दर्द - भाग १

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
22 Aug 2016 - 12:43 am

दर्द . --- भाग १ ----------- कथा --------- काल्पनीक ----------------

कॉलेजमध्ये गॅदरिंगची धामधुम चालु झाली होती . सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते . संध्याकाळची वेळ झालेली होती . हळुहळु अंधार पडु लागला होता . थोड्याच वेळात फॅशन शोचा कार्यक्रम चालु झाला . या फॅशन शोच्या वेळी आणी एकुणच पुर्ण गॅदरींगमध्ये काही गैरप्रकार घडु नये म्हणुन कमिटीने कॉलेजमधल्याच काही धट्ट्या कट्ट्या मुलांना बाउन्सर कम व्हॉलेंटिअर म्हणुन नेमले होते . हे कार्यकर्ते आपल्या खिशाला व्हॉलेंटिअरचा बॅज सगळ्यांना दिसेल असा ठळकपणे लावुन ऐटीत इकडुन तिकडे हिंडत होते . अधुन मधुन उगाचच इतरांवर गुरकावत होते . पण त्यांना कोणच भाव देत नव्हतं .

हा फॅशन शो कॉलेजमधल्याच , आपण रितीक रोशनचे जुडवा आहोत असा भ्रम असलेल्या मुलांनी आणी "फॅशन" सिनेमातला प्रियांका चोप्राने केलेला सुपर मॉडेलचा रोल खरं तर आपल्यासाठीच लिहिला होता असा गोड गैरसमज असलेल्या मुलींनी मिळुन आयोजित केलेला होता .

हि हाय फ्लायर मुले मुली जेव्हा कुठुन तरी मागुन नाहि तर इकडुन तिकडुन मिळवलेले हाय फाय कपडे घालुन स्टेजवर , या शोपुरते त्याचे तात्पुरते नामकरण रॅम्प झाले होते , तर अशा रॅम्पवर शो सादर करु लागली तेव्हा बघ्यांमध्ये एकच दंगा उसळला . कालपर्यंत आपल्याच क्लासमध्ये आपल्याबरोबर एकत्र बसणारी हि मुले , मुली आज उसना रुबाब आणुन वेस्टर्न टयुनसच्या चालीवर पावले टाकत रॅम्पवर मिरवु लागली तेव्हा शो बघत असलेल्या मुलांनी त्यांची मापे काढणे सुरु केले .

"अरे यार , जरा इधर तो देख ."
"क्या यार .. एक दिन भाडेका सुट बुट पहना तो अपने दोस्तोंको भुल गया क्या कमिने "
"चल .. पहले मेरी टाय और घडी वापस कर .."

या कॉमेंटसमधुन फॅशन शो मधल्या मुलीही सुटल्या नाहित .

"ओ मेरी मुन्नी ... मुन्नी मुन्नी बेब्बी.. कॅट वॉक करे है तेरे हाय हिल शुज.. "
"अरे जरा संभालके पगली ...नहि ते गिर जायेगी.."

अखेर अर्ध्या तासात तो शो संपला . थोड्याच वेळात गाण्यांचा कार्यक्रम चालु झाला . सगळ्यांनाच या कार्यक्रमाची उत्सुकता होती . सुरुवातीला निवेदक आणी सर्व वादक स्टेजवर आले . प्रत्येकाने आपापली जागा घेतली . सर्व वादक आणी त्यांची वाद्ये तयार आहेत हे पाहिल्यावर निवेदकाने आपल्या खास आवाजात आपले निवेदन सुरु केले .

"दोस्तों , अब आप की खिदमतमें पेश करते हैं एक अनोखी संगीतकी महफील.. आजकी शाम सुरोंके नाम.."

त्यानंतर , ज्यांना आपण चांगले गातो अशी ठाम खात्री होती अशी कॉलेजमधली काहि मुले आणी मुली एकेक करुन स्टेजवर आली आणी गाउन गेली . प्रत्येकाने आपापले गळे गाण्याच्या निमित्ताने साफ करुन घेतले . पहिली चार गाणी अशी सो सो झाली तेव्हा मुलांचाही दंगा वाढला . प्रत्येक गाण्याला त्या त्या गायकाची चांगलीच टर उडवली गेली .

निवेदकाने काळ वेळ ओळखुन आपल्या हातातल्या लिस्टमधली पुढली नावे बघीतली . आणि पुढल्या गायकाचे नाव सादर केले .

"मित्रांनो .. आणि त्यांच्या मैत्रिणींनो .. आता तुमच्यासमोर गाणे सादर करायला येतो आहे तुमचा सगळ्यांचाच आवडता गायक .. मागच्या वर्षीचा या स्पर्धेचा विजेता ..राघव.."

सगळ्यांनी या निवेदनाला आणी राघवचे नाव ऐकुन टाळ्यांचा कडकडाट केला . राघवने मागच्या गॅदरींगला , आपल्या कॉलेजच्या पहिल्याच वर्षात उत्कॄष्ट गाणे गाउन पहिले बक्षिस मिळवले होते . सर्वांचेच लक्ष आणि कान आज त्याच्या गाण्याकडे लागले होते . त्याच्या मित्रांनी त्याचे नाव ऐकताच जोरदार आरोळ्या ठोकल्या .

"राघव गुरु ..हो जा शुरु.."

"गावात गोंगाट .. राघव झिंगाट .."

राघव हसतमुखाने स्टेजवर आला . सर्वांकडे आत्मविश्वासाने पाहात त्याने उत्साहाने गायला सुरुवात केली .

"खिलते हैं गुल यहां ...खिलके बिखरनेको..
मिलते है दिल यहां ... मिलके बिछडनेको..
खिलते हैं गुल यहां.. "

राघवने मुळ गाण्याचा किंचित आर्त , किंचित खेळकर मुड व्यवस्थित सादर केला . त्याचे गाणे संपताच टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला . बहुतेकांची खात्रीच झाली की , या वर्षीही राघव विजेता ठरणार .

परत पुढले चार गायक मुले , मुली येउन गाणी गाउन गेले . पण त्यांचा राघवसारखा प्रभाव पडला नाही . सगळेच आता कंटाळले होते . तेवढ्यात निवेदकाने जाहिर केले .

"मित्रांनो .. तुमच्यासमोर आता येत आहे ..शेवटचा स्पर्धक ..लास्ट बट नॉट द लिस्ट..देविका.."

"देविका कोण ? याआधी तर कधी हे नाव ऐकले नाही .." राघवने आपल्या एका मित्राला विचारले .

"बहुतेक कुणीतरी पहिल्या वर्षातील नवीन स्टुडंट दिसतीय ." मित्राने सांगितले . सगळ्यांनाच या नविन गायिकेचे गाणे ऐकण्याची उत्सुकता लागली .

देविका शांतपणे स्टेजवर आली . या कॉलेजमधले हे तिचे पहिलेच गाणे असल्याने ती थोडी बावरली होती . पण लगेच सावरुन ती आत्मविश्वासाने गाउ लागली .

"बिती ना बितायी रैना ..बिरहाकी जाई रैना ..
भीगी हुई अंखियोंने ..लाख बुझाई रैना ..
बिती ना बितायी रैना .."

या गाण्यामधील दु:ख , दर्द , व्याकुळतेची भावना देविकाने अचुकपणे सादर केली . तिचे गाणे संपल्यावर ऐकणारे सगळे मिनीटभर शांत , निस्त्ब्ध झाले . पुढल्याच क्षणी सगळीकडुन टाळ्यांचा एकच कडकडाट झाला .

"राघव , तुला पहिल्या नंबराला टफ काँपिटिशन असली तर या देविकाचीच असेल." राघवचा मित्र कुजबुजला .

राघवलाही देविकाने म्हणलेले गाणे खुप आवडले होते . आता सगळीच गाणी झाली होती . परिक्षक निकाल तयार करण्यात वेळ घेत होते . हि वेळ साधुन राघव त्वरेने उठला . मधल्या खुर्च्यांच्या रांगांमधुन वाट काढत देविका जिथे बसली होती तिथे गेला . तिला पाहुन हसत हसत म्हणाला .

"अभिनंदन . तुमचे गाणे खुप छान झाले . मला , सगळ्यांनाच खुप आवडले . तुमच्या गाण्यातील दर्द मनाला भावुन गेला ."

देविका राघवला पाहुन आधी जरा गांगरलीच होती . तिने त्याच्या गाण्याबद्दल , त्याच्या मागच्या वर्षाच्या यशाबद्दल खुप ऐकले होते . त्याचे आजचे गाणे तिलाही खुप आवडले होते . त्याने केलेल्या अभिनंदनामुळे तिला जरा धीर आला . ती मोकळेपणाने हसत म्हणाली .

"थँक्स .. तु..तुमचेही गाणे खुप चांगले झाले . मलाही खुप आवडले ."

राघवने हसुन मान डोलावली आणि तो परत आपल्या जागेकडे निघुन गेला . थोड्याच वेळात परिक्षकांनी निकाल जाहिर केला .

"आजच्या गाण्याच्या कार्यक्रमात सर्वांनीच चांगला प्रयत्न गेला . सगळ्यांनाच विशेष करुन राघव आणि देविका यांची गाणी खुप आवडली . दोघांनाही जवळ जवळ सारखेच गुण मिळाले आहेत . पण अगदी एका गुणाने राघव हा आजचा विजेता ठरला आहे ."

सगळ्यांनी टाळ्या वाजवुन राघवचे अभिनंदन केले . राघवने स्टेजवर जाउन बक्षिस स्विकारले . पण लगेचच माईकपाशी जाउन तो बोलु लागला .

"परिक्षकांनी माझ्यावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी आभारी आहे . पण खरं तर मलाही देविका यांचे गाणे खुप आवडले आहे . मला हे बक्षिस देविका यांच्याबरोबर शेअर करायचे आहे . माझ्या मते त्यांचाही या बक्षिसावर समान हक्क आहे . देविका , प्लीज कम ऑन स्टेज . "

देविकाच्या मैत्रीणींनी तिला "जा ना .." करत बळे बळेच पुढे ढकलले . किंचित भांबावुन गेलेली देविका स्टेजवर आली . राघवने ते बक्षिस तिच्या हातात दिले . सर्वांनी परत एकदा टाळ्यांचा जल्लोश केला .

तेव्हा पासुन राघवची आणी देविकाची चांगली मैत्री झाली . बरेचदा ते गाण्याची तयारी एकत्रच करु लागले . एकमेकांना आपली आवडती गाणी म्हणुन दाखवणे . त्या गाण्यांबद्दल बोलणे हा त्यांचा आवडता छंद झाला . पुढल्या वर्षी गॅदरींगला देविकाला पहिले बक्षिस मिळाले , तर राघवला दुसरे . त्या दोघांचे मित्र , मैत्रीणी त्यांना एकमेकांवरुन चिडवु लागले . पण या दोघांना ते चिडवणेही आवडत होते .

बघता बघता राघवच्या वर्गाचा , शेवटच्या वर्षाचा सेंड ऑफचा दिवस आला . इतर सर्व वर्षांतील विद्यार्थ्यांनी मिळुन कॉलेजमधल्या एका हॉलमध्ये हा सेंड ऑफचा कार्यक्रम आयोजित केला .

राघव आणि देविकाने मिळुन या कार्यक्रमात गाण्यासाठी गेले आठ दिवस एका ड्युएट गाण्याची तयारी केली होती . गाण्याची सुरुवात देविकाने कशी करायची , आणी मग राघवने हळुवारपणे त्या गाण्यात आपले स्वर कसे मिसळायचे अशा बारीक सारीक डिटेल्सवरही त्यांनी खुप मेहनत घेतली होती .

सेंड ऑफचा कार्यक्रम सुरु झाला होता . अनेक मुले , मुली , शिक्षक आणि प्रिन्सिपॉल माईकसमोर आपले मनोगत व्यक्त करत होते . शुभेच्छा देत होते .

राघव बराच वेळ देविकाची वाट पाहात होता . पण तिचा काहीच पत्ता नव्हता . त्याला अनेक मित्रांनी गाण्याचा खुप आग्रह केला . पण तो हसुन ती वेळ टाळत होता . पुढे ढकलत होता . बराच वेळ गेल्यावर कॉलेजचा एक वयस्क शिपाई सावकाश चालत राघवपाशी आला . त्याने राघवला आपल्या खिशातुन एक चिठ्ठी दिली आणि तो निघुन गेला .

राघवने ती चिठ्ठी वाचली . त्यामध्ये फक्त "मला विसरुन जा" एवढेच लिहले होते . ते ह्स्ताक्षर राघवच्या ओळखीचे होते . देविकाचे ...

देविकाच्या या वागण्यामुळे राघवला चांगलाच धक्का बसला . राग , दु:ख , निराशा अशा अनेक भावना त्याच्या मनात फेर धरु लागल्या . त्याला काय करावे .. काय बोलावे काहिच सुचेना . तेवढ्यात त्याला मित्रांनी गाण्याचा परत आग्रह केला . त्या दु:खाच्या तिरीमिरीतच राघव माईकपाशी गेला . तो आता गाणार हे कळताच सगळे शांतपणे उत्सुकतेने त्याचे गाणे ऐकु लागले . राघव भावनांच्या भरात गात होता .

"किसका रस्ता देखें .. ऐ दिल ऐ सौदाई ..
मीलों है खामोशी .. बरसों है तनहाई .."

सगळ्यांनाच राघवचे गाणे खुप आवडले . पण सगळे थोडे चकीतही झाले . राघव अचानक असे दर्दभरे गाणे म्हणेल याची कुणालाच कल्पना नव्हती . कदाचित सेंड ऑफ नंतर आपले मित्र आपल्याला दुरावणार म्हणुन त्याने असे दु:खद गाणे म्हणले असावे अशी सगळ्यांनी समजुत करुन घेतली .

राघवची आणी देविकाची नंतर कधीच भेट झाली नाही . राघवनेही कधी तसा प्रयत्न केला नाही . देविकाने त्याला चांगलाच दर्दभरा धक्का दिला होता . त्यामुळे त्याच्या मनात कुठे तरी तिच्याबद्दल राग , द्वेश साठला होता .

त्याने स्वताला परिक्षा , अभ्यास यामध्ये गुंतवुन घेतले . कॉलेज संपल्यावर त्याला शहरातल्या एका चांगल्या कंपनीमधे लगेच नोकरीही मिळाली . त्यामुळे नोकरी , ऑफीसला जाणे येणे , जेवण खाण , झोप यामधेच तो पुर्ण बिझी झाला . बघता बघता त्याला कंपनीमधे चार वर्षे कशी गेली ते कळलंच नाही .

कॉलेजच्या बागेमधला सोनचाफा अजुनही कधी कधी त्या दोघांची आठवण काढत असतो . या बागेमधेच त्या दोघांनी एकमेकांना अनेकदा आपली आवडती गाणी ऐकवली आहेत . तिची गाणी तो मोठ्या आवडीने ऐकत असे . ती सुद्धा त्याने गायलेली गाणी जीव लाउन ऐकत असे आणि त्याच्या गाण्याला दाद देत असे . फक्त एकदाच ती त्याला भाबडेपणाने म्हणाली होती .

"तु गाणे खुप छान म्हणतोस . पण ..."

"पण .. पण काय .. बोल ना ?"

"आनंदी , खेळकर मुडची गाणी तु खुप छान गातोस .. अगदी एखाद्या निराश व्यक्तीला परत उत्साह येइल इतके छान . पण जेव्हा तु एखादे दर्दभरे गाणे म्हणतोस .. तेव्हा तेही छान जमते . पण ..त्यातला दर्द तुझ्या गळ्यातुन समोरच्या माणसाच्या मनापर्यंत पोचत नाही . त्याच्या काळजाला भिडत नाही . "

"पण मी हा असा स्वभावानेच आनंदी , खेळकर , हसतमुख . कॉलेजच्या कट्ट्यावर बसुन इतरांच्या फिरक्या घेणारा , मनमौजी . मला हा दर्द कसा मिळणार ? माझ्या गळ्यात हा दर्द मी कुठुन आणु ?"

"मलाही कधी वाटते , कि तुझ्या आसपास कसलेच दु:ख , दर्द फिरकुही नये . तर कधी वाटते की , हा दर्द जर तुला .. तुझ्या गळ्याला मिळाला तर तुझे गाणे खरे परिपुर्ण होईल . सम्रुद्ध होईल . एक दिवस तुला हा दर्द नक्की मिळेल . तेव्हा तुझ्या गळ्यातुन बाहेर पडणारे दर्दभरे सुर समोरच्याला क्षणभर या जगाचा विसर पाडेल . अंतर्मुख करेल ."

--------------- क्रमश: ----------- भाग १ --- काल्पनीक --------------

या आधीचे इतर लेखन - अनुक्रमणिका

कथालेख

प्रतिक्रिया

जगप्रवासी's picture

22 Aug 2016 - 4:25 pm | जगप्रवासी

छान सुरुवात, पुलेशु

अभ्या..'s picture

22 Aug 2016 - 4:29 pm | अभ्या..

थोडीशी टिपिकल वाटली पण येउद्यात. सफाई आलीय मस्त लिखाणात.

ज्योति अळवणी's picture

22 Aug 2016 - 4:33 pm | ज्योति अळवणी

छान आहे. पुढचा भाग लवकर टाका

क्षमस्व's picture

22 Aug 2016 - 4:51 pm | क्षमस्व

येऊ द्या पुढचे भाग!!

सिरुसेरि's picture

24 Aug 2016 - 5:33 pm | सिरुसेरि

आभारी आहे .

चिनार's picture

24 Aug 2016 - 5:41 pm | चिनार

पुलेशु !!
सुरवात मस्त !!

सिरुसेरि's picture

8 Sep 2016 - 12:50 pm | सिरुसेरि
अलका सुहास जोशी's picture

8 Sep 2016 - 1:59 pm | अलका सुहास जोशी

सिरूसेरी, दर्द चे दोन्हीही भाग वाचले. कथा आवडली

सिरूसेरी म्हणजे काय? शक्य असल्यास सांगणे.

हेच म्हणतो. दोन्ही भाग आवडले. पण सिरुसेरीचा अर्थ खरंच सांगावा. त्यांच्या कथांसारखंच आयडी नावात पण गूढता भरलेली आहे. :)
गूढकथा किंवा भयकथांवर जास्त भर द्यावा लेखनात ही विनंती.. :)

सिरुसेरि's picture

8 Sep 2016 - 2:22 pm | सिरुसेरि

Siruseri is a south eastern suburb of Chennai, India in Kancheepuram district, Tamil Nadu, located around 25 km south of the city, along Old Mahabalipuram Road. इथे काहि काळ कामाच्या निमित्ताने होतो . सिरुसेरी हे नाव साधे सोपे सरळ वाटले म्हणुन त्या नावाने मिपा आयडी घेतला .

..मला वाटलेलं फाइव एस् पैकी काही आहे की काय!!

पैसा's picture

8 Sep 2016 - 5:28 pm | पैसा

सुरुवात आवडली