे
ह्याबद्दल आनंद आहे की दुःख?
18 Sep 2016 - 12:29 pm | गॅरी ट्रुमन
यातल्या काही पुरोगाम्यांची विचार करायची पध्दत कशी असते हे बघा.
मागच्या वर्षी बाबासाहेब पुरंदर्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला गेला त्यावेळी या पुरोगाम्यांनी आकांडतांडव केलेच होते. त्यावेळी याच हमीद दाभोळ(ल)करांच्या भगिनी मुक्ता यांनी पेपरात पुढील पत्र लिहिले होते:
त्यावर मागच्या वर्षीच पुढील लिहिले होते. ते विषय निघालाच आहे म्हणून कॉपी-पेस्ट करतो.
हे असले स्वयंघोषित पुरोगामी लिखाण बघितलं की खरोखरच तळपायाची आग मस्तकात जाते.
१. बाबासाहेब पुरंदर्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर करणे आणि त्यापूर्वी दीड-दोन महिने गोविंद पानसरेंचा खून होणे या दोन गोष्टी लोक का जोडतात हे समजत नाही.गोविंद पानसरेंचा दुर्दैवी खून झाला म्हणून बाबासाहेबांच्या कामाचे महत्व कमी होते का?आपण इतिहासकार आहोत असा दावा बाबासाहेबांनी कधीच केला नव्हता.इतकेच नव्हे तर आपण इतिहासकार नसून छत्रपतींचे शाहिर आहोत हेच बाबासाहेब अजूनही म्हणतात.शाहिरांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊ नये आणि केवळ इतिहासकारांनाच द्यावा असा काही नियम आहे का? महाराष्ट्रातील किमान दोन पिढ्यांना बाबासाहेबांच्या शिवचरित्राने वेड लावले होते. महाराष्ट्रातील घराघरांमध्ये शिवाजी पोहोचविण्याचे काम बाबासाहेबांनी केले त्याचे महत्व पानसरेंचा खून झाला म्हणून कमी होते का?
२. धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचविण्याचा गोविंद पानसरेंनी प्रयत्न केला म्हणून त्यांचा खून झाला असे आम्हाला वाटते असे मुक्ता दाभोलकर म्हणतात.असे कोणालाही काहीही वाटू शकते.पण त्यामागे काही आधार नसेल तर तसे वाटण्यामध्ये आणि मलाही कधीतरी मी ऑलिंपिकमध्ये गोल्ड मेडल मिळवायला पात्र आहे असे वाटले तर तसे वाटण्यामध्ये नक्की फरक काय? असे वाटण्याला काही आधार आहे का? असल्यास कोणता?"शिवाजी कोण होता" हे पुस्तक पानसरेंने किती वर्षांपूर्वी लिहिले होते?मग इतकी वर्षे त्यांच्या नखालाही धक्का लागला नव्हता तोच अचानक आताच लागायचे काय कारण? नक्की कारण काय हे मला माहित असायचा प्रश्नच नाही.पण म्हणून त्या खुनामागे अमुक एक हेच (आणि आम्हाला वाटते तेच) कारण होते हे ढोल जगभरात पिटण्याला काय अर्थ आहे?
बरं त्याच्याच पुढचे वाक्य--"धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराजांची मांडणी केली म्हणून पानसरेंचा खून झाला आणि शासनाच्या बेपर्वाईमुळे खुनी अजूनही मोकाटच आहेत". म्हणजे आधीच्याच वाक्यात खुनामागे ते कारण आहे असे आम्हाला वाटते असे म्हणणार्या मुक्ता दाभोलकर लगेच पुढच्याच वाक्यात त्याच कारणामुळे त्यांचा खून झाला असा निवाडाही करून टाकतात? मजाच म्हणायची.
३. बाबासाहेबांनी लिहिलेले शिवाजी महाराजांचे चरित्र या बाईंनी वाचले आहे असे दिसत नाही. अन्यथा पानसरेंनी उभ्या केलेल्या शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेपेक्षा विपरीत अशी प्रतिमा बाबासाहेबांनी उभी केली आहे असे वाटायचे काहीच कारण नाही. मी बाबासाहेबांचे राजा शिवछत्रपती अक्षरशः हजारो वेळा वाचले आहे. आजही मी ते पुस्तक कुठलेही पान उघडून वाचायला सुरवात करू शकतो.त्यात हाच उल्लेख आहे की स्वराज्याच्या बाजूने उभा राहिल तो आपला आणि स्वराज्याच्या विरोधात उभा राहिल--मग तो कोणत्याही जातीधर्माचा असेना तो मोंगल. ही धर्मनिरपेक्षता नाहीतर काय आहे?शिवाजी महाराज धर्मांध होते अशा स्वरूपाचा नक्की कोणता उल्लेख या महान पुरोगाम्यांना त्या पुस्तकात मिळाला हे समजायला मार्ग नाही.
आणि पानसरेंच्या खुनानंतर सर्वत्र "शिवाजी कोण होता" या पुस्तकाच्या प्रती पुरोगामी कार्यकर्ते वाटत होते.अशा वेळी पुरंदर्यांना दिलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराचा वापर पानसरेंनी महाराजांची प्रतिमा मांडली होती त्याच्या विरूध्द प्रतिमा उभी करायला केला जाईल असे पुरोगामी कार्यकर्त्यांना वाटते!! म्हणजे यांना वाटेल ते वाटणे काही संपतच नाही.बरं लोकशाही आहे. कोणालाही काहीही वाटू शकते. पण म्हणून या पुरोगामी कार्यकर्त्यांना जे वाटते ते ब्रह्मवाक्य थोडीच आहे? तुम्हाला वाटायचे ते वाटू दे पण ते वाटणे इतरांवरही बंधनकारक थोडीच आहे?
४. बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार द्यायला विरोध जातीय भावनेतून होत असेल हे आमच्या आधी लक्षात आले नाही. वा वा वा. टाळ्या वाजवून हात दुखायला लागले. काय बोलता राव. हा विरोध करणार्यांमध्ये कोण होते/आहे हे यांना माहित नव्हते की मुद्दामून डोळेझाक करायचे ठरविले होते? जितेंद्र आव्हाड, अजित पवार असले गणंग बाबासाहेबांना पुरस्कार द्यायचा विरोध करत होते आणि या लोकांचा पूर्वेतिहास मुक्ता दाभोलकर यांना माहित नव्हता का? की झोपायचे सोंग लावले होते?
हे असले काहीतरी वाचले की "पुरोगामी","विवेकवादी" इत्यादी मराठी भाषेतील सर्वात वाईट शिव्या आहेत असे वाटायला लागते.
एकूणच काय या असल्या ढोंगी लोकांना पुरोगामी म्हणणे यापेक्षा खरोखरच्या पुरोगामीत्वाचा मोठा अपमान असूच शकत नाही. डिजगस्टींग!!
18 Sep 2016 - 12:40 pm | भोळा भाबडा
अगदी!
यांचा जोर हिंदुविरोधीच आहे यात शंका नाही.
अभिराम दिक्षीतांनी अशा ढोंगी लोकांवर सडेतोड टिका केली आहे.
18 Sep 2016 - 12:40 pm | प्रकाश घाटपांडे
काही संबंधित माहिती. योगेश परळे यांचा लेख
पानसरे शिवाजी इस्लाम आणि इतिहास
18 Sep 2016 - 1:01 pm | प्रसाद_१९८२
एकूणच काय या असल्या ढोंगी लोकांना पुरोगामी म्हणणे यापेक्षा खरोखरच्या पुरोगामीत्वाचा मोठा अपमान असूच शकत नाही. डिजगस्टींग!!
अगदि सहमत !
18 Sep 2016 - 6:41 pm | विवेकपटाईत
डाव्यांचे चालले तर शिवाजी महाराजांचा इतिहास हि पुसून टाकतील. अफजलखान धर्मनिरपेक्ष हिरो आणि शिवाजी खलनायक हि प्रतिमा स्थापित करायला हि कमी करणार नाही. पुढे कुणीतरी महान पुरोगामी इतिहासकार शिवाजी झालाच नव्हता असे हि म्हणू शकेल. सर्व काही मिथिक कथा आहे.
18 Sep 2016 - 10:39 pm | गॅरी ट्रुमन
पटाईतकाका, अफझलखान धर्मनिरपेक्ष हिरो होता अशी प्रतिमा प्रस्थापित करायचा या मंडळींनी प्रयत्न केला आहे की नाही माहित नाही पण मागच्या वर्षी दिल्लीमधील औरंगजेब रोडचे नाव बदलून ए.पी.जे.अब्दुल कलाम रोड करायचा केंद्र सरकारने निर्णय घेतला त्याविरूध्द "औरंगजेब किती चांगला होता, किती धर्मनिरपेक्ष होता" इत्यादी अकलेचे तारे काही पुरोगामींनी तोडलेच होते. त्याला दीड-दोनशे लोकांनी लाईक केले होते. त्या लाईक करणार्यांमध्ये मिपावरचेही काही होतेच. हे तथाकथित पुरोगामी तिकडे दिवाळी अंकातही लिहितात.
19 Sep 2016 - 8:37 pm | आजानुकर्ण
गॅरीसाहेबांशी अगदी सहमत. स्वयंघोषित पुरोगामी आणि स्वयंघोषित हिंदुत्त्ववादी हे नेहमीच त्यांच्या विचारसरणीच्या विपरीत काम करत असल्याने हे शब्द आता शिवीस्वरुप झाले आहेत.
याच्याशीही सहमत. किंबहुना हाच परिच्छेद असाच्या असा एका बाबा चमत्कारी संघटनेला लागू होतो.
23 Sep 2016 - 4:49 pm | ओम शतानन्द
मस्तच, खोटारड्या पुरोगाम्यान्ची चान्गली चम्पी केली आहे
26 Sep 2016 - 3:00 pm | ए ए वाघमारे
या पत्रावर मी दिलेली आणि यामागच्या राजकारणावर बोलणारी प्रतिक्रियाही लोकसत्तेने छापली होती. ती खालीलप्रमाणे
आम्ही सारे राजकारणी
माझ्या पत्रावर मात्र मुक्ताबाईंचे उत्तर आले नाही आणि 'या विषयावरचा पत्रव्यवहार आता इथेच थांबवित आहोत' असे लिहिण्याची संपांदकांची (आणि जाहीर वाद घालायची आमची) संधी मात्र हुकली. :)
18 Sep 2016 - 6:31 pm | कैलासवासी सोन्याबापु
ट्रुमन एक विनंती आहे, तुम्ही इतके नीट बोलला आहात की तुम्ही
सगळे प्रतिसाद नीट संकलित करून त्याचा एक मस्त लेख बनवा, सही होईल ते एकदम
18 Sep 2016 - 6:48 pm | प्रचेतस
ट्रुमन यांचे सर्व प्रतिसाद आवडले.
18 Sep 2016 - 9:26 pm | साहना
गॅरी ट्रुमन ह्यांचे विचार मुद्देसूद आणि तर्कास धरून आहेत .
फुरोगामी आणि तर्क ह्याचा संबंध असतोच असे नाही. ज्या प्रमाणे कम्युनिस्टांची नजर पूर्वी फादरलॅन्ड कडे असायची त्याप्रमाणे भारतीय फुरोगामी आपले विचार कदाचित पश्चिमेकडील फुरोगाम्या कडून इम्पोर्ट करत असावेत असे वाटते. त्यांत गैर काही काही नाही पण पश्चिमी फुरोगाम्यांनी त्यांच्या स्वतःच्या देशांत काय गोंधळ घातले आहेत हे पाहणे आवश्यक आहे. इस्लाम चे लांगुनचलन, सरकारी ताकद वापरून आपल्या विरोधकांची तोंडे बंद करणे, आपल्याच इतिहासाविषयी कमालीचा न्यूनगंड बाळगणे हे विदेशी पुरोगाम्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे आणि काही प्रमाणात भारतीय कॉपीकॅट्स सुद्धा हे विषय आयात करताहेत असे कधी कधी वाटते.
अमेरिकेत कैद्यातील काळ्या लोकांचे प्रमाण खूप जास्त आहे म्हणून फुरोगामी ओरडत असतात त्याच प्रमाणे मागे आपल्या फुरोगाम्यांनी सुद्धा भारतीय कैद्यांत मुस्लिम (आणि नंतर दलित) ह्यांचे प्रमाण जास्त का आहे असा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता पण कदाचित ते आकडे अंगावर आल्याने तो प्रकार बंद पडला.
काही दिवस आधी अशीच एक ओळखीची फुरोगामी महिला, "महिलांना सार्वजनिक ठिकाणी बाळांना दूध पाजण्याचा हक्क असला पाहिजे" म्हणून मुंबईत काही तरी कार्यक्रम घडवू पाहत होती. विषयावर मत काहीही असो सध्या अमेरिकेत ह्या विषयाची फॅशन आहे म्हणून इथे हा विषय आणला जातो असे राहून राहून वाटले. आमच्या इथे लोक सर्रास संडास उघड्यावर करतात दूध पाजणे हि तर नगण्य (आणि बहुतेक करून समाजाला मान्य असेलेली) गोष्ट आहे.
भारतीय परंपरांना विरोध आणि ख्रिस्ती/मुस्लिम परंपरांना समर्थन ह्यांत हिंदू द्वेषा पेक्षा पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव हे कारण आहे असे मला वाटते. पाश्चिमात्य देशांत हजारो वर्षांच्या ख्रिस्ती प्रभावाने नास्तिक लोकांच्या मनात सुद्धा निसर्गपूजक, अनेकेश्वरवादी इत्यादी आमच्या सारख्या पेगन लोकांच्या समजुती बद्दल कमालीचा द्वेष किंवा भयगंड असतो. "तुम्ही मृत्यूच्या देवतेला भजता ? तुम्हाला लाज नाही वाटत का ?" अश्या प्रकारचा प्रश्न विचारणारे नास्तिक लोक खूप भेटतात. कारण मृत्यू त्यांच्या दृष्टीने खूप वाईट गोष्ट असते आणि भारतीय संस्कृतीतील मृत्यू (पुनर्जन्म) ह्या संकल्पनेबद्दल आमच्या ज्या धारणा असतात त्या त्यांना सहज सहजी समजत नाहीत. ह्या उलट जपानी बौद्ध किंवा थाई लोकांना हे सगळे समजण्यास अजिबात कष्ट पडत नाहीत.
भारतीय पुरोगामी सुद्धा दुर्दैवाने अश्या प्रकारच्या विचारांना बळी पडलेले दिसतात.
18 Sep 2016 - 10:25 pm | गामा पैलवान
प्रकाश घाटपांडे,
वरील विधानाशी असहमत. थोरले दाभोलकर फ्रॉड होते/आहेत. त्यांचे साधना आणि परिवर्तन हे न्यासदेखील गैरव्यवहारात आकंठ बुडालेले आहेत. त्यामुळे अनिसचा सहानुभूतीदार वर्ग (जो काही उरलासुरला आहे तो) दुरावतो आहे.
आ.न.,
-गा.पै.
19 Sep 2016 - 9:24 am | प्रकाश घाटपांडे
हा मुद्दा सनातनवाले दाभोलकरांच्या हयातीत सुद्धा मांडत होते.पण त्यात काही अर्थ नसावा. फार तर काही तांत्रिक अनियमितता असेल.परदेशी मदत स्विकारणे हा गैरव्यवहार नाही. मला वाटत की पुर्वी याची चर्चा आपण केली आहे.
19 Sep 2016 - 12:43 pm | गामा पैलवान
प्रकाश घाटपांडे,
बराच अर्थ आहे. वृत्तपत्रांनी बातमी दाबली म्हणून सत्य लपणारे थोडंच?
वर्षानुवर्षे धर्मादाय आयुक्तांकडे विवरणपत्र भरलेच नाही. याला तांत्रिक अनियमितता म्हणंत नाहीत. फ्रॉड म्हणतात. तर लोकांचा विश्वास उडणारच ना? समाजप्रबोधन करण्यासाठी फ्रॉडची काय गरज?
आ.न.,
-गा.पै.
19 Sep 2016 - 1:47 pm | प्रकाश घाटपांडे
सगळा मिडिया कसा मॅनेज होईल? तथ्य असते तर मिडियाला सनसनाटी बातमी हवीच असते. ते मागे लागले असते. अण्णांच्या संस्थांवर पण असे आरोप झाले. आता तांत्रिक बाब हा तात्विक दृष्ट्या भ्रष्टाचार असतो.पण गौण. सबब या मुद्दयात फारसा अर्थ नाही
20 Sep 2016 - 2:51 am | गामा पैलवान
प्रकाश घाटपांडे,
सगळा मीडिया म्यानेज करणं आवघड आहे हे मान्य. दाभोलकरांचा उदोउदो करण्यात सगळी माध्यमे गर्क होती तरी सनातन प्रभात वृत्तपत्राने सत्याला वाचा फोडलीच.
अर्थात केवळ मीडिया म्यानेज करूनही भागंत नाही. भुजबळांच्या व्यवहारांवर माध्यमांतून काहीच भाष्य झालं नव्हतं. बरोब्बर माध्यमांना खिशात घातलं होतं. तरीही आज ते अडकलेच.
आ.न.,
-गा.पै.
20 Sep 2016 - 4:55 pm | प्रकाश घाटपांडे
मग तुम्ही म्हणता त्यात सत्य असेल तर उद्या हेही अडकतील. मुक्ता दाभोलकर ने आपण केस दाखल करु शकता असे सनातनवाल्यांना जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे. जी काही परदेशी आर्थिक मदत घेतली असेल तर ती कायद्याची परिपुर्ती करुन घेतली आहे असे तिने सांगितले आहे
अनेकांना दाभोलकरांची मते मान्य नाहीत पण त्यांच्या प्रामाणिकपणाबद्द्ल वा हेतु बद्द्ल शंका नाही.
20 Sep 2016 - 7:03 am | सतिश गावडे
त्यांचे हे गैरव्यवहार जगासमोर आणण्याच्या दिशेने कारवाई का केली नाही कुणी? एका अतिशय हास्यास्पद विचारसरणी असलेल्या संस्थेने आपल्या ब्लॉगवर चार शब्द खरडण्यापलीकडे काहीच कसे झाले नाही यावर?
हमिद दाभोलकरांचे विधान अतिशय चुकीचे आहे यात शंका नाही. मात्र तो धागा पकडून विवेकवादाच्या चळवळीतील एका दिवंगत सच्च्या कार्यकर्त्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रकार हा प्रकार चांगला नव्हे.
20 Sep 2016 - 4:45 pm | पुंबा
ह्या आरोपांबद्दल तुम्ही एक तरी पुरावा देणार आहात का? माहिती अधिकार वगैरे वापरुन मिळालेली माहिती वगैरे काही आपल्याकडे आहे का? जर नसेल तर तुमच्या विधानांवर विश्वास केवळ सनातन प्रभात ने छापले एवढ्या मर्यादीत पुराव्यांवर ठेवायचा का?
19 Sep 2016 - 2:44 pm | बाळ सप्रे
कुर्बानी आणि बळी देणे दोन्ही एकाच पातळीवरच्या अंधश्रद्धा आहेत. कुर्बानीविरुद्ध अंनिसकडू अजून लक्षवेधी काम झालेले नाही हे मान्य करायला काहीच हरकत नव्हती.
मांडलेला मुद्दा कुरापत काढायला असो वा खरच निर्मूलन व्हावे या इच्छेने असो , हमीद यांची प्रतिक्रीया मुद्द्यावर असायला हवी होती. कुर्बानीमागचा भावार्थवगैरे जरा अतिच झालं.
नरेन्द्र दाभोलकरांइतके संयमित भाष्य करणे हमीद / मुक्ता यांना तेवढेसे जमत नाही. अविनाश पाटील खरतर अध्यक्ष आहेत त्यांना प्रतिक्रीया वगैरे देताना जास्त ऐकलेले नाही
केवळ कुरापत काढण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य केल्याने मुद्द्याला पाठीशी घातले असेच वाटणार.
अशाने कुरापत काढणारे (फोटोशॉप मधे जास्त लाल रंगाने रंगवून रस्त्यावर रक्ताच्या नद्या दाखवणारे) आणखी फोफावणार.
19 Sep 2016 - 3:36 pm | प्रदीप
फोटोशॉप मधे जास्त लाल रंगाने रंगवून रस्त्यावर रक्ताच्या नद्या दाखवणारे
म्हणजे अशा लाल रक्ताच्या नद्या वाहिल्याच नव्हता, व कुणीतरी हे फक्त कुरापत काढण्यासाठी प्रसवलेले आहे, असे तुमचे म्हणणे आहे. हे नक्की कुणी केले आहे, माहिती नाही. पण 'लिबरल', डावीकडे झुकलेला गार्डियन त्यात असेल असे मला वाटले नव्हते! तुमची माहिती माझ्या अल्प माहितीपेक्षा अधिक आहे, असे दिसते!
19 Sep 2016 - 4:05 pm | बाळ सप्रे
फेसबुक्/व्हॉट्सॅपवर फिरतायत त्या फोटोंची रंगवलेली आणि बिन रंगवलेली व्हर्शन्स आंतरजालावर उपलब्ध आहेत. शोधुन पहा.
देवाच्या नावावर कत्तल चूकच, पण अतिरंजित चित्रं /मजकूर वापरून भावना भडकवणेही चूक..
19 Sep 2016 - 4:10 pm | अनुप ढेरे
ही स्टॅंडर्ड पद्धत आहे. खरे फोटो/व्हिडो जर आपल्याला डॅमेजिंग असतील तर मुद्दाम एकदोन डॉक्टर्ड वर्जन्स फिरवायची. मग आपणच आरडा-ओरडा सुरू करायचा की हे बघा लोक कसे खोटे फटू पसरवतायत. मग जे खरे फोटो असतात त्याबद्दल देखील संशय निर्माण होतो. JNU प्रकरणातदेखील हेच झालं होतं. दोन-तीन खरे व्हिडो फिरत असताना एक खोटा व्हिडो देखील फिरवला होता. मग आरडाओरडा सुरू झाला की जे व्हिडो फिरतायत ते खोटे आहेत.
19 Sep 2016 - 8:13 pm | प्रदीप
मला फेबु व व्हॉट्सअॅपवर काय फिरते आहे, ते शोधुन पहाण्यची काय जरूर आहे? मुळात तसे रक्तरंजित पाणी वाहत होते हे (दस्तुर्खुद्द 'गार्डियन' म्हणाते आहे, तेव्हा) कुणी नाकबूल करू शकत नाही. ते सगळे तसे काही नव्हतेच, आणि मुद्द्दाम कुणीतरी ते कुरापत काढण्याकरता निर्माण केले आहे, हे खरे नव्हे.
19 Sep 2016 - 8:25 pm | संदीप डांगे
सोशल मीडियावर फिरणे हीदेखील कुरापत असू शकते, ;)
हे काही पहिल्यांदा घडत नसेल किंवा यापेक्षा जास्त रक्त भारतातल्या कत्तलखान्यात -जयांचे मालक हिंदू आहेत- वाहत असेल रोज.
अर्थात, माझे कुठल्याच बळी प्रकाराला दुरुनही समर्थन नाही.
खाणाऱ्याला खाऊ द्या, बळी देणाऱ्यांचे प्रबोधन करा..
19 Sep 2016 - 8:33 pm | प्रदीप
भारतातल्या कत्तलखान्यात -जयांचे मालक हिंदू आहेत- वाहत असेल रोज. कत्तलखान्यांत काय होते मला माहिती नाही. पण नेपाळमधे तेथील हिंदूंनी गेल्या वर्षी एक सण साजरा केला, त्यातही हजारो बकर्यांचा बळी देण्यात आला असे वाचनात आले होते. तेही ह्या घटनेइतकेच निषीद्ध आहेच. आणि तेही बदलले पाहिजे.
जे आहे, ते आहे, ते मान्य करून पुढे जाणे उत्तम. तसे काही झालेच नाही, सर्वच अतिरंजित आहे, इत्यादी मखलाशी कुठल्याच घटनेविषयी न करणे हे शहाणपणाचे आहे, नाही?
19 Sep 2016 - 8:37 pm | प्रदीप
सोशल मीडियावर फिरणे हीदेखील कुरापत असू शकते, ;) एका बाजूला आपल्याकडील तथाकथित प्रमुख प्रवाही मीडियाने स्वतःची विश्वातार्हता झपाट्याने आता गमावलेली आहे. दुसरीकडे सोशल मीडिया आता सर्वांना उपलब्ध आहे. कोंबडे झाकून उजाडले नाही, असे मानण्याचे दिवस गेले.
मूळ चित्रे सोशल मीडियावर फिरणे कुरापत का समजावी?
19 Sep 2016 - 8:46 pm | संदीप डांगे
का फिरली असावी हाच प्रश्न पडला आहे,
19 Sep 2016 - 8:59 pm | प्रदीप
जे काम तथाकथित प्रमुख (mainstream) प्रसारमाध्यमे जाणूनबुजून करीत नाहीत, ते आता, मार्ग उपलब्ध सहजी झाल्याने दुसरे कुणीतरी करणारच.
19 Sep 2016 - 5:09 pm | अमितदादा
ते फोटो खरे आहेत , नंतर आलेले फोटो ज्यामध्ये लाल कलर न्हवता ते फोटो खोटे म्हणजे फोटोशॉप केलेले आहेत. खालील लिंक पहा. link
यामध्ये नमूद केलाय कि , ...But the images weren’t actually photoshopped at all. In fact, the images without the blood were the doctored ones.
हि पहा बांगलादेश मधील वर्तमानपत्रातील लिंक , link यामध्ये व्हिडीओ सुद्धा दिलाय तो हि पहा. हि बातमी खरी आहे नंतर आलेले फोटो खोटे होते
19 Sep 2016 - 8:40 pm | आजानुकर्ण
बकऱ्यांचा बळी देण्यात निषिद्ध काय आहे हे समजले नाही. नॉनव्हेज खाणेही निषिद्ध मानायचे काय? बांगलादेशातील रक्ताच्या नद्या वगैरेंमुळे हायजिनिक प्रॉब्लेम्स निर्माण होतात हे मान्य. पण गटारी अमावास्येच्या पवित्र तिथीला किती बोकड-कोंबडे कापले आणि किती लिटर दारु विकली गेली याचे आकडे सामनामध्ये दरवर्षी प्रकाशित केले जातात. मग नक्की आक्षेप कशाला घेतलाय ते कळले नाही.
19 Sep 2016 - 8:48 pm | संदीप डांगे
खाण्यासाठी मारले ते चालेल, धर्माच्या नावावर मारू नका,
19 Sep 2016 - 8:56 pm | आजानुकर्ण
बकरीईदलाही खाण्यासाठीच मारतात. गणेशचतुर्थीला मोदक करतात ते देवाच्या नावाखाली केले असले तरी ते खाण्यासाठीच केलेले असतात.
19 Sep 2016 - 9:28 pm | प्रकाश घाटपांडे
जत्रे मधे बकरी कोंबड कापतात ते देवाच्या नावाने असले तरी ते माणसंच खातात.
19 Sep 2016 - 9:32 pm | संदीप डांगे
फरक आहे थोडा, बकरे सर्व समाज कापतो तर कोंबड्या काही अशिक्षित लोकांपर्यंत उरलं, सुशिक्षित कापत असतील तर माहित नाही,
19 Sep 2016 - 11:56 pm | साहना
सुशिक्षित लोक सुद्धा भरपूर कोंबडे कापतात आणि चांगला ताव मारतात. स्वानुभव :)
21 Sep 2016 - 12:24 am | खटपट्या
ये बात हजम नही हुई. इस्कटून सांगा..
21 Sep 2016 - 8:35 am | संदीप डांगे
हिंदुमधली एखादी जात जे कोंबडं बकरे वैगेरे देवाला कापतात त्यातला सुशिक्षित वर्ग ह्या प्रथा सोडून आहे, मुस्लिमांमध्ये मात्र असे काही नाही, श्रीमंत गरीब, शिक्षित अशिक्षित सर्वच ईदला बकरे कापतात, खाण्यासाठी वापरत असाल तरी मूळ कारण बळी देणे हेच आहे, ते एक पवित्र व न टाळता येण्यासारखे कार्य समजून केले जाते, हिंदू समाजात असे कम्पलशन दिसत नाही, चुभु देणेघेणे
19 Sep 2016 - 9:01 pm | प्रदीप
आहे.
19 Sep 2016 - 8:52 pm | आनंदयात्री
मूळ आक्षेप बळी देण्याला नसून दुटप्पीपणाला आहे असे वाटते. जसे मांढरदेवी किंवा तत्सम यात्रेत बळी देणे म्हणजे अंधश्रद्धा, क्रौर्य इत्यादी इत्यादी, पण बकरीइडीला बकरे कापणे म्हणजे धार्मिक अभिव्यक्ती! असे.
19 Sep 2016 - 10:46 pm | साहना
अगदी बरोबर. सन्मानपूर्वक बळी देणे सर्व संस्कृतीचा भाग आहे आणि कुणाला पालन करायचे असेल तर कायद्याच्या चौकटीत राहून जरूर करावे. दुट्टपी पणा ह्यावर आक्षेप. आम्ही लोक साधी बैलगाडी शर्यत भरवू शकत नाही आणि ह्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी बकरे कापायची मुभा.
19 Sep 2016 - 11:04 pm | संदीप डांगे
हो ना राव! साध्या बैलगाडा शर्यतीत भाग घ्यायचाय, पण माझ्या गाडीसाठी एक साधा बैल कमी पडतोय, समर्थकांपैकी कोणाला वेळ असेल तर कळवा..
19 Sep 2016 - 11:56 pm | साहना
इतके चांगले बैल इथे तुम्हाला मिळतील असे वाटत नाही आणि ते स्लो असतील तर दुसऱ्या बाजूने तुमची गती कमी होईल. सजेशन म्हणून तुम्ही एकटेच गाडी ओढा ना ? कदाचित तुम्ही एकटेच सगळ्यांना भारी पडाल.
20 Sep 2016 - 7:06 am | संदीप डांगे
मी ओढला असता ओ, पण शर्यत बैलांची आहे ना!
20 Sep 2016 - 7:59 am | साहना
वाईट मानून घेऊ नका गाढवाच्या शर्यतींत भाग घ्या
20 Sep 2016 - 8:04 am | संदीप डांगे
आहे की नाही पंचाईत? तिथे गाढव लागतील ना...
20 Sep 2016 - 4:03 am | अर्धवटराव
+१
मलाही बळी प्रथेमधे काय चुक आहे हे कळत नाहि. सणासुदीला आपण गोड, आवडीचं अन्नसेवन करतो. ज्यांना मांसाहार आवडतो त्यांनी अवष्य बळी देऊन मांसाहार करावा.
बळी प्रकरणात स्वच्छता, प्राण्यांना प्रत्यक्ष्य मरण्यापुर्वेच्या यातना, अंधश्रद्धेचा बाजार वगैरे वेगळे प्रॉब्लेम आहेत. पण मुळात मांसाहार करण्यात ज्यांना इंट्रेस्ट आहे त्यांना तो करु द्यावा.
20 Sep 2016 - 12:30 am | बॅटमॅन
धाग्यावर सगळे सुटलेत मोकाट. फुरोगाम्यांची कितीवेळा मारणार, ते तसेही बदलणार नाहीत. मग आपण एनर्जी कशाला वाया घालवायची? बकरी ईदला बिर्यानी आणि गावच्या जत्रेत चुलीवरचे साजूक तूपवाले मटन खा अन खूष रहा.
20 Sep 2016 - 8:18 am | चौकटराजा
निसर्गात एक प्राणी कोणत्याही कारणास्तव इतरांचा जीव घेत असतो. त्याला कोणतीही शिक्षा नाही.
कायद्यात मानवी समाजात मानवाचा बळी घेणे याला शिक्षा आहे. काही ठिकाणी विशिष्ट प्राणी मारणे याला शिक्षा आहे.
खरा गोंधळ नेहमी असतो तो संस्कॄति त तेथे एक म्हणतो अमुक मारले तर तो गुन्हा आहे दुसरा म्हणतो ह्या त्यात काय गुन्हा आलाय ?
जगणे जगताना, निसर्ग, कायदा व संस्कृति यांचा तारतम्याने वापर करायचा असतो.एव्हरेस्ट वर गेल्यावर धर्माने ओक्सीजन वापरायचा नाही असा कायदा सांगितलेला आहे तो मी पाळीन असे करून चालत नाही.
20 Sep 2016 - 8:42 am | प्रकाश घाटपांडे
खर आहे. जीवो जीवस्य जीवनम|
मानवी संस्कतीचा जसा विकास होत गेला तस देवाला संतुष्ट करण्यासाठी प्राण्याचा बळी देणे हा प्रकार कमी होत गेला. नारळ फोडणे हे देखील बळी ला प्रतिकात्मक पर्याय म्हणूनच निर्माण झाल.
20 Sep 2016 - 3:30 pm | श्रीगुरुजी
>>> नारळ फोडणे हे देखील बळी ला प्रतिकात्मक पर्याय म्हणूनच निर्माण झाल.
हे कोणी सांगितले? या समजूती ला काही आधार आहे का?
20 Sep 2016 - 4:22 pm | अनिरुद्ध.वैद्य
बळी नव्हे तर नरबळी. किंबहुना कै़क होमांमध्ये अजुनही प्रतिकात्मक बळी विधी होतो. वास्तुला धान्याचा पुतळा करुन दिला होता बहुतेक.
नक्की आठवत नाही.
20 Sep 2016 - 5:32 pm | श्रीगुरुजी
प्रत्रिकात्मक बळी? नरबळी? वास्तुला? मी स्वतःच्या घराची वास्तुशांत २-३ वेळा केली आहे. असला विधी पाहण्यात/ऐकण्यात नाही.
20 Sep 2016 - 6:11 pm | अनिरुद्ध.वैद्य
बाहुला करुन त्याची पुजा करुन, नंतर तो बाहेर नेउन ठेवायला सांगण्यात आले होते.
20 Sep 2016 - 11:59 pm | श्रीगुरुजी
असला विधी माझ्या पाहण्यात नाही. स्वतःच्या घराच्या वास्तुशांतीत किंवा नातेवाईक/मित्र/शेजारीपाजारी इ. च्या वास्तुशांतीत हा विधी केल्याचे बघितलेले नाही.
आमच्या, आमच्या नातेवाईकांच्या/मित्रमंडळींच्या/शेजार्यापाजार्यांच्या घरातील पूर्वीच्या पिढ्यात नरबळी देण्याची उच्चपरंपरा नसावी असं दिसतंय.
20 Sep 2016 - 4:36 pm | प्रकाश घाटपांडे
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3
अजून धर्मशास्त्राच्या जाणकाराला विचारा
20 Sep 2016 - 5:29 pm | श्रीगुरुजी
अच्छा! तुमच्या माहितीचा स्त्रोत विकिपिडीया. तिथे कोणीतरी, काहीतरी लिहिलंय ते सत्य आहे असं मानून तुम्ही चाललाय. तुम्ही जे खरं मानून चाललाय त्याला विकिपिडियाच्या वरील लिंकमधील एका वाक्याव्यतिरिक्त काही पुरावे, शास्त्राधार आहे का?
20 Sep 2016 - 5:38 pm | प्रकाश घाटपांडे
केवळ तसे नाही पण मी धार्मिक वातावरणात वाढलो असल्याने किर्तनकार प्रवचनकार गुरुजी घरात असायचेच. त्यांच्याही बोलण्यात असे संदर्भ यायचे. अधिक विश्वासार्ह संदर्भ तुम्ही ही शोधा मीही शोधतो. प्रत्येक गोष्टी साठी विद्वत्ताप्रचुर संदर्भ देणे शक्य होत नाही. तारतम्याने आपण काही गोष्टी समजू शकतो.
20 Sep 2016 - 5:47 pm | टवाळ कार्टा
असे कोणी म्हणाले म्हणजे ते खरे मानायचे??? उद्या जर म्हणाले सगळे सोडून संन्यास घ्या तर घेणार आहात का तुम्ही? असले गुरुजी बदला
20 Sep 2016 - 6:01 pm | श्रीगुरुजी
या अफवेला कोणताही शास्त्राधार वा इतिहास वा पुरावे नाहीत हे मला माहित होते. केवळ ऐकीव गप्पांवर ही अफवा पसरवली गेली आहे.
अशा अनेक अफवा पसरवल्या गेल्या आहेत. पूर्वी म्हणे महारांना बळी द्यायचे. नंतर एका मित्राशी बोलताना त्याने नारळाचे उदाहरण दिल्यावर मी त्यालाही संदर्भ मागितल्यावर तो म्हणाला की नारळाला शेंडी असते कारण ते म्हणे बळी दिल्या जाणार्या बटूचे प्रतीक आहे. त्यावर मी विचारले की बळी तर महारांना द्यायचे, मग ब्राह्मण मुलांना कधी बळी द्यायला लागले? यावर त्याला योग्य उत्तर न दिल्याने त्याने मलाच उलटे विचारले की मग फोडताना नारळाला शेंडी का ठेवतात? यावर मी सांगितले की नारळाच्या शेंडीचा बटूच्या शेंडीशी संबंध लावणे हा जावईशोध आहे. नारळाला शेंडी ठेवण्याची वेगवेगळी कारणे असू शकतील. कदाचित नारळ उचलायला किंवा अनेक नारळ शेंडीला एकत्र बांधून हातातून कॅरी करायला सोपे जात असेल किंवा अजून काहीतरी कारण असेल. पण लगेच नारळाची शेंडी म्हणजे बळी दिल्या जाणार्या मुंजा मुलाची शेंडी हा संबंध कोठून आला? यावर त्याला काही सांगता आले नाही. आणि समजा ब्राह्मण मुलांना बळी देत असतील तर महारांना बळी द्यायचे ही अफवा असणार.
मी पूजा सांगणार्या अनेक भटजींना विचारले आहे. नारळ फोडणे व नरबळी यांचा काहीही संबंध नाही असेच आजवर सर्वांनी सांगितले आहे.
अशा गोष्टींवर निदान मी तरी तारतम्याने विचार करून विश्वास ठेवत नाही. इतरांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे.
20 Sep 2016 - 5:55 pm | प्रचेतस
काय राव गुरुजी.
जैन-बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर सुरु झालेल्या शाकाहाराच्या प्रचारामुळे सुरु झालेल्या परंपरा आहेत ह्या. ह्याचे विवक्षित असे दाखले कसे देतील.
नारळ म्हणजे बळी, मांसाचा वडा - उडदाचा वडा असे विविध पदार्थ बळीला/मांसनैवेद्याला पर्याय म्हणून हळूहळू विकसित होत गेले. त्याचे दाखले असे कुठून आणणार.
तरी महाभारतातील शांतीपर्वातील तुलाधार-जाजली हा संवाद संपूर्ण वाचावा. अध्याय २६१ पासून. आपल्या सर्व प्रश्नांची त्यात मिळतील असे वाटते.
हा संवाद येथेही उपलब्ध आहे.
http://www.sacred-texts.com/hin/m12/m12b088.htm
20 Sep 2016 - 7:01 pm | संदीप डांगे
सहमत आहे!
20 Sep 2016 - 10:51 pm | श्रीगुरुजी
जैन-बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर सुरु झालेल्या शाकाहाराच्या प्रचारामुळे सुरु झालेल्या परंपरा आहेत ह्या. ह्याचे विवक्षित असे दाखले कसे देतील.
नारळ म्हणजे बळी, मांसाचा वडा - उडदाचा वडा असे विविध पदार्थ बळीला/मांसनैवेद्याला पर्याय म्हणून हळूहळू विकसित होत गेले. त्याचे दाखले असे कुठून आणणार.
इथे जी लिंक दिलेली आहे त्यात तर नारळ, बळी असे शब्द सुद्धा नाहीत. ही महाभारतातील एक रूपक कथा आहे. त्या कथेचा संदर्भ पूर्णपणे वेगळा आहे. रूपक कथा सत्य मानता येत नाहीत. रूपकथा संदेश देण्यासाठी असतात (उदा. लाकूडतोड्याची गोष्ट). या गोष्टी म्हणजे सत्य घटना नाहीत. त्या सत्य मानायच्या झाल्यास सत्यनारायणाच्या पोथीतील साधुवाण्याची कथा किंवा इसापनीतितील कथा सुद्धा सत्य मानाव्या लागतील.
जर नरबळीला शाकाहारी पर्याय म्हणून नारळ फोडण्याची परंपरा जैन-बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर सुरू झाली असेल तर त्यापूर्वी कितीतरी आधी झालेल्या महाभारतात ही परंपरा असण्याचे कारणच नाही.
नारळ फोडणे म्हणजे नरबळी, उडदाचा वडा म्हणजे मांसाचा वडा असे मानत गेले तर ताटातील प्रत्येक पदार्थाचा मांसाहाराशी संबंध लावता येईल. खेकडा भजी म्हणजे तळलेल्या खेकड्यांचा शाकाहारी पर्याय, चटणी म्हणजे खिमा किंवा रसम् म्हणजे रक्त पिण्याचा शाकाहारी पर्याय असेही शोध लावता येतील. मानवी कल्पनाशक्तीला मर्यादा नाहीत, त्यामुळे कोणत्याही पदार्थाचा संबंध कोणत्याही मांस प्रकाराशी जोडता येईल.
एकंदरीत नारळ फोडणे किंवा खाली कोणीतरी लिहिल्याप्रमाणे कोहळा फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी असे मानणे ही भ्रामक समजूत आहे.
21 Sep 2016 - 8:22 am | प्रचेतस
सिलेक्टिव रिडींगचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमचा प्रतिसाद.
मी स्वत:च वर लिहिले आहे की अशा गोष्टींचे दाखले देणे शक्य नाही.
रूपककथा संदेश देण्यासाठीच असतात हे मान्यच आणि ह्या संवादातील सम्पूर्ण आशय काढायाचा म्हटल्यास यज्ञीय हिंसेला विरोध हाच आहे हे तुम्ही हे चार पाच अध्याय नीट वाचल्यास लक्षात येउ शकते.
बाकी मी फ़क्त बळी हा शब्द वापरला असून नरबळी हा शब्द कुठेही वापरला नाही. बळी ह्याचा अर्थ यज्ञीय बळी (vedic sacrifices) अशा अर्थाने आहे.
अशाने माझाच मुद्दा सिद्ध होतोय की. भारतकाळात ही परंपरा नव्हतीच. हिंसेला विरोध हा जैन बौद्धांच्या आगमनानंतरच सुरु झाला. महाभारतातील उपरोक्त पर्व हे बरेचसे प्रक्षिप्त आहे. आणि ते इसवी सनाच्या आसपास शेदोनशे वर्षे मागेपुढे कधीतरी लिहिले गेलेले आहे असे त्याचे तत्कालीन इतिहासाच्या अभ्यासकास सहजी लक्षात येते. सामान्यांसही महाभारताचे सूक्ष्मपणे वाचन केल्यास हे लक्षात यावे असे मला वाटते.
बाकी ताटातील इतर पदार्थांचा उल्लेख तुम्ही येथे का करीत आहात ते समजले नाही.
नारळ, उडदाचा वडा आदि पदार्थ ख़ास देवकार्यासाठी नैवेद्य म्हणूनच वापरले जातात. तर इतर पदार्थ केवळ आहार ह्या दृष्टीने.
21 Sep 2016 - 12:51 pm | श्रीगुरुजी
मी सर्वात आधी तेच लिहिलं आहे. या ऐकीव समजूती आहेत. अशा गोष्टींना आधार नाही.
तुम्ही जी लिंक दिली आहे ते पान मी संपूर्ण वाचले. त्यात बळी, नारळ, नरबळी असे किंवा अशा अर्थाचे शब्द कोठेही नाहीत.
माझ सुरवातीपासून हाच मुद्दा आहे की नारळ फोडणे म्हणजे नरबळीचे प्रतीकात्मक रूप ही ऐकीव समजूत आहे. नारळ फोडण्याचा व प्रतीकात्मक नरबळी किंवा बळी देण्याचा काहीही संबंध नाही. भूतकाळात कोणीतरी असा संबंध जोडला असावा व कालांतराने तेच सत्य मानले जाऊ लागले असावे. नारळ, उडदाचा वडा इ. प्रमाणे खीर, लाडू, इतर पक्वान्ने व वरणभात, पोळी हे देखील नैवेद्यात वापरले जातात. हे सर्वच आहाराचे पदार्थ आहेत. प्रतीकात्मक मांस सेवनाचा व बळीचा यातील कोणत्याही पदार्थाशी संबंध नाही.
21 Sep 2016 - 12:57 pm | प्रचेतस
एकच पान वाचलत?
२/३ अध्याय वाचायला हवेत.
आणि आता
http://www.misalpav.com/comment/882262#comment-882262
आत्मबंध यांचेप्रमाणेच म्हणतो.
डोळ्यावर कातडं बांधून घेतलेल्या व्यक्तीशी बोलण्यात काही पॉइंट नाही.
21 Sep 2016 - 1:10 pm | श्रीगुरुजी
मीही तेच म्हणतो. एका भ्रामक समजूतीमागील कारणे मी विचारली तर कोणालाच योग्य कारणे देता आली नाहीत. परंतु समजूती खरीच आहे यावर मात्र ठाम विश्वास आहे. आणि आता व्यक्तिगत टिप्पणी सुरू झाली आहे.
म्हणजे नारळ/कोहळा फोडण्यामागे प्रतीकात्मक नरबळी देणे ही कल्पना भ्रामक आहे हेच सिद्ध होतंय. असो.
20 Sep 2016 - 6:58 pm | साहना
आमच्या इथे प्रतीकात्मक नरबळी म्हणून कोहळा फोडण्याची पद्धत आहे. नारळ आणि बळी ह्यांचा संबंध आहे असे वाटत नाही.
20 Sep 2016 - 6:02 pm | श्रीगुरुजी
या ऐकीव गप्पा आहेत. या गप्पांमागे कोणताही आधार नाही.
20 Sep 2016 - 6:04 pm | प्रचेतस
तुलाधार-जाजली संवाद वाचला का?
20 Sep 2016 - 6:11 pm | प्रचेतस
अजून संदर्भ हवे असतील तर आश्वमेधिकपर्वातील सुवर्णनकुलाची कथा वाचावी.
20 Sep 2016 - 6:11 pm | अनिरुद्ध.वैद्य
नारळ का फोडायचे, ह्याला काही शास्त्राधार आहे का? फोडुन काय फायदा होतो?
20 Sep 2016 - 10:52 pm | श्रीगुरुजी
खाण्यासाठी फोडायचा हे कारण आहे. ज्याप्रमाणे स्वतः खाण्यासाठी कोंबड्या, बकर्या कापल्या जातात, तसेच नारळ सुद्धा खाण्यासाठीच फोडले जातात.
20 Sep 2016 - 11:11 pm | साहना
वाढदिवस, नवीन वर्ष का साजरे करायचे , आईवडिलांना नमस्कार का करायचा ? फोन उचलल्यावर हॅलो का म्हणायचे ? सगळ्यांचं काही शास्त्र आधार हवा असे नाही. नारळ नको तर कालीगंड फोडा सगळयाच गोष्टींना आहे म्हणून करतात असे नाही परंपरा सुद्धा काही लोकांना पाळ्याव्याशा वाटतात
20 Sep 2016 - 11:26 pm | अत्रुप्त आत्मा
@या ऐकीव गप्पा आहेत. या गप्पांमागे कोणताही आधार नाही. ››› चूक.
श्राद्धातला उडिदवडा हा श्राद्धातल्या मांसान्नाचा पर्याय आहे. विविध होमहवनांच्या विधीतही असणाय्रा क्षेत्रपाल बळीपूजेत भात दही उडिदाचा बळी असतो. त्यालाही सदीपमाषभक्तबली असच संबोधलं जातं.
नवचंडी होमातला देवीसमोरचा कूष्मांड(कोहोळा)बली हा ही पशूबलीचा पर्याय आहे. त्याला कापण्यापूर्वी 'बलीत्वं पशुरूपेण' असा मंत्र म्हटला जातो. याला सगळ्याला कर्मकांडाच्या पोथ्यांचा आधार आहे.
20 Sep 2016 - 11:53 pm | श्रीगुरुजी
रसम्, खेकडा भजी, अळूची भाजी, मठ्ठा, चटणी इ. कोणत्या मांसाहारी अन्नाचे शाकाहारी पर्याय आहेत?
21 Sep 2016 - 12:08 am | अत्रुप्त आत्मा
कोणत्याच नाही. ते पदार्थ शाकाहारीच आहेत. पण तुमचं 'कोणताही आधार नसल्याचं' मत अता निराधार झालं. त्याचं काय? ते बोला.
21 Sep 2016 - 12:13 am | श्रीगुरुजी
नारळ फोडणे हे नरबळीचे शाकाहारी रूप आहे असे तुमचे वैयक्तिक मत आहे. तुमचे मत हा काही शास्त्राधार नाही. याला शास्त्राधार समजणे म्हणजे विकीपिडियावरील माहिती ही डोळे झाकून सत्य आहे असे समजण्यासारखे आहे.
21 Sep 2016 - 10:56 am | अनुप ढेरे
आयला, इथे वल्लीसारखे अभ्यासक आणि आत्मु गुर्जींसारखे पौरोहित्याचं शिक्षण घेतलेले लोक सांगतायत त्याचा अर्थ तरी गुरुजींचं नाक वरच!
21 Sep 2016 - 12:55 pm | श्रीगुरुजी
वाचून गंमत वाटली. हे कोण आत्मबंध आहेत त्यांच्यासारखेच इतर अनेकांनी पौरोहित्याचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांच्यापैकी कोणीही नारळ फोडण्याचा व बळी/नरबळीचा संबंध जोडलेला नाही. आत्मबंध असोत वा प्रचेतस वा अजून कोणी, ते जे सांगतात त्या सर्व गोष्टींवर निदान मी तरी डोळे झाकून विश्वास ठेवत नाही. जर ते सांगतात त्याविषयी शंका वाटली तर अजून माहिती विचारतो व स्वतःची खात्री झाली तरच विश्वास ठेवतो. एखाद्या गोष्टीबद्दल माहिती, प्रश्न विचारणे म्हणजे नाक वर करणे असे ज्यांना वाटते त्यांना माझा साष्टांग दंडवत! ज्यांना त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा असेल त्यांनी तो ठेवावा. माझा आक्षेप नाही.
21 Sep 2016 - 1:16 pm | टवाळ कार्टा
तसा तर तुमचा हेल्मेट वापरण्याबाबतसुध्धा आक्षेप आहे ;)
21 Sep 2016 - 1:20 pm | श्रीगुरुजी
बरोबर. त्यासाठी कारणे सुद्धा आहेत. आणि फक्त माझा एकट्याचा विरोध नसून अनेकांचा हेल्मेटला विरोध आहे.
21 Sep 2016 - 12:15 am | श्रीगुरुजी
>>> कोणत्याच नाही. ते पदार्थ शाकाहारीच आहेत.
बादवे, नारळ, उडीद वडे आणि कोहळा हे पदार्थ शाकाहारीच आहेत आणि हे पदार्थ फक्त फक्त श्राद्धप्रसंगी खाल्ले जात नसून १२ ही महिने त्यांचे सेवन होत असते.
21 Sep 2016 - 12:23 am | अत्रुप्त आत्मा
शाकाहारी पदार्थ असले.. तरी ते मांसारूपी आहेत असं समजून खाल्ले जातात... हे जुनं टनाटनी मूल्य तत्वात शाबूत ठेवण्यासाठी केलं जातं.
पण असो.. अता तुम्ही जाणीवपूर्वक मती मंदत्व स्विकारलं.. हे तुमच्या स्पष्टीकरणावरून कळतच आहे. त्यामुळे अता आणखी समजाविण्याचा प्रश्नच उरत नाही.
तेंव्हा .. चालू द्या अता टनाटनीपणा!
21 Sep 2016 - 12:59 pm | श्रीगुरुजी
हे पदार्थ मांसाहारी समजून खाल्ले जातात हे कोणी सांगितलं तुम्हाला? हे टनाटनी मूल्य वगैरे काय आहे ते तुम्हालाच ठाऊक. मती मंदत्व वगैरे व्यक्तीगत कॉमेंट करून हे लक्षात येतंय की तुम्हाला या गोष्टीची माहिती नाही व तुम्ही केवळ ऐकीव माहिती सत्य समजून चालत आहात.
21 Sep 2016 - 3:33 pm | अत्रुप्त आत्मा
@हे पदार्थ मांसाहारी समजून खाल्ले जातात हे कोणी सांगितलं तुम्हाला? हे टनाटनी मूल्य वगैरे काय आहे ते तुम्हालाच ठाऊक. मती मंदत्व वगैरे व्यक्तीगत कॉमेंट करून हे लक्षात येतंय की तुम्हाला या गोष्टीची माहिती नाही व तुम्ही केवळ ऐकीव माहिती सत्य समजून चालत आहात. ››› कम्माल आहे ब्वॉ . जो माणूस त्याच क्षेत्रात काम करतो. त्यालाच ही त्याची माहिती ऐकीव आहे, असं बळजबरीनी उलट कोंबवून ऐकवणं म्हणजे रगेलपणाचा कळस आहे. एकादा वेळ काढून निर्णयसिंधु आणी धर्मसिंधु आभ्यासा . हे तर वैदिक धर्माचे मान्यताप्राप्त आचारग्रंथ आहेत.
शिवाय मती मंद ही व्यक्तिगत कमेंट नाही. तुम्ही जाणीवपूर्वक कोहोळाबली सारख्या तत्सम घटने मागची मूल्य, हेतू, क्रुतीआशय याकडे दुर्लक्ष करत आहात.
हे माणसाने बुद्धी वापरून स्वत:ची मती मुद्दाम मंद करून ठेवल्याचं लक्षण आहे.
अर्थात धार्मिक कट्टरतावादी टनाटनी याबाबतीत अत्यंत निगरगट्ट चामडीचे असतात. असा पूर्वानुभव आहेच. तुम्हिही तेच करणार हे दिसतच आहे.
तेंव्हा.. पुन्हा एकदा.. चालू द्या निरर्थक आत्मकुंथन!
21 Sep 2016 - 5:35 pm | श्रीगुरुजी
अनेक जण पौरोहित्य करतात. त्यातील काही जणांचा हा पिढीजात व्यवसाय आहे. नारळ फोडण्याचा बळीशी संबंध जोडणारे तुम्ही पहिलेच पुरोहित. अर्थात अखिल ब्रह्मांडात आपणच तेवढे ज्ञानी व इतर सर्वजण अज्ञानी असा तुमचा गैरसमज झाला असेल तर मग बोलणंच खुंटलं. असो.
21 Sep 2016 - 6:17 pm | शलभ
बर्याच जणांच तुमच्या बाबतीत हेच म्हणणे आहे. :)
21 Sep 2016 - 11:28 pm | श्रीगुरुजी
असू देत.
21 Sep 2016 - 6:27 pm | अत्रुप्त आत्मा
@नारळ फोडण्याचा बळीशी संबंध जोडणारे तुम्ही पहिलेच पुरोहित.››› फक्त नारळ फोडण्याचा बळीशी किंवा नरबळिशी संबंध मी जोडलेला नाही. हे तुमचं तुम्हीच आपमत तैय्यार करून माझ्यावर हाणताय. मी नारळ, कोहोळा, वास्तुशांती व जवळ जवळ सगळ्या होमहवनाच्या विधीत होणारी क्षेत्रपाल बळीपूजा(भातावर उडिद मांस म्हणून घालून व वरती गुलाल रक्त साद्रुष्यता म्हणून घालून त्यावर कणकेचा दिवा ठेवलेला दिसतो ती बळीपूजा) आणी श्राद्धात पूर्वी जे प्राणी/पक्षी शिजवून वाढले जात, त्या जागी पचायला जडान्न म्हणून आलेला आणी म्हणूनच मांस समान मानला गेलेला उडिदवडा, व तत्सम पदार्थ ... हे सगळे मांसबळीचे समान पर्याय म्हणून वैदिक धर्मशास्त्राने काळाच्या ऒघात स्विकारलेले आहेत. हेच आणी एव्हढच मी सारांशाने मांडलेलं आहे. हे सगळं कुठलाच पुरोहित नाकारू शकत नाही. अर्थात तो तुमच्यासारखा नसला पाहिजे, एव्हढीच पूर्वअट आहे.
(मूऴ धर्मातच विषमता, अप्रामाणिकपणा , चुका , लबाड्या, ढोंगबाजी, कपट इत्यादी दोष असतात . हे खरंच खरं असल्यामुळे मान्य असून ते स्विकारलेला- आत्मंभट्ट ! )
21 Sep 2016 - 6:29 pm | आजानुकर्ण
__/\__
तुमच्या चिकाटीला सलाम. वरच्या प्रतिसादालाही सलाम.
21 Sep 2016 - 6:38 pm | संदीप डांगे
खरंच. अत्मुस, जबरा हो _/\_, शेवटी सोनारानेच कान टोचावे!
21 Sep 2016 - 11:42 pm | श्रीगुरुजी
सुरूवात झाली ती नारळ फोडण्याचा देवाला दिल्या जाणार्या बळीशी संबंध जोडून. मग त्याच्यात कोहळा आला. नंतर वडे आले. आता भात आला. माझा मूळचा मुद्दा होता की नारळ फोडण्याचा बळीशी संबंध जोडणे ही एक चुकीची कल्पना आहे. हे लिहिल्यावर नारळाचा बळीशी संबंध जोडण्यासाठी कुठलीतरी विकिपीडीयाची लिंक दिली गेली. त्यात अशा संबंधाचं स्पष्टीकरण नव्हतंच. मी ज्या ज्या वास्तुशांतीच्या पूजनात सहभागी होतो (यजमान म्हणून, पुरोहित म्हणून नाही) त्या त्या सर्व समारंभात गुलाल घातलेला भात, उडीद वडे असले प्रकार नव्हते. श्राद्ध किंवा तेराव्या/चौदाव्याचा जेवणात वडे होतेच, पण इतरही अनेक पदार्थ होते आणि त्याचा मांसाशी संबंध आहे असे कोणीही सांगितलेले नाही. एक वास्तुशांत पौरोहित्याचा पिढीजात व्यवसाय असलेल्या व वेदाभ्यासाचा अभ्यास असलेल्या पुण्यातील एका नामवंत पुरोहित घराण्यातील पुरोहितांनी केली होती. यातील एका पुरोहितांनी नंतर वेदाभ्यास पूर्ण करून काशीतून 'दशग्रंथी' हा सन्मान प्राप्त केला. अजून एक वास्तुशांत दोन महिला पुरोहितांनी केली होती. त्यातही असले पदार्थ नव्हते. इतर नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या वास्तुशांतीत सुद्धा हे पाहण्यात नाही. घरी सत्यनारायणासाठी, सोळा सोमवारच्या व्रतासाठी, ग्रहयज्ञासाठी वा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी आलेल्या पुरोहितांना याबद्दल विचारल्यावर त्यांनी ही चुकीची समजूत असल्याचे सांगितले आहे.