गुंजन करण्या का कष्ट विहंग घेई
ही समस्या सदैव माझ्या मनी येई
गीत लिहूनी कवी ते गाण्या देई
सप्तसूरातून गायिका मग गान गाई
कवनासाठी कोण बरे विहंगाचा कवी
अपुले कवन सहजगत्या तो गाई
प्रीति कशी एकमेकावरी करावी
गाऊनी गाणे तेच विहंग शिकवी
अपुली प्रीति सहजगत्या व्हावी
हीच कामना कवनातूनी मिळावी
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
3 Feb 2009 - 6:40 pm | लिखाळ
कविता चांगली आहे. पहिल्या कडव्यातली कल्पना आवडली.
गुंजन शब्द भुंग्यासारख्या किटकांसाठी वापरतात असे वाटते. इंग्रजीत हम ऑफ बी म्हणतात तसे. त्यामुळे गुंजन-गाणे हे तितकेसे जुळले नाही असे मला वाटले.
पण कल्पना आवडली.
-- लिखाळ.
3 Feb 2009 - 10:10 pm | विसोबा खेचर
सामंत साहेब, जियो..!
आपलाच,
तात्या.
3 Feb 2009 - 11:03 pm | सर्किट (not verified)
अरे वा ! कवितेच्या प्रांतातही आपली मुशाफिरी बघून चांगले वाटले.
पुकशु.
-- सर्किट
3 Feb 2009 - 11:10 pm | प्राजु
कल्पना सुंदर आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Feb 2009 - 11:53 pm | शंकरराव
कविता आवडली