आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले.
खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते.
विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर.
.
.
.
प्रतिक्रिया
29 Aug 2019 - 10:26 am | चौकस२१२
आता वळूया आपल्या ठसठसणाऱ्या वेदनेकडे. फक्त प्रबोधन 'आमचेच' का म्हणून? यावर माझी मते खालील प्रमाणे:
प्रबोधन तर सर्वांचेच व्हायला पाहिजे , त्यामुळे "आमचेच का" असे म्हणण्याची पाळी आलीच नसती जर हे प्रबोधन जर सर्व धर्मात झाले असते तर.. हे म्हणजे असे कि मला पिके चित्रपट आवडला, नक्कीच पण पुढे विचार केल्यावर असे हि वाटू लागले कि अरे याने हिंदूइतर धर्माबद्दल पण तेवढेच जास्त प्रसंग दाखवले असते तर? ते का नाही दाखवले
तरी त्यामानाने पिके चा दिदर्शक एवढा ढोंगी नाही पण अनिस ज्यांच्याबरोअबर दिस्ततात ते मात्र निश्चितच असे एकांगी ढोंगी दिसतात
असो बदल सगळीकडे व्हावा असेच वाटते,
29 Aug 2019 - 2:35 pm | Rajesh188
दाभोलकरहे हिंदू द्वेशी आणि डाव्यांचा पॉलिटिक्स अजेंडा राबवत होते चाणाक्ष लोक जाणतात .
इथे एवढी चर्चा करायची गरजच नव्हती .
त्यांचा अंध श्रद्धा निर्मूलन हा नव्हताच तर ती हिंदू ची विटंबना करणे हा होता .
त्या मुळे त्यांच्या आंदोलनाचा काहीच परिणाम समाजावर झाला नाही
29 Aug 2019 - 2:49 pm | जॉनविक्क
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
22 Nov 2019 - 1:22 pm | प्रकाश घाटपांडे
त्यांचा अंध श्रद्धा निर्मूलन हा नव्हताच तर ती हिंदू ची विटंबना करणे हा होता .>>> म्हणजे त्यांचा अंधश्रद्धा निर्मूलन हा अजेंडा नव्हताच तर ती हिंदूंची विटंबना करणे हा अजेंडा होता असे तुम्हाला खरोखरच म्हणायचे आहे का? राजेश
22 Jul 2021 - 10:33 pm | Rajesh188
हो
दाभोलकर आणि मंडळी नी अंध श्रद्धा निर्मूलन करण्यात बिलकुल स्वारस्य नाही.
हिंदू धर्म नष्ट किंवा कमजोर करायचा असेल तर .
हिंदू धर्माच्या श्रद्धा स्थानांना सुरुंग लावणे हा मार्ग त्यांनी. निवडला होता.
त्यांना खरोखर अंध श्रद्धा मुक्त समाज निर्माण करायचा असता तर सर्व धर्मातील अंध श्रद्धा,श्रद्धा चा विरोध केला असता.
माझे स्पष्ट मत आहे.
हिंदू च्या श्रद्धा पण लवचिक आहेत आणि अंध श्रद्धा सुद्धा.
सर्व हिंदू ना त्या पाळण्याची जबरदस्ती नाही.
हिंदू सोडून बाकी धर्मातील श्रद्धा आणि अंध श्रद्धा त्या धर्मातील लोकांनी पाळव्या म्हणून जबरदस्ती केली जाते.
पण दाभोलकर कधीच ह्या विषयावर बोलत नाहीत.
काय कारण असेल.
विदेशातून मिळणारा प्रचंड पैसा?
22 Jul 2021 - 8:21 pm | प्रकाश घाटपांडे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित ईद उल अजहा निमित्त कुर्बनीचा अर्थ नवा
ह्या अभियानाच्या अंतर्गत कुर्बानीचा नवा अर्थ शोधणाऱ्या दोन युवकांशी विशेष ऑनलाईन संवाद आज झाला.
जरुर हा कार्यक्रम पहा. विषय - भारतीय मुसलमान आणि अंधश्रद्धा निर्मूलन
सहभाग:
पैगंबर शेख(समन्वयक, आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी उपक्रम, अध्यक्ष, मिडिया फौंडेशन, दुर्गप्रेमी,लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते)
समीर शेख (पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते)
संवादक : फारुख गवंडी,तासगांव
(मअंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य)
https://www.facebook.com/DrDabholkar/videos/3101651006733504