✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे

स
साहना यांनी
Sun, 09/18/2016 - 07:58  ·  लेख
लेख
आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले. खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते. विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर. . . . img
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
217873 वाचन

💬 प्रतिसाद (456)

प्रतिक्रिया

मी ओढला असता ओ, पण शर्यत

संदीप डांगे
Tue, 09/20/2016 - 07:06 नवीन
मी ओढला असता ओ, पण शर्यत बैलांची आहे ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

वाईट मानून घेऊ नका गाढवाच्या

साहना
Tue, 09/20/2016 - 07:59 नवीन
वाईट मानून घेऊ नका गाढवाच्या शर्यतींत भाग घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आहे की नाही पंचाईत? तिथे गाढव

संदीप डांगे
Tue, 09/20/2016 - 08:04 नवीन
आहे की नाही पंचाईत? तिथे गाढव लागतील ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

बकऱ्यांचा बळी देण्यात निषिद्ध काय आहे हे समजले नाही.

अर्धवटराव
Tue, 09/20/2016 - 04:03 नवीन
+१ मलाही बळी प्रथेमधे काय चुक आहे हे कळत नाहि. सणासुदीला आपण गोड, आवडीचं अन्नसेवन करतो. ज्यांना मांसाहार आवडतो त्यांनी अवष्य बळी देऊन मांसाहार करावा. बळी प्रकरणात स्वच्छता, प्राण्यांना प्रत्यक्ष्य मरण्यापुर्वेच्या यातना, अंधश्रद्धेचा बाजार वगैरे वेगळे प्रॉब्लेम आहेत. पण मुळात मांसाहार करण्यात ज्यांना इंट्रेस्ट आहे त्यांना तो करु द्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

धाग्यावर सगळे सुटलेत मोकाट.

बॅटमॅन
Tue, 09/20/2016 - 00:30 नवीन
धाग्यावर सगळे सुटलेत मोकाट. फुरोगाम्यांची कितीवेळा मारणार, ते तसेही बदलणार नाहीत. मग आपण एनर्जी कशाला वाया घालवायची? बकरी ईदला बिर्यानी आणि गावच्या जत्रेत चुलीवरचे साजूक तूपवाले मटन खा अन खूष रहा.
  • Log in or register to post comments

निसर्ग कायदा संस्कति वगैरे..

चौकटराजा
Tue, 09/20/2016 - 08:18 नवीन
निसर्गात एक प्राणी कोणत्याही कारणास्तव इतरांचा जीव घेत असतो. त्याला कोणतीही शिक्षा नाही. कायद्यात मानवी समाजात मानवाचा बळी घेणे याला शिक्षा आहे. काही ठिकाणी विशिष्ट प्राणी मारणे याला शिक्षा आहे. खरा गोंधळ नेहमी असतो तो संस्कॄति त तेथे एक म्हणतो अमुक मारले तर तो गुन्हा आहे दुसरा म्हणतो ह्या त्यात काय गुन्हा आलाय ? जगणे जगताना, निसर्ग, कायदा व संस्कृति यांचा तारतम्याने वापर करायचा असतो.एव्हरेस्ट वर गेल्यावर धर्माने ओक्सीजन वापरायचा नाही असा कायदा सांगितलेला आहे तो मी पाळीन असे करून चालत नाही.
  • Log in or register to post comments

खर आहे. जीवो जीवस्य जीवनम|

प्रकाश घाटपांडे
Tue, 09/20/2016 - 08:42 नवीन
खर आहे. जीवो जीवस्य जीवनम| मानवी संस्कतीचा जसा विकास होत गेला तस देवाला संतुष्ट करण्यासाठी प्राण्याचा बळी देणे हा प्रकार कमी होत गेला. नारळ फोडणे हे देखील बळी ला प्रतिकात्मक पर्याय म्हणूनच निर्माण झाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

>>> नारळ फोडणे हे देखील बळी

श्रीगुरुजी
Tue, 09/20/2016 - 15:30 नवीन
>>> नारळ फोडणे हे देखील बळी ला प्रतिकात्मक पर्याय म्हणूनच निर्माण झाल. हे कोणी सांगितले? या समजूती ला काही आधार आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

होय. आसच ऐकलंय.

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 09/20/2016 - 16:22 नवीन
बळी नव्हे तर नरबळी. किंबहुना कै़क होमांमध्ये अजुनही प्रतिकात्मक बळी विधी होतो. वास्तुला धान्याचा पुतळा करुन दिला होता बहुतेक. नक्की आठवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बळी नव्हे तर नरबळी. किंबहुना

श्रीगुरुजी
Tue, 09/20/2016 - 17:32 नवीन
बळी नव्हे तर नरबळी. किंबहुना कै़क होमांमध्ये अजुनही प्रतिकात्मक बळी विधी होतो. वास्तुला धान्याचा पुतळा करुन दिला होता बहुतेक.
प्रत्रिकात्मक बळी? नरबळी? वास्तुला? मी स्वतःच्या घराची वास्तुशांत २-३ वेळा केली आहे. असला विधी पाहण्यात/ऐकण्यात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

भाताचा मानवाकृती

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 09/20/2016 - 18:11 नवीन
बाहुला करुन त्याची पुजा करुन, नंतर तो बाहेर नेउन ठेवायला सांगण्यात आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

असला विधी माझ्या पाहण्यात

श्रीगुरुजी
Tue, 09/20/2016 - 23:59 नवीन
असला विधी माझ्या पाहण्यात नाही. स्वतःच्या घराच्या वास्तुशांतीत किंवा नातेवाईक/मित्र/शेजारीपाजारी इ. च्या वास्तुशांतीत हा विधी केल्याचे बघितलेले नाही. आमच्या, आमच्या नातेवाईकांच्या/मित्रमंडळींच्या/शेजार्‍यापाजार्‍यांच्या घरातील पूर्वीच्या पिढ्यात नरबळी देण्याची उच्चपरंपरा नसावी असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

https://mr.wikipedia.org/wiki

प्रकाश घाटपांडे
Tue, 09/20/2016 - 16:36 नवीन
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3 अजून धर्मशास्त्राच्या जाणकाराला विचारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अच्छा! तुमच्या माहितीचा

श्रीगुरुजी
Tue, 09/20/2016 - 17:29 नवीन
अच्छा! तुमच्या माहितीचा स्त्रोत विकिपिडीया. तिथे कोणीतरी, काहीतरी लिहिलंय ते सत्य आहे असं मानून तुम्ही चाललाय. तुम्ही जे खरं मानून चाललाय त्याला विकिपिडियाच्या वरील लिंकमधील एका वाक्याव्यतिरिक्त काही पुरावे, शास्त्राधार आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

केवळ तसे नाही पण मी धार्मिक

प्रकाश घाटपांडे
Tue, 09/20/2016 - 17:38 नवीन
केवळ तसे नाही पण मी धार्मिक वातावरणात वाढलो असल्याने किर्तनकार प्रवचनकार गुरुजी घरात असायचेच. त्यांच्याही बोलण्यात असे संदर्भ यायचे. अधिक विश्वासार्ह संदर्भ तुम्ही ही शोधा मीही शोधतो. प्रत्येक गोष्टी साठी विद्वत्ताप्रचुर संदर्भ देणे शक्य होत नाही. तारतम्याने आपण काही गोष्टी समजू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

असे कोणी म्हणाले म्हणजे ते

टवाळ कार्टा
Tue, 09/20/2016 - 17:47 नवीन
असे कोणी म्हणाले म्हणजे ते खरे मानायचे??? उद्या जर म्हणाले सगळे सोडून संन्यास घ्या तर घेणार आहात का तुम्ही? असले गुरुजी बदला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

केवळ तसे नाही पण मी धार्मिक

श्रीगुरुजी
Tue, 09/20/2016 - 18:01 नवीन
केवळ तसे नाही पण मी धार्मिक वातावरणात वाढलो असल्याने किर्तनकार प्रवचनकार गुरुजी घरात असायचेच. त्यांच्याही बोलण्यात असे संदर्भ यायचे. अधिक विश्वासार्ह संदर्भ तुम्ही ही शोधा मीही शोधतो. प्रत्येक गोष्टी साठी विद्वत्ताप्रचुर संदर्भ देणे शक्य होत नाही. तारतम्याने आपण काही गोष्टी समजू शकतो.
या अफवेला कोणताही शास्त्राधार वा इतिहास वा पुरावे नाहीत हे मला माहित होते. केवळ ऐकीव गप्पांवर ही अफवा पसरवली गेली आहे. अशा अनेक अफवा पसरवल्या गेल्या आहेत. पूर्वी म्हणे महारांना बळी द्यायचे. नंतर एका मित्राशी बोलताना त्याने नारळाचे उदाहरण दिल्यावर मी त्यालाही संदर्भ मागितल्यावर तो म्हणाला की नारळाला शेंडी असते कारण ते म्हणे बळी दिल्या जाणार्‍या बटूचे प्रतीक आहे. त्यावर मी विचारले की बळी तर महारांना द्यायचे, मग ब्राह्मण मुलांना कधी बळी द्यायला लागले? यावर त्याला योग्य उत्तर न दिल्याने त्याने मलाच उलटे विचारले की मग फोडताना नारळाला शेंडी का ठेवतात? यावर मी सांगितले की नारळाच्या शेंडीचा बटूच्या शेंडीशी संबंध लावणे हा जावईशोध आहे. नारळाला शेंडी ठेवण्याची वेगवेगळी कारणे असू शकतील. कदाचित नारळ उचलायला किंवा अनेक नारळ शेंडीला एकत्र बांधून हातातून कॅरी करायला सोपे जात असेल किंवा अजून काहीतरी कारण असेल. पण लगेच नारळाची शेंडी म्हणजे बळी दिल्या जाणार्‍या मुंजा मुलाची शेंडी हा संबंध कोठून आला? यावर त्याला काही सांगता आले नाही. आणि समजा ब्राह्मण मुलांना बळी देत असतील तर महारांना बळी द्यायचे ही अफवा असणार. मी पूजा सांगणार्‍या अनेक भटजींना विचारले आहे. नारळ फोडणे व नरबळी यांचा काहीही संबंध नाही असेच आजवर सर्वांनी सांगितले आहे. अशा गोष्टींवर निदान मी तरी तारतम्याने विचार करून विश्वास ठेवत नाही. इतरांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

काय राव गुरुजी.

प्रचेतस
Tue, 09/20/2016 - 17:55 नवीन
काय राव गुरुजी. जैन-बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर सुरु झालेल्या शाकाहाराच्या प्रचारामुळे सुरु झालेल्या परंपरा आहेत ह्या. ह्याचे विवक्षित असे दाखले कसे देतील. नारळ म्हणजे बळी, मांसाचा वडा - उडदाचा वडा असे विविध पदार्थ बळीला/मांसनैवेद्याला पर्याय म्हणून हळूहळू विकसित होत गेले. त्याचे दाखले असे कुठून आणणार. तरी महाभारतातील शांतीपर्वातील तुलाधार-जाजली हा संवाद संपूर्ण वाचावा. अध्याय २६१ पासून. आपल्या सर्व प्रश्नांची त्यात मिळतील असे वाटते. हा संवाद येथेही उपलब्ध आहे. http://www.sacred-texts.com/hin/m12/m12b088.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सहमत आहे!

संदीप डांगे
Tue, 09/20/2016 - 19:01 नवीन
सहमत आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

जैन-बौद्ध धर्माच्या

श्रीगुरुजी
Tue, 09/20/2016 - 22:51 नवीन
जैन-बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर सुरु झालेल्या शाकाहाराच्या प्रचारामुळे सुरु झालेल्या परंपरा आहेत ह्या. ह्याचे विवक्षित असे दाखले कसे देतील. नारळ म्हणजे बळी, मांसाचा वडा - उडदाचा वडा असे विविध पदार्थ बळीला/मांसनैवेद्याला पर्याय म्हणून हळूहळू विकसित होत गेले. त्याचे दाखले असे कुठून आणणार.
तरी महाभारतातील शांतीपर्वातील तुलाधार-जाजली हा संवाद संपूर्ण वाचावा. अध्याय २६१ पासून. आपल्या सर्व प्रश्नांची त्यात मिळतील असे वाटते.
इथे जी लिंक दिलेली आहे त्यात तर नारळ, बळी असे शब्द सुद्धा नाहीत. ही महाभारतातील एक रूपक कथा आहे. त्या कथेचा संदर्भ पूर्णपणे वेगळा आहे. रूपक कथा सत्य मानता येत नाहीत. रूपकथा संदेश देण्यासाठी असतात (उदा. लाकूडतोड्याची गोष्ट). या गोष्टी म्हणजे सत्य घटना नाहीत. त्या सत्य मानायच्या झाल्यास सत्यनारायणाच्या पोथीतील साधुवाण्याची कथा किंवा इसापनीतितील कथा सुद्धा सत्य मानाव्या लागतील. जर नरबळीला शाकाहारी पर्याय म्हणून नारळ फोडण्याची परंपरा जैन-बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर सुरू झाली असेल तर त्यापूर्वी कितीतरी आधी झालेल्या महाभारतात ही परंपरा असण्याचे कारणच नाही. नारळ फोडणे म्हणजे नरबळी, उडदाचा वडा म्हणजे मांसाचा वडा असे मानत गेले तर ताटातील प्रत्येक पदार्थाचा मांसाहाराशी संबंध लावता येईल. खेकडा भजी म्हणजे तळलेल्या खेकड्यांचा शाकाहारी पर्याय, चटणी म्हणजे खिमा किंवा रसम् म्हणजे रक्त पिण्याचा शाकाहारी पर्याय असेही शोध लावता येतील. मानवी कल्पनाशक्तीला मर्यादा नाहीत, त्यामुळे कोणत्याही पदार्थाचा संबंध कोणत्याही मांस प्रकाराशी जोडता येईल. एकंदरीत नारळ फोडणे किंवा खाली कोणीतरी लिहिल्याप्रमाणे कोहळा फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी असे मानणे ही भ्रामक समजूत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सिलेक्टिव रिडींगचं उत्तम

प्रचेतस
Wed, 09/21/2016 - 08:22 नवीन
सिलेक्टिव रिडींगचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमचा प्रतिसाद.
इथे जी लिंक दिलेली आहे त्यात तर नारळ, बळी असे शब्द सुद्धा नाहीत.
मी स्वत:च वर लिहिले आहे की अशा गोष्टींचे दाखले देणे शक्य नाही. रूपककथा संदेश देण्यासाठीच असतात हे मान्यच आणि ह्या संवादातील सम्पूर्ण आशय काढायाचा म्हटल्यास यज्ञीय हिंसेला विरोध हाच आहे हे तुम्ही हे चार पाच अध्याय नीट वाचल्यास लक्षात येउ शकते. बाकी मी फ़क्त बळी हा शब्द वापरला असून नरबळी हा शब्द कुठेही वापरला नाही. बळी ह्याचा अर्थ यज्ञीय बळी (vedic sacrifices) अशा अर्थाने आहे.
जर नरबळीला शाकाहारी पर्याय म्हणून नारळ फोडण्याची परंपरा जैन-बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर सुरू झाली असेल तर त्यापूर्वी कितीतरी आधी झालेल्या महाभारतात ही परंपरा असण्याचे कारणच नाही
अशाने माझाच मुद्दा सिद्ध होतोय की. भारतकाळात ही परंपरा नव्हतीच. हिंसेला विरोध हा जैन बौद्धांच्या आगमनानंतरच सुरु झाला. महाभारतातील उपरोक्त पर्व हे बरेचसे प्रक्षिप्त आहे. आणि ते इसवी सनाच्या आसपास शेदोनशे वर्षे मागेपुढे कधीतरी लिहिले गेलेले आहे असे त्याचे तत्कालीन इतिहासाच्या अभ्यासकास सहजी लक्षात येते. सामान्यांसही महाभारताचे सूक्ष्मपणे वाचन केल्यास हे लक्षात यावे असे मला वाटते. बाकी ताटातील इतर पदार्थांचा उल्लेख तुम्ही येथे का करीत आहात ते समजले नाही. नारळ, उडदाचा वडा आदि पदार्थ ख़ास देवकार्यासाठी नैवेद्य म्हणूनच वापरले जातात. तर इतर पदार्थ केवळ आहार ह्या दृष्टीने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मी स्वत:च वर लिहिले आहे की

श्रीगुरुजी
Wed, 09/21/2016 - 12:51 नवीन
मी स्वत:च वर लिहिले आहे की अशा गोष्टींचे दाखले देणे शक्य नाही.
मी सर्वात आधी तेच लिहिलं आहे. या ऐकीव समजूती आहेत. अशा गोष्टींना आधार नाही.
रूपककथा संदेश देण्यासाठीच असतात हे मान्यच आणि ह्या संवादातील सम्पूर्ण आशय काढायाचा म्हटल्यास यज्ञीय हिंसेला विरोध हाच आहे हे तुम्ही हे चार पाच अध्याय नीट वाचल्यास लक्षात येउ शकते. बाकी मी फ़क्त बळी हा शब्द वापरला असून नरबळी हा शब्द कुठेही वापरला नाही. बळी ह्याचा अर्थ यज्ञीय बळी (vedic sacrifices) अशा अर्थाने आहे.
तुम्ही जी लिंक दिली आहे ते पान मी संपूर्ण वाचले. त्यात बळी, नारळ, नरबळी असे किंवा अशा अर्थाचे शब्द कोठेही नाहीत.
अशाने माझाच मुद्दा सिद्ध होतोय की. भारतकाळात ही परंपरा नव्हतीच. हिंसेला विरोध हा जैन बौद्धांच्या आगमनानंतरच सुरु झाला. महाभारतातील उपरोक्त पर्व हे बरेचसे प्रक्षिप्त आहे. आणि ते इसवी सनाच्या आसपास शेदोनशे वर्षे मागेपुढे कधीतरी लिहिले गेलेले आहे असे त्याचे तत्कालीन इतिहासाच्या अभ्यासकास सहजी लक्षात येते. सामान्यांसही महाभारताचे सूक्ष्मपणे वाचन केल्यास हे लक्षात यावे असे मला वाटते. बाकी ताटातील इतर पदार्थांचा उल्लेख तुम्ही येथे का करीत आहात ते समजले नाही. नारळ, उडदाचा वडा आदि पदार्थ ख़ास देवकार्यासाठी नैवेद्य म्हणूनच वापरले जातात. तर इतर पदार्थ केवळ आहार ह्या दृष्टीने.
माझ सुरवातीपासून हाच मुद्दा आहे की नारळ फोडणे म्हणजे नरबळीचे प्रतीकात्मक रूप ही ऐकीव समजूत आहे. नारळ फोडण्याचा व प्रतीकात्मक नरबळी किंवा बळी देण्याचा काहीही संबंध नाही. भूतकाळात कोणीतरी असा संबंध जोडला असावा व कालांतराने तेच सत्य मानले जाऊ लागले असावे. नारळ, उडदाचा वडा इ. प्रमाणे खीर, लाडू, इतर पक्वान्ने व वरणभात, पोळी हे देखील नैवेद्यात वापरले जातात. हे सर्वच आहाराचे पदार्थ आहेत. प्रतीकात्मक मांस सेवनाचा व बळीचा यातील कोणत्याही पदार्थाशी संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

एकच पान वाचलत?

प्रचेतस
Wed, 09/21/2016 - 12:57 नवीन
एकच पान वाचलत? २/३ अध्याय वाचायला हवेत. आणि आता http://www.misalpav.com/comment/882262#comment-882262 आत्मबंध यांचेप्रमाणेच म्हणतो. डोळ्यावर कातडं बांधून घेतलेल्या व्यक्तीशी बोलण्यात काही पॉइंट नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मीही तेच म्हणतो. एका भ्रामक

श्रीगुरुजी
Wed, 09/21/2016 - 13:10 नवीन
मीही तेच म्हणतो. एका भ्रामक समजूतीमागील कारणे मी विचारली तर कोणालाच योग्य कारणे देता आली नाहीत. परंतु समजूती खरीच आहे यावर मात्र ठाम विश्वास आहे. आणि आता व्यक्तिगत टिप्पणी सुरू झाली आहे. म्हणजे नारळ/कोहळा फोडण्यामागे प्रतीकात्मक नरबळी देणे ही कल्पना भ्रामक आहे हेच सिद्ध होतंय. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आमच्या इथे प्रतीकात्मक नरबळी

साहना
Tue, 09/20/2016 - 18:58 नवीन
आमच्या इथे प्रतीकात्मक नरबळी म्हणून कोहळा फोडण्याची पद्धत आहे. नारळ आणि बळी ह्यांचा संबंध आहे असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नारळ म्हणजे बळी, मांसाचा वडा

श्रीगुरुजी
Tue, 09/20/2016 - 18:02 नवीन
नारळ म्हणजे बळी, मांसाचा वडा - उडदाचा वडा असे विविध पदार्थ बळीला/मांसनैवेद्याला पर्याय म्हणून हळूहळू विकसित होत गेले. त्याचे दाखले असे कुठून आणणार.
या ऐकीव गप्पा आहेत. या गप्पांमागे कोणताही आधार नाही.
  • Log in or register to post comments

तुलाधार-जाजली संवाद वाचला का?

प्रचेतस
Tue, 09/20/2016 - 18:04 नवीन
तुलाधार-जाजली संवाद वाचला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अजून संदर्भ हवे असतील तर

प्रचेतस
Tue, 09/20/2016 - 18:11 नवीन
अजून संदर्भ हवे असतील तर आश्वमेधिकपर्वातील सुवर्णनकुलाची कथा वाचावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मग

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 09/20/2016 - 18:11 नवीन
नारळ का फोडायचे, ह्याला काही शास्त्राधार आहे का? फोडुन काय फायदा होतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

खाण्यासाठी फोडायचा हे कारण

श्रीगुरुजी
Tue, 09/20/2016 - 22:52 नवीन
खाण्यासाठी फोडायचा हे कारण आहे. ज्याप्रमाणे स्वतः खाण्यासाठी कोंबड्या, बकर्‍या कापल्या जातात, तसेच नारळ सुद्धा खाण्यासाठीच फोडले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

वाढदिवस, नवीन वर्ष का साजरे

साहना
Tue, 09/20/2016 - 23:11 नवीन
वाढदिवस, नवीन वर्ष का साजरे करायचे , आईवडिलांना नमस्कार का करायचा ? फोन उचलल्यावर हॅलो का म्हणायचे ? सगळ्यांचं काही शास्त्र आधार हवा असे नाही. नारळ नको तर कालीगंड फोडा सगळयाच गोष्टींना आहे म्हणून करतात असे नाही परंपरा सुद्धा काही लोकांना पाळ्याव्याशा वाटतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

@या ऐकीव गप्पा आहेत. या

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/20/2016 - 23:26 नवीन
@या ऐकीव गप्पा आहेत. या गप्पांमागे कोणताही आधार नाही. ››› चूक. श्राद्धातला उडिदवडा हा श्राद्धातल्या मांसान्नाचा पर्याय आहे. विविध होमहवनांच्या विधीतही असणाय्रा क्षेत्रपाल बळीपूजेत भात दही उडिदाचा बळी असतो. त्यालाही सदीपमाषभक्तबली असच संबोधलं जातं. नवचंडी होमातला देवीसमोरचा कूष्मांड(कोहोळा)बली हा ही पशूबलीचा पर्याय आहे. त्याला कापण्यापूर्वी 'बलीत्वं पशुरूपेण' असा मंत्र म्हटला जातो. याला सगळ्याला कर्मकांडाच्या पोथ्यांचा आधार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

रसम्, खेकडा भजी, अळूची भाजी,

श्रीगुरुजी
Tue, 09/20/2016 - 23:53 नवीन
रसम्, खेकडा भजी, अळूची भाजी, मठ्ठा, चटणी इ. कोणत्या मांसाहारी अन्नाचे शाकाहारी पर्याय आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कोणत्याच नाही. ते पदार्थ

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/21/2016 - 00:08 नवीन
कोणत्याच नाही. ते पदार्थ शाकाहारीच आहेत. पण तुमचं 'कोणताही आधार नसल्याचं' मत अता निराधार झालं. त्याचं काय? ते बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नारळ फोडणे हे नरबळीचे

श्रीगुरुजी
Wed, 09/21/2016 - 00:13 नवीन
नारळ फोडणे हे नरबळीचे शाकाहारी रूप आहे असे तुमचे वैयक्तिक मत आहे. तुमचे मत हा काही शास्त्राधार नाही. याला शास्त्राधार समजणे म्हणजे विकीपिडियावरील माहिती ही डोळे झाकून सत्य आहे असे समजण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कमाले!

अनुप ढेरे
Wed, 09/21/2016 - 10:56 नवीन
आयला, इथे वल्लीसारखे अभ्यासक आणि आत्मु गुर्जींसारखे पौरोहित्याचं शिक्षण घेतलेले लोक सांगतायत त्याचा अर्थ तरी गुरुजींचं नाक वरच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

वाचून गंमत वाटली. हे कोण

श्रीगुरुजी
Wed, 09/21/2016 - 12:55 नवीन
वाचून गंमत वाटली. हे कोण आत्मबंध आहेत त्यांच्यासारखेच इतर अनेकांनी पौरोहित्याचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांच्यापैकी कोणीही नारळ फोडण्याचा व बळी/नरबळीचा संबंध जोडलेला नाही. आत्मबंध असोत वा प्रचेतस वा अजून कोणी, ते जे सांगतात त्या सर्व गोष्टींवर निदान मी तरी डोळे झाकून विश्वास ठेवत नाही. जर ते सांगतात त्याविषयी शंका वाटली तर अजून माहिती विचारतो व स्वतःची खात्री झाली तरच विश्वास ठेवतो. एखाद्या गोष्टीबद्दल माहिती, प्रश्न विचारणे म्हणजे नाक वर करणे असे ज्यांना वाटते त्यांना माझा साष्टांग दंडवत! ज्यांना त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा असेल त्यांनी तो ठेवावा. माझा आक्षेप नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

तसा तर तुमचा हेल्मेट

टवाळ कार्टा
Wed, 09/21/2016 - 13:16 नवीन
तसा तर तुमचा हेल्मेट वापरण्याबाबतसुध्धा आक्षेप आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बरोबर. त्यासाठी कारणे सुद्धा

श्रीगुरुजी
Wed, 09/21/2016 - 13:20 नवीन
बरोबर. त्यासाठी कारणे सुद्धा आहेत. आणि फक्त माझा एकट्याचा विरोध नसून अनेकांचा हेल्मेटला विरोध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

>>> कोणत्याच नाही. ते पदार्थ

श्रीगुरुजी
Wed, 09/21/2016 - 00:15 नवीन
>>> कोणत्याच नाही. ते पदार्थ शाकाहारीच आहेत. बादवे, नारळ, उडीद वडे आणि कोहळा हे पदार्थ शाकाहारीच आहेत आणि हे पदार्थ फक्त फक्त श्राद्धप्रसंगी खाल्ले जात नसून १२ ही महिने त्यांचे सेवन होत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

शाकाहारी पदार्थ असले.. तरी ते

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/21/2016 - 00:23 नवीन
शाकाहारी पदार्थ असले.. तरी ते मांसारूपी आहेत असं समजून खाल्ले जातात... हे जुनं टनाटनी मूल्य तत्वात शाबूत ठेवण्यासाठी केलं जातं. पण असो.. अता तुम्ही जाणीवपूर्वक मती मंदत्व स्विकारलं.. हे तुमच्या स्पष्टीकरणावरून कळतच आहे. त्यामुळे अता आणखी समजाविण्याचा प्रश्नच उरत नाही. तेंव्हा .. चालू द्या अता टनाटनीपणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

शाकाहारी पदार्थ असले.. तरी ते

श्रीगुरुजी
Wed, 09/21/2016 - 12:59 नवीन
शाकाहारी पदार्थ असले.. तरी ते मांसारूपी आहेत असं समजून खाल्ले जातात... हे जुनं टनाटनी मूल्य तत्वात शाबूत ठेवण्यासाठी केलं जातं. पण असो.. अता तुम्ही जाणीवपूर्वक मती मंदत्व स्विकारलं.. हे तुमच्या स्पष्टीकरणावरून कळतच आहे. त्यामुळे अता आणखी समजाविण्याचा प्रश्नच उरत नाही. तेंव्हा .. चालू द्या अता टनाटनीपणा!
हे पदार्थ मांसाहारी समजून खाल्ले जातात हे कोणी सांगितलं तुम्हाला? हे टनाटनी मूल्य वगैरे काय आहे ते तुम्हालाच ठाऊक. मती मंदत्व वगैरे व्यक्तीगत कॉमेंट करून हे लक्षात येतंय की तुम्हाला या गोष्टीची माहिती नाही व तुम्ही केवळ ऐकीव माहिती सत्य समजून चालत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@हे पदार्थ मांसाहारी समजून

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/21/2016 - 15:33 नवीन
@हे पदार्थ मांसाहारी समजून खाल्ले जातात हे कोणी सांगितलं तुम्हाला? हे टनाटनी मूल्य वगैरे काय आहे ते तुम्हालाच ठाऊक. मती मंदत्व वगैरे व्यक्तीगत कॉमेंट करून हे लक्षात येतंय की तुम्हाला या गोष्टीची माहिती नाही व तुम्ही केवळ ऐकीव माहिती सत्य समजून चालत आहात. ››› कम्माल आहे ब्वॉ . जो माणूस त्याच क्षेत्रात काम करतो. त्यालाच ही त्याची माहिती ऐकीव आहे, असं बळजबरीनी उलट कोंबवून ऐकवणं म्हणजे रगेलपणाचा कळस आहे. एकादा वेळ काढून निर्णयसिंधु आणी धर्मसिंधु आभ्यासा . हे तर वैदिक धर्माचे मान्यताप्राप्त आचारग्रंथ आहेत. शिवाय मती मंद ही व्यक्तिगत कमेंट नाही. तुम्ही जाणीवपूर्वक कोहोळाबली सारख्या तत्सम घटने मागची मूल्य, हेतू, क्रुतीआशय याकडे दुर्लक्ष करत आहात. हे माणसाने बुद्धी वापरून स्वत:ची मती मुद्दाम मंद करून ठेवल्याचं लक्षण आहे. अर्थात धार्मिक कट्टरतावादी टनाटनी याबाबतीत अत्यंत निगरगट्ट चामडीचे असतात. असा पूर्वानुभव आहेच. तुम्हिही तेच करणार हे दिसतच आहे. तेंव्हा.. पुन्हा एकदा.. चालू द्या निरर्थक आत्मकुंथन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अनेक जण पौरोहित्य करतात.

श्रीगुरुजी
Wed, 09/21/2016 - 17:35 नवीन
अनेक जण पौरोहित्य करतात. त्यातील काही जणांचा हा पिढीजात व्यवसाय आहे. नारळ फोडण्याचा बळीशी संबंध जोडणारे तुम्ही पहिलेच पुरोहित. अर्थात अखिल ब्रह्मांडात आपणच तेवढे ज्ञानी व इतर सर्वजण अज्ञानी असा तुमचा गैरसमज झाला असेल तर मग बोलणंच खुंटलं. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अर्थात अखिल ब्रह्मांडात आपणच

शलभ
Wed, 09/21/2016 - 18:17 नवीन
अर्थात अखिल ब्रह्मांडात आपणच तेवढे ज्ञानी व इतर सर्वजण अज्ञानी असा तुमचा गैरसमज झाला असेल तर मग बोलणंच खुंटलं.
बर्‍याच जणांच तुमच्या बाबतीत हेच म्हणणे आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

असू देत.

श्रीगुरुजी
Wed, 09/21/2016 - 23:28 नवीन
असू देत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ

@नारळ फोडण्याचा बळीशी संबंध

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/21/2016 - 18:27 नवीन
@नारळ फोडण्याचा बळीशी संबंध जोडणारे तुम्ही पहिलेच पुरोहित.››› फक्त नारळ फोडण्याचा बळीशी किंवा नरबळिशी संबंध मी जोडलेला नाही. हे तुमचं तुम्हीच आपमत तैय्यार करून माझ्यावर हाणताय. मी नारळ, कोहोळा, वास्तुशांती व जवळ जवळ सगळ्या होमहवनाच्या विधीत होणारी क्षेत्रपाल बळीपूजा(भातावर उडिद मांस म्हणून घालून व वरती गुलाल रक्त साद्रुष्यता म्हणून घालून त्यावर कणकेचा दिवा ठेवलेला दिसतो ती बळीपूजा) आणी श्राद्धात पूर्वी जे प्राणी/पक्षी शिजवून वाढले जात, त्या जागी पचायला जडान्न म्हणून आलेला आणी म्हणूनच मांस समान मानला गेलेला उडिदवडा, व तत्सम पदार्थ ... हे सगळे मांसबळीचे समान पर्याय म्हणून वैदिक धर्मशास्त्राने काळाच्या ऒघात स्विकारलेले आहेत. हेच आणी एव्हढच मी सारांशाने मांडलेलं आहे. हे सगळं कुठलाच पुरोहित नाकारू शकत नाही. अर्थात तो तुमच्यासारखा नसला पाहिजे, एव्हढीच पूर्वअट आहे. (मूऴ धर्मातच विषमता, अप्रामाणिकपणा , चुका , लबाड्या, ढोंगबाजी, कपट इत्यादी दोष असतात . हे खरंच खरं असल्यामुळे मान्य असून ते स्विकारलेला- आत्मंभट्ट ! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

__/\__

आजानुकर्ण
Wed, 09/21/2016 - 18:29 नवीन
__/\__ तुमच्या चिकाटीला सलाम. वरच्या प्रतिसादालाही सलाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

खरंच. अत्मुस, जबरा हो _/\_,

संदीप डांगे
Wed, 09/21/2016 - 18:38 नवीन
खरंच. अत्मुस, जबरा हो _/\_, शेवटी सोनारानेच कान टोचावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

सुरूवात झाली ती नारळ

श्रीगुरुजी
Wed, 09/21/2016 - 23:42 नवीन
सुरूवात झाली ती नारळ फोडण्याचा देवाला दिल्या जाणार्‍या बळीशी संबंध जोडून. मग त्याच्यात कोहळा आला. नंतर वडे आले. आता भात आला. माझा मूळचा मुद्दा होता की नारळ फोडण्याचा बळीशी संबंध जोडणे ही एक चुकीची कल्पना आहे. हे लिहिल्यावर नारळाचा बळीशी संबंध जोडण्यासाठी कुठलीतरी विकिपीडीयाची लिंक दिली गेली. त्यात अशा संबंधाचं स्पष्टीकरण नव्हतंच. मी ज्या ज्या वास्तुशांतीच्या पूजनात सहभागी होतो (यजमान म्हणून, पुरोहित म्हणून नाही) त्या त्या सर्व समारंभात गुलाल घातलेला भात, उडीद वडे असले प्रकार नव्हते. श्राद्ध किंवा तेराव्या/चौदाव्याचा जेवणात वडे होतेच, पण इतरही अनेक पदार्थ होते आणि त्याचा मांसाशी संबंध आहे असे कोणीही सांगितलेले नाही. एक वास्तुशांत पौरोहित्याचा पिढीजात व्यवसाय असलेल्या व वेदाभ्यासाचा अभ्यास असलेल्या पुण्यातील एका नामवंत पुरोहित घराण्यातील पुरोहितांनी केली होती. यातील एका पुरोहितांनी नंतर वेदाभ्यास पूर्ण करून काशीतून 'दशग्रंथी' हा सन्मान प्राप्त केला. अजून एक वास्तुशांत दोन महिला पुरोहितांनी केली होती. त्यातही असले पदार्थ नव्हते. इतर नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या वास्तुशांतीत सुद्धा हे पाहण्यात नाही. घरी सत्यनारायणासाठी, सोळा सोमवारच्या व्रतासाठी, ग्रहयज्ञासाठी वा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी आलेल्या पुरोहितांना याबद्दल विचारल्यावर त्यांनी ही चुकीची समजूत असल्याचे सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा