कुठेतरी फुललेलं फुलपाखरु आणि लाल फुलांचा सडा असावा
वाटतं मला
काही पक्षी रंगीबेरंगी किडे बाजरीचं कणीस पाणी चौफेर असावं
वाटतं मला
आभाळ झळाळून ऊन पडावं
पंक्चर झालेल्या सायकलला वंगण लावून दमडावं
रीम वाकडी व्हावी चिखलात चाक रुतावं खांद्यावर घेऊन घरला चालत जावं
असावी म्हणून ठेवलेली
दाढी
चांगली हातभर वाढली
जंगलातून भुत बाहेर पडावं
तश्या माझ्या कविता
अचानक आलेल्या
जरीची टोपी घालूनंच
मी कविता लिहायला बसतो
अगदी राजबिंडा
गंजलेल्या पत्र्याच्या घरात कोंबडी अंडी घालतेय टिव्हीच्या खाली
डिरीवरच्या पेंडीच्या पोत्यात आजकाल चांदीची थाळी नाही
मुळात म्हशी राहिल्यात किती?
टंगस्टन दिव्याचा भगभगीत प्रकाश
पेन चालत नाही
लाकडे मसणात गेली
इत्यादी इत्यादी
"अरे थू..."
प्रतिक्रिया
15 Sep 2016 - 1:47 pm | अभ्या..
हान तिज्यामारी.
परफेक्शन.
गेटर सारखी उपमा वापरणार्या जव्हेरभावला साष्टांग प्रणिपात.
15 Sep 2016 - 1:54 pm | निनाव
+१ अभ्या
जव्हेर जी -
रुतलेली सायकल बरीच वेगाने पुढे गेलीये .. बर् का.. :)
15 Sep 2016 - 2:11 pm | इरसाल
गॅटर म्हणजे टायर फाटला की नवा टायर न टाकता फाटलेल्या जागी जुनी ट्युब किंवा टायरचा टाकलेला तुकडा.
15 Sep 2016 - 2:13 pm | अभ्या..
आँगळवाणे दिसते पण नाईलाज असतो.
हेच जाणवले. म्हणून तर दंडवत ठोकला.
15 Sep 2016 - 4:38 pm | तुषार काळभोर
टायरचा एखादा भाग थोडासा झिजला की आतून ट्यूब हवेच्या दाबाने बाहेर यायला बघते.
(हर्निया सारखा) त्याला गॅटर म्हणतात.
(गॅटर आलंय, असं अजून एका वेगळ्या संदर्भात म्हटलं जातं. पण ते एक असो...)
15 Sep 2016 - 4:58 pm | अभ्या..
आम्हाला दुसरा एकच संदर्भ म्हैते. निवांत बसून बसून पोटाला वळ्या पडल्या की त्याला गेटर आले म्हणतो.
पैलवान, तुमचा अर्थ वेगळा असेल तर सांगा की.
15 Sep 2016 - 5:04 pm | इरसाल
त्यांना जो अभिप्रेत आहे तो इतरही ठिकाणी वापरला जातो नेमका त्याच कारणासाठी.
15 Sep 2016 - 5:12 pm | अभ्या..
इरसालबुवा तेवढा
शब्द वापरु नका हो. उगीच नटून थटून, पांढरे कापड गुंडाळून स्ट्रॉबेडवर अधांतरी अधांतरी वाटते. ;)
16 Sep 2016 - 5:05 pm | इरसाल
तसला वंगाळ विचार नाही हो करत मी.
16 Sep 2016 - 5:17 pm | अभ्या..
एक दिन जाना तो है, मगर ऐसे नही. ;)
15 Sep 2016 - 5:35 pm | तुषार काळभोर
तो ' वळ्या पडणे' हा तिसराच अर्थ आहे.
पहिला टायरचा
दुसरा मला अभि*त असलेला (*च्या जागी प्रे आहे, अभ्याला अधांतरी वाटू नये म्हणुन तसं लिहिलंय :प)
तिसरा वळ्यांचा
15 Sep 2016 - 6:45 pm | सिरुसेरि
गॅटरचं जीवनातलं म्याटर गमतीशीर .
15 Sep 2016 - 6:55 pm | क्षमस्व
फक्त दण्डवत।।।
15 Sep 2016 - 11:21 pm | रातराणी
हम्म. नाही कळली.
16 Sep 2016 - 11:40 am | पथिक
नीट कळली नाही पूर्ण, पण आवडली.
17 Sep 2016 - 9:55 am | शिव कन्या
absurdity ची हीच गम्मत असते....
कळते, नाही कळत, पण मनात रेंगाळत राहते...