मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गॅटर

जव्हेरगंज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कुठेतरी फुललेलं फुलपाखरु आणि लाल फुलांचा सडा असावा वाटतं मला काही पक्षी रंगीबेरंगी किडे बाजरीचं कणीस पाणी चौफेर असावं वाटतं मला आभाळ झळाळून ऊन पडावं पंक्चर झालेल्या सायकलला वंगण लावून दमडावं रीम वाकडी व्हावी चिखलात चाक रुतावं खांद्यावर घेऊन घरला चालत जावं असावी म्हणून ठेवलेली दाढी चांगली हातभर वाढली जंगलातून भुत बाहेर पडावं तश्या माझ्या कविता अचानक आलेल्या जरीची टोपी घालूनंच मी कविता लिहायला बसतो अगदी राजबिंडा गंजलेल्या पत्र्याच्या घरात कोंबडी अंडी घालतेय टिव्हीच्या खाली डिरीवरच्या पेंडीच्या पोत्यात आजकाल चांदीची थाळी नाही मुळात म्हशी राहिल्यात किती? टंगस्टन दिव्याचा भगभगीत प्रकाश पेन चालत नाही लाकडे मसणात गेली इत्यादी इत्यादी "अरे थू..."

वाचने 4355 वाचनखूण प्रतिक्रिया 16

अभ्या.. गुरुवार, 09/15/2016 - 13:47
हान तिज्यामारी. परफेक्शन. गेटर सारखी उपमा वापरणार्‍या जव्हेरभावला साष्टांग प्रणिपात.

निनाव गुरुवार, 09/15/2016 - 13:54
+१ अभ्या जव्हेर जी - रुतलेली सायकल बरीच वेगाने पुढे गेलीये .. बर् का.. :)

इरसाल गुरुवार, 09/15/2016 - 14:11
गॅटर म्हणजे टायर फाटला की नवा टायर न टाकता फाटलेल्या जागी जुनी ट्युब किंवा टायरचा टाकलेला तुकडा.

In reply to by इरसाल

तुषार काळभोर गुरुवार, 09/15/2016 - 16:38
टायरचा एखादा भाग थोडासा झिजला की आतून ट्यूब हवेच्या दाबाने बाहेर यायला बघते. (हर्निया सारखा) त्याला गॅटर म्हणतात. (गॅटर आलंय, असं अजून एका वेगळ्या संदर्भात म्हटलं जातं. पण ते एक असो...)

In reply to by तुषार काळभोर

अभ्या.. गुरुवार, 09/15/2016 - 16:58
आम्हाला दुसरा एकच संदर्भ म्हैते. निवांत बसून बसून पोटाला वळ्या पडल्या की त्याला गेटर आले म्हणतो. पैलवान, तुमचा अर्थ वेगळा असेल तर सांगा की.

In reply to by इरसाल

अभ्या.. गुरुवार, 09/15/2016 - 17:12
इरसालबुवा तेवढा
अभिप्रेत
शब्द वापरु नका हो. उगीच नटून थटून, पांढरे कापड गुंडाळून स्ट्रॉबेडवर अधांतरी अधांतरी वाटते. ;)

In reply to by अभ्या..

तुषार काळभोर गुरुवार, 09/15/2016 - 17:35
तो ' वळ्या पडणे' हा तिसराच अर्थ आहे. पहिला टायरचा दुसरा मला अभि*त असलेला (*च्या जागी प्रे आहे, अभ्याला अधांतरी वाटू नये म्हणुन तसं लिहिलंय :प) तिसरा वळ्यांचा