व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी
- निनाव (१२.०९.२०१६)
व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी
अव्यक्त गुंत भावनांची, तुज समजेल का तरी
आठवून विसरावे तुला, प्रयत्न मज आसवांचे
विसरलोच तुला जर कधी, मी उरेन का तरी
आस ही जगण्याची मी, सोडली नसली तरी
जगलो तुझ्याच साठी, तुज उमगेल का तरी
आठवून विचारावे तुला, अर्थ मज जगण्याचे
आठवलोच मी नाही तुज, मी उरेन का तरी
बहर गोड़ मज स्वप्नांना, कधी येईल का तरी
मन बंद पापण्यांना, चिंब भिजवेल का तरी
स्पर्श एक तुझे, मज स्वप्न कोवळे स्वप्नांचे
भंगूनि स्वप्न तुझे असे, मी उरेन का तरी
प्रतिक्रिया
12 Sep 2016 - 8:32 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
मस्तच,
13 Sep 2016 - 12:48 am | निनाव
13 Sep 2016 - 12:48 am | निनाव
13 Sep 2016 - 12:48 am | निनाव
13 Sep 2016 - 12:54 am | निनाव
मराठी टंकण मज नवीन आहें
13 Sep 2016 - 7:59 am | राजेंद्र देवी
छान... आवडली
13 Sep 2016 - 10:04 am | विवेकपटाईत
मस्त कविता. गाण्यासारखी , गुणगुणून बघितली.
13 Sep 2016 - 11:04 am | निनाव
.
13 Sep 2016 - 11:54 am | निनाव
प्रिय कवि वर्ग हो, मी थोडे बदल केले आहे.. हे देखिल वाचावे नि सान्गा कि कुठले वर्जन जास्त बरे वाटते वाचायला.
- आ. विनम्र, निनाव
व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का?
अव्यक्त गुंत भावनांची, तुज समजेल का?
आठवून विसरावे तुला, प्रयत्न मज आसवांचे
विसरलोच तुला जर कधी, मी असा उरेन का?
आस मी जगण्याची हि, न सोडली जरी
जगलो तुझ्याच साठी, तुज उमगेल का?
आठवून विचारावे तुला, अर्थ मज जगण्याचे
आठवलोच मी नाही तुज, मी असा उरेन का?
बहर मज स्वप्नांना, सांग कधी येईल का?
मन बंद पापण्यांना माझ्या, चिंब भिजवेल का?
आठवून पाहावे स्वप्न तुझे, तू येण्याचे
भंगूनि स्वप्न गोड़ हे, मी असा उरेन का?
14 Sep 2016 - 3:05 pm | पथिक
छान..